लेख छान झालाय. पुढच्या भागांची वाट पाहतो. मद्रासमधल्या सार्वजनिक परिवहनाच्या बसेसमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्या राखीव जागा विभागणारा एक मोठा दोरखंड बसमध्ये असतो असे कुठेसे वाचले होते. बाकी मुंबईचा म्हटल्यावर थोडंफार यक्षलोकातून आल्यासारखा पाहण्याचा, बदलणारा दृष्टिकोन रंजक आहे. थोड्याफार फरकाने मलाही असे एक-दोन अनुभव आले होते. अगदी पेशावरसारख्या दूरच्या शहरातही याच जातकुळीचे अनुभव आल्याचं भारत-पाकिस्तान क्रिकेट दौर्यावर गेलेल्या लोकांनी नमूद करून ठेवलं आहे.
कलंदर मॅडम, छान लिहिलंय. आवडलं. चांगलं लिहिलं असेल तर टंकलेखनाकडे लक्ष जात नाही. आणि फारशा चुका पण नाहीयेत. सो, पर्वा इल्ले, जस्ट राइट पण्णी...
मला तमिळलोकांबरोबर खूप सहवास लाभला आहे. त्यांच्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल पराकोटीचे अभिमानी (खरं तर दुराभिमानीच) असतात बहुतेक जण. जगात तमिळ आणि (चुकीचे) इंग्लिश या दोनच भाषा आहेत असाच बर्याच जणांचा समज असतो. ;) आपली दखल न घेता निवांतपणे आपापसात तमिळमधून बोलत राहतात. आपण आपल्या अस्तित्वाची जाणिव करून दिल्यावर "काय तुम्हाला तमिळ कळत नाही?" असा खरोखरचा प्रश्न त्यांना पडत असावा. अर्थात सन्मान्य अपवाद आहेतच. पण सर्वसामान्य लोक असेच. असो.
मुंबईच्या लोकांबद्दल केवळ मद्रासमधेच नाही तर पूर्ण भारत - पाकिस्तानातले लोक वेगळ्याच दृष्टीने बघतात हा अनुभव मलापण आहेच. त्यांना वाटते की आपण अगदी फिल्मस्टार्सच्या अवतीभोवतीच राहतो.
बिपिन कार्यकर्ते
मद्रास सफर आवडली. :)
अवांतर : वाईट संस्कार? तमिळ नट्या हिन्दी नट्यांपेक्षा जास्त बोल्ड असतात म्हणे! [खरं-खोटं देव जाणे]
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
बाँबे गर्ल...मस्तच लिहीलं आहेस.
मद्रास (आता चेन्नई) शहरातल्या बस सेवेबद्दल मी लिहायचे राहूनच गेले.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तिथे बायकांसाठी एक अख्खी बाजू राखीव असायची आणि ती बाजू मोकळी असली तरी त्यावर कोणत्याही पुरुषाने बसू नये असा दंडक होता. अर्थात आता कदाचित नियमात काही बदल झाला असल्यास मला माहीत नाही.
बंगलोरमध्येही हा अनुभव आला होता. एकूणच दक्षिण भारतात स्त्रियांना मान आहे हे पदोपदी जाणवते. स्त्री-दाक्षिण्य ह्या शब्दाचा उगम ह्यातूनच तर झाला असावा काय? ;)
मी सुद्धा एकदा त्या मोकळ्या जागेवर बसलो असतांना बसमधील इतर मद्रदेशीय जन्ता माझ्याकडे ज्या विचित्र नजरेने पाहात होती ते आठवले. नंतर स्वतः वाहक महाशय(कंडक्टर)माझ्यापाशी येऊन सांगते झाले....कुड्कुड्कुड.
मी नकारार्थी मान हलवली. तेव्हा त्याच्या लक्षात आले आणि तो इंग्लीशमध्ये बोलला आणि तिथला कायदा मला समजला.
जागा मोकळी असतानाही त्यावर बसायचे का नाही? ह्यावर मी माझ्या परीने वाद घातला पण बसमधील बाकी यच्चयावत लोक माझ्या विरोधात दिसल्यामुळे मी यशस्वी माघार घेतली.
येऊ द्या तुमचेही अनुभव....भरभरून आणि जरा सविस्तर लिहा एकेक अनुभवाबद्दल.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
माझ्या एका तामिळ मित्राला मी जेव्हा हे अनुभव सांगितले, तेव्हा त्याने सांगितले की दाक्षिणात्य पुरूष जास्त कामुक (अक्षरांचा रंग बदलत नाहिये) असतात.. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना अशा अनुभवापासून वाचवण्यासाठी असे नियम बनवले गेले आहेत.... ( जरा आठवा... दाक्षिणात्य चित्रपट.... नि त्यातली...ऐकलेली... पाहिलेली..... भडक... ओंगळवाणी द्रूश्ये.....)
यात स्त्रिदाक्षिण्याचा भाग कमीच....!!!!
मस्त कलंदर
मद्रासची सफर आवडली. अजुन विस्ताराने लिहावे असे वाटते.
अवांतर : आजकालच्या दाक्षिणात्य चित्रपटात नायकाकडे पहायला वेळ कुठे असतो...;)
-संदीप.
काय'द्याच बोला.
लेख आवडला.
दाक्षिणात्य पुरूष जास्त कामुक (अक्षरांचा रंग बदलत नाहिये) असतात.. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना अशा अनुभवापासून वाचवण्यासाठी असे नियम बनवले गेले आहेत
बेंगळूरुमध्ये तरी बाहेरून आलेल्या मुलीना हे अनुभव येतात असे ऐकले आहे.त्यात विदेशी पाहुणे असाल तर बघायलाच नको.व्यक्ती दिसेनाशी होईपर्यंत टक लावून बघणे हे ईकडे नेहमीचे आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मस्त लिहिलं आहेत कलंदर ताई! वाचायला मजा आलीच, पण दोन महिन्यांच्या बंगळूरूच्या वास्तव्यात आलेले अनुभव पुन:पुन्हा येत आहेत असं वाटलं. फक्त मीच नाही, इतर मुंबईच्या मुलींकडेही लोकं "बाँबे गर्ल" म्हणून पहातात यामुळे खरंतर समदु:खी मिळाल्याचा फार आनंद झाला! ;-)
छान लिहिलं आहेत. टंकलेखनाची सवय होईल तसं तुम्हीही तावच्या ताव भरून लिहायला लागाल आणि त्याचा आनंदही होईल तुम्हाला!!
अवांतरः टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी "इनपुट फॉरमॅट"वर क्लिक करा. तिथे 'फुल एच.टी.एम.एल.' सिलेक्ट करा, रंग बदलतो. इथेही तेच केलं आहे.
कलंदरताई,
चांगलं लिहिताय की. आणि हो त्या क्रोमच्या नादी नका लागू बरं. त्याद्वारे गुगल आपली माहिती ठेवतं असं ऐकुन आहे.
आता मुद्द्याचं.
हे तामिळी अंमळ वेडपटच असतात असं माझं वैयक्तिक मत आहे. पराकोटीचा दुराभिमान हा त्यांचा (बहुतांशांचा!) सहज दिसणारा (अव)गुण.
बाकी, तुम्हाला आलेले अनुभव खरंच विचित्र आहेत बॉ. कमाल आहे ह्या लोकांची. कै च्य कै इमेजेस डोक्यात ठेऊन वावरतात हे लोक.
एक असाच किस्सा: मुंबईच्या आय-फ्लेक्समध्ये माझा एक मित्र होता त्या टीममध्ये १४ तामिळी आणि हा एकटा मराठी. तर म्हणे त्यांच्या ग्रुप मिटींगाही तामिळमध्येच चालायच्या. मित्रानं भांडून भांडून एच आर कडे वगैरे तक्रारी करुन त्यांना इंग्रजीत उतरवलं..हिंदीचा प्रश्नच नव्हता..एकालाही येत नव्हतं. तर, तामिळ परवडलं पण इंग्रजी आवरा अशी गत झाली म्हणे. :)
बाकी, स्त्रीदाक्षिण्य, मुलीबाळींना जपणं वगैरे गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत, पण त्यांचाच उदोउदो करणारे प्रादेशिक चित्रपटात मात्र मुच्च्छड अगडबंब पंक्चर काढणार्यासारखे दिसणारे हिरो आपल्या लेकीच्या वयाच्या हिरोइनला चतकोर रुमालापासुन केलेल्या कपड्यांत नाचवत कवटाळताना पाहिले की नक्की खरं काय असा प्रश्न पडतो.
असो, आणखी येऊ द्या तुमचे असेच अनुभवकथन.
- (रात्री बेरात्री उदया, सुर्या टिव्ही चोरुन पाहणारा आंबटशौकिन) धमालमणि मुथ्थु :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
मुच्च्छड अगडबंब पंक्चर काढणार्यासारखे दिसणारे हिरो आपल्या लेकीच्या वयाच्या हिरोइनला चतकोर रुमालापासुन केलेल्या कपड्यांत नाचवत कवटाळताना
या हिरोबद्दल काहीतरी कॉमेंट केली (हिंदीत) म्हणून मद्रासमधला रिक्शावाला मारायला (अक्षरशः) धावला होता.
बिपिन कार्यकर्ते
बिपिनदा, तुम्हाला तो रिक्षावाला मारायला धावला असेल.. पण मला मात्र तिथे त्याचे जोक्स रंगवून रंगवून सांगितले... त्यातले बरेचसे आपण ईकडे रजनीकांथ च्या नावावर ऐकले आहेत...
मस्थ ;p कलंदर
बिपिनदा, तुम्हाला तो रिक्षावाला मारायला धावला असेल.. पण मला मात्र तिथे त्याचे जोक्स रंगवून रंगवून सांगितले... त्यातले बरेचसे आपण ईकडे रजनीकांथ च्या नावावर ऐकले आहेत...
त्यातला मला आवड्लेला विनोदः
करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेच्या एकदा मनी आलं या चालीवर.. एकदा न्यूटनच्या मनी आलं, की आपण एवढ्या मोलाचे गतिविषयक नियम सार्या जगाला सांगितले... जाऊन पाहुयात तरी ही मंडळी त्यांचा कसा उपयोग करताहेत ते.. नि त्याचं दुर्दैव असं, की पॄथ्वीवर तो उतरला नेमका विजयकांत च्या शूटींग लोकेशनवरती...
तिथे.. विजयकांतला १० गुंडानी घेरलेले असते.. वि. चे पिस्तुल रिकामे असते.. सगळेजण त्याच्या दिशेने गोळ्या झाड्तात... हा माकडासारखा ईकडेतिकडे उड्या मारत राहतो... गुंडांच्या गोळ्या संपतात... आता हा अरविंद त्रिवेदी स्टाईलमध्ये ही ही करू लागतो... सगळे चक्रावतात... हा पिस्तूल उघडून दाखवतो.. त्याने सगळ्यांनी झाडलेल्या गोळ्या आपल्या पिस्तू्लमध्ये झेललेल्या असतात.. :))
न्यूटन आत्महत्या करतो (मेलेला असून देखील)
मस्थ ;p कलंदर
आवडला लेख. दाक्षिणात्य लोकांमध्ये स्रीला मान वगैरे असतो असं वाटत नाही, कधी कधी - खरंतर बर्याचदा, बसमध्ये बसायची वेगळी व्यवस्था आहे, हेच उत्तम असे वाटते!
मद्रास! मद्रास बद्द्ल सगळं नकारार्थी पाहुन अजिबात आश्चर्य नाही वाट्लं.
पण मद्रासचे दिवस आम्ही सर्व मित्र मात्र मनापासुन miss करतो. तुम्हाला चार गमतीच्या गोष्टी सांगतो कदाचीत तुम्हीही आठ्वणी गोळा करुन परताल. :)
मद्रास म्हट्लं कि पहीला प्रश्न असतो खाण्याचा, तुम्ही IIT मुख्य लायब्ररी जवळील मेस मध्ये सकाळी जाउन पुरी-भाजी खाउन पाहीली आहे का? (नाव विसरलो, पण आमचे आवड्ते ठिकाण) तिथला डोसा तर अप्रतिम असतो! सांबार बंगलोर ला लाजवेल असं! कधी सकाळी सकाळी सहाला बाहेर येउन पहा, पहील्या घाण्याच्या इड्ल्या अन मेदुवड्यासाठी आम्ही रात्रं जागुन काढायचो, सहाला दाबुन खायचं आणि मग द्यायची ताणुन! रुपया दिड रुपयाला एक इड्ली, काय सुख होतं, श्या!! पाणि सुट्लं. :)
सात-आठ दिवसांत आंघोळ केली नसेल असा तो अण्णा, त्याचं ते संपुर्ण ओशट असं गाळा वजा हॉटेल, त्याचं नावच आम्ही dirty tea shop ठेवलं होत, पण त्या वाफाळलेल्या इड्ल्या समोर आल्या कि जगी सर्व-सुखी आम्हीच.
सेंन्ट्रल रेल्वेस्थानकाच्या मागे शिवसागर मध्ये मस्त पावभाजी मिळते. नुंगंबक्कम ला काही चांगली युरोपयीन ठीकाणं ही आहेत.
मद्रासच्या काही आवड्लेल्या गोष्टींमध्ये: भर उन्हाळ्यात मिळनारं ते एक रुपयाचं पाण्याचं पाकिट, १० रु. मध्ये इगा वा सत्यम मध्ये पाहीलेले ते सिनेमे, मोकळी लोकल वगेरै वगेरै. असो, आवरायला हवं! :)
नक्कीच पुण्यामुंबईची सर नाही मद्रासला पण लोकांचा साधेपणा मात्र चकित करुन जातो.
असो, IIT म्हणजे आमचं दुसर घर तिथलं, सिंधु नाही तरि क्रुष्णा, आठ्वणी ताज्या करुन दिल्याबद्द्ल मनापासुन आभारी आहे.
सगळ्याच आठवणी नकारार्थी नाहीत... पण मद्रास म्हटले.. की पहिल्यांदी हेच आठवते म्हणून.. काही चांगलेही अनुभव आहेत.... येतीलच ते मिपावर एक दोन दिवसांत..
मस्त कलंदर..
हे जीवन सुंदर आहे..
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी