पाककृती
इंद्रधनुष्यी करंज्या
Primary tabs
ह्या करंज्या माझ्याकडील पुस्तकात बघुन मी केल्या आहेत. माझ्या कडे उपलब्ध असलेल्या सामानानुसार थोडा बदल केला आहे. ह्या करंज्या त्यातील रंगामुळे खुप
आकर्षक दिसतात. आणि अतिशय खुसखुशीत होतात.
साहित्यः
१ वाटी रवा, १वाटी मैदा, १-१/२ वाटी ओल खोबर, २ वाट्या साखर, १/४ वाटी तेल (तळणीसाठी वेगळ लागेल) , ५ चमचे कॉन्फ्लोअर
४ चमचे तुप, १ चमचा वेलची पावडर, २ चमचे बदाम, पिस्ता, काजु पावडर ( आवडत असेल तर), हवे असतील ते खाण्याचे ४ रंग.
२ वाट्या दुध.
कृती :
रवा आणि मैदा तुप घालुन मिसळुन घ्यावा. त्याचे दोन समान भाग करावेत.
एक भाग दुध घालुन घट्ट मळुन घ्यावा. उरलेल्या भागाचे पुन्हा समान चार भाग करावेत.
प्रत्येक भागात एक एक रंग घालुन ते दुधाने घट्ट मळुन घ्यावेत. आणि तयार पाचही भाग दोन तास झाकुन ठेवावेत. (तोपर्यंत मिपा वर यावे. )
खोबर आणि साखर एकत्र करुन ते शिजत ठेवावे.
सारण शिजत आल्यावर त्यात वेलची पावडर आणि बदाम ,पिस्ते,काजु पावडर घालावी.
दोन तासांनी वरील पिठाचे गोळे चांगले कुटुन घ्यावेत.
पाववाटी तेल कोमट करुन त्यात कॉन्फ्लोअर चांगले फेटुन घ्यावे.
आता पांढर्या पिठाच्या गोळ्याचे चार गोळे करावेत. आणि त्यातील एका गोळ्याची पोळी लाटुन घ्यावी.
तयार पोळीवर फेटलेले कॉन्फ्लोअर व्यवस्थित लावावे.
आता रंगीत गोळ्याची पोळी लाटुन ती पांढर्या पोळीवर पसरावी आणि त्याला कॉन्फ्लोअर लावावे.
याप्रमाणे चार पांढर्या व चार रंगीत पोळ्या एकमेकांवर पसरवून त्यांची वळकटी करावी.
तयार वळकटी लांबीच्या बाजुने कापून दोन भाग करावेत,व त्याचे पुन्हा आडवे कापून अंदाजे दोन-दोन इंचाचे तुकडे करावेत.
एक तुकडा घेऊन ज्याचे पदर दिसतात ती बाजु पोळपाटाकडे करुन पुरीसारखी लाटावी.
त्यात सारण भरुन त्याची करंजी करुन मंद आचेवर तळावी.
गार झाल्यावरच खावी.
सुरेख करंज्या..!
जियो...!
समिधा मॅडम, कृपया अश्याच रंगीबेरंगी, चवदार, चटकदार पाककृत्या अजूनही मिपावर येऊ द्यात प्लीज..
:)
तात्या.
मस्त दिसत आहेत.
हेच म्हणतो
--अवलिया
फारच सुरेख करंज्या..!
अगदी रुखवतात ठेवण्यालायक!!
नक्की प्रयत्न करेन अजुन काही पाकृ. टाकण्याचा.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
वाह! मस्तच!
-संदीप.
काय'द्याच बोला.
तुफान!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
काय जबरदस्त दिसताहेत करंज्या!! मस्तच.. :)
फोटो अफलातून आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अ़जुन २ रन्ग अस्ते तर सप्तरन्गी करन्ज्या म्हणता आले असते ;;)
चुचु
पण माझ्या कडे नव्हते गं ,पुढच्या वेळेस मिळाले तर घालेन.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
वा खुप सुंदर आहेत. मी दिवाळीत तिरंगी केल्या होत्या.
फार सुंदर दिसत आहेत ग करंज्या, क्लास!
स्वाती
मस्तच दिसत आहेत करंज्या... लवकरच करुन पहाते.
अप्रतिम दिसता आहेत ग करंज्या!!!
खुप सुंदर दिसताहेत!
मस्त दिसत आहेत. तोंडाला पाणी सुटले.
मस्त करंज्या! करुन बघणारच्.
-सुप्रिया
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
समिधा,
रंगीबेरंगी करंज्या खूपच सुंदर दिसत आहेत.
आत्ता लग्गेच करून खावाश्या वाटत आहेत.
खूपच छान! अजूनही येऊदे. :)
--शाल्मली.
दिसतंय! खूप सुरेख दिसताहेत करंज्या. =D>
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
अगं समिधा,
आत्ता बघितल्या मी करंज्या!
मस्तच दिसतायत!
वर अनंता म्हणताहेत त्याप्रमाणे अगदी रुखवतात ठेवण्यासारख्या झाल्यात.
ग्रेटच आहेस बाई तू!
रेवती