अजून विचार करतो आहे.
निरागस-अल्लड उषा एकीकडे, रसिक-प्रौढ निशा, पण कवयित्री निवडते ती विचलित करणारी थोडीशी करुण संध्या.
संध्या ही दिवस आणि रात्र यांच्या मध्ये घुटमळणारी (हेलकावणारी) वेळ. पण तशीच उषा ही रात्र आणि दिवस यांच्यामधली संधिकालीन वेळ...
उषा ही गाढ निद्रेपासून जागृतीकडे जाणारी म्हणून उमलणारी-प्रसन्न म्हणावी, तर इथे रात्र प्रत्येक कडव्यात सौदर्य लेऊन आलेली आहे. फारफारतर उषा एका धुंद आनंदातून दुसर्या धुंद आनंदाकडे नेणारा सांधा आहे. पण मग संध्यासुद्धा उलट्या दिशेने तसाच सांधा आहे. पण कवयित्रीला तो संधिकाल मग्न-करुण करतो. कवयित्री असे म्हणते ते पटते, पण "असे कारुण्य का?" हा विचार गुलदस्त्यात आहे.
अजून विचार करायला लावणार्या कवितेबद्दल धन्यवाद.
या कवितेच्या बाबतीत तरी कवयित्री स्वतःच अपेक्षित उत्तर देऊ शकेल; पण सामान्यतः हा नियम नसावा असे (मला) वाटते. सांज ये गोकुळी सावळी सावळी, संधिकाली या अशा यांसारखी गीते आठवतात (जोडीलाच 'सांज ढले गगनतले हम कितने एकाकी' सुद्धा आठवतेच!)
(स्मरणशील)बेसनलाडू
अवांतर - जवळपास दररोजची संध्याकाळ व्यायामशाळेतच व्यतीत होत असल्याने (शक्यतो) करुणबिरुण वाटत नाही; प्रसन्नच वाटते :)
(हट्टाकट्टा)बेसनलाडू
संध्याकाळ ही माझी अत्यंत आवडती वेळ! ती कातरवेळ असते, हुरहूर लावणारी, अंतर्मुख करणारी. तशी नेहमीच ती उदास नसते, पण बरेचदा असं होतं. 'संध्याछाया भिवविती हृदया' ही भावना कैकदा जागी होते संध्याकाळी. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर एकाकीपणा, रितेपणा जेव्हा जास्त सलतो, तेव्हा असं काहीतरी मनातून कागदावर उतरतं. [मारवा थाटातला पूरिया शिकतेय, तोही संध्याकाळी, त्याचा परिणाम असेल कदाचित!]
तशी माझी संध्याकाळ कधी कधी अशी सुन्दरही असते.
http://www.misalpav.com/node/6781
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
सहसा कविता वाचत नाही. पण कशी कोण जाणे आज वाचली.
खूप आवडली. प्रत्येक कडव्यातील सकाळ आणि रात्र यांतील वेगळेपण आणि स्वीकारलेले/निवडलेले तिसरेच.
छान कल्पना.
खराटा
(रंग माझा वेगळा)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी