Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झबडं - टोपलं

अ
अरुण वडुलेकर
Fri, 05/22/2009 - 12:32
💬 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4923 वाचन

💬 प्रतिसाद (23)
आ
आनंदयात्री Fri, 05/22/2009 - 12:37 नवीन
>>वाचकहो, तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेला आहांत? वरुण अडुरलेकर काका, आम्हाला अजुन सुनबाई यायला अवकाश आहे ;) - आंद्यातात्या मुळे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/22/2009 - 13:16 नवीन
वरुण अडुरलेकर काका, आम्हाला अजुन सुनबाई यायला अवकाश आहे चला शेवटी संतती आहे हे तर मान्य केले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Fri, 05/22/2009 - 13:22 नवीन
अबॉबॉबॉ .. पर्‍या आठवल्या ... हलकटा ... कुठल्या जन्माचा सुड उगवतोस !! चल घेईन मी तुला राज्यसभेवरुन .. ऍटलिस्ट विधानपरिषदेत तरी वर्णी लावेनच .. पण जरा सबुरीने घे बाबा. आधीच तर दोन दोन घरे चालवायची म्हणजे खर्च एवढा .. त्यात तुम्ही अशी तोडपाणी करता !! कसं जगावं कसं माणसानी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विजुभाऊ Fri, 05/22/2009 - 12:35 नवीन
आपकी बजी मे कितने घडे है बस नौणेपौ ..... भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
व
वाचक Fri, 05/22/2009 - 15:19 नवीन
एका सून बाईंना म्हणायचे होते "भाजी आमटी" - त्या म्हणाल्या "आजी भामटी" :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 05/22/2009 - 15:22 नवीन
वा! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 05/22/2009 - 16:22 नवीन
थोडं वेगळं. आम्ही एकदा संध्याकाळी खेळून घरी आल्यावर आमच्या आजीने "आता कपडे धुवा आणि हातपाय बदला" असे सांगितले होते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/22/2009 - 16:25 नवीन
बाकी आम्ही खेळून आल्यावर कपड्यांची आणि हातापायांची जी काही अवस्था होत असे ती बघता हे सार्थच म्हणायचे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चतुरंग Fri, 05/22/2009 - 16:28 नवीन
मिरवणुकीच्या रस्त्याने मागेपुढे हिंडत असताना आमचा एक मित्र दुसर्‍या मित्राबद्दल सांगताना म्हणाला, "अरे, तो आत्ताच 'उतळेरोडवरुन चिलटा' चालत गेला." (चितळेरोडवरुन उलटा चालत गेलाच्या ऐवजी)! :D चतुरंग
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Sat, 05/23/2009 - 13:06 नवीन
नगरचा चितळेरोड का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पक्या Fri, 05/22/2009 - 19:41 नवीन
माझ्या ओळखीतला एक मुलगा लहानपणी असेच बोलायचा. मुद्दाम नाही. त्याचा नेहमी गोंधळ व्हायचा बोलताना. त्याचे एक वाक्य कायम लक्षात राहिले आहे...साणे दांडले
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 05/22/2009 - 19:43 नवीन
मी लहान असताना सोनाली व केदार यांच्याकडे खेळायला चालले आहे असे म्हणायच्या ऐवजी सोनाल व केदारी म्हटले होते. माझ्या नणंदेच्या मैत्रिणींमधे पिंकी नावाच्या मुलीला पकडापकडी खेळताना एक मैत्रिण म्हणाली,"पिळ पंकी" खरेतर तीला म्हणायचे होते,"पळ पिंकी" =)) =)) रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/23/2009 - 05:22 नवीन
काय वार गारा सुटलाय! :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 05/23/2009 - 07:46 नवीन
माझं नेहेमीच होतं! असंख्य उदा असतील..! मज्जय! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Sat, 05/23/2009 - 13:30 नवीन
पुण्यात आमची एक XYZ उत्सव समिति आहे, मंड्ळ आहे. बर, या मंड्ळाचे आधारस्तंभ माननीय ABC, हे रात्री ९ नंतर हालायला लागायचे, अथात टाकुन / पिउन. हा आधारस्तंभ मला म्हणाला " आरे मंडळात जरा संभोग करत जा" च्यामारी म्हंट्ल, हा असा का म्हण्तो आहे ? मग कळालं त्याला म्हणायचं होत "मंडळात सहभागी होत जा"
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 05/24/2009 - 05:52 नवीन
मराठीत म्हण आहे की "पाहुण्याच्या काठीने साप मारणे." आमचा कांबळीमामा म्हणायचा ... पाहुण्याच्या सापाने काठी मारणे. :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 05/24/2009 - 06:04 नवीन
मस्त मजेशीर धागा आहे. मजा येते आहे सर्वांचे अनुभव वाचताना. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Sun, 05/24/2009 - 09:21 नवीन
शाळेत असतांना क्रमिक पुस्तकात एक मराठी कविता होती. ती आता मुळीच आठवत नाही. पण तीत पळसाच्या कळी संबधी कांही तरी वर्णन होते. ती लालचुटुक कळी कवीला पोपटाच्या चोचीसारखी दिसली असें कांहीसे आठवते. पन लक्षांत राहिलेली गंमत म्हणजे ही कविता शिकवणार्‍या, एरवी अत्यंत रुक्ष असलेल्या शिक्षकांनी जेंव्हा चुकून कळसाची पळी म्हणताच त्यांनाच फुटलेले हसूं. तो त्यांचा प्रथमच पाहिलेला हंसरा चेहरा.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 05/24/2009 - 16:22 नवीन
अगदी झक्कास उदाहरणे दिली आहेत एकेकांनी! अशा प्रकारच्या अक्षरांच्या थारेपालटावरून केलेल्या गमतीला इंग्लीशमध्ये स्पूनरीझम म्हणतात. काही वाचलेली उदाहरणे - If you hiss my mistery lectures. I will send you home by town drain (If you miss my history lectures, I will send you home by down train) Our queer old dean (Our dear old queen) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 05/24/2009 - 23:41 नवीन
माझ्या यजमानांची मामे बहिण कांदी काकडा म्हणायची.अजूनही यावरून चिडवा चिडवी चालते. मीनल.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 05/25/2009 - 11:15 नवीन
हे लय भारी केलंत हो वडुलेकर. मस्त धागा. मी माझ्या मावशीकडे शिराळ्याला गेलो होतो तेव्हा एका संध्याकाळी अचानक दिवे गेले. माजघरात एकदम खोलीचा मध्य पकडून काहीतरी हादडत बसलो होतो मी. दिवे गेलेले पाहताच सगळेजण दुसरी सोय करायला धडपडत उठले... मी मात्र मुद्दाम गोंधळ घालायला सुरुवात केली.. "पेंढा टेपवा..पेंढा टेपवा" !! ;) सगळे जे काही गंडून गेले, कोणाला काहीच कळेना, पण काहीतरी करायचंच हे समज्त होतं, नुसती पळापळ करायला लागले सगळे. अचानक आजीच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय ते.....मला रप्पकन एक धपाटा घातला तीनं! गुमान उठलो आणि पुन्हा दिवे येईपर्यंत बाहेर ओट्यावर जाऊन बसलो :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Tue, 05/26/2009 - 08:11 नवीन
एका वरून एक आठवतं. माझाच एक लहानपणीचा किस्सा नव्याने आठवला. सातवीत असतांना शाळेच्या वार्षिक स्नेह सम्मेलनात, विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांत मी 'झाला महार पंढरीनाथ' हे गाणं म्हणत होतो. गाण्याची दोन कडवी बरी झाली तिसर्‍या श्रोत्यात अचानक हंशा सुरू झाला. कारण मी 'शहा घाली तोंड बोटात' असें म्हणालो होतो.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 05/26/2009 - 08:44 नवीन
बारावीत असतानचा एक किस्सा आहे. केमिस्ट्रीच्या लेक्चरला प्रोफेश्वर्साहेब क्वांटम थेअरी शिकवत होते. आझिमुथल क्वांटम नंबर शिकवताना ते चुकुन(?) म्हणाले की माझीउठल क्वांटम नंबर !! पण तेव्हापासून तो क्वांटम नंबर नावानिशी लक्षात राहिला आहे!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा