सुंदर गाणे. या गाण्याची स्केल (सुरावट) आणि त्यात सर्व कलाकारांनी घेतलेल्या इंप्रोव्हायजेशन्स आपल्या भैरवीशी मिळत्याजुळत्या आहेत. मी भैरवीच्या स्केलमधे म्हणून पाहिलं, भरपूर साम्य आहे. फक्त ऋषभ तेवढा शुद्ध आहे. भैरवीची हुरहुरसुद्धा तशीच आहे. बाकी स्पॅनिश भैरवी म्हणून म्हणायला हरकत नाही.
बाकी हे गाणं ऐकून 'ये समां, समां है ये प्यार का' या गाण्याची आठवण झाली.
हे "समा" गाणे मुद्दामून पाश्चिमात्य सुरावटीला अनुसरून जुळवले आहे का?
(नृत्यदिग्दर्शकानेही नृत्य एखाद्या बॉलरूम-डान्ससारखे बसवलेले आहे.)
या गाण्यातली पहिली थोडीशी सुरावट "बेसामे"शी अगदी मिळतीजुळती आहे. "बेसामे" आणि "समा" दोन्ही गाणी हार्मोनिक मायनर मधली सुरावट वापरतात -
सा रे ग म प ध नी सां (अवरोह तसाच.)
आता पाश्चिमात्य संगीतात रागदारी नसते, आणि स्वरानुक्रम बदलणार्या आधारस्वराशी जुळवणारा असतो. परंतु दोन्ही प्रकारच्या स्वरानुक्रमामध्ये खोलवर काही सामान्यनियम असावा असे पटते.
काही पाश्चिमात्य अभासक अभ्यास करतात, की रागदारीतील स्वरानुक्रम स्वरमेळही जुळवतो. (तानपुर्याशी स्वरमेळ जुळतो, हे सर्वांनाच माहीत आहे, त्यापेक्षा थोडा वेगळा असा हा अभ्यास आहे.) त्याच प्रकारे भारतीय अभ्यासकांनी दुसर्या दिशेने हात मिळवत अभ्यास केला, की जे "स्वरमेळाचे नियम" म्हणतात, त्यांच्यातही रागदारीची झलक दिसते, तर फार उत्तम होईल. कारण अशा प्रकारचे निरीक्षण भारतीय संगीत मनापासून समजलेल्या, पाश्चिमात्य संगीत कुतूहलाने ऐकणार्या रसिकाकडूनच होऊ शकेल.
घाटावरचे भट यांना पुनश्च धन्यवाद.
'बेसामे'ची साधारण स्केल 'सा रे ग् म प ध् नी सां' आहे. कोमल निषाद इंप्रोव्हायजेशन्स मधे दिसतो, पण फार कमी. साबालेता बाईंच्या गाण्यात कोमल ऋषभही दिसतो. म्हणून भैरवीशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न केला. बाकी गायक/गायिकेच्या शैलीनुसार इतर स्वर दर्शन देऊन जातात.
>>हे "समा" गाणे मुद्दामून पाश्चिमात्य सुरावटीला अनुसरून जुळवले आहे का?
ठाऊक नाही, पण बेसामे ऐकल्यावर लग्गेच त्याची आणि 'ये समां'ची सुरावट डोक्यात घोळायला लागली.
नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन वाचण्या/ऐकण्याची अपेक्षा पूर्ण झाली. सगळीच, विशेषतः सेसारिया एवोरा यांचे गाणे आवडले. मूळ गाणे लिहीले तिचे (कोन्सुएलो) पियानोवादन ऐकले तर सुरूवात कारूण्यपूर्ण होते, पण नंतर इतर गायकांनी भावनांचे प्रदर्शन जसे विचारपूर्वक केले आहे तसे मला वाटले नाही. तिचा आविष्कार बेदरकार आहे असे वाटले.
अवांतर -घाटावरचे भट यांनी म्हटल्यासारखी ये समा सारखी चाल वाटते आहे, खरे. आणि मला गाण्यातले काही कळत नाही हे आधी स्पष्ट करते. तरी एक दिन" ची सुरूवात (:१० च्या सुमारास) सेसारियाबाईंच्या सुरूवातीप्रमाणे वाटली. (:३७, :४० च्या सुमारास). बाकी साम्य (असल्यास) तेथेच संपत असावे.
"भी लागे" म्हणजे "भीती वाटते"
गाणे चालीत बसवायचा प्रयत्न - आणि इथे ते चालीवर गाऊन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न!
Get this widget | Track details | eSnips Social DNA
गायनासाठी नव्हे, तर चालीत बसते इतपतच दाखवण्यासाठी ही ध्वनिफीत. मागच्या तंतुस्वराच्या चालीच्या भोवती रुंजी घालणारे गळ्यातले अपस्वर म्हणजे शकुंतलेच्या भोवती फिरून त्रास देणारे भुंगे... आहाहा काय सुंदर कल्पना आहे ;-)
असाच उद्योग मी 'रंजिशी सही'च्या वेगवेगळ्या आवृत्त्या ऐकून केला होता. आशा भोसले, मेहंदी हसन, रूना लैला आणि आणिक कुणीतरी ते गायलेलं ऐकलं होतं.
पण तेव्हाही मला असाच प्रश्न पडला होता, आणि आताही पडतो - दरेक गायकानुसार गाण्यामधल्या भावात फरक पडतो हे तर मान्यच. पण त्याचे अन्वयार्थ लावताना, आपण आपल्या मूडनुसार, आपल्या पूर्वग्रहांनुसार लावतो की काय? हे एखाद्या कवितेच्या समीक्षेसारखं तर नाही? प्रत्येकाला दिसतं (इथे ऐकू येतं!) तेच आणि तितकंच खरं?
दरेक गायकानुसार गाण्यामधल्या भावात फरक पडतो हे तर मान्यच. पण त्याचे अन्वयार्थ लावताना, आपण आपल्या मूडनुसार, आपल्या पूर्वग्रहांनुसार लावतो की काय? हे एखाद्या कवितेच्या समीक्षेसारखं तर नाही? प्रत्येकाला दिसतं (इथे ऐकू येतं!) तेच आणि तितकंच खरं?
- हेच लिहायचं होतं :). रोजामधल्या गाजलेल्या 'दिल है छोटासा' या गाण्याची चाल रेहमानने एक दु:खी गाणं कल्पून लावली होती, असं त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितल्याचं आठवतं.
१९४२ अ लव्ह स्टोरी.. मधलं कुछ ना कहो हे गाणं कुमार सानू आणि लता मंगेशकर या दोघांनीही दोन वेगवेगळ्य मूड मध्ये गायलं आहे.
कुमार सानू यांनी गायलेलं गाणं एकताना, एक रोमँटीक फील येतो आणि ..
लतादीदींच्या आवाजात ऐकताना त्यात आर्तता जाणवते.. विरह जाणवतो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
दोन मूडचं एक उदाहरण, माझ्या आवडीचं - दिल ढुंढता है फिर वही फुरसतके रात दिन... मौसम!
आवडतं, कारण एक आठवण. काही वर्षांपूर्वी एकदा भर दुपारी प्रचंड कडाक्याच्या उन्हाळ्यात रस्त्यापलीकडच्या कॉलनीतून या गाण्याच्या हसऱ्या आविष्काराची सुरावट ऐकू आली आणि त्या भर उन्हातदेखील आल्हाददायक वाटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी रात्री वळवाचा पाऊस आल्यानंतर भूपिंदरचं गंभीर गाणं ऐकलं. वळवाचा पहिला पाऊस सहसा साधारण संध्याकाळी येतो. त्या दिवशी तो रात्री साडेअकराला आला. त्यामुळं तो लक्षात राहिला आणि त्यासोबत ते गाणंही.
हेच आठवायचा प्रयत्न करत होतो गेला काही वेळ! हेच गाणं मलाही आवडतं, असंच दोन मूड्स मधलं त्या त्या वेळी ते ते भावतं तेवढंच उत्कटतेने.
धन्यवाद श्रावणदा!
चतुरंग
संगीतातलं काहीही कळत नसल्यानं यात मी एक वेगळी मौज घेतो ती पहिल्या अक्षरावरची.
हसऱ्या मूडमध्ये दिल ढुंढता है यातल्या दिल शब्दाचा उच्चार किंचित 'दिल्' असा आहे. गंमत वाटते आणि तिथंच त्या गाण्याचा भावही व्यक्त होऊन जातो. गंभीर गाण्यात तो 'दि...ल' असा आहे. त्या 'दि...ल' या शब्दातच या गाण्याची भावावस्था व्यक्त होऊन जाते.
खिलते हैं गुल यहां हे शर्मिली चित्रपटातील गाणं. दोन्हीची चाल आणि शब्द जवळजवळ समान आहे. फक्त लताबाईंनी गाताना सूर लांबवत म्हटले आहे. त्यामुळे दोन्हीचा मूड वेगवेगळा भासतो.
(अशी हिंदी सिनेमांमध्ये खूप गाणी आहेत जी चित्रपटात दोन वेगळ्या वेळी वेगळ्या मूड्मध्ये गायलेली आहेत. अशी गाणी एकापाठोपाठ ऐकली की एक वेगळीच मजा येते.)
खराटा
(रंग माझा वेगळा)
गाणं तसं ठीकच वाटलं...विशेष श्रवणीय असं काहीच जाणवलं नाही..
दुसर्या चित्रफितीतील पियानोवादन मात्र झकास! तेच शेवटच्या चित्रफितीबाबत! पियानोवादनात या गाण्याचा जो आत्मा आहे तोच शेवटच्या चित्रफितीत दिसतो..
ये समा, समा है.. चा मुखडा पुष्कळसा असाच आहे..
बाकी, भटसाहेब म्हणतात त्याप्रमाणे या गाण्याचा आणि भैरवीचा मला तरी दुरान्वयेही संबंध दिसत नाही..भैरवीचा फीलच वेगळा,भैरवीचा गोडवाच वेगळा, भैरवीचा आत्माच वेगळा!
बाकी एकच गाणे अनेक गायकांनी गाण्याबाबत म्हणाल तर तो अनुभव मी आमच्या हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या अनेकानेक मैफलींमधून घेतला आहे, घेतो आहे. एखादा राग, किंवा एखादी बंदिश अनेक गायका़कडून ऐकण्यात आनंद तर वेगवेगळा असतोच परंतु तो माझा केवळ आनंदाचा विषय नसून अभ्यासाचाही विषय आहे. यामुळे गाण्यात बहुशृतता येते. एखादा गायक एखाद्या बंदिशीकडे कसं बघतो, ती कुठल्या अंगाने/बाजाने गातो किंवा एखाद्या घराण्यात एखाद्या रागाकडे कसे बघितले जाते, सुराच्या अंगाने, बोलाच्या अंगाने, लय-तालाच्या अंगाने इत्यादी..
एकाच बंदिशीबाबतची किंवा रागाबद्दलची ही विविधता आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतात अगदी ओतप्रोत आहे. खूप श्रीमंत आहे आपलं संगीत..!
असो..
धन्याशेठ, चांगला लेख. येऊ द्या अजूनही...
आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.
+१००
उत्खनन करून अजून काही हिरे वर काढा... ते वाचून-ऐकून मजा तर येईलच, पण त्यानिमित्ताने काहींच्या प्रतिभा नव्याने बहरून काही मस्त नवीन वाचायला-ऐकायलाही मिळेल !
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी