Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विवाह संस्था व तीचे पावित्र्य

ह
हर्षद आनंदी
Tue, 05/26/2009 - 05:33
🗣 27 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6350 वाचन

💬 प्रतिसाद (27)
व
विनायक प्रभू Tue, 05/26/2009 - 05:35 नवीन
कळाले नाही हॉ
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 05/26/2009 - 05:46 नवीन
आपण जे काही दुरदर्शन संचावर पाहतोय, त्याचा भावी पिढीवर काय परीणाम होऊ शकतो \ झालाय? लग्नसंबंधाचे महत्व संपत चालले आहे, त्याला कारणीभुत हे प्रकार आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ट
टारझन Sat, 05/30/2009 - 23:04 नवीन
मास्तरला पण कळलं नाही ? =)) =)) =)) चला आता मास्तरला सामान्य वाचकांची व्यथा कळेल .. :) असो ..बाकी काथ्याकुटातला सब्जेक्ट कुछ कळ्या तो नैच्च .. पण पच्या भी नही बॉस !! जरा मोठं आणि विस्तृत लिवलं असतं तर कळलं असतं .. (गतिमंद) टारझन अस्वस्थी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
च
चिरोटा Tue, 05/26/2009 - 05:40 नवीन
गेल्या काही वर्षात जात्,धर्म्,भाषा सगळच रस्त्यावर आलय. विवाह संस्था त्यापैकी एक. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 05/26/2009 - 05:48 नवीन
विवाह संस्थेचे पावित्र्य म्हणजे नक्की काय? (ते कळल्यास पुढची कारणमिमांसा करता येईल) ..विधी काहीतरे महत्....जाहीर रित्या प्रदर्शन होऊ नये असे तुम्हाला का वाटते? (मग लग्नाला का बोलावतात? गुपचुप का नाही करत?) कथेतील विवाह दाखवुन आपन त्या विधींची चेष्टा ? (हे कसे काय?) कळत नकळत हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे (बघुन जास्त विचार न करता सोडून देणे) की सर्वांना अपरिहार्य कायद्याने बंधनकारक वैचारिक / पाळणे आवश्यक असा उपचार आहे?
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 05/26/2009 - 06:06 नवीन
विवाह संस्थेचे पावित्र्य म्हणजे नक्की काय? (ते कळल्यास पुढची कारणमिमांसा करता येईल) लग्ना नंतरचे रंगवलेले सीन, त्याच्याही पलीकडे जाउन गेले काही दिवस झी- मराठी वर जो तमाशा चालला आहे (अवघाची संसार, कळत नकळत व.) ते बघुन डोके फिरले. घराघरातुन लहान मुले ह्या सिरीयल बघत असतात. त्यांच्यांवर काय संस्कार होतीय हा विचार आला. ..विधी काहीतरे महत्....जाहीर रित्या प्रदर्शन होऊ नये असे तुम्हाला का वाटते? (मग लग्नाला का बोलावतात? गुपचुप का नाही करत?) कथेतील विवाह दाखवुन आपन त्या विधींची चेष्टा ? (हे कसे काय?) खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का? कळत नकळत हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे (बघुन जास्त विचार न करता सोडून देणे) की सर्वांना अपरिहार्य कायद्याने बंधनकारक वैचारिक / पाळणे आवश्यक असा उपचार आहे? हे मान्य, तरी संस्कृतीचा र्‍हास उघड्या डोळ्यांनी बघवत नाही हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Tue, 05/26/2009 - 06:09 नवीन
टिव्ही बंद करा :-) टिव्ही बंद --> खोटेनाटे बंद --> संस्कृतीचा र्‍हास थांबेल. तुम्ही म्हणता ते कार्यक्रम बघत नसल्याने तुम्हाला नक्की काय खरे खोटे वाटते याबाबत खल करण्यास असमर्थ :-( शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
म
मेघना भुस्कुटे Tue, 05/26/2009 - 06:12 नवीन
टिव्ही बंद करा --> संस्कृतीचा र्‍हास थांबेल. =)) =)) =)) जालीम पण रामबाण उपाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सागर Tue, 05/26/2009 - 09:07 नवीन
टिव्ही बंद करा टिव्ही बंद --> खोटेनाटे बंद --> संस्कृतीचा र्‍हास थांबेल. =)) =)) =)) पूर्णपणे सहमत.... :) अवांतरः पण टी.व्ही. बंद केला तर माझे आवडते डिस्कव्हरी आणि ऍनिमल प्लॅनेट कसे पाहणार :( तसेही कथानायिकेंची तीन तीन - चार चार लग्ने पाहून डोक्यातील संस्कारांची वाट लागते. पण बायकोपुढे बोलेन कोण ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/26/2009 - 09:13 नवीन
तसेही कथानायिकेंची तीन तीन - चार चार लग्ने पाहून डोक्यातील संस्कारांची वाट लागते.
चार लग्नं आणि चारशे लग्नबाह्य संबंध विसरू नका मिश्टर! वर त्या कथानायिकेचं नावसुद्धा 'संस्कृती'च असेल!!
पण बायकोपुढे बोलेन कोण ? Wink
हे दोन वेगवेगळे विषय आहेत. तुमच्या बायकोपुढे बोलणार्‍या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत ... तिच्या मैत्रिणी! ;-) अदिती उवाचः या सिरीयल लोकाच्या घरी जाऊन बघायच्या तर बघायच्या, एकीकडे त्या सिरीयलवर ही & ही शेरे मारून विंट्रेश्ट घेऊन बघणार्‍यां शेजार्‍यांचा जीव नकोसा करायचा आणि वर त्यांच्यामुळे संस्कृतीचा र्‍हास होतो अशी ओरड करायची हा माझा आवडता धंदा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
स
सागर Tue, 05/26/2009 - 10:30 नवीन
=)) सहमत... आदितीताई, चार लग्नं आणि चारशे लग्नबाह्य संबंध विसरू नका मिश्टर! वर त्या कथानायिकेचं नावसुद्धा 'संस्कृती'च असेल!! पार्वती....तुलसी.... करुन सवरुन थकले आता.... आता अक्षरा पुराण चालू असते.... :) ... बाकीच्या सिरियल्स कडे मी लक्ष पण देत नाही त्यामुळे नावे माहिती नाहीत ;) बायकोने सिरियल लावली की बघणे नशीबी येते ... बर्‍याच वेळा मीच तिला स्टोरी सांगतो की पुढे असे घडेन आणि तसे घडेन... आणि अगदी तसेच होते... अशा रटाळ सिरियल्सच्या कथा सांगायला ह्या सिरियल्स पहायची गरज अजिबात नसते.... :) नाही म्हणायला माझ्या बायकोमुळे एक सिरियल मी आवर्जून बघतो... तारक मेहता का उलटा चष्मा... आणि कधी कधी एफ आय आर.... धमाल टाईमपास होतो... या सिरियल्स खर्‍या अर्थाने मनोरंजन करतात. केव्हाही बघा...किंवा बघू नका... कथानक लक्षात ठेवायची भानगड नाही. मराठी मधे पण गंगाधर टिपरेंसारख्या चांगल्या सिरियल्स चा मोठा तुटवडा आहे. अवांतर: आदितीताई आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या "अदिती उवाचः " चा एक लेख टाकून द्या... तेवढाच माझ्यासारख्या सिरियल्सला गांजलेल्या पीडीतांना आनंद होईन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नीधप Sat, 05/30/2009 - 17:19 नवीन
खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का?<< अहो ती काय सुहाग रात आहे का प्रतिकात्मक दाखवायला? कायपण... आता उद्या म्हणाल देवाची पूजा पण प्रतिकात्मक दाखवा खरी खुरी केल्यासारखी दाखवली तर मुलांवर वाईट परिणाम होतील... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
N
Nile Sat, 05/30/2009 - 22:19 नवीन
अहो ती काय सुहाग रात आहे का प्रतिकात्मक दाखवायला?
=)) असं केलं तर ही काय प्रतिकात्मक दाखवण्याची गोष्ट आहे का असा 'काथ्याकुट' निघेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
व
विसोबा खेचर Tue, 05/26/2009 - 05:48 नवीन
विवाह संस्था व तीचे पावित्र्य माझ्या आयुष्यात असे काही अनुभव आले आहेत, की वरील बाबतीत मी जर काही लिहिले तर ते स्फोटक ठरेल! तेव्हा काही न बोललेलेच बरे! चालू द्या..! आपला, (पवित्र अविवाहीत!) तात्या :)
  • Log in or register to post comments
स
सागर Tue, 05/26/2009 - 09:09 नवीन
तात्या, होऊन जाऊ दे एकदा काय ते डोक्यात स्फोट करुन घेण्यापेक्षा इथे केलेला बरे ;) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वेताळ Sun, 05/31/2009 - 07:10 नवीन
निदान तुमच्या स्फोटामुळे ह्या विषयावर एकादी साधकबाधक चर्च तरी मिपावर घडुन येईल. आपल्या चुका तरी लोकांच्या नजरेत येतील्.वाट बघत आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक प्रभू Tue, 05/26/2009 - 07:40 नवीन
असेच बोल्तो. डोक्याला शॉट च्या प्रतिक्रिया नक्की
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/26/2009 - 09:10 नवीन
अरे.माझा प्रतिसाद काय झाला? :( भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
अ
अ-मोल Tue, 05/26/2009 - 12:47 नवीन
हम आपके है कौन ष्टाईल गळेकाढू मालिकांवर कायदयाने बंदी आणावी.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 05/26/2009 - 18:48 नवीन
सद्ध्याच्या परिस्थितीत तुम्ही झी (मराठी/हिंदी) तत्सम चॅनल्सच्या सिरिअल्स पाहात असाल, तर संस्कृतीचा र्‍हास नक्कीच होतोय! टीव्ही बंद करा.. हा उत्तम उपाय ! २ दिवस फक्त मी छोटी बहू, सात फेरे बघायचा प्रयत्न केला.. फीट येऊन पडणार होते मी! सामान्य जनता इतकी गांजलेली आणि पीडित असते (तेही ढीगभर सोन्याचे दागिने घालून) हे माहीत नव्हते मला.. ज्या गोष्टी सरळ तोंडावर बोलता येण्यासारख्या असतात त्या यांना बोलता येत नाहीत, का तर घराण्याची प्रतिष्ठा किंवा संस्कार , आणि मग काय बोलू, कसं बोलू करत , डोळ्यातून ग्लिसरीनचा पाऊस काढत ३ एपिसोड्स घालवतात!! फालतूगिरी सगळी! X( www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 05/30/2009 - 22:13 नवीन
२ दिवस फक्त मी छोटी बहू, सात फेरे बघायचा प्रयत्न केला.. का गं असा प्रयत्न करावासा वाटला? माझी सहानुभुती आहे तुला. ;) (हलकेच घे.) त्या प्रकारच्या सिरिअल्समध्ये एकाच व्यक्तीचा चेहरा वेगवेगळ्या कोनांमधून दाखवतात ..... तोही ढँटॅढँ अश्याप्रकारचं बॅक्ग्राऊंड म्युझीक लावून....... असं ऐकलय. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Mon, 06/01/2009 - 02:38 नवीन
:) :) सहानुभूती ऍक्सेप्ट केली! गरज होतीच! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
नितिन थत्ते Sat, 05/30/2009 - 15:43 नवीन
>>>खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का? हे फेरे वरैरे दाखवले म्हणजे सिरिअल जास्त दिवस दळता येते. मागे दामिनी नावाच्या जंबो सिरिअलचा एक एपिसोड चुकून पाहिला. त्या सुमारास गणपतीचे दिवस होते. त्या एपिसोडमध्ये सुरुवात ते ब्रेक १- गणपती घरी आणणे. ब्रेक १ ते ब्रेक २ - गणपतीची आरती आणि ब्रेक २ ते शेवट- अथर्वशीर्षाची आवर्तने असे दाखवले होते. एपिसोड संपला. कथेच्या दृष्टीने पूर्ण एपिसोड रिकामाच होता. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sat, 05/30/2009 - 16:19 नवीन
आदिवाशी समाजामधी कोनापासुन राजीखुशीन मुल्गी पोटुशी र्‍हायली त त्येला तिच्यासंगच लगीन कराव लागत. आनी आधि पोरगा झाला त त्यो त्याच मान्साच नाव बाप म्हनुन लावतो. पुर्वी म्हनुनच आमच्यात एका मान्साला ३-४ बायका पन आसत. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
स
स्वामि Mon, 06/01/2009 - 04:47 नवीन
काय नशीब घेउन आले असतात ह्या सीरीयल मधले ना(ला)यक.बायको एवढी सुंदर असते तरी पण..........तो हर्षवर्धन भोसले तर लग्नाआधी एकीला पोटुशी ठेवतो,दुसरी त्याच्यावर मरते तर लग्न तिसरीशी करतो.तुमच्या बघण्यात आहे का हो असा कोणी नरपुंगव?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 06/01/2009 - 05:48 नवीन
खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का? सहमत आहे. खोटे लग्न दाखवताना विधी, फेरे वगैरे दाखवतात आणि 'सुहागरात' मात्र प्रतिकात्मक ... हा अन्याय आहे. ;)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 06/01/2009 - 06:52 नवीन
त्यात विविध जोडपी एकत्र राहणार आहेत. त्यात त्याचा प्रणय,मिठ्यामारणे, भांडण करणे सगळे वास्तवात दाखवणार आहेत्.त्या मालिकेचे नाव काहीतरी सरकार केराजमैं असे काहीतरी आहे. कलर्स ह्या चॅनेल वरुन त्याचे प्रसारण होईल. परवा त्यातील गरमागरम सीन दाखवले आहेत इंडीया टीव्ही वर. टीव्ही वरील कार्यक्रमावर नियंत्रणासाठी सेन्सारबोर्डला अधिकार नाहीत का? . हे सीन बघितल्या नंतर तसे एकादे बोर्ड असावे ह्याची प्रकर्षाने जाणिव होते. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा