Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली

घ
घाशीराम कोतवाल १.२
Sat, 05/16/2009 - 12:54
🗣 78 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15619 वाचन

💬 प्रतिसाद (78)
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 05/16/2009 - 12:59 नवीन
हो न.. कृपा शंकर म्हणाले.."उत्तर भारतियानि उत्तर दिले आहे" आता मुंबई त्यांच्या हातात...बसा बोंबलत
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sat, 05/16/2009 - 13:05 नवीन
आम्ही मटा दररोज वाचतो ;) लेखही बहुतांश मटातून साभार लिहायला विसरलात काय? वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 05/16/2009 - 13:13 नवीन
आकडेवारी दिल्याबद्दल कोतवालांना धन्यवाद.राज ठाकरेंच्या मनसेला मिळालेली बहुतांश मते मनसे नसती तर शिवसेना-भाजप युतीला गेली असती हे मानायला जागा आहे. २६/११ नंतर आणि एकूणच काँग्रेस सरकारविरोधी मते शिवसेना-भाजप युती आणि मनसे यांच्यात विभागली गेली आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवारांचा मार्ग सोपा झाला.मनसेने मते खाल्ली नसती तर काँग्रेसला ही निवडणुक इतकी सोपी गेली नसती हे नक्की. शिवसेनेची सुरवात मुंबई-ठाण्यातून झाली आणि बरीच वर्षे शिवसेनेचे वर्चस्व मुंबई-ठाणे सोडून राज्याच्या इतर भागात नव्हते.पण आता जे काही वर्चस्व शिवसेनेचे आहे ते राज्याच्या इतर भागातच राहिले आहे हा दैवदुर्विलास. १९९३-९४ पर्यंत बाळासाहेबांचा राजकिय वारसदार राज ठाकरे असणार आणि उद्धव ठाकरे राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रमणार असे चित्र होते.पण नंतरच्या काळात उध्दव पुढे आले किंवा आणले गेले.त्याचे परिणाम यापुढे शिवसेनेला भोगावे लागणार आहेत.एकूणच काय चुलत भावंडांमध्ये भांडणे व्हायची भारताची ’उज्वल’ परंपरा इथेही चालूच आहे. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 05/18/2009 - 12:40 नवीन
क्लिंटनसाहेब, एक गोष्ट तुमच्या मतात थोडी भर घालावीशी वाटते आहे शिवसेनेची सुरवात मुंबई-ठाण्यातून झाली आणि बरीच वर्षे शिवसेनेचे वर्चस्व मुंबई-ठाणे सोडून राज्याच्या इतर भागात नव्हते.पण आता जे काही वर्चस्व शिवसेनेचे आहे ते राज्याच्या इतर भागातच राहिले आहे हा दैवदुर्विलास. राज ने फक्त १२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते, त्यामुळे ही वाट लागली. राज ने सगळीकडे मनसे चे उमेदवार उभे केले असते तर कदाचित राज्यात सगळीकडे हेच चित्र दिसले असते. :) शिवसेनेने यातून बोध घेऊन केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला तरच पुन्हा गेलेली प्रतिष्ठा त्यांना मिळवता येईन. पण मनसे चे वादळ आता थांबेलसे वाटत नाही. फक्त बाळासाहेबांच्या हातात राज ला समजावण्याची व सांभाळण्याची ताकद आहे. पण प्रकृती स्वास्थ्यापायी बाळासाहेब यात कितपत लक्ष घालतील यात शंका आहे असो. पुढच्या निवडणुकीची मुहूर्तमेढ राज ने या निवडणुकीत चांगलीच घट्टपणे रोवली आहे. मनसेच्या पुढील उत्तुंग वाटचालीस शुभेच्छा सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
इ
इनोबा म्हणे Mon, 05/18/2009 - 12:54 नवीन
>>शिवसेनेने यातून बोध घेऊन केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला तरच पुन्हा गेलेली प्रतिष्ठा त्यांना मिळवता येईन. कसलं काय. आजचा सामनाचा अग्रलेख वाचा. संजय राऊतांनी मनसेला आणि त्यांना मतदान करणार्‍या मराठी जनतेलच सगळा दोष दिलाय. यांच्या चूका हे मान्य करायलाच तयार नाहीत तर त्या दुरुस्त तरी कसे करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/18/2009 - 13:24 नवीन
हाहा ... फारच मजेशीर आहे तो अग्रलेख. पुन्हा एकदा फार्फार करमणूक झाली ते वाचून!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
भ
भडकमकर मास्तर Mon, 05/18/2009 - 14:32 नवीन
तो अग्रलेख वाचला.. माझीही फार करमणूक झाली... अजून शिकण्याची वेळ गेलेली नाही, पण हेच समजून घ्यायच्या मूडमध्ये नाहीत... ... मला वाळूत डोके खुपसलेले शहामृग दिसायला लागले आहे... अवांतर : पुढच्या विधानसभा निवडणुकीत माझा कल मनसे कडे चालला की काय असे वाटायला लागले आहे... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रदीप Mon, 05/18/2009 - 16:07 नवीन
हेच समजून घ्यायच्या मूडमध्ये नाहीत... ... मला वाळूत डोके खुपसलेले शहामृग दिसायला लागले आहे...
स्वतःच्या शक्तिविषयी भ्रम झालेल्यांची संख्या दुनियेत कमी नाही, त्याचेच हे अजून एक उदाहरण. पण आता देव करो, ते अशाच भ्रमात राहोत, मग विधानसभेच्या निवडणुकीत ते संपलेच समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
सागर Mon, 05/18/2009 - 18:31 नवीन
मी पण हा लेख आत्ताच वाचला... माझीही भरपूर करमणूक झाली.... महाराष्ट्रात घोडदौड सुरुच राहिली. मुंबई - ठाण्याने यातना दिल्या असे म्हटले आहे "राज" चे उपकार माना हो..... त्याने फक्त मुंबई - ठाणे व नाशिक अशा ठिकाणी १२ उमेदवार उभे केले होते नाहीतर सगळीकडेच हेच चित्र दिसले असते आणि मग महाराष्ट्रात घोडदौड सुरुच राहिली असे म्हणायला वाव राहिला नसता... पण हे समजून कोण घेणार? का डोळ्यावर पांघरुण ओढून घेतले आहे सेनेने? मला मात्र मनापासून वाटते की मराठी माणसांच्या हितासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा शिवसेनेला पुढील निवडणुकीस घोडदौड करण्यास जागाच उरणार नाही जय महाराष्ट्र (खिन्न) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/19/2009 - 14:06 नवीन
>>>मला मात्र मनापासून वाटते की मराठी माणसांच्या हितासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. >>>> हेच वाक्य मनोहर जोशींनी उच्चारले तेव्हा त्यांना मातोश्रीवर बोलावून झापण्यात आले आणि अशी उद्धवजींची इच्छा नाही असे नंतर त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले; असे आजच्या सकाळला आले आहे... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
स
सागर Tue, 05/19/2009 - 15:08 नवीन
हो मास्तर, मी सकाळ वर पण बातमी वाचली या निवडणुकीतून राज ने काय सिद्ध करुन दाखवले यापेक्षा चूक मान्य न करुन खापर ठाणे-मुंबईच्या मराठी जनतेवरच फोडले गेले आहे. शिवसेनेचा राज कडे पाहण्याचा दृष्टीकोन हाच राहिला तर शिवसेना पुढच्या निवडणुकीत अखिल महाराष्ट्राला दोष द्यायला कमी करणार नाही कारण ह्याच अरेरावीपणामुळे पुढच्या निवडणुकीत राज शिवसेनेची उरली सुरली मते पण घेऊन जाईन यात शंका नाही. - सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/19/2009 - 16:16 नवीन
कारण ह्याच अरेरावीपणामुळे पुढच्या निवडणुकीत राज शिवसेनेची उरली सुरली मते पण घेऊन जाईन यात शंका नाही.
फक्त मतांवरच निभावलं तर थोडक्यात निभावलं असं म्हणेन! आत्तापर्यंत चुकांचं खापर राजकारण्यांवर फोडलेलं पाहिलं होतं. इथे तर मिठी (गंगा म्हटलं तर पुन्हा भय्यांची नदी होईल) उलटी वहायला लागली! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
व
विसोबा खेचर Sat, 05/16/2009 - 13:23 नवीन
मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली हो, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आज मुंबईत मराठी माणूसच साफ झोपला आहे. एकाही मराठी नेत्याला विजय मिळालेला नाही..! येत्या विधानसभेतही मुंबैत शिवसेना-मनसेत मराठी मतांची विभागणी होऊन त्यांच्यापैकी एकालाही स्पष्ट विजय न मिळता त्याचा काँग्रेसच्या तिसर्‍याच कुणा अमराठी नेत्याला फायदा होण्याची भिती आहे..! मराठी माणूस दरवेळेस जर असा शिवसेना-मनसेत विभागला गेला तर प्रॉब्लेम वाटतो बॉस! आपला, (मारवाडी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 05/16/2009 - 15:17 नवीन
मराठी माणूस दरवेळेस जर असा शिवसेना-मनसेत विभागला गेला तर प्रॉब्लेम वाटतो बॉस!
म्हणायचे आहे. एकंदरीत काय, आम्ही आमचा खास मराठी बाणा पुढे चालवला आहे. इतिहासापासून आम्ही काहीही शिकलेलो नाही. कुठल्यातरी एका जुन्या चित्रपटात मेहमूद सुंदर स्त्रियांबद्दल म्हणाला होता ते असे काहीतरी होते" मियाँ, ये लडकीयाँ एक के कंधेपे मान रख के, दुसरे को आँख मारती है, और उस्सी टाईम तिसरे के बारे मे सोचतीं है" शिवसेनेच्या अलिकडच्या उड्या पाहून ह्याची मला आठवण येत होती. आता सेनेची परिस्थिती 'ना घर का, ना घाट का' अशी झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विकि Sat, 05/16/2009 - 21:13 नवीन
हो, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आज मुंबईत मराठी माणूसच साफ झोपला आहे. एकाही मराठी नेत्याला विजय मिळालेला नाही..! एकनाथ गायकवाड आणि संजय पाटील काय अमराठी आहेत काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनामिका Sat, 05/16/2009 - 13:32 नवीन
क्लिंटन यांच्या मताशी सहमत कोतवाल साहेब तुंम्ही स्वतःच्या शब्दात लिखाण करायची तसदी घ्याल का? सेना भाजपाचा सुपडा साफ झाला याचा आसुरी आनंद बाळगणार्‍यांचा निवडुन आलेले उत्तरभारतीय कधी सुपडा साफ करतिल हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही. मनसेने नाहक उमेदवार उभे करुन सेनाभाजपाची मते खाल्ली व त्याचा फायदा आघाडीला व अप्रत्यक्षपणे उत्तरभारतीय उमेदवारांनाच मिळवुन दिला........मुंबई महाराष्ट्राच्या हातुन जाण्याची ही नांदी नसावी म्हणजे मिळवले? राजने लोकसभा निवडणु़कांच्या निमित्ताने मराठी माणसाचा ,मुंबईकरांचाव पर्यायाने महाराष्ट्राचा केसाने गळा कापला असेच खेदाने म्हणावे लागतय. आणि याच निमित्ताने आपल्याच माणसांचे पाय ओढण्याची मराठी माणसाची खेकडा प्रवृत्तीदेखिल स्वहस्ते दाखवुन दिली........ महाराष्ट्राचा दैवदुर्विलास म्हणायचा तो हाच का? असा प्रश्न पड्लाय? "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 05/16/2009 - 13:51 नवीन
>>सेना भाजपाचा सुपडा साफ झाला याचा आसुरी आनंद बाळगणार्‍यांचा निवडुन आलेले उत्तरभारतीय कधी सुपडा साफ करतिल हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही. सेना भाजपचा साफ पराभव(सुफडा साफ या हिंदी शब्दापेक्षा मराठी शब्द बरे) झाल्यामुळे आनंद झालेल्या लोकांमधे मी ही मोडतो. गेली अनेक वर्षे राम मंदिराच्या नावावर मते मागून भाजपने घाणकारण केले. तसेच शिवसेनेने मुंबईत मराठी माणसाबद्दल केले. इतकी वर्षे शिवसेनेच्या हातात सत्ता असून शिवसेना मराठी माणसासाठी काहीच करत नाहि? एक कायदा करु शकत नाहीत मराठी माणसाच्या हिताचा? भाजपवाले कर्नाटकाच्या बाबतीत कानडी अस्मिता म्हणून पाहू शकतात तेच महाराष्ट्राच्या बाबतीत पाहू शकत नाहीत? किती ही लाचारी? त्यापेक्षा राजने कमीतकमी २-३ कॉलेजे , १०-१२ हॉटेल्स तरी फोडली (प्रश्न येथे फोडाफोडीच्या समर्थनाचा नाही तर त्यामागच्या हेतूचा आहे. मनसेने भारती विद्यापीठ फोडले तेव्हा असाच असुरी आनंद मला झाला होता). त्यामुळे युती गेली तरी काही वाईट वाटणार नाही. चांगले असल्याचे भासवून शेवटी काँग्रेसवाल्यांसारखे वागणार्‍यांपेक्षा सरळ काँग्रेसवालेच आले तर काय वाइट? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
न
नितिन थत्ते Sat, 05/16/2009 - 14:23 नवीन
सहमत. मराठी माणसाने एकजूट दाखवायला हवी होती असे वर बर्‍याच लोकांचे म्हणणे दिसते. ती एकजूट मराठी लोकांना उलट दिशेने दाखवता आली असती. म्हणजे सर्व मराठी लोकांनी शिवसेनेऐवजी मनसे ला मते द्यायला हवी होती. त्याने दोन गोष्टी साध्य झाल्या असत्या. १. नुसते मराठी मराठी असे गाणे ४० वर्षे गाऊन काहीच न करणार्‍या शिवसेनेला हिसका बसला असता. त्यातून राजला पुढील वाटचालीसाठी धडाही मिळाला असता. २. मराठी खासदार निवडून आले असते. मराठी लोकांचा-मराठी म्हणून आवाज- दिल्लीत पोचला असता. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अनामिका Sat, 05/16/2009 - 14:30 नवीन
पेशवे!!!!!!!! स्वतःचे घर फोडायला परकियांची गरज नाही आपले स्वकियच या गोष्टीत तरबेज आहेत हे आपल्या अभिप्रायावरुन सिद्ध होतय असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही............... सेनेने भले काही केल नसेल मराठी माणसासाठी पण म्हणुन मराठीची ओरड करत मराठी माणसाचा पर्यायाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला? मी स्वतः देखिल राजचीच समर्थक आहे पण आज महाराष्ट्रातली राजकिय परिस्थिती बघता आपणच वैयक्तिक मतभेद , स्वार्थ साधण्यासाठी व स्वकियांवर सुड उगवण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या अधःपतनास हातभार लावतोय. इतक सगळ करुन मनसे महाराष्ट्रात आपले बस्तान बसवु शकली तर आनंदच आहे पण दुर्दैवाने तसे नाही झाले तर तेल गेले "तुप गेले हाती आले धुपाटणे" अशी अवस्था नाही झाली म्हणजे मिळवले........पाच वर्षाचा काळ खुप मोठा आहे.........इकडच जग तिकडे व्हायला वेळ लागणार नाही.उद्या जर मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळी करण्याचा निर्णय झालाच तर त्याच पातक मनसेच्याच माथी असेल इतक ध्यानात असु द्या. काँग्रेसला मुंबई काबिज करायला हातभार लावून एकाअर्थी मनसेने माकडाच्या हाती कोलीत दिलय हे स्मरणात राहु द्या म्हणजे झाल............. सेनेने मराठी माणसासाठी काय केलेय हे मी व्यक्तीशः अनुभवलय बघितय .........पण त्याची चर्चा मला इथे करायची नाही. जय हिंद ! जय महाराष्ट्र! जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
वेताळ Sat, 05/16/2009 - 14:41 नवीन
सेनेने आजपर्यत मुंबईत मराठी माणसासाठी काय केलेच नाही. फक्त मुंबई केंद्रशासित करण्याचा कॉग्रेसचा डाव आहे ह्याच मुद्द्यावर सत्ता ताब्यात घेत गेली आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये कॉग्रेसने मुंबईत ज्यादा जागा जिंकल्या होत्या काय केले त्यांनी?मुंबई तोडली का? मग कशाला त्याबद्दल बोलायचे? मुंबई बद्दल काही निर्णय घेताना त्याना स्थानिक नेत्याची मते देखिल लक्षात घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे हे होईल ते होईल असे भाकित करण्यात काहीच अर्थ नाही. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 05/17/2009 - 16:44 नवीन
अनामिकांशी असहमत. शिवसेनेला एवढा मराठीपणाचा (माणूस, भाषा, भूमी इ) कैवार आहे तर त्यांनी त्याकारणास्तव मनसेला पाठींबा द्यायचा होता. ज्या जागा वाटपात शिवसेनेला आल्या होत्या, त्या मनसेसाठी सोडून द्यायच्या! तडजोड फक्त एकानेच का करायची? बरं आत्ताचे निकाल पहाता दोन-चार जागा सोडल्या असत्या तर (उदा: ठाणे, दक्षिण मुंबई) तर जास्त मराठी माणूस निवडून नसता का आला? रामभाऊ म्हाळगी आणि प्रकाश परांजपेंच्या मतदारसंघाच्या तुकड्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या माणसाला उमेदवारी दिली, काय परिणाम झाला?? असो. मला या मराठीच्या 'कैवार' घेण्याची विचारसरणी अमान्य आहे त्यामुळे मी या विषयावर न बोललेलंच बरं! पण विचारांत विसंगती असावी अशी शंका आली म्हणून प्रतिसादप्रपंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
व
विकि Sun, 05/17/2009 - 16:55 नवीन
तुम्ही तर मुंबईत न राहता कुवेत मध्ये असता ना. म्हणजे तुम्ही तर तिथे परप्रांतियच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
अ
अनामिका Sun, 05/17/2009 - 19:36 नवीन
कॉ विकी!!!!!!!!!१ मी भले तुमच्या लेखी देशाबाहेर राहते आहे म्हणुन परप्रांतीय ठरत असेन्.............पण इथे आंम्ही कुणाच्या उपजिविकेच साधन बळकवायच्या उद्देशाने आलो नाही ................आणि महाराष्ट्रातील उपर्‍यांप्रमाणे इथे स्वतःचा टक्का वाढवण्यासाठी विमाने भरभरुन आपल्या आप्तांना बस्तान बसवायला पाचारण करित नाही आहोत..............इथे रहाताना इथल्या सगळ्या नियमांचे पालन करुनच रहातो आहोत ........."कानामागुन आली आणि तिखट झाली" त्याप्रमाणे इथे आंम्ही अनैतिक मार्गाने स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणुन रहात नाही................ आणि परप्रांतियांच्या बाबतीत काही नियम राजनेच घालुन दिलेत त्याचे इथे रहाताना प्रामाणिकपणे पालन करतो............काय आहे ?इथे काँग्रेसचे अथवा तुमच्या लालबावट्याचे सरकार नाही आंम्हाला मतांच्या राजकारणासाठी पाठीशी घालायला आणि आमच लांगुलचालन करायला काय समजले?..........आणि देशाबाहेर रहातो म्हणून देशात घडत असलेल्या घटनांवर आपली मते मांडु नयेत असे तुम्हांस वाटत असेल तर तर तुमचा हा महान विचार तुंम्ही तुमच्याकडेच ठेवलेला जास्त चांगले. आणि आंम्ही परदेशात राहुन देखिल अस्सल देशी आहोत आणि आमची विचारसरणी देखिल कुठल्या देशाकडुन आयात केलेलि नाही तुमच्या सारखी ............... तुमच्या सारखे प्रत्येकवेळेस चिन रशिया कडे तोंड करुन बांग देत नाही आंम्ही. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Sun, 05/17/2009 - 19:58 नवीन
अनामिका ताई मी तुमच्याबाबत सत्य आहे तेच म्हणालो आहे तुम्हाला राग आल्यास मी काही करू शकत नाही. आणि एक फरक तुम्ही परदेशात राहतात इथे मुंबईत जे येतात ते भारतीयच असतात ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
च
चिरोटा Mon, 05/18/2009 - 07:52 नवीन
इथे रहाताना इथल्या सगळ्या नियमांचे पालन करुनच रहातो आहोत
ह्याचा अर्थ तिकडच्या प्रशासनातले अधिकारीपण स्वच्छ असतील. नियमांचे पालन होत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असते.'बाहेरचे लोक येवून घाण करतात" पण घाण होऊ नये म्हणून इकडे प्रशासन(जिकडे ९५% मराठीच आहेत) काळजी घेते का? मोठ्या (अमराठी)बिल्डरांना वनखात्याच्या ताब्यातली जमीनपण पटकन मिळते. कफ परेड्,वरळी,परळ ह्या जुन्या वस्तींमधेपण मोठे टॉवर उभे रहातात. हे सगळ्याना परमिशन देणारे राजकारणी आणि अधिकारी मराठीच असतात. दाऊद/शकील भारताबाहेर पण त्यांची गँग मुंबईमधे गेले २० वर्षे कार्यरत .आजही त्यांचा फोन आला की मोठ्या व्यापार्‍याना घाम फुटतो!. ९५% अधिकारी मराठी असणार्‍या मुंबई पोलिस दलाचे आणि पर्यायाने मराठी राजकारणी लोकांचे अपयश नाही काय? मनसेने आंदोलनाची सुरवात ह्या लोकांपासुन करायला नको का? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
व
वेताळ Sat, 05/16/2009 - 14:27 नवीन
उध्दव ठाकरे ह्यांच्या भुमिकेचा तु अभ्यास करावास असे वाटते.आज शिवसेनेला जी काही मरगळ आली आहे त्याला स्वःता उध्दव ठाकरे जबाबदार आहेत. भलेही आज मुंबई,ठाणे,पुणे व नाशिकात राज ठाकरे ह्याच्या मनसे मुळे शिवसेनेच्या जागा गेल्या असल्या तरी तिथे शिवसेनेला एक भक्कम पर्याय म्हणुन मनसे समोर आला आहे. उद्या सेनेची मते देखिल मनसे कडे वळायला वेळ लागणार नाही. आज मनसे कडे तरुण वर्ग जो आकर्षित झाला आहे तो १४-२० वया दरम्यानच्या तरुण तरुणीचा आहे . पुढे त्याना मतदानाचा हक्क प्राप्त झाला कि काय घडेल ह्याची तुला कल्पना असेलच. मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या सेनेने हिंदुत्वाची कास धरली त्यावेळीच मराठी माणुस परत एकदा पोरका झाला होता. आज त्याला मनसे ने हात दिला आहे.१२ जागी फक्त उमेदवार उभे केल्यानण्तर जर ही परिस्थिती तुमची होत असेल तर बाकी ठिकाणी उमेदवार उभे केले असते तर तुमची पळताभुई थोडी झाली असती.विधानसभेला काय होणार ह्याचा अंदाज सेना नेत्रुत्वाला आला असावा अशी मी आशा करतो. राज ठाकरे झिंदाबाद. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Sat, 05/16/2009 - 14:49 नवीन
श्री वेताळ ! आपण असे समजत असाल तर मग पुढे बोलणेच नको....................मला दुखः सेनेचे उमेदवार निवडुन आले नाहीत याहीपेक्षा मनसेमुळे काँग्रेसला मुंबईवर अधिराज्य गाजवायची संधी मिळाली याचच जास्त आहे...........उद्या कुणी बघितलाय ?उद्या सेनेची मते देखिल मनसेकडे वळतील या भविष्यकाळातील कल्पनाविलासात मग्न राहुन मी स्वतःचा वर्तमानकाळ जर हातचा घालवुन बसत असेन तर त्याला काय अर्थ उरतो? ज्या झाडाच्या फांदीवर बसलोय नकळतपणे त्याच फांदीवर घाव घालुन साध्य काय होणार ?शेवटी फांदी तुटल्यावर आपणच फांदीसकट तोंडघशी पडणार आणि तरीही जर फांदी तुट्ल्याचा आसुरी आनंद मिळवण्यात आपण धन्यता मानतत असु तर आपले देव सुद्धा भले करु शकणार नाही. दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ झाला याचच जास्त वाईट वाटतय.................जे काँग्रेसला अपेक्षित होत तेच घडल...............त्यापेक्षा सेनेचा सुपडा साफ करायच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या मनसेने काँग्रेसचा सुपडा देखिल साफ केला असता व स्वतः निवडुन आले असते तर लोकांनी त्यांना दुवाच दिला असता. तुंम्हाला माझ्या लिखाणात सेनेबद्दल प्रेम् दिसत असेल तर त्याला माझा आक्षेप नाही कारण शरीराचे भाग कुणि वेगळे करु शकत नाही............सेना काय किंवा मनसे काय माझ्या साठी दोन्ही सारखेच ..............पण सेनेचा पराभव यापेक्षा उद्धववर कुरघोडी करण्याच्या नादात राजने स्वतःचेच नुकसान करुन नाही घेतले म्हणजे मिळवले. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
य
यन्ना _रास्कला Sat, 05/16/2009 - 18:47 नवीन
संप्रुण सहमत. प्वाईंट आहे. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
न
नितिन थत्ते Sat, 05/16/2009 - 14:37 नवीन
इतकी वर्षे शिवसेनाच मुंबईत निवडून येतेय. तरी मराठी माणसाचा सुपडा साफच होतोय. त्यामुळे मनसे ने शिवसेनेला वॉकओव्हर दिला असता तरी मराठी माणसाचा सुपडा साफच होणार होता. म्हणून मराठी लोकांनी (म्हणजे मराठी लोकांचा हक्क वगैरे विचार करणार्‍यांनी एकजुटीने मनसे ला ट्राय करायला हवे होते. म्हणजे काँग्रेसचे खासदार निवडून आले नसते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 05/16/2009 - 14:55 नवीन
अहो गेल्या वेळेसच ह्यांचा सुपडा साफ झाला असता पण मोहन रावले निवडुन आले आणि ह्यांची लाज वाचली ती तर खर म्हनजे अरुन गवळीमुळे वाचली जर त्यांनी ९०००० नव्वद हजार मते घेतली नसती तर अहो कशाला राजच्या नावाने खडे फोडताय एक म्हनजे स्वताला राज समर्थक म्हनवता आणी त्याने उमेदवार उभे करायला नको असे हि म्हणतात तुम्हाला नक्कि काय म्हणायचे आहे अहो अजुन १ वर्षात विधानसभेच्या निवडणुका होतील मग बघा राज कसा किंगमेकर बनतो ते आणी ४० वर्ष बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा उचलुन धरला पण मराठी पाट्याचा कायदा असुन ह्यांना राबवता आला नाहि राजच्या निवेदनाने कसे ५५% पाट्या मराठीत लागल्या अहो जर सेनेला मराठीचा एव्हडा कळवळा होता तर त्यांनी का नाहि राजच्या उमेदवारांना पाठिंबा दिला बोलण खुप सोप्प आहे पण जर त्याचे १२ उमेदवार प्रत्येकि १ लाख ह्याप्रामाणे १२ लाख मते घेउ शकतात तर विधानसभेत २५ ते ३५ आमदार सहज बसु शकतात ना .. ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Sat, 05/16/2009 - 15:23 नवीन
कोतवालसाहेब! किंगमेकर संबोधुन तुंम्ही राजला त्या नतद्रष्ट लालुच्या पंक्तीत बसवण्याचा प्रमाद करु नका हि कऴकळीची विनंती विधानसभा निवडणुकांच्या वेळेस राज आपली निर्णायक भुमिका बजावेलच त्याबद्दल शंकाच नाही .आणि तुंम्ही माझी कळकळ समजु शकत नसाल तर निदान समजुन घेण्याचा प्रयत्न करा. तुंम्ही फक्त मराठी पाट्यांच झालेल यशस्वी राजकारण बघुन अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नका.त्याही पेक्षा फार मोठे प्रश्न आहेत महाराष्ट्रापुढे व मराठी माणसापुढे त्याची तड लावण देखिल तितकच गरजेच आहे अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
न
नितिन थत्ते Sat, 05/16/2009 - 15:30 नवीन
त्याही पेक्षा मोठे प्रश्न आहेत हे खरे. पण त्याबाबतीत शिवसेनेने काही दिवे लावल्याचे स्मरत नाही. युतीच्या राज्यात सुरुवातीला शिवउद्योग सेना नावाचा प्रकार राजनेच सुरू केला होता (एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज सारखा). त्यात काही बरे काम झाल्याचे स्मरते. बाकी दसर्‍याच्या भाषणात 'मला मर्द हवेत', 'बांगड्या भरल्या नाहीत' वगैरे ठरावीक वाक्ये फेकून टाळ्या मिळवण्याखेरीज काही भरीव काम नाही (रुग्णवाहिका सोडून). खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
प्रशु Sat, 05/16/2009 - 15:01 नवीन
मराठी माणसाने मराठी माणसाचा मराठी माणसाठी केलेला पराभव.. आता तरी जागे व्हा..........
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/16/2009 - 15:12 नवीन
>>>मराठी माणसाने मराठी माणसाचा मराठी माणसाठी केलेला पराभव यात मराठी माणसाच्या हिताचा पराभव केला असेल तर तो राजला किंवा शिवसेनेला सगळी मते न देणार्‍या मतदारांनीच. मराठी माणसाच्या हितासाठी मनसेने उमेदवारच उभे करायला नको होते किंवा लोकांनी मनसे ला मते द्यायला नको होती असे म्हणणे अयोग्य आहे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
क
कलंत्री Sat, 05/16/2009 - 15:12 नवीन
कोणत्याही नवोदित पक्षासाठी हरणे, हरविणे आणि जिंकणे अशी त्रिसुत्री असते. राज - मनसे हे हरविणे अशा पायरीवर गेले असे समजावे. पूढील वेळेस शिवसेना आणि भाजपा यांनी मनसेची दखल घेतली पाहिजे असे सूचवावेसे वाटते. अवांतर : मनसेला आर्थिक निधी कॉग्रेसने दिला आहे असे वावड्या ऐकत आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/16/2009 - 15:19 नवीन
>>>अवांतर : मनसेला आर्थिक निधी कॉग्रेसने दिला आहे असे वावड्या ऐकत आहे. कलंत्री साहेब, वाईट पाहू नये. वाईट ऐकू नये. वाईट बोलू नये. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
अ
अवलिया Sat, 05/16/2009 - 15:24 नवीन
Image removed. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
क
कलंत्री Sat, 05/16/2009 - 15:33 नवीन
ही मर्कटे गांधीच्या मेजावर असत आणि कोणी वाईट बोलत असेल तर गांधी या मर्कटांवर निर्देश करीत. सध्या इतकी माकडे झाली आहेत की माणसे शोधावी लागतील ( हलके घ्या).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
वेताळ Sat, 05/16/2009 - 15:37 नवीन
गांधीजीना माणसांपेक्षा माकडांवर ज्यादा विश्वास होता ,त्यामुळे माणसे पण माकडांप्रमाणे वागायला लागली आहेत. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
इ
इनोबा म्हणे Sat, 05/16/2009 - 16:29 नवीन
सध्या इतकी माकडे झाली आहेत की माणसे शोधावी लागतील हो ना! आणि माकडांचाही गांधीजींवर फार जिव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
वेताळ Sat, 05/16/2009 - 15:32 नवीन
आमच्या इथे एक आमदार सलग ३० वर्षे निवडुण येत होते. मागील दोन निवडनुकात ते पडले परंतु अजुनही लोक त्याना आमदारसाहेब असेच बोलवतात. तसेच सेनेचे झाले आहे.मराठी माणसाच्या हक्कासाठी सेनेची स्थापना झाली होती तेच हे सेना वाले विसरले. हिंदुत्व व मुसलमान विरोध सुरु झाला. परंतु काही भाबड्या मराठी माणसाना अजुनही वाटते कि सेना फक्त मराठी हिताचे रक्षण करण्यासाठीच आहे. ह्याच सेनेने राज्यसभेसाठी चंद्रिका केनिया,राम जेठमलानी,अशा कितीतरी अमराठी लोकाना राज्यसभेमधुन संसदेत पाठवले आहे. त्यानी मराठी लोकांचे काय हित केले हे सेनेलाच माहित आहे. त्यामुळे सेना म्हणजे मराठी माणसाचे हित रक्षण हा राग आळवायचे बंद करा.आजकाल सेना ९०% राजकारण व १० % तिकिटाचा काळाबाजार करते. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 05/16/2009 - 15:37 नवीन
मनसेने नाहक उमेदवार उभे करुन सेनाभाजपाची मते खाल्ली व त्याचा फायदा आघाडीला व अप्रत्यक्षपणे उत्तरभारतीय उमेदवारांनाच मिळवुन दिला........कधी काळी उत्तर भारतीयांची मते मिळविण्यासाठी संजय निरुपम,जेठमलानी सारख्या अमराठींना उमेदवारी देणार्‍या,उत्तर भारतीयांसाठी हिंदितून "दोपहर का सामना" चालवणार्‍या, उत्तर भारतीय मेळावे भरवणार्‍या, मराठी माणसाचा घात करणार्‍या शिवसेनेच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी मनसेने माघार घ्यायला हवी होती का? हे बरं आहे तुमचं. आणि समजा मनसेने माघार घेतलीच असती तरी शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केले असते? वयाच्या २२ व्या वर्षापासून जे राज ठाकरे शिवसेनेसाठी राबले त्यांना एका फटक्यात बाजूला सारले गेले. गांधी-नेहरुंच्या घराणेशाहीला शिव्या देणार्‍यांनी शेवटी घराणेशाहीचाच रस्ता निवडला. राजने लोकसभा निवडणु़कांच्या निमित्ताने मराठी माणसाचा ,मुंबईकरांचा व पर्यायाने महाराष्ट्राचा केसाने गळा कापला असेच खेदाने म्हणावे लागतय. केसाने गळा कुणी कापला हे मराठी माणसाला चांगलेच माहित आहे. त्यामुळेच मराठी माणसाने यावेळी शिवसेनेला हिसका दाखवला. अनामिका ताई मते ही हिसकावून मिळत नसतात. आज जर मराठी माणसाने मनसेला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे तर त्यामागे तशी कारणे ही आहेत. मनसेला शिव्याशाप देण्यापेक्षा शिवसेनेच्या चुका शोधा. आणि याच निमित्ताने आपल्याच माणसांचे पाय ओढण्याची मराठी माणसाची खेकडा प्रवृत्तीदेखिल स्वहस्ते दाखवुन दिली........ महाराष्ट्राचा दैवदुर्विलास म्हणायचा तो हाच का? असा प्रश्न पड्लाय? हो, हाच महाराष्ट्राचा दैवदुर्विलास आहे. योग्य नेतृत्व काय असते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले असताना ही शिवसेना आज ही त्यांनाच दोष देत बसले आहेत. खेकडा वृत्ती कशाला म्हणतात हे शिवसेनेनेच आज दाखवून दिले आहे. राज आज जर शिवसेनेचे नेते असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांनी धूळ चारली असती. पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या भल्याकडे दुर्लक्ष करुन बाळासाहेबांनी पुत्रप्रेमाला प्राधान्य दिले. आणि तीच चूक शिवसेनेला भोवते आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Sat, 05/16/2009 - 16:06 नवीन
इनोबा तुमचे सगळे मुद्दे मान्य ............तुंम्हाला मी राज विरोधक आहे असे वाटत असेल तर प्रश्नच मिटला...माझा आक्षेप फक्त मनसे सेनेच्या भांडणात काँग्रेसचा लाभ झाला यालाच आहे..कुणितरी समजुतीने घ्यायला हवे कि नको?कि प्रत्येक जण स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या नादात आढ्यतेनेच वागणार्?कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी. " title="दुवा">http://www.misalpav.com/node/4200 .......हे लिखाण वाचुन देखिल तुंम्ही मला राज विरोधकांच्या पंक्तित नेउन बसवत असाल तर याउपर न लिहिलेलेच बरे "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Sat, 05/16/2009 - 16:21 नवीन
तुंम्हाला मी राज विरोधक आहे असे वाटत असेल तर प्रश्नच मिटला अर्थातच्...आणि तसे वाटण्याला आपला प्रतिसादच कारणीभूत आहे. मनसे आणि शिवसेनेच्या वादात मराठी माणसाचे नुकसान झाले हे मान्य. पण मग आपल्या प्रतिसादात सगळे शिव्याशाप फक्त राज यांनाच का? याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत असे तुम्हाला का वाटले नाही? राज यांच्यासारखा प्रभावी नेता असताना ही त्यांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सुत्रे स्वतः च्या हाती घेतली. हा मराठी माणसाचा घात नाही का? त्यावेळी उद्धव यांनी मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा गळा कापला नहई का? ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी हि संघटना चालू केली त्यांनी तरी त्यावेळी हस्तक्षेप करायला हवा होता ना. आज एवढ्या मोठ्या संख्येने मराठी माणूस राज यांच्या पाठीशी भक्कम उभा असताना ही आपण अप्रत्य्क्षरित्या राज यांनीच माघार घ्यावी असे सुचवताय. त्यापेक्षा शिवसेनेने माघार घेतल्यास बरे आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
पिवळा डांबिस Sun, 05/17/2009 - 00:01 नवीन
इनोबा, तुझ्या या आणि यापूर्वीच्या प्रतिक्रियेशी १००% सहमत.... मराठी हिताची जपणूक करण्याचा मुद्दा आपलाच असल्याचे समजणार्‍या शिवसेनेला आता तरी जाग यावी.... शिवशाहीचा वारस अष्टप्रधान मंडळाकडून नव्हे तर (निवडणुकीच्या) रणांगणावर ठरवला जातो हा इतिहास त्यांना उमजावा... आता विधानसभा निवडणूक जवळ आलीच आहे... मनसे, एक धक्का और दो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
अ
अनामिका Sun, 05/17/2009 - 19:50 नवीन
मी राजने माघार घ्यावी असे मुळीच सुचवत नाही आहे.....................................'तुम अपुन को इतना मारा, लेकीन अपुन ने तुमको सिर्फ दोही मारा, पर क्या सॉलिड मारा' .हा डायलॉग काय दर्शवतोय्...............राजवर व मनसेवर अन्याय केला कुणी ?आघाडीच्या सरकारमुळे त्याला तुरुंगात जावे लागले ..............गुंडाची सेना ठरवुन मोकळे झालेल्या अघाडिच्याच ताब्यात मुंबई द्यायला कारण राज झाला याचच दु:ख जास्त आहे............... उद्धवने राजला समजुन घेण्याइतपत परिपक्वता त्याच्या कडे असती तर आज सेना, मनसेवर ही वेळच आली नसती! पण जर खरच महाराष्ट्राच व मराठी माणसाच भल व्हाव अशी प्रामाणिक इच्छा दोन्ही पक्षांची असेल तर कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा कि नको?.......... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
स
सागर Mon, 05/18/2009 - 06:45 नवीन
अनामिकाताई आणि इनोबा भाऊ दोघांच्या चर्चेमुळे मला थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून लिहित आहे. मराठी माणसाचा घात मराठी माणसामुळेच होतो हा इतिहास आहे. पानिपत झाले हा वाक् प्रचार त्यामुळेच पडला आहे. पण तो इतिहास आता बदलायची वेळ आलेली आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. राज च्या बाबतीत जे झाले त्यामुळे राज ने शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला. स्वतःच्या कर्तृत्त्वाला वाव मिळत नसल्यामुळे शिवसेना सोडून झालेला मनसे चा जन्म मी बंडखोरी मानत नाही. आणि राजच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत लाखो मराठी मने लाखों मतांच्या रुपाने त्याच्यामागे उभी राहिली . यातच राजचे यश, कर्तृत्त्व दिसून येते यात शंका नाही. पहिल्याच निवडणुकीत मनसे चे ३ उमेदवार चुरशीच्या लढाईत हरले. बाळा नांदगावकर तर अगदी काही हजारांनी हरले. मराठी माणूस वर्षांनुवर्षे परप्रांतियांकडून भरडला गेला आहे आणि अजूनही जातो आहे. यासाठी पहिली महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे योग्य नेता निवडण्याची. आणि मला राज मधे ते सर्व गुण दिसतात. संधी प्रत्येकाला मिळायला हवी हे माझे मत आहे. इतकी वर्षे शिवसेनेने मराठी माणसाची अस्मिता मराठी माणसाला मिळवून दिली आहे असे मला वाटत नाही. हेच नेमके राज करु पाहतो आहे. त्याचा मार्ग बर्‍याच जणांना गुंडगिरीचा वाटतो. पण आज परिस्थिती अशी आहे की परप्रांतियांना (खास करुन यू.पी. - बिहारच्या लोकांना) याच भाषेतले उत्तर कळते. महाराष्ट्रातून अशा प्रकारचा प्रचंड प्रतिकार या परप्रांतियांना अपेक्षित नव्हता. त्यामुळेच एवढा गदारोळ चालू आहे. दुसरे मला असे सांगायचे होते की, आत्ता असे चित्र दिसते आहे की राज मुळे शिवसेनेचे पानिपत झाले. पण आपण सर्वांनीच लांबचा विचार करायला हवा. पहिल्याच निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठींबा मिळाल्यावर, राजही अधिक जोमाने त्याची संघटना मजबूत करेन. आणि पुढच्या निवडणुकीत मनसेला दुर्लक्षित करणार्‍या पक्षांनाच मराठी मतदार दुर्लक्षित करतील. अर्थात त्याला थोडा वेळ लागेल. पण राजच्या लढाईला, प्रयत्नांना पूर्ण यश पहिल्याच प्रयत्नात मिळण्याची अपेक्षा आपण करणे पण चुकीचे आहे. पहिले पाऊल टाकण्याअगोदर लहान मूल पण १०० वेळा पडते. पुढील ५ वर्षांत राज नक्कीच अशी तयारी करेन की मराठी माणसाने मराठी माणसाचा गळा कापला हा त्याच्यावरचा कलंक पुसला जाईन. राजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... आपणही मराठी मित्र आपापसात भांडू नये ही विनंती :) शेवटी आपण सगळे मराठी, हेच खरे जय महाराष्ट्र !!! जय मनसे !!! :) धन्यवाद, सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
प्रशु Sat, 05/16/2009 - 15:48 नवीन
कोणी तरी या नंतर आपण सगळयानी काय करावे या बद्द्ल बोलेल का?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 05/16/2009 - 15:54 नवीन
यापुढे आपण फक्त मनसेलाच मत द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 05/16/2009 - 16:13 नवीन
असेच म्हणतो..... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा