Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद - ३ - कोपर्निकस ते न्यूटन

ट
टायबेरीअस
Wed, 05/06/2009 - 06:37
🗣 22 प्रतिसाद

Book traversal links for आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद - ३ - कोपर्निकस ते न्यूटन

  • ‹ आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद - २ - थोर परंपरा - शल्वसूत्रे ते टॉलेमी!
  • Up

प्रतिक्रिया द्या
8035 वाचन

💬 प्रतिसाद (22)
अ
अडाणि Wed, 05/06/2009 - 07:28 नवीन
बद्दल नुकतेच वाचनात आले कि... त्या काळी चर्च ची एवढी भिती होती कि त्याचे स्वतचे संशोधन बराच काळ प्रसिध केले नव्हते... अगदी मरायच्या आधी त्याच्या एका शिश्याने 'सुर्य केंद्रस्थानी' हे संशोधन प्रसिद्द केले.. (सुमारे १५४३) - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 05/06/2009 - 07:30 नवीन
शिश्याने नाही हो शिष्याने ! बरे मधे 'न' नाही टाकला !!! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
अ
अनंता Wed, 05/06/2009 - 07:35 नवीन
__/^\__ प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अडाणि गुरुवार, 05/07/2009 - 08:36 नवीन
तुम्ही योगी माणुस... बरे झाले सांगितले... बघा इथे पण 'न' नाही टाकला.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/06/2009 - 07:41 नवीन
गॅलिलिओ ने तर चक्क 'टेलिस्कोप' बनवून ...
हान्स लिपर्शे या डच ऑप्टिशनने टेलिस्कोप बनवला आणि डच राजाला तो दिला. त्याने त्याचा उपयोग युद्धकाळासाठी केला. गॅलिलेओला या दुर्बिणीची माहिती कळली आणि त्यानेही खटपटी करून एक दुर्बीण बनवली. गॅलिलेओ (हा आपल्याला माहित असलेला) पहिला माणूस ज्याने दुर्बिण आकाशाकडे रोखली. "त्या" (पहिल्या नव्हे) दुर्बीणीच्या जन्माला ४०० वर्ष झाली म्हणून हे वर्ष आंतरराष्टीय खगोलवर्ष म्हणून जाहीर झालं आहे. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 05/06/2009 - 09:44 नवीन
टायबेरीअस, माहीती चांगली आहे पण फारच त्रोटक वाटते. अजून जर थोडेफार स्पष्टीकरण दिले तर चांगले होईल असे मला वाटते. बाकी पुढच्या भागाची वाट पहातो आहे... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 05/06/2009 - 11:54 नवीन
खूप त्रोटक लिहिताहात. वेळ काढा. सविस्तर लिहा. 'बाराला दहा कमी'ची आठवण येतेय.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 05/06/2009 - 12:10 नवीन
जरा अजुन मोठा भाग चालेल. :-) वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विसुनाना Wed, 05/06/2009 - 12:39 नवीन
कोपर्निकस ते न्यूटन ते आईन्स्टाईन २० ओळीत हे जरा जास्तच झालं. (की फार कमी झालं?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्राजु गुरुवार, 05/07/2009 - 17:46 नवीन
थोडं सविस्तर लिहा. वाचयला आवडते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/07/2009 - 18:57 नवीन
थोडं सविस्तर लिहा. वाचायला आवडते आहे. सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावादाच्या प्रतिक्षेत...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मेघना भुस्कुटे Wed, 05/06/2009 - 14:56 नवीन
लिहा की राव अजून जरा सविस्तरपणे. मजा येतेय...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 05/06/2009 - 23:23 नवीन
छान आहे. हे अजून प्रास्ताविकच आहे (म्हणून त्रोटक असले तरी ठीक आहे.) पण नमनाला तीन छोटेछोटे क्रमशः भाग घेतले, हे बरे नाही :-) कदाचित इतके त्रोटक आहे ते बरोबर नाही. कारण ही जी काय शृंखला आहे टॉलेमी->कोपेर्निकुस->केप्लेर->गॅलिलेओ->न्यूटन ही श्रेयस्कर प्रगतीची शृंखला आहे का? (आहे असे माझे, आणि लेख लिहिणार्‍याचेही मत आहे, असे दिसते.) पण ती श्रेयस्कर का, आणि प्रगती का, हे कसे ठरवले? हे जर कळले नाही, तर ही केवळ एक पूजनीय नामावली झाली. टॉलेमी म्हणे की आकाशातील सर्व ज्योती पृथ्वीभोवती फिरतात, कोपेर्निकुस म्हणे की (पृथ्वीसह) बाकी सर्व ज्योती सूर्याभोवती फिरतात. टॉलेमीचे चूक आणि कोपेर्निकुस याचे बरोबर असे का? हा विचार नीट जर केला नाही तर दोन्ही "टॉलेमीचे म्हणणे अन् सूर्याला ग्रहणे"च्या ठिकाणी "कोपेर्निकुसचे म्हणणे अन् सूर्याला ग्रहणे" असे उत्तरोत्तर "बाबावाक्यं प्रमाणं" होईल. हा विचार "देवाची/गुरूची करणी आणि नारळात पाणी/खडकात बेडकी" यापेक्षा फार वेगळा नाही. पुढच्या लेखात आपल्याला आइन्स्टाईन भेटणार आहे. त्याने श्रेयस्कर प्रगती केली, आणखी एक फक्त पाया पडण्यायोग्य गुरू आहे? जर प्रत्येकाने प्रगती केली असेल, तर ती कशी, हे प्रास्ताविकाने समजावले असते, तर मला आवडले असते. मग आइन्स्टाइनने केलेली तीसुद्धा ऐतिहासिक प्रगती आहे, हे पुढच्या लेखात समजेल अशी रास्त अपेक्षा माझ्यात निर्माण झाली असती. - - - शैलीबाबत : न्यूटनचे लिएब्नित्सशी भांडण होते, वगैरे "गॉसिप" तपशील मला गमतीदार आणि रंजक वाटले, की थिल्लर आणि लक्ष विचलित करणारे वाटले, याबाबत माझ्या मनाची द्विधा होते आहे. बहुधा "गंमत वाटली, शैली अशीच ठेवा" या बाजूला मी कलतो आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 05/07/2009 - 09:08 नवीन
सहमत. गणित आणि आकृत्या टाळून लेख लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे असे होत असावे. पण हे टाळून लेख लिहिणे म्हणजे कदाचित ठाकूर आणि गब्बरसिंगला टाळून शोले पिक्चरची गोष्ट सांगण्या सारखे होईल. लेखाचा आकार थोडा मोठा हवा असे वाटते. तसेच न्यूटन ते आइनस्टाईन यांमधील हायगेन्स, मॅक्सवेल, लोरेन्त्झ, मायकेलसन्-मोर्ले प्रयोग यांचा आवश्यक असलेला उल्लेख टाळला आहे. तो का? आईन्स्टाईनने नवी दृष्टी देण्यापूर्वी थिअरीशी न जुळणारी निरीक्षणे जुन्या थिअरीत ठोकून ठाकून बसवण्याचे प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. कोपनिकस ते न्यूटन हा मोठा प्रवास आहे. तो एका लेखात संपवणे अन्यायकारक (वाचकांवर आणि विषयावर) वाटते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
र
राघव गुरुवार, 05/07/2009 - 14:50 नवीन
धनंजय अन् खराटा, दोघांशीही सहमत. माहिती विस्तृत अन् नेमकी असली म्हणजे बरे असते! :) (विज्ञानप्रेमी)राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ट
टायबेरीअस गुरुवार, 05/07/2009 - 16:34 नवीन
स्गळे बरोबरच सांगत आहेत. लेख थोडे सविस्तर चालले असते. विषय थोडा मोठा असल्याने, प्रास्तविक ३ भागांत विभागले होते. खराटा यांचे निरक्षण अचूक आहे. गणिताविना या विषयावर लिहायचे म्हणजे अमिताभ विना बॉलिवूड कथा लिहिल्यासारखे होणारे. अगदी आवश्यक असेल तर मी गणितात प्रवेश करणार आहे. मूळ हेतू इतिहासातून विज्ञानातला अत्यंत लोकप्रिय पण नीटसा कळलेला नसलेला ( मी ही अजून डायजेस्टतोय ;) ) विचार लोकांसमोर मांडणे आहे. धनंजय, खराटा तुमचे विशेष आभार. आता मेन लेख मोठे आणि सविस्तरच लिहीन. आणि खराटा तुम्ही सांगितलेले जवळ्जवळ सगळे शास्त्रज्ञ या लेखांमधून प्रकट होतील. -धन्यवाद! -टायबेरीअस मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 05/07/2009 - 16:49 नवीन
लेखमाला छान चालू आहे.. वाचनीय आहे.. धनंजय, खराटा यांच्या सूचना योग्य वाटल्या. पुढले भाग वाचण्यास उत्सुक आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे गुरुवार, 05/07/2009 - 17:15 नवीन
मलाही हा इतिहास जरा त्रोटक वाटला. हा प्रवास थोड्या विस्ताराने मी खालील स्थळी लिहिला आहे. वाटल्यास वाचून पहावा. http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part-15-copernicus.html http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part16-keplers-laws.html http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part-17-galileo.html http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part-18-gravitation.html आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टायबेरीअस गुरुवार, 05/07/2009 - 17:33 नवीन
खरडवहीत एक प्रश्न आलाय आणि माझ्याकडे त्याचे नक्की उत्तर नाही.. कोणास ठाउक आहे का? "जसे न्युटनला सफरचंद खाली पडताना गुरुत्वाकर्षण वगैरे ट्युब पेटली...तसे नक्की काय झाले की कोपर्निकसला वाटले की नाही पृथ्वीभोवती नाही तर सुर्याभोवती सगळे फिरत आहेत?" मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 05/07/2009 - 18:39 नवीन
न्यूटनबद्दल ही रम्य कथा मोठी गमतीदार आहे. कोपेर्निक्सबद्दल अशी कथा मला माहीत नाही. तो कॅथेड्रलच्या तटबंदीच्या बुरुजावर जाऊन आकाशाचे निरीक्षण करत असे, असे म्हणतात - पण हर त्याच्या सवयींचे वर्णन झाले, यात गमतीदार असे काही नाही. कोपेर्निकसने आकाशातील ग्रहस्थितींचे त्या काळातले सर्वोत्तम तक्ते प्रसिद्ध केले होते. त्याच्या स्वतःच्या पुस्तकात असे वर्णन आहे की "टॉलेमीच्या चर्कात-चक्रे फिरणार्‍या ग्रहमार्गांचे वर्णन निरीक्षणाशी सुसंगत होण्यासाठी ग्रहांच्या काहीच-अचल नसलेल्या गती मानाव्या लागतात...आणि ही चक्रात-चक्रे गती मनालाही आनंददायक नाही..." त्याच्या पुस्तकातील प्रस्ताविकातील इंगजी भाषांतरित काही वाक्ये -
...For these theories were not adequate unless certain equants were also conceived; it then appeared that a planet moved with uniform velocity neither on its deferent nor about the center of its epicycle. Hence a system of this sort seemed neither sufficiently absolute nor sufficiently pleasing to the mind. Having become aware of these defects, I often consideredwhether there could perhaps be found a more reasonable arrangement of circles, from which every apparent inequality would be derived...
http://dbanach.com/copernicus-commentarilous.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टायबेरीअस
अ
अमेरिकन त्रिशंकू गुरुवार, 05/07/2009 - 18:03 नवीन
टायबेरिअस, कोपर्निकसबद्दल तुमच्या लेखासाठी अजुन माहिती हवी असेल तर हा दुवा बघा. http://www-groups.dcs.st-and.ac.uk/~history/Biographies/Copernicus.html गणित,गणितज्ञ, गणिताचा इतिहास ह्याबद्दल माहिती हवी असेल तर इथे बघा. http://www-groups.dcs.st-and.ac.uk/~history/index.html
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे गुरुवार, 05/07/2009 - 18:45 नवीन
सारे ग्रह जर पृथ्वीभोवती फिरत असले तर त्यांनी वक्री होण्याचे कारण नव्हते, पण ते मागे पुढे जातांना प्रत्यक्षात दिसायचे. याचे टॉलेमीने दिलेले स्पष्टीकरणही कोपर्निकसला पटले नाही. त्याने सर्व ग्रहांच्या भ्रमणाबद्दल त्या काळी जेवढी माहिती उपलब्ध झाली त्याचा तौलनिक अभ्यास केला. कोपर्निकस गणित विषयात अत्यंत प्रवीण असल्यामुळे सूर्याच्या भ्रमणाशी इतर ग्रहांचे भ्रमण सुसंगत आहे हे त्या विश्लेषणातून त्याच्या लक्षात आले. जसे न्युटनला सफरचंद खाली पडताना गुरुत्वाकर्षण वगैरे ट्युब पेटली ही सुद्धा चुकीची समजूत आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यासंबंधी विचार करता करता न्यूटन गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतापर्यंत पोचला. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा