माझी दुपारची शाळा असे तेव्हा ११ला कामगार सभा चालू झाली कि जेवायला बसायचे आणि कामगारसभा संपता संपता म्हणजे ११:३० ला घराबाहेर पडायचे. हल्ली मुंबई केंद्र नीटसे ऐकू येत नाही पुण्यात त्यामुळे कामगार सभा ऐकली नाही बरेच दिवसात.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
ह्या गाण्यातले खालील ठळक ओळिंचे अर्थे काय आहेत?
घागर घुमूंदे घुमूंदे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे
रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा
माझं माहेर सावली, उभी दारात माऊली
तिच्या काळजात बाई, माया-ममतेचा झरा
मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात, मला मिळू दे उबारा
सौभाग्याचं लेणं, गवर माझी लेवू दे
मोरपंखी चोळी, गवर माझी घालू दे
मला पुसते माऊली, आले कोणत्या पाऊली
माझं गौराईचं पाय, माझा सोन्याचा उंबरा
गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात, गवर माझी नाचू दे
मी हो बहीण लाडकी, पंचप्राणांच्या तबकी
दिली कुऱ्हाडीची ओवाळणी, त्याचं भाव करा
माया ममतेची ममतेची, आई मला भेटू दे
माहेरपणाचं पणाचं, सुख मला लुटू दे
कशी माहेराला येऊ, शिवंवरी उभा भाऊ
गेला दगड मातीनं ओटी भरून माघारा
गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
जीव लाऊन जीवाचा, टिळा लाविते रक्ताचा
आता म्होरल्या जल्मात, नदी भेटु दे सागरा
गणपतीसोबत ज्येष्ठा कनिष्ठा गौरी तीन दिवसांसाठी येतात. त्या गणपतीच्या बहिणी असून त्या माहेरपणाला येतात, असं समजलं जातं. [म्हणूनच त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं ही असतात.] घागरी फुंकण्याचा उल्लेख ज्येष्ठागुअरीच्या कहाणीतही आहे. या गौरी माहेरी येतात, तेव्हा लिंबलोण उतरून त्यांचं स्वागत करायचं [लेक माहेरी आली की तुकडा ओवाळून टाकतात ना], माहेरी आलेल्या लेकीला काही नवं सौभाग्यलेणं आई देते, नवी साडीचोळी देते, त्याचाही उल्लेख या गीतात आहे. माहेरपणाला आलेल्या सगळ्या सख्यांच्या सोबत शेत्-मळ्यात मुक्तपणे ही लेक मुक्तपणे खेळ, गाणी, नाच यांचा आस्वाद घेते. हे एका माहेरी आलेल्या लेकीचे गीत आहे. [कुरहाडीची ओवाळणी याचा संदर्भ मात्र मला माहीत नाही. कुणाला माहिती असेल तर जाणून घ्यायला आवडेल.] कदाचित चित्रपटातील काही घटनेचा संदर्भ असेल. कितीही वय झालं तरी माहेरी जायचं म्हटलं की स्त्रीच्या मनात अशाच भावना उमलून येतात!
माझ्या अल्पमतीप्रमाणे या गीतातल्या काही ओळींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. चुभूदेघे!
:)
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
विश्लेषण. 'लिंबलोण उतरण्या'च्या उल्लेखावरून माझे लहानपणीचे एक अत्यंत आवडते गीत आठवले :"लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी.." सुंदर शब्दात पी. सावळारामांनी व्यक्त केलेल्या भावना : (ह्याच घरावर छाया धरूनी, लोभ दाविसी मायपक्षिणी, हसते घर हे तुझ्या दर्शनी, सुखव मला गे आई म्हणूनी, बिलगूनी माझ्या उरी-- असे नव्या सुनेला उद्देशून सासू म्हणते आहे), वसंत प्रभूंचे संगीत,लताचा आवाज आणि त्याला बरोबर बिलगून जाणारे लीड व्हायोलिन....
जाता जाता, 'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' ह्याच्या संगीतकार होत्या आनंदघन म्हणजे लताबाई.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी