सायंटीष्ट काय उच्च शिक्षण घेणे अवघड होईल त्यांना, आहे त्या पगारात.
स्कॉलरशीपवर संपूर्ण शिक्षण होईलही, पण वाटते तितके ते सोपेही नाही.
मास्तर येऊ दे, अजून !
-दिलीप बिरुटे
"हक्क" वगैरे गोष्टींवर विचार करणे बंद केलय.
आपण आपली झापडे लावुन घेतली की जग कसे स्वच्छ दिसते. वर्तमानपत्र वाचणे बंद करुन टाकलय. त्यामुळे जगात कुठ्येच अन्याय वगैरे घडत नाहीत यावर ठाम विश्वास बसत चाललाय
आपले नाक दाबुन ठेवले की सिंहाच्याच काय आपल्या सुद्धा तोंडाचा वास येत नाही.
कान बंद केले की कशी रम्य शांतता पसरते.
आपले तोंड बंद ठेवले की कसे कोणीच आपण मनातल्या मनात केलेल्या विधानाना आक्षेप घेत नाही.
अश्राप पालक्.....अजाण बालके....कत्ले आम चे कत्ल होणाराना काहीच नाही. मग कत्ले आम ही खास बात न रहाता आम होउन जाते.
शिक्षण, नोकरी इत्यादींसंदर्भात जात आड येऊ नये असं माझं मत आहे. शिक्षणासाठी मदत करताना जातीचा विचार होऊ नये, त्यामुळे लेखाचा शेवट खटकला!
इंटीग्रेटेड एम.एस्सी.साठी प्रा. चित्रे यांनी मुंबई विद्यापीठात सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायन्सेस सुरू केलं आहे. शिवाय आयसर (पुणे, कोलकाता, मोहाली) आहेत, जिथूनही इंटीग्रेटेड एम.एस्सी. करता येतं. या कोर्सेसना बारावीनंतर प्रवेश परिक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
www.iiserpune.ac.in/ आयसर-पुणे
http://www.iiserkol.ac.in/ आयसर -कोलकाता
http://www.iisermohali.ac.in/ आयसर - मोहाली
आम्ही अजुनही आर्थिक निकषावरील आरक्षणाचे खंदे समर्थक आहोत.
अवांतरः भारतासारखा धर्मनिरपेक्ष देश कधी धर्म आणि जातिपातींवर आधारीत आरक्षणे आणि कायद्यांच्या फाट्यावर मारेल कोण जाणे?
वरिल प्रतिसाद : तात्यांकडुन ऍप्रुव्हड.
-संदीप.
काय'द्याच बोला.
प्रभु सर,
आजच्या तीव्र स्पर्धेच्या काळातल भयाण वास्तव फार परिणामकारक मांडल आहे तुम्हि. इतक्या स्वछ्छ पणे नाहि पण ह्या वस्तुस्थितिचि कल्पना बर्याच जणांना असते, राजकारण, महागाइ या बरोबर हळहळण्यासाठि एक हक्काचा विषय असतो हा बर्याच दिवाणखाण्यांतुन. पण हि परिस्थिति बदलण्यासाठि शक्य तितके सगळे प्रय्त्न करण्याचा तुमचा निर्धार खुप आवडला. त्यासाठि माझ्याकडुन खुप खुप शुभेछ्छा. काहि मदत करण्याचि संधि दिलित तर आभारि राहिन.
मुलाने सरळ बी.एस्.सी. एम्.एस.सी चा मार्ग चोखाळावा.
हे उत्तम!
म्हणजे बीएस्सी झाल्यावर आता नाही मला सायंटिस्ट बनायचं असा जर विचार मनात आला तर अन्य मार्ग उपलब्ध होऊ शकतात.
तीव्र स्पर्धेविषयी म्हणाल तर कुठलीही "करियर" करायची झाली तर तीव्र स्पर्धा ही असतेच.....
सायंटिस्ट व्हायला स्पर्धा आहेच पण सायंटिस्ट झाल्यानंतरची स्पर्धा तर जास्त तीव्र आहे....
पण त्याचबरोबर हुशारी आणि मुख्य म्हणजे प्रचंड मेहेनत करायची क्षमता असेल तर मार्गही निघतात....
तात्कालिक अपयशांनी/ अडचणींनी निराश न होता काम करीत रहाणे हा तर सायंटिस्ट होण्यासाठी सर्वात आवश्यक गुण आहे, हुशारीपेक्षाही!!!
त्या मुलास आमच्या शुभेच्छा!!!
शास्त्रज्ञ तितुका मेळवावा |
शास्त्र विचार वाढवावा ||
म्हणजे बीएस्सी झाल्यावर आता नाही मला सायंटिस्ट बनायचं असा जर विचार मनात आला तर अन्य मार्ग उपलब्ध होऊ शकतात.
हुशार माणसाला कोणत्याही वयात, कितीही पदव्या घेतल्यानंतर मार्ग बदलायचा असेल तरीही फारसे प्रश्न येत नाहीत.
तात्कालिक अपयशांनी/ अडचणींनी निराश न होता काम करीत रहाणे हा तर सायंटिस्ट होण्यासाठी सर्वात आवश्यक गुण आहे, हुशारीपेक्षाही!!!
काका, अगदी लाख मोलाचा सल्ला दिलात ... धन्यवाद (व्यक्तीगत माझ्याकडूनही!)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी