राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?
💬 प्रतिसाद
(7)
ब
बहुगुणी
Wed, 05/20/2009 - 16:50
नवीन
..पण कालच म. टा. मध्ये वाचलेल्या प्रताप आसबेंच्या या लेखाचा 'मान' राखून पवारांनी राजकारण-संन्यास घेतला तर? वर सुचवलेल्या ४ पेक्षा एक नवीनच पर्याय त्या पक्षातील इतर नेत्यांना घ्यावा लागेल. पवारांच्या अनुपस्थितीत ही इतर मंडळी काय करतील हाही उत्सुकतेचा विषय असू शकेल.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 05/20/2009 - 17:12
नवीन
पवार जरी राष्ट्रवादी नावाच्या पक्षात असले तरी ती काँग्रेसचीच एक शाखा आहे. म्हणजे विचारसरणी वगैरे सर्व काँग्रेसचीच आहे.
पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते महाराष्ट्रात काँग्रेसचे सगळ्यात बलवान नेते होते. १९९० विधानसभेत सेना भाजप ची मुसंडी त्यांनी एकहाती थोपवली होती.
प्रादेशिक नेतृत्वाला फुलू न देण्याच्या काँग्रेसच्या धोरणातून पवारांना काँग्रेसमध्ये दडपण्याचे प्रयत्न चालू राहिले. एके काळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यास पवारविरोधक असणे ही आवश्यक अट होती. या अडथळ्यांतून मॅनूव्हर करताना पवारांनीही काही खेळ्या केल्या त्यात विविध जागांवर आपले बंडखोर अपक्ष उभा करून त्याला निवडून आणणे आणि त्या बंडखोरांच्या सहाय्याने काँग्रेसश्रेष्ठींशी बार्गेनिंग करणे. अशीच एक खेळी १९९५ च्या निवडणुकीत अंगाशी आली आणि युतीचे सरकार सत्तेवर आले.
ही खेळी काँग्रेसच्या नेत्यांना कळलीच होती त्यामुळे १९७८ च्या कृतीने निर्माण झालेला संशय दृढमूल होऊन ते काँग्रेसश्रेष्ठींच्या मनातून उतरले.
तेव्हा त्यांनी १९९९ मध्ये सोनिया गांधींनाच चॅलेंज केले आणि वेगळा पक्ष काढला. आता पवारांना पक्षशिस्तीचा जाच राहिला नाही.
त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे पवारांशी युती केल्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही (कारण काँग्रेस दुसर्या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). पण पवार आपले पर्याय नेहमीच खुले असल्याचे सांगून काँग्रेसकडून जादा लाभ उपटू शकतात.
थोडक्यात नारायण राणे यांची जी अडचण आहे ती वेगळा पक्ष असल्याने पवारांपुढे नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
भ
भोचक
Fri, 05/22/2009 - 12:44
नवीन
(कारण काँग्रेस दुसर्या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही).
खराटाजी, या मुद्यासंदर्भात थोडेसे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आज ज्या काही जागा जिंकते, त्या खरं तर कॉंग्रेसच्या 'खाल्लेल्या' जागा आहेत. राष्ट्रवादीचा पर्याय अस्तित्वात नसता, तर ही सगळी मंडळी कॉंग्रेसमध्येच असती आणि त्या सगळ्यांना उमेदवारी देणेही अवघड झाले असते. कॉंग्रेसमध्ये इतर कोणत्याही पक्षापेक्षा इच्छुक उमेदवारांची संख्या नेहमी जास्त असते. याचे कारण स्थानिक पातळीवरील सहकारापासून अनेक सत्ताकेंद्रे आजही या पक्षाच्या हाताता आहेत. हे सगळे नेते स्थानिक पातळीवर मातब्बर आहेत. त्यामुळेच त्यांचीही आकांक्षा विधानसभेत जाण्याची असते. कॉंग्रेस या सगळ्यांना तिकिट देऊ शकत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्यासाठी पर्याय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससकट या सगळया बंडखोरांना नीट शांत केले, तर कॉंग्रेस नक्की स्वबळावर निवडून येऊ शकते.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
- Log in or register to post comments
C
chipatakhdumdum
गुरुवार, 05/21/2009 - 21:02
नवीन
+
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Fri, 05/22/2009 - 06:03
नवीन
उत्तम लेख. पवार साहेबांना कमी लेखण्याची चूक महाराष्ट्रातील नेते नक्कीच करणार नाहीत
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 05/22/2009 - 13:40
नवीन
लेखातून राष्ट्रवादीचा आणि पर्यायाने पवारांच्या धोरणाचा केलेला उहापोह आवडला,
स्वाती
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 05/22/2009 - 13:52
नवीन
पवारांची आणखी एक ताकत म्हणजे आज निष्प्रभ वाटत असलेले पूर्वाश्रमीचे विरोधी पक्षांतील नेते. हे नेते म्हणजे पूर्वीच्या जनता पक्षातील, समाजवादी पक्षातील (एस एम जोशींचा पक्ष- मुलायमसिंहाचा नव्हे)नेते. हे नेते त्यांनी पुलोदच्या प्रयोगाच्या काळात जोडले आहेत. या नेत्यांच्या मूळ पक्षांतील कार्यकर्ते पवारांना थोडीफार ताकद पुरवतात. त्याचप्रमाणे पवारांना आपली इमेज चांगली ठेवणे शक्य होते.
८-१० जागांच्या जोरावर पंतप्रधानपदाची स्वप्ने तर हल्लीच्या काळात अनेक जण पहात असतात. यापुढे बहुधा पाहणार नाहीत. जनता त्यांना पाहू देणार नाही असे वाटते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments