सुंदर मुक्तक. खूप आठवणी जागवल्यास. वाचताना मजा आली.
माझ्या पहिल्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं आणि स्पर्श केला तो क्षण माझ्या स्मृतीत अगदी 'फोटोग्राफिक' म्हणतात तसा बसला आहे. त्याक्षणी काय वाटले, आजूबाजूला काय होते, कोण होते, सगळे अगदी घट्ट आहे डोक्यात. तो एक विलक्षण क्षण असतो हे खरेच, विशेषतः पहिल्या अपत्यावेळी.
बाकी बाळलीला तर काय वर्णाव्या? मोठी होईपर्यंत नक्को जीव करतात कार्टी.... पण मोठी झाली की "मोठी का झालीस? अशी लहानच गोडुली का नाही राहिलीस?" असं वाटतं. खूप काही शिकवून जातात मुलं. उगाच नाही 'चाइल्ड इज फादर ऑफ मॅन' असं म्हणत.
बिपिन कार्यकर्ते
खूप खूप आठवणी चाळवल्या आमच्या चिरंजीवांच्या बाळपणाच्या.
आणि 'प्रत्येकाच्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी होत असतात' हे जरी खरं असलं तरीही जन्माला येणार्या प्रत्येक बाळाच्या बाबतीत या गोष्टी अशाच/याच क्रमाने होतात असं नव्हे, तेंव्हा यातलं नाविन्य कधी संपेल असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या बाळलीलांची अशी बखर मधून-मधून ठेवता आली तर जरूर ठेवावी, म्हणजे मुलं भराभर वाढत जातांना ती अशी "मोठी का होतात? ..लहानच का नाही रहात" असं जेंव्हा वाटतं, ते क्षण पकडून ठेवावेसे जेंव्हा वाटतं, तेंव्हा आपल्या समाधानासाठी, आणि तितकंच महत्वाचं, ती मोठी झाल्यावर त्यांच्यावर आई-बाप व्हायची वेळ येईल तेंव्हा त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी, हा ठेवा महत्वाचाच!
आईपणाचं चांगलं वर्णन केलयस.
पुर्वीच्या काळी सात आठ मुलं असायची तेंव्हा कसं सहन करत असतील बायका असं वाटून गेलं.
एकटाकी लिहिलेलं दिसतयं....छान वाटलं वाचून.
रेवती
"तुझ्यामुळे मी झाले आई" यातल्या आई होण्यात काय काय आणि किती सामावलेले असते याची एक सुरेख झलक वाचायला मिळाली. अप्रतिम लेख!
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
म्हणूनच मातृदेवो भव असं म्हणत असावेत..कारण आई म्हणजे..
श्वासाची लय असते
विश्वासाचे आलय असते
अशुभाला भय असते
वात्सल्याची सय असते..... हो ना?
लाख मोलाची बात अन् सुरेख लेख..
जियो..
आपला,
(मातृभक्त) तात्या.
खुप छान लिहीलयस.माझे अनुभव अगदी सारखे आहेतम्हणजे तिने लवकर जन्माला येण्यापासुन ते अगदी उम्म्मा सकट.... :)(ती पण उम्माच म्हणते)
मी पण लेकीला पहील्यांदा ३ दिवसांनी मांडीवर घेतल त्या वेळी काय काय वाटल नाही सांगु शकत मी शब्दात.
पण माझ्या देवघरातले देव तेवढे कधी हालले नाहीत आणि ती बाबांना सोडून कधी राहीली नाही.(४ दिवसाच्या वर बाबा दिसले नाहीत तर ५व्या दिवशी जेवण सोडतात आमच्या बाईसाहेब)
प्लेग्रुप चा अनुभव थोडा वेगळा मी शाळेत बसत होते पण दर दोन मिनीटांनी बाबा पण हवे असायचे शाळेत खुप रडली यासाठी.
पण अजुन मोठ्या शाळेचा अनुभव यायचा आहे.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
प्राजुताई,
एक नंबर लिहिलयस. लय लय खास :)
एक गंमत सांगू?
ह्या लेखाची एक प्रिंट काढ आणि ज्यावेळी लेक मराठी छान वाचायला, आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी नीट कळायला लागतील अशा वयात त्याला हे "रिटर्न गिफ्ट" दे.
बघ कसा कै च्या कै खुश होऊन जाईल :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
प्राजु,
नेहमीप्रमाणे सुंदर लिखाण...:)
आठवणींचे वर्णन छान केले आहेस...
श्वासाची लय असते
विश्वासाचे आलय असते
अशुभाला भय असते
वात्सल्याची सय असते.....
मस्त ओळी आहेत..
जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला तुझा लेख वाचून. सगळे शब्द कमी पडतील प्रतिसादासाठी इतका अप्रतिम लेख! शेवटची चारोळी तर आईपणाचं सार!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
सगळ्यांना त्या पहिल्या क्षणाच्या सुखद आठवणी आहेत. पण माझी आठवण थोडी वेगळी आहे. मुलीच्या वेळी डॉक्टरांना वाटलेले हेल्दी बेबी असणार. पण ऑपरेशनच्या वेळी 'वाटलं त्या मानाने बा़ळ बरेच बारीक आहे' हे वाक्य शेवटचे ऐकले. मग जाग आली ती थेट बेडवर. थोड्या वेळाने नर्सने बाळाला आणुन कुशीत ठेवलं. मी त्याआधी कधीच नुकतंच जन्मलेलं मुल पाहिलं नव्हतं. शेजा-यापाजा-यांची मुले ५-६ महिन्यांची होईपर्यंत मी चार हात दुरुनच त्यांना पहायचे. माझ्या फॅमिलीत मीच सगळ्यात मोठी. त्यामुळे नुकतेच जन्मलेले मुल पाहायचा चान्स माझ्याच मुलीने मला दिला. तिला पाहताच पहिला विचार मनात आला - देवा, हे माकडाचं पोर कुठुन माझ्या पदरात टाकलंस?' तिच्या अंगावर आणि चेह-यावर काळी लव होती, शिवाय जन्मताच मुलाचे डोळे, नाक वगैरेचा शेपही ठिक नसतो. मी ५-६ महिन्यांची मोठी मुले पाहिलेली, जी अगदी व्यवस्थित असतात, त्यामुळे हिला पाहुन मला थोडाफार धक्का बसला. पण तिचे डोळे एकदम चमकत होते. मला तर चक्क ती माझ्याकडे पाहुन हसल्याचाही भास झाला. मी हरखुनच गेले. मग नंतर तासनतास पहात बसायचे तिच्याकडे. मालीशने अंगावरची लवही हळुहळु गेली. नाक, डोळे व्यवस्थित झाले. आणि मग ३-४ महिन्यात माझ्या मुलीपेक्षा जास्त छान बेबी कोणाची असेल यावर माझा विश्वास बसेनासा झाला.
साधना
आठवणी छानच. मुलांसोबत असताना आपल्याला आपलीच एक ओळख नव्याने होते, नाही?
मुलगी जवळजवळ तीन-सव्वातीन वर्षांची होईपर्यंत मी एकीकडे शिकत होते, त्यामुळे दिवसारात्री जमेल तेव्हा माझे काम करत असे. ती बाळ असतानाचा आनंद घेतला पण शांतपणे घेता आला नाही असे आता वाटते. ती तीन वर्षांची होऊन शाळेला गेली की आपल्याला आपले काम छान करता येईल असे कधीतरी वाटे. प्रत्यक्षात ती शाळेला गेली आणि मला काही सुचेना. इतक्या शांततेची सवय राहिली नव्हती.
या तुझ्या लेखाने परत तिचे खूप लहान असतानाचे दिवस आठवले.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी