कलादालन

बाबुजी.. एक रेखाटनाचा प्रयत्न.

Primary tabs

साद स्वरांची अलगद देते स्पर्श सुखाचा नवा.. नाद सुरांचा गाऊन जातो संध्याचळी मारवा! गोड सुरावट सहज छेडती बोल अमृताचे.. ताल लयीचा तोल पेलती साज प्रेषिताचे!! राघव Image removed.From Sketches
अनंता

|| विमोह त्यागुन कर्मफलाचा, सिद्ध होई पार्था ||
|| कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्था ||

मराठमोळा

अतिशय सुरेख रेखाटन.
राघव.. प्रतिभेला प्रणाम ..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्रमोद देव

पण अजून प्रगतीला बराच वाव आहे.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

विसोबा खेचर

राघवदादा,

सुरेख रेखाटन..

बाबुजींचा अगदी प्रसन्न मुद्रेतला हा मूळ फोटू आहे. आपल्या रेखाटनातही ती प्रसन्नता अगदी तशीच आली आहे..

मनापासून अभिनंदन...

आपली अशीच एकसे एक रेखाटने यापुढेही मिपावर यावीत हीच इच्छा!

आपला,
(बाबुजींचा शिष्य) तात्या.

नुस्तं सुंदर एवढंच नाही म्हणता येत ... बाबुजी संवाद साधत आहेत असं वाटत आहे. डोळा खूपच आवडला, डोळ्यामुळेच संवाद साधत आहेत असं वाटतंय.

ध्रुव

फारच जबरदस्त आहे. एकदम बोलकं

--
ध्रुव

अवलिया

मस्तच रे !!!

--अवलिया

ऋषिकेश

सुंदर! अतिशय बोलके, भावपूर्ण रेखाटन
पु.रे.शु.

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

अप्रतिम, राघवा, अप्रतिम. विशेषतः डोळा खूपच छान आहे. मला वाटतं की कोणत्याही चित्रात रेखाटनात डोळाच सगळ्या जास्त अवघड असतो ना? इथे खूपच सुंदर जमलाय तो.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग

(काव्यपंक्तीही तुझ्याच की काय? त्याही सुंदर आहेत!)

चतुरंग

राघव

सगळ्यांचे मन:पूर्वक आभार! :)

देव काका,
सुधारणा तर असायलाच हव्यात. मलाही त्याची कल्पना आहे. पण तुम्हाला ज्या सुधारणा अभिप्रेत आहेत त्या थोड्या विस्तृतपणे सांगा. मी नक्की तसा प्रयत्न करेन.

तात्या,
अहो हे काय सांगायला हवे? चांगले काही जमले की अगोदर मिपावर टाकल्यावाचून राहवत नाही आता! :)

बिपिनदा,
डोळे सगळ्यात महत्त्वाचे हे खरेच. मुख्य भाव त्यानेच व्यक्त होतो. अर्थात सोबत बाकीचा चेहरा पूरक असायला हवा नाही तर हवा तसा भाव दिसत नाही. :)

रंगदा,
होय! काव्यपंक्तीही माझ्याच आहेत. आज सकाळीच सुचल्यात. तशाच टाकल्या इथे. चित्र मात्र जवळपास २-३ दिवस झालेत करतोय.

आपला,
राघव

लिखाळ

वा !! मस्त चित्र ! अभिनंदन..
-- लिखाळ.

मदनबाण

व्वा...राघवजी फारच सुंदर रेखाटले आहे तुम्ही हे बाबुजींचे चित्र.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्रान्ति

अप्रतिम रेखाटन आणि काव्य!
=D> क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

बेसनलाडू

आवडला. अभिनंदन नि शुभेच्छा!
(आस्वादक)बेसनलाडू

यशोधरा

>>काव्यपंक्तीही माझ्याच आहेत

सुरेख आहेत!

लवंगी

दोन्हि अप्रतिम.. अजून रेखाटने पहायला नक्कि आवडेल

बाकरवडी

अ प्र ति म !

:B :B :B बाकरवडी :B :B :B

राघव

सगळ्यांचे पुनःश्च आभार! :)

राघव