Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तें ... पाकिस्तानात

ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/17/2009 - 22:52
🗣 39 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10757 वाचन

💬 प्रतिसाद (39)
श
शरदिनी Sun, 05/17/2009 - 23:01 नवीन
तें पाकिस्तानात पोचले म्हणून त्यांचे कौतुक आहे की तेंचे नाटक करतात म्हणून पाकिस्तान्यांचे कौतुक आहे? की दोन्ही? ----------- अवांतर : तुम्ही डॉन वाचता हे समजले. का वाचता अशी एक उत्सुकता निर्माण झाली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/17/2009 - 23:20 नवीन
माझा जो काही पाकिस्तान आणि एकंदरीतच पाकिस्तानी लोकांशी संबंध आला आहे (आणि खूप जवळून आला आहे) त्यावरून एक निश्चित सांगू शकतो की सामान्य पाकिस्तानी माणसाला भारत आपल्यापुढे आहे हे प्रखर वास्तव माहित असते पण ते कबूल करवत नाही. त्या उलट भारतिय माणसाला पाकिस्तानाबद्दल एक प्रकारची द्वेष / घृणा मिश्रित उत्सुकता असते. पाकिस्तानी मिडियात भारताचे जेवढे कव्हरेज असते त्याच्या निम्मेपण आपल्या मिडियामधे नसते. एकंदरीतच भारतीय कलाकार / सिनेमे यावर अजूनही तिथे बंदी आहे. त्यात परत खाली नंदन म्हणतो त्या प्रमाणे सध्या जे काही एकूण वातावरण पाकिस्तानात आहे त्या पार्श्वभूमीवर आणि वर उल्लेखलेल्या कारणामुळेही आज पाकिस्तानातल्या तरूण कलाकारसमूहाला तेंसारख्या एका प्रादेशिक भाषेतल्या नाटककाराचे नाटक (त्यातल्या पात्रांची नावे न बदलता किंवा असे म्हणता येईल की त्या नाटकाचे पाकिस्तानीकरण न करता) करावेसे वाटते, डॉनसारख्या आघाडीच्या पत्राने त्याची दखल घेणे इ. गोष्टी मला रोचकच वाटल्या. त्याबद्दल कौतुक वाटले. तेंचे कौतुक आहेच. जगभरात त्यांचे नाटक पोचले आहे, त्यांच्या नाटकांवर आज जगभरात चर्चा / परिसंवाद होतात. हे सगळे माहित आहेच. पण भारत - पाकिस्तान ही (एका भारतीय कलाकाराच्या दृष्टीने) 'फायनल फ्रंटियर' ओलांडली याचाच आनंद झाला. बाकी डॉन का वाचतो वगैरे आपण खरडवही मधे बोलू. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरदिनी
म
मस्त कलंदर Mon, 05/18/2009 - 03:44 नवीन
१००% सहमत... बाकी.. ज्या लोकांनी खुदा के लिये पाहिला आहे.. त्यांना हेही ठाऊक असावे की पाकिस्तानात मुळात मनोरंजनावरतीच धर्माने बंदी आहे.. अशा परिस्थितीत.. >>एका प्रादेशिक भाषेतल्या नाटककाराचे नाटक ही नक्कीच दखलपात्र नि चांगली गोष्ट आहे... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
N
Nile Mon, 05/18/2009 - 04:00 नवीन
बिका 'काकांच्या शी' सहमत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
न
नंदन Sun, 05/17/2009 - 23:05 नवीन
बातमी वाचून डोक्यात पहिला विचार आला की, हिंसेने पोळलेल्या पाकिस्तानात सूक्ष्म हिंसेच्या रूपाची चिकित्सा करणारं नाटक हे एकाच वेळी विरोधाभासात्मक आणि सुसंगत म्हणता येईल का? बाकी राजकीय/सांस्कृतिक पार्श्वभूमी काहीही असो, तेंडुलकरांची नाटकं त्या त्या प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोचतात ही त्यांच्या लेखणीची ताकद दाखवून देणारी गोष्ट. (शेवटी माणूस हा इथूनतिथून सारखाच इ.) न्यू यॉर्क मध्येही २००४ मध्ये इंडो-अमेरिकन कौन्सिलने 'तेंडुलकर महोत्सव' आयोजित केला होता, त्याची या संदर्भात आठवण झाली. (अधिक माहिती येथे)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/17/2009 - 23:07 नवीन
शेवटी माणूस हा इथूनतिथून सारखाच धन्यवाद ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सहज Mon, 05/18/2009 - 02:34 नवीन
>शेवटी माणूस हा इथूनतिथून सारखाच अर्थात बातमी वाचून सुखद धक्का बसला. अर्थात ह्या नाटकाचे पाकिस्तानीकरण (बेणारे बाइंच्या ऐवजी कोणी बानो इ.) करुन सादर केले असते तर अजुनच मोठा धक्का बसला असता, विजय तेंडूलकर यांचे यश व इथुन तिथुन माणुस निदान भारतीय उपखंडातील सारखाच.. नुकतेच हे नाटक परत एकदा पहाण्यात आले, (रेणुका शहाणे बेणारे बाईंच्या भुमीकेत) काही वर्षात हे नाटक जरा अजुन मॉडर्न (कालावधी अजचा वाटेल असा, काही संदर्भ वेगळे) बनु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु Mon, 05/18/2009 - 05:03 नवीन
सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मुक्तसुनीत Mon, 05/18/2009 - 05:01 नवीन
या बातमीबद्दल बिपिन यांचे अनेक धन्यवाद. या बातमीमुळे या नाटकाबद्दलचे , तेंडुलकरांबद्दलचे , सुलभा देशपांडे यांच्याबद्दलचे संदर्भ जागे झाले. पाकिस्तानात याचा प्रयोग व्हावा, त्याची जाणत्या लोकांमधे प्रशंसा व्हावी हे सारे रोचक वाटले. मनात उमटलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक : "शांतता" मधे ज्या अनेक "थीम्स" आहेत त्यापैकी एक (आणि बहुदा तेंडुलकरांच्या दृष्टीने मध्यवर्ती, महत्त्वाची ) म्हणजे माणसातल्या हिंसेचे प्रकटन. इथे साधीसुधी कारकुंडी माणसे "अभिरूप न्यायालय"रूपी खोटेपणाच्या पडद्याआड दडल्यानंतर जी हिंसक , मॉब मेंटॅलिटीरूपी हिंसेचे थैमान घालतात त्याचे अंगावर येणारे दर्शन घडते. या थीमला अर्थातच , धर्माचे , प्रदेशाचे , भाषेचे , देशाचे बंधन असण्याचे कारण नाही. या संदर्भात, जे आपल्या प्रदेशात परिणामकारक वाटले ते कुठेही वाटेलच. तेंडुलकरांची नाटके इतर भाषांत परिणामकारक ठरतात याचे (मला वाटत असलेले ) एक कारण म्हणजे : त्यांची भाषा , शब्दांची योजना ही कधी क्लिष्ट नव्हती , अगदी आलंकारिकही नव्हती. (कानेटकर, शिरवाडकर या समकालीनांची नाटके या संदर्भात लक्षांत घ्यावीत. हेही उत्तम नाटककार. परंतु त्यांची नाटके इतर भाषांत नेणे कठीण. अपवाद : "अश्रुंची झाली फुले " सारखा मेलोड्रामा.) अर्थात, माझ्या तेंडुलकरांबद्दलच्या विधानालाही प्रचंड मोठा अपवाद म्हणजे : घाशीराम कोतवाल ! हे नाटक मराठीखेरीज इतर कुठल्याही भाषेत कितपत सुरेख होईल याबद्दल जबरदस्त शंका वाटते. पेशवाई, बावन्नखणी, नाना, त्यातली मुळगुंदांची नृत्ये , चंदावरकरांचे संगीत या सार्‍यासार्‍याचा मिलाफ "अन् - पोर्टेबल्" आहे. तर , या संदर्भात "शांतता!" उर्दूत जाणे , पाकिस्तानात केले जाणे , तिथे उचलले जाणे हे सारे आनंदाचे असले तरी अनपेक्षित नाही. अर्थात यातही एक छोटीशी गोम आहे. बेणारे च्या शेवटच्या स्वगतामधे "चिमणीला मग पोपट बोले" ही (बहुदा बालकवींची ) जुनी कविता येते. आता इतक्या चपखल, नाजूक कवितेला अन्य भाषेत तितकी योग्य कविता मिळाली असेल काय ? (बिपीन राव , तुमच्या उर्दूभाषिक मित्राना विचारा : याचे उर्दू पुस्तक उपलब्ध आहे काय ?अर्थात , त्याची लिपी अरेबिक असली तर मग परत बोलणे खुंटलेच !) मात्र एक गोष्ट. कुमारी माता , गर्भपात यांचे संदर्भ आपल्या समाजात - विशेषतः शहरी भागात - ४० वर्षांत बदललेले आहेत. पाकिस्तानात - अगदी त्यांच्या शहरी भागात- या गोष्टींची चर्चा , त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातली मान्यता हे कितपत घडले आहे कोण जाणे. जर का त्यांचा समाज अजूनही ४० वर्षे मागे असेल तर पाकिस्तानात नाटकाची ही "थीम" आणखी जास्त परिणामकारक ठरली असेल असे वाटते - कारण शॉक व्हॅल्यु जास्त. बाकी या लेखात पाकिस्तान, पाकिस्तान्यांचे कौतुक आहे किंवा कसे , बिपिनराव यानी अमुक वृत्तपत्र वाचावे किंवा नाही इ. इ. प्रतिसाद लई भारी !
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 05/18/2009 - 05:21 नवीन
छ्या! खरी मजा तर ख.व. मध्ये आहे. ;) बाकी मी सखाराम बाईंडर चा विचार करत होतो, जरी कथानक "पोर्टबल" असलं तरि भाषा जरा त्रास देईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चिंतामणी गुरुवार, 02/10/2011 - 20:40 नवीन
अपवाद : "अश्रुंची झाली फुले " सारखा मेलोड्रामा. ह्या नाटकार दोन हिंदी सिनेमे निघाले होते. एक "आसू बन गये फुल" आणि दुसरा (सिनेमा) मशाल. दिलीपकुमार, वहीदा रेहमान आणि अनील कपूर फेम. या व्यतिरीक्त अनेक भाषात त्यांच्या आणि अनेक मराठी नाटकांचे/ कादंब-यांचे अनूवाद झाले आहेत. माझ्या माहिती प्रमाणे गुजराथी आणि कानडी भाषेत झाले आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ऋ
ऋषिकेश Mon, 05/18/2009 - 05:38 नवीन
सुख्द धक्का बसला. शेवटी माणूस इथून तिथुन सारखा हे नंदनचे म्हणचे पटते. पाकिस्तानाच्या सध्याच्या परिस्थितीमधे एकीकडे भयंकर अशांतता / हिंसा असताना नेमकं "शांतता!.." तिथल्या लोकांना का करावेसे वाटले असावे याचं उत्तर म्हटलं तर कळतं, म्हणलं तर अजिबात कळत नाहि. पाकिस्तानात अजूनहि नाट्य संस्कृती जिवंत आहे आणि चक्क परदेशी प्रादेशिक भाषांतील नाटके करू पाहते आहे (का सर्रास करते?) हे वाचुन ओसाड वाळवंटात एक हिरवा कोंब बघुन वाटावे तसे काहिसे वाटले. हि बातमी पोचवल्याबद्द्ल आभार बिपिनदा ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/18/2009 - 08:18 नवीन
नंदन आणि ऋषिकेशप्रमाणेच म्हणते. चांगली बातमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
श
शिल्पा ब Wed, 02/09/2011 - 18:36 नवीन
असेच म्हणेन...आनंद वाटला...हळुहळु त्यांच्या जाणिवा जाग्या झाल्या की फक्त भारत या विषयापलिकडे त्यांना पाहता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
स्वाती दिनेश Mon, 05/18/2009 - 08:12 नवीन
आज पाकिस्तानातल्या तरूण कलाकारसमूहाला तेंसारख्या एका प्रादेशिक भाषेतल्या नाटककाराचे नाटक (त्यातल्या पात्रांची नावे न बदलता किंवा असे म्हणता येईल की त्या नाटकाचे पाकिस्तानीकरण न करता) करावेसे वाटते, डॉनसारख्या आघाडीच्या पत्राने त्याची दखल घेणे इ. गोष्टी मला रोचकच वाटल्या. त्याबद्दल कौतुक वाटले. अगदी रे, सहमत आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
घ
घासू Mon, 05/18/2009 - 12:13 नवीन
भारतीय (मराठी) नाटक पाकिस्तानात सुद्धा पोहचलं. अभिनदंन..........! गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा!!!!!!!!! बातमी पोहचवल्याबद्द्ल बिपीनजींचे विशेष अभिनदंन.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 05/18/2009 - 13:38 नवीन
खरंच, वर सगळ्यांनी म्हंटल्याप्रमाणे - बातमी आनंददायक, डॉनचा संदर्भ मजेशीर. अवांतरः बिपिनदा, डॉन आणि तुम्ही डॉन का वाचता या दोन गोष्टी फक्त खरडवहीत का राहाव्यात? नवा धागा काढा की.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 05/22/2009 - 06:57 नवीन
तेंडुलकरांचं नाटक पाकिस्तानातदेखील पोहोचलं याचा आनंदच आहे. पण यासाठी नाटककर्त्यांनी तेंडुलकरांच्या कुटुंबियांची परवानगी घेण्याचं किंवा योग्य ती रॉयल्टी देण्याचं सौजन्य दाखवलेलं नाही. त्याला काय म्हणणार? सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/22/2009 - 07:20 नवीन
'सुसंबद्ध' हा चटकन आठवणारा शब्द. 'प्रस्तुत' असाही एक शब्द असल्याचे कळते. आंदोप राव संगणक शिका, संगणक वापरा! http://lokayat.com/
  • Log in or register to post comments
J
jaydip.kulkarni Wed, 02/09/2011 - 15:19 नवीन
मि पा वर हि बातमी दिल्याबद्दल बिपीन कार्यकर्ते यांचे आभार ...........
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 02/09/2011 - 18:17 नवीन
आपल्याहून कैक पतीने जास्त रुपयाचे अवमूल्यन पाकिस्तानी रुपयाचे झाले आहे ./होत आहे /होणार आहे . त्यामुळे त्यांचे ५०० रुपये नाटकाला फार काही जास्त नाही . बाकी नाटक उर्दू मध्ये पाहणार्यात काराचीस्थित मुहाजिर ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे . व सध्या नव्याने ह्या शहरावर हुकुमत गाजवणारे पश्तून ह्यांचा उर्दूला प्रखर विरोध आहे . कारण पाकिस्तानातील दोन मुख्य साधन प्रांत पंजाब (शेती ) सिंध (व्यापार ) ह्यांची मूळ भाषा उर्दू नसल्याने तेथे उर्दू विरोधात रान उठले होते .प्रचंड दंगे झाले होते .व अजूनही धूस मूस आहे . तेव्हा उर्दू मध्ये सिनेमे व नाटके तीही दर्जेदार आता दुर्मिळ झाली आहेत . त्यामुळे आता त्यांची मदार नेहमीच मनोरंजनासाठी भारतावर असते . बातमी बद्दल धन्यवाद . तेंडूलकर हे नाव पाकिस्तानला क्रिकेट मूळे माहित होते .मात्र आता ते साहित्यामुळे परिचित होईल . बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विषयी अनेक दंतकथा ह्या लोकांमध्ये प्रचलित आहेत . त्यांना सांगून खरे वाटत नाही कि आमच्या रोजच्या जीवनात पाकिस्तान हा प्रमुळ विषय नसतो . शीला कि जवानी आणि मुन्नी ची बदनामी तसेस अनेक रीयालती शो ह्यावर अखंड चर्चा चालू असते .(आता मनोरंजांच्या बापाची भर पडली आहे )बाकी पाकिस्तान मध्ये नव निर्मिती कोणत्याही शेत्रात होत नाही .गावात सरंजामी कारभार चालतो .त्यामुळे भारत द्वेष हा त्यांच्याकडे सर्व प्रांताला जोडणारा समान धागा असतो . कोणताही खेळाडू व नेता मुलाखतीत आपण भारताविरुद्ध कसे कडक वागलो किंवा खेळलो .ह्यांचे एकतरी उदाहरण देतात .बाकी कार्यकर्ते म्हणतात ते योग्य आहे कि आपण अर्ध्याहून जास्त सुद्ध त्यांच्या घडामोडी कडे लक्ष देत नाही .(तेथे भारत ह्या विषयावर वाहिलेले (बहुतेक वेळा लाखोल्या ) अनेक कार्यक्रम मुलाखतीचे हे मुख्य वाहिन्यांवर दाखवतात .अशक्य कोटीचे स्वप्न रंजन भारताविषयी दाखवले जाते .उदा हिंदू .ज्यू आणि ख्रिस्ती धर्म एकत्र येऊन इस्लाम संपवण्यासाठी एकत्र आले आहेत .अफगाण युद्धात त्यांची संयुक्तिक आघाडी आहे .(अजून बरेच काही आहे .पण त्याबद्दल सविस्तर परत ) एका महाभागाने मला विचारले .कि त्याने एकले कि ठाकरे त्यांची माणसे ( पाकिस्तानात पाठवणार आहेत ) बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विषयी अनेक दंतकथा ह्या लोकांमध्ये प्रचलित आहेत . त्यांना सांगून खरे वाटत नाही कि आमच्या रोजच्या जीवनात पाकिस्तान हा प्रमुळ विषय नसतो . शीला कि जवानी आणि मुन्नी ची बदनामी तसेस अनेक रीयालती शो ह्यावर अखंड चर्चा चालू असते .(आता मनोरंजांच्या बापाची भर पडली आहे )
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/09/2011 - 18:28 नवीन
विषय काय? प्रतिसाद काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/09/2011 - 18:33 नवीन
बरं. ह्यात नवीन काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मेघवेडा Wed, 02/09/2011 - 18:42 नवीन
अरे काय चाललंय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
N
Nile गुरुवार, 02/10/2011 - 06:51 नवीन
तुम्हाला लोकांना माहित नाय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
श
शिल्पा ब Wed, 02/09/2011 - 18:34 नवीन
सवयीने!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
निनाद मुक्काम … Wed, 02/09/2011 - 19:54 नवीन
लेखाच्या मालकाने आपण डॉन हे वृत्त पत्र वाचतो .( सीमेपलीकडील ) हे मिपाकरांना आवर्जून नमूद केले त्यात त्यांना जी बातमी मिळाली . तिचे काही तुकडे लेखात अडकवले .आता हा लेख मिपावर टाकण्याचे प्रयोजन म्हणजे बहुदा भारतीय प्रादेशिक (मराठी ) लेखकाची कलाकृतीचा त्या वृत्त पत्राने स्तुती पर लेख लिहिला म्हणून असावा . त्यांच्याकडे ५०० रुपये तिकिटाला देऊन रसिकवर्ग नाटक पाहतात असा गौरव पूर्ण उल्लेख केला .आता ह्या अप्रतिम लेखावर मालकाला प्रतिक्रिया बहुदा त्यांना हव्या तश्या म्हणजे अरे वा पाकिस्तान सारख्या देशात असे काही तरी घडते म्हणजे ..... अश्या ठराविक पाध्ध्तीच्या अपेक्षित होत्या . शरदिनीची पहिलीच प्रतिक्रिया मालकांना झोंबली .( आपल्या लेखावर आपल्याला हवी तीच प्रतिक्रिया वाचायला मालकांना आवडते .इतर मुद्दे खरडवहीत चर्चा करायला हवे असतात . मुळात माझ्या प्रतिक्रियेत पाकिस्तानात महागाई व रुपायचे अवमूल्यन ह्याने ५०० रुपयाला नाटकाचे तिकीट हि साधी बाब आहे हे लिहिल्याचे बहुदा आवडले नसावे . कराची शहरात सध्या काय घडत आहे . हे जाणून न घेता केवळ वृत्त पत्रावर (ते देखील इंग्लिश ) जे पाकिस्तानात किती टक्के जनता वाचते देव जाणे तुम्ही मत प्रदर्शित केले म्हणून मी प्रतिक्रिया दिली . कराची येथे ह्या वर्षी भाषिक दंगल होऊन पश्तून विरुध्ध उर्दू समूहाने १०० वर हत्या व अनेक ठिकाणी मालमत्ता जाळली . तेथे आता कर्फू हि रोजची गोष्ट झाली आहे .त्याचबरोबर दोन्ही समूहाचे राजनैतिक पक्ष झरदारी वर दबाव तंत्र वापरते आहे (पंजाबात पंजाबी हि उर्दू पेक्षा श्रेष्ठ आहे अश्या पद्धतीचा वाद चालला आहे ) त्यामुळे प्रदेशील अस्मिता ह्या तेथे प्रखर होत आहेत .त्याचा फायदा उर्दू नाटकांना होत आहे .असे माझ्या आधीच्या प्रतिक्रियेतून व्यक्त करायचे होते बाकी लेखासाठी शिल्पा ब ह्यांनी जी जाणीव जागृत वैगेरे प्रतिक्रिया दिली ती पाहता तिथल्या मुठभर लोकांच्या नाटक पाहण्यावर सुतावरून स्वर्ग गढू नका एवढेच सांगणे होते . कराचीचे तालिबानीकरण झपाट्याने होत आहे .ह्यावर एक वेगळा लेख होऊ शकतो . तू नळीवर ह्याच्या अनेक चित्रफिती परदेशी वाहिन्यांच्या वार्ताहरांनी सोदाहरण दाखवल्या आहेत .
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 02/10/2011 - 06:01 नवीन
माझा प्रणाम स्वीकार करावा. -- लेखनसीमा --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/10/2011 - 06:06 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. एक तुच्छ प्रश्नः हाच काय तो आधुनिकोत्तरवाद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 02/10/2011 - 13:42 नवीन
ह्या प्रतिसादाची तुलना फक्त आणि फक्त तम्मा तम्मा वाल्या प्रतिसादाशीच होऊ शकेल ! त्यात तो कुठेपण जो फुलस्टॉप टाकतो न तो तर कहर आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पैसा गुरुवार, 02/10/2011 - 17:50 नवीन
यालाच म्हणतात "आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
शिल्पा ब गुरुवार, 02/10/2011 - 19:20 नवीन
वय झाल्यावर असं होतंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रदीप गुरुवार, 02/10/2011 - 10:25 नवीन
अत्यंत सभ्य व संयत आहेत ह्याचा हा दाखला आहे. मला असे रहावयास जमत नाही, म्हणून मी बिपीनचा हेवा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सहज गुरुवार, 02/10/2011 - 10:29 नवीन
कुमार गंधर्व यांनी गायलेला तुकारामांचा अभंग आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 02/10/2011 - 13:24 नवीन
मस्त प्रतिसाद. बिका खरच महान आहेत !!!! बाकी ते दोन प्रतिसाद वाचून गणगोत मधल्या दिनेश च्या व्यक्तीचित्रणातील "माणूस, बेडूक आणि उप्पीटम" (का असेच काहीसे) या कथेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुधीर काळे गुरुवार, 02/10/2011 - 06:34 नवीन
सर्व प्रथम तेंडुलकरांना सलाम! मी स्वतः हे नाटक पाहिलेले नाहीं, पण त्याबद्दल ऐकले मात्र खूप आहे. मी 'पाकिस्तानी लोक' आणि 'पाकिस्तानी सरकार' यातला फरक विसरत नाहीं. मला 'आम' पाकिस्तानी लोक आपल्यासारखेच आहेत असे वाटते. कित्येक 'बुजुर्ग' पाकिस्तानी "मैं दिल्लीका हूँ" असे सांगतात, तर तरुण पाकिस्तानी "मेरे अब्बा xxx के हैं" असा प्रेमाने उल्लेखही करतात. एका अशाच तरुण पाकिस्तानी माणसाला मी एकदा म्हटले की उर्दूतला 'ए' किंवा 'इ' मला फार घोटाळ्यात टाकतो (उदा. मुगल-ए-आझम"). तर त्याने आपल्या आईकडून मला नंतर फोन केला. व त्या बाईने "हमारे गरीबखानेमें तश्रीफ लाइयेगा, मैं समझानेकी कोशिश करूँगी" असेही मला सांगितले, पण मी त्यांच्याकडे जायच्या आधीच ते कुटुंब पाकिस्तानात परत गेले. 'अमरेली स्टील' नावाच्या एका पाकिस्तानी पोलाद कारखान्याचा मालक मला नेहमी कराचीला बोलवत असतो. ओळख झाली होती डॅनियली नावाच्या कंपनीत! थोडक्यात काय कीं पाकिस्तानी माणसांना भारताबद्दल फारशी अढी नाहीं, पण सरकारबद्दल मात्र तसे म्हणता येत नाहीं. वेळ झाला तर "मला भेटलेले पाकिस्तानी" या विषयावर एक पोस्ट करायचा मोह होतोय्. बघू वेळ मिळतो का आणि 'भट्टी जमते' कां! बिकासेठ, तुम्हीही डॉन वाचता हे वाचून बरे वाटले! अलीकडे मला मोबाईलवर वाचायचा प्रॉब्लेम झाला होता, पण तो नुकताच सुटला!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/10/2011 - 18:13 नवीन
चांगली बातमी. मी अजूनही हे नाटक पूर्ण पाहिलेले नाही. अर्धे पाहून झाल्यावर कसेसेच झाले आणि त्यानंतर पाहिले गेले नाही.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 02/10/2011 - 19:41 नवीन
छान बातमी. एकमेकांच्या कलाकृतींची रुपांतरे आणि कलाकारांची एकमेकांशी गाठभेट ह्या गोष्टीदेखिल (राजनैतिक संबंधांइतक्या) महत्त्वाच्या आहेत. सहा वर्षांपूर्वी मराठी लेखिका सानिया ह्या पाकिस्तात गेल्या होत्या. कराचीत त्यांची स्थानिक लेखकांशी बातचित झाली. त्या संदर्भातील बातमीदेखिल तत्कालीन डॉनमध्ये आली होती. इथे वाचा.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 02/11/2011 - 00:45 नवीन
या सार्‍यावरून एक सुप्रसिद्ध वचन आठवले... डॉनको पढना मुमकिनही नहीं, आसानभी है"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा