खुपच छान फोटो आहेत आणि आमच्या साठी हे फोटो दुर्मिळच आहे.
आणी प्रत्येक फोटोचे केलेले शब्दांकन तर उत्तमच. =D>
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
गुरुजनांना साष्टांग दंडवत....
त्यांच्या पायाची धूळ जरी होऊ शकलो तरी जन्म सार्थकी लागला असं म्हणावं अशी "माणसं"...कुमारांच्या साथीला असलेले वसंतराव किती वेगळे दिसत आहेत. आजच उस्ताद अब्दुल करीम खासाहेबांची झिंजोटी रागातली १९०५ सालातली एक चिज ऐकली, शब्द अजुन जुळवतोय, पण करीम खांसाहेबांचा आवाज अतिशय मृदु म्हणावा असाच. अण्णांच तर न बोलण्या पलिकडचं गाणं.
चित्र सुंदर. तात्या बर्याच दिवसात असा एखादा लेख आला नाही असं राहुन राहुन वाटु लागलं आहे.
वाटाड्या...
तात्या , हि दुर्मिळ प्रकाशचित्रे दाखवुन एक वेगळाच आनंद मिळाला. गायन क्षेत्रातील आपली मुशाफिरी हि अवर्णनीय अशी आहे. आपली गाण्यावरची निष्ठा, प्रेम ठायी ठायी जाणवत रहाते. या गंधर्व कलेचा आपला अभ्यास याची साक्ष देतो ! आपला प्रत्येक लेख वाचनीय तर असतोच पण तो मनाला एक सात्विक आनंद देतो. जेष्ठ कवि कुसुमाग्रजांवरील लेख सुद्धा खूप आवडला . आपले अभिनंदन !!
फ़ोटू आणि माहिती दोन्ही छान!
भास्करबुवांची एकही साधी रेकॊर्ड नाही हे पुलंनी लिहिलेले वाचून खूप वाईट वाटले होते. पण बाकीचे कधी कधी ऐकत असतो. जास्त समजत नाही संगीतातले पण सूर आवडतात.
राघव
अजून काही छायाचित्रं:
१) हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाइ राणे
२) बडे गुलाम अली खान
३) मास्टर कृष्णराव
४) भास्करबुवा बखले
एका मैफीलीत घेतलेलं छायाचित्रं. सगळ्यात उजव्या बाजूला लोकमान्य टिळक बसले आहेत.
५) वसंतराव देशपांडे यांची आणखी एक भावमुद्रा:
६) चिदानंद नगरकर (तबल्यावर उस्ताद अल्लारखाँ)
सुमीतराव,
चित्रे आवडली.
चवथ्या चित्रात टिळकांच्या दिशेला दोघे तिघे मान वळवून पाहत असल्याने टिळक कोठे आहेत ते ओळखणे सोपे गेले :)
यावरुन 'दोन्-तीन सारख्या दिसणार्या, एकसारखाच पोषख केलेल्या माणसांत खरा राजा कोण' ते बिरबल (की तेनालीराम?) कसा ओळखतो त्या कथेची आठवण झाली :)
-- लिखाळ.
चवथ्या चित्रात टिळकांच्या दिशेला दोघे तिघे मान वळवून पाहत असल्याने टिळक कोठे आहेत ते ओळखणे सोपे गेले
खरच. माझ्या आधी लक्षात नव्हतं आलं. दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
सगळी छायाचित्रे [प्रतिसादातली पण] आणि माहिती हा अत्यंत अनमोल खजिना आहे! तो सांभाळून ठेवून आमच्यापर्यंत पोहोचविणा-यांना धन्यवाद.
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
वसंतखांचा मुडातला फोटू काळजाच्या तारा छेडून गेला! अतिशय प्रसन्न भावमुद्रा!
पहिल्या फोटोत बुवांच्या चेहेर्यावरचा करारीपणा नजरेत भरण्याजोगा!
सर्वच चित्रे अमूल्य. :)
चतुरंग
तात्या हा दुवा अतिशय सुंदर आहे. 'जतन करण्याचे पान' आहे.
तुम्ही लिहिलेली माहिती थोडक्यात पण सजवणारी खुलवणारी आहे.
काहीना आयुष्यात नशीबाने खूप काही मिळते. ते मिळाले हे कळणे, त्यावर भाळणे, स्वतः त्या आनंदात डुंबून मग इतरांनाही त्यात सहभागी करून घेणे - सगळेच विलक्षण. या प्रत्येक एकेका पायरीवर माणसाची श्रेष्ठ गुणवत्ता वाढत जाते! तुमच्याबद्दल तसे वाटले.
तुम्ही मागे एकदा गोविंदरावांचे हार्मोनियम ऐकवले होते दुर्मिळ दुवा देऊन. पुढे कधी त्या धर्तीवर लिहिले नाहीत. बहुतेक 'पंचवार्षिक योजना' दिसते!
काहीना आयुष्यात नशीबाने खूप काही मिळते. ते मिळाले हे कळणे, त्यावर भाळणे,
लाख बोललात केळकरसाहेब. जे मिळाले त्यावर भाळणे महत्वाचे..!
स्वतः त्या आनंदात डुंबून मग इतरांनाही त्यात सहभागी करून घेणे
हा गुण माझा नव्हे. तो मी माझे गुरुजी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्याकडून शिकलो. ते मला एकदा म्हणाले होते, 'बाबारे, तुला जे भावेल, आवडेल,रुचेल, ते तुझ्या परिने जगालाही सांग. अगदी हातचं काहीही राखून न ठेवता..!'
प्रत्येक एकेका पायरीवर माणसाची श्रेष्ठ गुणवत्ता वाढत जाते! तुमच्याबद्दल तसे वाटले.
मनापासून धन्यवाद केळकरशेठ. आजवर खूप भन्नाट आयुष्य जगलो. तेही अगदी भरपूर आणि मनमुराद. मग एखादं छानसं गाणं असो, की जीव ओवाळून टाकावी अशी कांद्याची भजी असोत, की इंदौर-उज्जैनीची रबडी असो, की एखादी मनमोहक, चित्ताकर्षक ललना असो! मी भाळलो नाही असं कधी झालं नाही!
अर्थात, ललनेच्या बाबतीत बेताबेताने आणि मनातल्या मनात भाळलो हे वेगळं सांगायला नको! ;)
तुम्ही मागे एकदा गोविंदरावांचे हार्मोनियम ऐकवले होते दुर्मिळ दुवा देऊन. पुढे कधी त्या धर्तीवर लिहिले नाहीत. बहुतेक 'पंचवार्षिक योजना' दिसते!
अहो तसं नाही. अलिकडे बर्याच दिसांनंतर टाईम भेटला. अजूनही माझ्या संग्रही अनेक दिग्गजांची खूप काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणे आहेत. इतकी, की त्यावर जर लिहू लागलो तर कित्येक लेख व्हावेत. यात जराही अतिशोयोक्ति नाही. अहो आजपर्यंत ऐकलेल्या नानाविध मैफली, त्यांच्या आठवणी आणि इथून-तिथून जमवलेली एकसे एक दुर्मिळ ध्वनिमुद्रणे एवढीच काय ती या तात्याची आयुष्यातली कमाई आहे. मात्र ती आयुष्यभर पुरेल हे नि:संशय!
आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्या.
एक निवेदन--
मिपाच्या मुखपृष्ठावर येणार्या फळं, सँडचिचं किंवा अन्य तत्सम पदार्थ खाणार्या बायकांची प्रकाशचित्रेदेखील माझ्या संग्रहातीलच आहेत याची नोंद घ्यावी..
निवेदन संपले! :)
तात्या.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी