तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !
💬 प्रतिसाद
(96)
ध
धनाजी
गुरुवार, 05/07/2009 - 14:35
नवीन
ममता दिदी ,काँग्रेस अभद्र आणी भाजपा सत्तालोलुप. छान
तुम्हाला फेगडा सलाम. छान माहिती आहे.
- Log in or register to post comments
म
मेथांबा
गुरुवार, 05/07/2009 - 15:00
नवीन
छान माहिती आहे.
लिहिल्याचं चीज झालं.
तुम्हाला फेगडा सलाम.
फेगडा हा शब्द नवा एैकतोय. त्याचा अर्थ काय?
- Log in or register to post comments
ध
धनाजी
गुरुवार, 05/07/2009 - 15:29
नवीन
कॉम्रेड मेथांबा तुम्हाला फेगडा सलाम.
आमची विचारसरणी कमुनिष्टच आहे पण आम्ही लाल शब्दाला देवासमान मान देत असल्याने तो जरा जपुन वापरतो.
चारचौघात बोलतांना फेगडा सलाम असे म्हणतो. तुम्हाला कधीतरी आमच्या सीटु मधे घेउन जाईन.
बाकी तुमचे कार्य फार स्पृहणीय आहे.
हे बघा फेगडा कुणाला म्हणतात ते ...
चित्रं काढून टाकले आहे. -- संपादक
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Fri, 05/08/2009 - 05:14
नवीन
पायानं सलाम करतात माहित नव्हतं. हे काय उफराटं? पण जर का तुम्ही त्या मुलाच्या व्यंगाची खिल्ली उडवत असाल तर तुम्ही डोक्याने अधु आहात असं खेदानं म्हणावं लागेल.
या संकेतस्थळाला कोणी शासक, नियंत्रक आहेत का? त्यांनी जरा लक्ष घालावं.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sat, 05/16/2009 - 16:40
नवीन
तिसरी आघाडी म्हणजे डावे देशातुन साफ झालेत. भारतातील लोकाना चिनी लोकांसारखी देव(सॉरी) बुध्दी कधी देणार कुणास ठाउक.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Mon, 06/22/2009 - 04:50
नवीन
तिसरी आघाडी म्हणजे डावे देशातुन साफ झालेत.
आजही कम्युनिस्ट पक्ष देशातील तिसर्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. मात्र सत्तेचा घास हातातोंडाशी येता येता का हुकला त्याचा आजही आम्ही अभ्यास करीत आहोत. ही वेळ आत्मनिरीक्षणाची आहे. त्यामुळे सध्या मी आपल्या उत्तरांवर मौन बाळगणे पसंत करेन. मात्र पुढच्या लोकसभा निवडणुकित आम्ही फ्लाईंग कलर्स घेउन तुमच्या समोर येउ.
^^^
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/22/2009 - 04:55
नवीन
सध्या मी आपल्या उत्तरांवर मौन बाळगणे पसंत करेन. मात्र पुढच्या लोकसभा निवडणुकित आम्ही फ्लाईंग कलर्स घेउन तुमच्या समोर येउ.
हे आवडले ! :)
- Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला
Mon, 05/11/2009 - 02:50
नवीन
तुझ्या धाग्याव मोठा प्रतिसाद लिहुन मी माझा अमुल्य वेळ फुकट घालवु इच्चित नाही. झोपलेल्याल उटवता येत. झोपेच सोंग घेतलेल्याल नाय.
जन्तेनं तुला उत्तर कंधीच दिलय. १६ मेपर्यंत थाम्ब.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Tue, 05/12/2009 - 08:02
नवीन
काय हि भाषा. साथी यन्ना पहिले तु स्वताची भाषा सुधार. मोठ्यांविषयी आदर वगैरे काय तुला शिकवला आहे कि नाही? माझं नाव मेथंब्या नसुन मेथांबा आहे.
तसे पण १६ मेची वाट आम्ही पण आतुरतेने पाहतोय. १६ मे नंतर पण मी मिपावर चक्कर टाकेनच.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 05/16/2009 - 10:44
नवीन
याच आता इथे!!! आम्हीही तुमची वाट बघतोय!!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/16/2009 - 10:46
नवीन
हॅहॅहॅ!!! वाट बघा...
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
व
विकि
Sat, 05/16/2009 - 21:26
नवीन
किती खुष होताय हो. कधी कधी पराभव होतोच त्यात काय पण दुसर्याच्या पराभवावर खुष होणे कितपत चांगले .
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sun, 05/17/2009 - 05:17
नवीन
आहेत, ह्यावर अवलंबून आहे. कम्युनिस्टांच्या दारूण (बंगालीत 'भीषण') पराभवामुळे राष्ट्रवादी ('हिंदूत्ववादी' नव्हे) मला अत्यानंद होत आहे. आणि हे मी लपवू कशाला? त्यांच्या राष्ट्रघातक चालींची तर मला चीड आहेच, पण तसेच गेली काही वर्षे ते जे राजकिय ब्लॅकमेलिंग करत आहेत त्याचीही चीड आहे. त्यामुळे मला आनंद होतो आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 05/17/2009 - 13:39
नवीन
त्यांच्या राष्ट्रघातक चालींची तर मला चीड आहेच, पण तसेच गेली काही वर्षे ते जे राजकिय ब्लॅकमेलिंग करत आहेत त्याचीही चीड आहे.
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
अ
अनंता
Sat, 05/16/2009 - 10:08
नवीन
आताच्या ताज्या आकडेवारीनुसार तिसरी आघाडी शेवटच्या घटका मोजत आहे.
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Sat, 05/16/2009 - 16:34
नवीन
हा हा हा!
निकाल लागल्यावर सर्वप्रथम तुमच्या लेखाची आठवण झाली!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 05/16/2009 - 18:19
नवीन
काय हि भाषा. साथी यन्ना पहिले तु स्वताची भाषा सुधार. असल्यांविषयी आदर वगैरे काय तुला शिकवला आहे कि नाही? तो "तुमचा लेख" नसून "तुझा लेख" आहे लेका !!
तसे पण १६ मेची वाट तो पण आतुरतेने पाहतोय. १६ मे नंतर पण तो मिपावर चक्कर टाकेनच.
- टारांबा
लोकांना आपण किती मोठे किंवा कसे आहोत हे कळण्यासाठी प्रोफाईल मधे आपली जम्नतारीख्,उंची,गोत्र, कंपनी आपल्याकडून किती काम करून घेते .. किंवा तत्सम माहीत का लिहीत नाही ? म्हणजे पब्लिकला कळेत तरी "टांरंबा" म्हणावे की "टारंब्या" ते =))
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 05/07/2009 - 14:43
नवीन
मेथांबाजी...
काँग्रेसने जवळ जवळ ५० वर्षांच्यावर कारभार केला (खरे तर वाट लावली देशाची)
तर ५ वर्षे स्थिर सरकार देणारे भाजप सत्तालोलुप कसे?
याचे पटणारे स्पष्टीकरण दिलेत तर बरे होईन.
सत्तेचा गैरवापर करण्याची उघड उदाहरणे काँग्रेसची कितीतरी आहेत...
एकच कायदा वापरुन गोव्यातील भाजपा समर्थित सरकार बरखास्त केले जाते आणि दुसर्या राज्यात बहुमतात नसतानाही काँग्रेस समर्थित पक्षाला सत्तासीन होता येते.
सीबीआय
क्वात्रोची
टायटलर क्लीन चीट
अजून किती प्रकरणे हवीत.
माझ्यापेक्षा येथे अनेक ज्येष्ठ लोक आहेत जे नक्की यावर उहापोह करतील
(किमान काँग्रेसविरोधी) सागर
- Log in or register to post comments
म
मेथांबा
गुरुवार, 05/07/2009 - 15:10
नवीन
काँग्रेसने जवळ जवळ ५० वर्षांच्यावर कारभार केला (खरे तर वाट लावली देशाची) तर ५ वर्षे स्थिर सरकार देणारे भाजप सत्तालोलुप कसे?
हा जर आणि तरचा प्रकार समजला नाही. दोन एकमेकांशी अजिबात संबंध नसलेली वाक्य जर-तर ने का जोडलेली आहेत. असो. भाजप सरकार स्थिर होते पण लोकांचा त्यांनी भ्रमनिरास केला. इंडिया शायनिंग चा नारा देणाऱयांना जनतेनेच अस्मान दाखवले. ते आता अडवाणींचा मुखवटा घालुन सत्तेवर येऊ पाहताहेत. पण खरा चेहरा मौतच्या सौदागराचाच असणार आहे यात शंका नाही. मात्र नितिशकुमारसारख्या लोकांना आपल्या गाड्याला बांधुन घेण्यासाठी हा मुखवटा.
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 05/07/2009 - 15:15
नवीन
इंडीया त्यावेळी खरोखर शायनिंग मारत होता राव, पण भाजपाने आपली कामे दाखवण्यापेक्षा तो नारा जास्त वेळा दाखवला ही घोडचुक मारली गेली भाजपाला मागच्यावेळी.
साला, ६० र्वषात क्रॉगेस कडून धड रस्ते तयार झाले नाहीत तेथे भाजपामुळे दोन पदरी- चार पदरी हायवे तयार केले गेले हे डोळ्यासमोर घडलेले पाहून पण तुम्हाला शंका येत हे पाहून नवल वाटले नाही कारण तुमची निष्ठा तिकडेच राहणार हे आम्हाला ही माहीत आहे त्यामुळे तुम्ही त्या विषयी लिहा उगाच टिकेला टिका करु नका.
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
म
मेथांबा
गुरुवार, 05/07/2009 - 15:30
नवीन
भाजपाने आपली कामे दाखवण्यापेक्षा तो नारा जास्त वेळा दाखवला ही घोडचुक
कामं केली असती तर नारा द्यायची गरजच कशाला पडली असती? हाथ-कंघी को आरसी क्युं !
म्हणतात ना गर्जेल तो पडेल काय ! ज्या ढगात पाणी नसते तेच आवाज करतात.
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 05/07/2009 - 16:13
नवीन
एक मोठे काम सांगू का भाजपाने केलेले?
गरिबांचे आशिर्वाद तरी मिळवले होते त्यांनी
जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवले होते भाजपाच्या सरकारने.
त्यासाठी काय काय उठाठेवी केल्या ते त्यांचे त्यांना माहीत...
पण गरिबांना ५ वर्षे एकाच दराने स्वस्त अन्न धान्य उपलब्ध करुन दिले होते...
गरिबांच्या पोटाचा विचार तरी किमान या सरकार ने केला तरी होता...
काँग्रेस राजवटीत तीच महागाई किती आसमानात भिडली आहे हे सगळ्यांना माहीत आहे
वीज
पाणी
पेट्रोल
२०-२२ रुपयाला मिळणारा तांदूळ ४०-६० रुपयांना मिळतोय
डाळींचेही तेच
साखर
दूध
गहू
बाजरी
सर्व्हिस टॅक्स वाढवला
व्हॅट सुरु केला
सगळ्यां जीवनावश्यक वस्तूंचे भाव तुम्ही पहा.
तुमचे तुम्हालाच कळेल सर्वसामान्य माणसाला काय भोगावे लागते आहे ते....
गरिबीरेषेखाली जगणारे व मध्यमवर्गीय या वर्गात मोडणारे जे आहेत ते सर्व देशाच्या बहुसंख्य लोकांमधे येतात. ९०% पेक्षा जास्त
तुम्हीच बोला मेथांबाजी... सर्वसामान्य माणसाने काय करावे?
सामान्य माणसांना अणुकरार.... विदेश दौरे या गोष्टी नाही कळत हो.... त्याला फक्त पोटाला बसणारा चिमटा कळतो....
मन मारणे कळते....
काँग्रेसने इमानेइतबारे सर्वसामान्यांसाठी काम करायचे ठरवले असते तर खरेच ५-१० वर्षे पुरेशी आहेत देशाचा कायापालट करायला.
पण सर्वात जास्त स्विस बँकेत बॅलन्स फुगवण्यात काँग्रेसी नेते आघाडीवर आहेत हे सत्य नाकारता येणार नाही... यामुळेच तर सध्याचे सरकार काळया पैशावर मौन साधून आहे आणि कोणतीही कार्यवाही करत नाहीये. चोरच कसा सांगेन ही आपली चोरी आहे म्हणून :)
आडवाणींनी राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित केला असे मान्य केले तरी सत्य नाकारता येत नाही....
अरे लेको आपल्याच कष्टाचे पैसे विदेशात पडले आहेत आणि आपण त्याच चोरांना योग्य उमेदवार म्हणून निवडून देतो याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे....
एकालाच संधी किती वर्षे देणार? झाली की ५० वर्षे... दुसर्या पक्षांना संधी नाही मिळाली तर त्यांना अनुभव कधी येणार?
आपण सर्व मतदार लाचारीने एकच पर्याय कायम निवडत आलेलो आहोत... दुसरी अनुभवाची फळी तयार करणे हे सुज्ञ मतदार म्हणून आपले कर्तव्य नाही काय?
दिसला पंजा की मार शिक्का... विचार न करता???
पहा विचार करुन माझे विचार पटले तर....
जय हिंद जय महाराष्ट्र
- सागर
अवांतरः स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाका अशी स्वतः गांधीजींची इच्छा होती म्हणे... पण नेहरु प्रभृतींनी विरोध केला आणि सत्तेत सहभागी होण्याच्या लालसेने काँग्रेस जिवंत ठेवली... आता सत्तालोलुप कोण? हे ज्याचे त्याने ठरवावे....
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 05/08/2009 - 05:57
नवीन
कशाला आपली टायपिंग शक्ती व्यर्थ घालवत आहात सागर.... राहू दे सोडा...
त्यांना चीनीच चालतो नाहीतर गेला बाझार रशिया ;)
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Fri, 05/08/2009 - 06:17
नवीन
काँग्रेस राजवटीत तीच महागाई किती आसमानात भिडली आहे हे सगळ्यांना माहीत आहे
अहो, जागतिक मंदीपुढे कोणाचे काय चालतं का? हि मंदी म्हणजे भांडवलशाही अमेरिकेचे कट-कारस्थान आहे. मंदी निर्माण करायची आणि युद्ध करायचे. काँग्रेसचा त्यात दोष तो काय म्हणतो मी.
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 05/08/2009 - 06:18
नवीन
कॉगेस भाजपा गेली खड्ड्यात तुमच्या पक्षाने काय काम केले व कुठे केले हे जरा दाखवा.
बंगाल !
जरा गुगला आकडे मिळतील सर्वच !
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Fri, 05/08/2009 - 06:33
नवीन
तुमच्या पक्षाने काय काम केले व कुठे केले हे जरा दाखवा.
बंगालमधील लोक स्थलांतर करुन नोकरीच्या शोधात मुंबईत येणाऱया लोकांचं प्रमाण सर्वात कमी आहे हि एकच गोष्ट बंगालची प्रगती दाखवायला पुरेशी आहे. केरळ तर पर्यटनाद्वारे सर्वात जास्त परकीय चलन देशाला मिळवुन देणारे एकमेव राज्य आहे.
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 05/08/2009 - 06:45
नवीन
=))
गुड जोक !
बंगाली बाबू आपला प्रांत सोडून कुठे ही जाण्यास तयार नसतो भले ही तो भुकबळी का पडेना ह्याला ते ज्वलंत राष्ट्राअभिमान म्हणतात.
बाकी,
केरळ मधील निसर्ग निर्मित साधनावर हक्क सांगताना तुम्हाला (पक्षाला) लाज वाटायला पाहीजे.
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Tue, 05/12/2009 - 08:11
नवीन
बंगाली बाबू आपला प्रांत सोडून कुठे ही जाण्यास तयार नसतो भले ही तो भुकबळी का पडेना ह्याला ते ज्वलंत राष्ट्राअभिमान म्हणतात.
भूकबळींची आकडेवारी दिलित तर बरे. म्हणजे लोकांना गोबेल्स प्रचार कसा असतो ते कळेल.
केरळ मधील निसर्ग निर्मित साधनावर हक्क सांगताना तुम्हाला (पक्षाला) लाज वाटायला पाहीजे.
कोणी हक्क सांगत नाहीये पण कम्युनिस्ट सरकारच्या योग्य पर्यटन पॉलिसीमुळेच हे शक्य झालय नाहीतर महाराष्ट्र काय निसर्ग संपदेत कमी आहे का कुठे? तो का नाही पर्यटन क्षेत्रात पुढे?
____________________________
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Tue, 05/12/2009 - 10:01
नवीन
हे हास्यास्पद म्हणायचे की दुर्दैवी?
बंगाल प्रांताला 'राष्ट्र' समजणे ह्याला दुसरे काय म्हणावे? मेथांबांच्या माहितीसाठी चीनमध्येही असे कुणी म्हणत नाही, मानत नाही. एका प्रदेशातील माणसे गरज भासल्यास दुसर्या प्रांतात जाऊन काम शोधतात. तसे झाले नसते तर चीनची दक्षिण व पूर्व भागातील विकास झालाच नसता, पर्यायाने त्या देशाचाही विकास झाला नसता.
दुसरे असे की भूकबळी पडला तरी बेहेत्तर, आमचा प्रांत सोडून जाणार नाही, ह्यात काय मोठेपणा आहे? हे प्रगतिचे लक्षण आहे की कसले?
बाकी आता तुमच्या हाती चाव्या येणार हे लक्षात आल्याने तुम्ही उडताय. भारतीय लोकशाहीचे हेच दुर्दैव आहे, माकडांच्या हाती कोलित आहे!
- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
Tue, 05/12/2009 - 10:27
नवीन
बंगालमधील लोक स्थलांतर करुन नोकरीच्या शोधात मुंबईत येणाऱया लोकांचं प्रमाण सर्वात कमी आहे हि एकच गोष्ट बंगालची प्रगती दाखवायला पुरेशी आहे. केरळ तर पर्यटनाद्वारे सर्वात जास्त परकीय चलन देशाला मिळवुन देणारे एकमेव राज्य आहे.
गैरसमज आहे.
मुंबईच कशाला,दिल्ली,बंगलोर,चंदिगड,चेन्नई,नागपुर,पुणे वगैरे ठिकाणी चिक्कार बंगाली आहेत.
सापडत नाहि तो मराठी माणूस.
स्वतःच्या राज्यात "कम्युनिस्ट" गप्पा मारणारे केरळाईटस व बंगाली प्रांताबाहेर पडल्यावर कसे झक मारत काम करतात हे कसे काय हो?
गल्फ मध्ये पोत्याने केरळावाले आहेत. जेमतेम पगारात भागवताना तिथे कोणी संप,बंद वगैरे भाषा करत नाहि. हे कसे काय बुवा?
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 05/08/2009 - 10:12
नवीन
=))
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/07/2009 - 14:43
नवीन
तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !
तुम्ही ठरवुन मोकळेपण झालात होय ? वाह !
ज्या मृणालताई कुलकर्णींना कमीत कमी ४-५ इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक सलग वाक्य बोलता येत नाही त्यांना राजा शिवछत्रपती मालिकेत नाईलाजाने का होईना शुद्ध मराठी बोलावे लागत आहे.
काय सांगता ? फारच आतल्या गोटातली माहिती बॉ तुम्हाला.
अवांतर :- हिंदी बोलताना प्रकाश कारत आणी रामदास आठवले किंवा सोनिया गांधी ह्यांचापण असाच नाईलाज होत असेल का हो ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 05/07/2009 - 14:48
नवीन
तिसरी आघाडी १६ मे ला धोतरात हात घालून पळताना दिसेल तेव्हा बघू ;)
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 05/07/2009 - 14:54
नवीन
१००% सहमत राजे
१६ मे ला संध्याकाळी १० जनपथ वर शोककळा पसरलेली राहीन यात शंका नाही...
काँग्रेसला आत्ताच वाटू लागले आहे की ते सत्तेवर येत नाहीत म्हणून राहुल गांधी ने प्रेस कॉन्फरन्स मधे
नितिशकुमार , जयललिता, यांना गाजर दाखवायचा प्रयत्न केलेला दिसतोय
- सागर
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 05/07/2009 - 14:56
नवीन
जो टाइम्स ऑफ इंडीया मागील महिन्यापर्यंत क्रॉगेस ला २२०+ जागा सांगत होता तोच आता १७५+ ची भाषा करतो आहे, एनडिए जवळ पास देखील नाही असे म्हणत म्हणत आता म्हणतो आहे की सात-आठ नंबराचा घोळ राहिल फक्त.
=))
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Fri, 05/08/2009 - 06:54
नवीन
१६ मे ला संध्याकाळी १० जनपथ वर शोककळा पसरलेली राहीन यात शंका नाही...
जशी इथं राजसाहेबांनी शिवसेनेची मत खाऊन काँग्रेसला परत सत्तेवर यायची वाट मोकळी करुन दिली तशी प्रत्येक राज्यात आमची आणि काँग्रेसची इतर बंडखोरांबरोबर आतुन युती झालेली आहे. किंबहुना खुल्ला नसले तरी राजसाहेब जसे आतुन काँग्रेसला सामील आहेत. तसे इतर राज्यात त्या त्या राज्यस्तरिय पक्षाची बंडखोर लोक आम्हाला सामील आहेतच. त्यामुळे तिसरी आघाडी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत येईल हे निश्चित.
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Fri, 05/08/2009 - 06:54
नवीन
१६ मे ला संध्याकाळी १० जनपथ वर शोककळा पसरलेली राहीन यात शंका नाही...
जशी इथं राजसाहेबांनी शिवसेनेची मत खाऊन काँग्रेसला परत सत्तेवर यायची वाट मोकळी करुन दिली तशी प्रत्येक राज्यात आमची आणि काँग्रेसची इतर बंडखोरांबरोबर आतुन युती झालेली आहे. किंबहुना खुल्ला नसले तरी राजसाहेब जसे आतुन काँग्रेसला सामील आहेत. तसे इतर राज्यात त्या त्या राज्यस्तरिय पक्षाची बंडखोर लोक आम्हाला सामील आहेतच. त्यामुळे तिसरी आघाडी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत येईल हे निश्चित.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 05/08/2009 - 07:09
नवीन
दिवसादेखिल तुम्हाला खुप छान स्वप्ने पडतात की हो.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
- Log in or register to post comments
म
मेथांबा
गुरुवार, 05/07/2009 - 15:17
नवीन
हिंदी बोलताना प्रकाश कारत आणी रामदास आठवले किंवा सोनिया गांधी ह्यांचापण असाच नाईलाज होत असेल का हो ?
नसावा किंवा होत असेल पण, पण कारतांचा बंगाली बोलताना, आठवलेंचा मराठी बोलताना आणि सोनियाचा इटालियन बोलताना नक्कीच नाईलाज होत नसेल. कुलकर्णीबाईंचे मराठी बोलायचेच वांधे आहेत. निदान माणसाने मातृभाषा तरी चांगली बोलावी.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/07/2009 - 15:19
नवीन
करात बंगाली?
माझ्या प्रश्नांची पण उत्तरे द्या.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Fri, 05/08/2009 - 07:09
नवीन
कारत की करात?
नक्की माहित नाही. विचारुन सांगतो.
करात बंगाली?
बंगाली चुकुन लिहिले. मळ्याळी असे लिहायला हवे होते. :)
http://en.wikipedia.org/wiki/Prakash_Karat
माझ्या प्रश्नांची पण उत्तरे द्या.
देतो, देतो. घायकुतीला येउ नका.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/07/2009 - 14:50
नवीन
मेथांबा, कम्युनिस्ट आणि काँग्रेस / भाजपा मधे काय फरक आहे हे समजवून सांगाल का? मी विचारधारेबद्दल नाही म्हणत आहे. एक निवडणुकीचे राजकारण करणारा पक्ष या भूमिकेवरून काय फरक आहे हे विचारतो आहे. मला काय विचारायचे आहे हे तुम्हाला समजले असेल अशी आशा करतो. नसल्यास परत नीट समजवू शकतो.
मला अजून एक विचारायचे आहे. जर का कम्युनिस्ट सत्तेत आले तर, देशहित की विचारसरणी असा प्रश्न निर्माण झाल्यास ते काय निवडतील?
यावेळी तरी प्रश्नांना उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Fri, 05/08/2009 - 07:31
नवीन
एक निवडणुकीचे राजकारण करणारा पक्ष या भूमिकेवरून काय फरक आहे हे विचारतो आहे.
१) आम्ही काँग्रेसला जरी जवळ केले तरी सत्ता उपभोगत नाही २) बाहेरुन पाठिंबा देतो ३) विचार पटले नाही तर ताबडतोब पाठिंबा काढुन घेतो. ४) सत्तेपेक्षा तत्त्व मोठे मानतो.
मला अजून एक विचारायचे आहे. जर का कम्युनिस्ट सत्तेत आले तर, देशहित की विचारसरणी असा प्रश्न निर्माण झाल्यास ते काय निवडतील?
एखादा अपवाद वगळला तर कम्युनिस्ट नेत्यांच्या देशभक्तीबद्दल आजपर्यंत कोणी संशय घेतलेला नाही. आता भाजपचेच पहा, देशभक्ती तोंडदेखली. कंदाहारला जाउन अतिरेकी सोडलेच ना.
यावेळी तरी प्रश्नांना उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो.
यावेळी तरी म्हणजे?
मी मुळातच ऑनलाईनच क्वचित असतो. जमेल तेव्हा मिपावर येतोच ना.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 05/08/2009 - 16:01
नवीन
१) आम्ही काँग्रेसला जरी जवळ केले तरी सत्ता उपभोगत नाही २) बाहेरुन पाठिंबा देतो ३) विचार पटले नाही तर ताबडतोब पाठिंबा काढुन घेतो. ४) सत्तेपेक्षा तत्त्व मोठे मानतो.
कम्युनिस्ट म्हणल्यावर आपण सर्वच "उपभोग्य" असणे/नसणे या विचारातून बघत आहात असे दिसते. वास्तवीक सत्ता ही उपभोगापेक्षा जबाबदारीने नेतृत्व आणि लोकहीत साध्य करण्यासाठी असते. त्यामुळे जेंव्हा कम्युनिस्ट काय किंवा इतर कुठलाही पक्ष काय जेंव्हा निव्वळ "बाहेरून पाठींबा" देत असतो तेंव्हा बाकी काही तर ज्यांना पाठींबा देतात त्यांच्याशी "ब्लॅकमेलींग" करत असतो.
शिवाय सत्ता उपभोगली नाही असे कसे म्हणता? - सर्वप्रथम आपण विरोधी पक्षात बसला नाहीत, तर लोकसभेचे सर्वोच्च आसन "लोकसभाध्यक्ष"पद पण आपण आपल्याकडे ठेवले.
विचार पटले नाही तर ताबडतोब पाठिंबा काढुन घेतो. : केवळ अणूकरारापोटी पाठींबा काढून घेतला. याचा अर्थ आपला काँग्रेस (युपिए) ने घेतलेल्या इतर सर्व निर्णयांवर आणि त्यांच्या एकंदरीत कारभारावर आपला शिक्कामोर्तब आहे असे म्हणायचे आहे का?
सत्तेपेक्षा तत्त्व मोठे मानतो: हा एक भंपकपणा आहे. कम्युनिस्ट तत्वज्ञानात लोकशाही मान्य नसून देखील त्यातील निवडणूकांत नुसताच सहभाग करताच ना? आणि शिवाय आता प. बंगाल मधे पण भांडवलदारांना आमंत्रीत करत असताना, सिंगूर सारख्या ठिकाणी शेतकर्यांना सत्तेच्या बळावर मारताना (आणि हो त्यात अनेक मुसलमानपण होते, माध्यमे ते सांगायचे विसरलीच!) तुमची तत्वे कुठे गेली होती?
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Tue, 05/12/2009 - 09:03
नवीन
जेंव्हा कम्युनिस्ट काय किंवा इतर कुठलाही पक्ष काय जेंव्हा निव्वळ "बाहेरून पाठींबा" देत असतो तेंव्हा बाकी काही तर ज्यांना पाठींबा देतात त्यांच्याशी "ब्लॅकमेलींग" करत असतो.
एखादे उदाहरण दिलेत तर त्यावर उहापोह करता येईल.
लोकसभेचे सर्वोच्च आसन "लोकसभाध्यक्ष"पद पण आपण आपल्याकडे ठेवले.
हे पद जेष्ठतेनुसार सोमनाथ दादांकडे बिनविरोध आले.
आपला काँग्रेस (युपिए) ने घेतलेल्या इतर सर्व निर्णयांवर आणि त्यांच्या एकंदरीत कारभारावर आपला शिक्कामोर्तब आहे असे म्हणायचे आहे का?
नाही, अजिबात नाही. पण धर्मनिरपेक्ष सरकार चालवायचे / टिकवायचे असेल तर
सतत काँग्रेसला विरोध करुन चालणार नव्हतं. नाहीतर जातीयवादी शक्तीनी डोके वर काढलं असतं. मात्र भारत जास्तच अमेरिकेच्या हातातील बाहुले बनणार हे पाहिल्यावर देशहितासाठी आम्ही अणुकराराला विरोध केला.
सिंगूर सारख्या ठिकाणी शेतकर्यांना सत्तेच्या बळावर मारताना (आणि हो त्यात अनेक मुसलमानपण होते, माध्यमे ते सांगायचे विसरलीच!) तुमची तत्वे कुठे गेली होती?
राज्यकारभार करताना चुटपुट हिंसा होतेच. पण बुध्ददेवजींनी त्याबद्दल माफी मागितलीच. (मात्र यात मुसलमान असल्याचा काय संबंध आहे ते नीट कळले नाही.) हाच मोठेपणा भाजपला आमच्या साथी शंकर गुहांची हत्या केल्यावर दाखवता आला नाही.
_____________________________
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान
- Log in or register to post comments
क
कपिल काळे
गुरुवार, 05/07/2009 - 14:50
नवीन
<<ज्या मृणालताई कुलकर्णींना कमीत कमी ४-५ इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक सलग वाक्य बोलता येत नाही त्यांना राजा शिवछत्रपती मालिकेत नाईलाजाने का होईना शुद्ध मराठी बोलावे लागत आहे. तशीच स्थिती केंद्रात काँग्रेसची झाली आहे.>>
ही उपमा ( की शिरा? की तुलना ?) समजली नाही.
तिसरी आघाडीतील प्रत्येकालाच पंतप्रधान बनायची आकांक्षा आहे, त्यामुळे ती कितपत स्थिर असेल ही शंकास्पद बाब आहे. कोण किती जोरात ब्लॅकमेल करेल त्यावर तो पंतप्रधानपदी बसेल की नाही ते ठरेल.
<<म्हणुनच प्रकाश करातजी बोलले कि काँग्रेसला आम्ही पाठिंबा देण्यापेक्षा आता काँग्रेसने निवडणुकपश्चात गपगुमान आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा>>
आमचा उमेदवार म्हणजे कम्युनिस्टांचा की? तिसरया खिचडीचा?
शीर्षक वाचून वाटलं होतं की हा विकी किंवा मेथाम्ब्याचाच धागा असणार, आणि तेच झालं.
जाता- जाता
तिसरया खिचडीतील पदार्थ.
तांदूळ- कम्युनिस्ट ( थोडे रेशनचे+ थोडे खडे+ थोडे गोटे)
डाळ- जयललिता
तेल- नवीन पटनाइक
मसाला- मायावती
बटाटे- चंद्राबाबू नायडू
शेंगदाणे/ वाटाणे/ हरभरे- लालू+मुलायम+पासवान
तोंडी लावायला- शरद चटणी
कुकर- काँग्रेस
सजावटीसाठी मुस्लीम लीग+ फारुख अब्दुल्ला अशी "हिरवीगार " पाने भुरभुरावीत. अपक्षांचा कांदा घ्यावा. इशान्येकडील संगमांचा पापड मोडावा. शिबू सोरेन कडून कढी घ्यावी.
अशी फर्मास तिसरी खचडी शिजवण्यासाठी जातीयवादी, सत्तालोलुप भाजपाची आग वापरावी!!
तिसरी आघाडी म्हणे देशाचे आशास्थान! बाझवली तुमची आघाडी.
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 05/07/2009 - 14:51
नवीन
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 05/07/2009 - 14:58
नवीन
या खिचडीतले काही पदार्थ मसाल्याचे असतात. कोणत्याही खिचडीत घातले तरी चालतात.
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
गुरुवार, 05/07/2009 - 15:25
नवीन
यातिल शरद पवार, मायावती, लालू, मुलायम आधिच बाशिंग बाधून बसलेत. कम्युनिस्ट मागच्यावेळ सारखी ऐतिहासिक चुक पुन्हा जर करणार नसतिल तर त्यांचा एक उमेद्वार! म्हनजे या खिचडीत ६-७ पंतप्रधान्पदाचे उमेदवार असतिल.... प्रत्तेक जण २० ते ५० खासदारांच्या जोरावर अख्ख्या देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न बालगून आहे. गम्मत आहे.
असो.
समजा उद्या कम्युनिस्टपार्टीचे (त्यातल्या ३-४ पक्षाच्या आघाडीचे ) सरकार आले आणि चिनने भारतावर अक्रमण केले तर कम्युनिस्तांची भुमिका काय असेल हे मेथांबा सांगू शकतिल काय?
(
धारी)आंबोळी
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/07/2009 - 20:23
नवीन
समजा उद्या कम्युनिस्टपार्टीचे (त्यातल्या ३-४ पक्षाच्या आघाडीचे ) सरकार आले आणि चिनने भारतावर अक्रमण केले तर कम्युनिस्तांची भुमिका काय असेल
चीनला आक्रमणाची गरजच लागणार नाही! आक्रमण हे विरोधकांवर करायचे असते. येथे "लाल" पायघड्या (रेड कार्पेट) स्वागत होणार म्हणल्यावर आजच्या जमान्यात भूभाग कशाला ते घेयला जातील. नैसर्गीक साधन संपत्ती, सैन्यासंबंधातील तशीच इतर स्ट्रॅटेजीक माहीती मिळाल्याशी कारण...
बाकी कपिलरावांची खिचडीची कृती (मी "पाक" हा शब्द मुद्दाम वापरत नाही ;) ) एकदम मस्तच आहे! मला एकदम "शौकीयो मी घोला जाये फुलोंका शवाब (की असेच काही!) ... " ह्या गाण्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »