भारतीय समाज आणि कुटुंब
💬 प्रतिसाद
(1)
व
विकास
Tue, 05/26/2009 - 22:28
नवीन
नक्की यातून नक्की "कवीला काय म्हणायचे आहे" (हा एक वाक्प्रचार आहे, या संदर्भात लेखकाला..!) ते समजले नाही. लेखक/लेखिकेचे नाव आणि मूळ दुवा मिळाल्यास बरे होईल.. तसेच येथे लेख टाकताना आपल्यालापण काय वाटते ते समजले तर बरे होईल!
बाकी माझे लहानसे निरीक्षण सांगते की हल्ली भारतात, विशेष करून शहरी आणि निमशहरी भागात मुले टिनएजर्स झाल्यावर "एकत्र विभक्त" कुटूंब पद्धतीच अस्तित्वात येऊ लागली आहे. एकाच वेळेस आईचा, वडलांचा, मुलांचा कुठे न कुठे तरी फोन चालू असतो. एकत्र जेवणे आणि त्यात काही तरी संवाद साधणे हा प्रकार पण कमी होत चालला आहे. त्याला दोन्ही बाजू कारणे आहेत (पालक आणि मुले). आता असे असणे हे समाजाच्या दृष्टीने एकंदरीत चांगले नाही असे मला वाटते. त्याचा अर्थ जर वरील लेखात म्हणल्याप्रमाणे, "जीवनशैली अत्याधुनिक व भावनात्मक सुखदु:खे मात्र मध्ययुगीन अशी सोयीस्कर सांगड घातक ठरल्याशिवाय राहणार नाही" असा कोणी घालू लागले तर घालूंदेत...
कारण जेंव्हा कुटूंबव्यवस्था असणे महत्वाचे वाटते तेंव्हा त्याचा संबंध हा मध्ययुगीन, संस्कृती वगैरेशी लावण्याऐवजी समाजशास्त्राशी लावावासा वाटतो. जेंव्हा कुटूंबात अथवा कुठेही (उ.दा. शाळेत शिक्षक-विद्यार्थी) संवाद उरत नाही तेंव्हा त्यातून मुलांची वाढ निकोप होण्याची शक्यता कमी असते असे वाटते.
>>>औद्योगिक क्रांतीबरोबर ही व्यवस्था ढासळणे अपरिहार्य होते. तरी आजही धंदा, राजकारण वगैरे क्षेत्रात फॅमिली मॉडेलच आदर्श मानले जाते. त्यामुळे व्यावसायिकतेचा बळी दिला जातो. कुटुंबाचे विश्व थोडे विस्तारले की त्यात नातलग व जात यांचा अंतर्भाव होतो. कारण जात ही विस्तारित कुटुंबच असते.<<
- औद्योगिक क्रांतीबरोबर कुटूंबव्यवस्था काही ठिकाणी जशी ढासळली तशीच काही ठिकाणी बदलली देखील. त्याचबरोबर ती लहान कुटूंबामुळेपण बदलली असे वाटते.
- धंदा, राजकारण यात कुटूंबापेक्षा "घराणेशाही" अधिक असते असे वाटते.
- कुटुंबाचे विश्व विस्तारल्यावर त्यात निव्वळ नातलग आणि जात येते असे आताच्या काळात म्हणणे सर्वार्थाने योग्य वाटत नाही. तर एकाच पेशातील, एकाच आर्थिक परिस्थितीतील कुटुंबे एकत्र येऊन पण विश्व विस्तारते. त्यात ना जात पाहीली जाते ना धर्म...
- Log in or register to post comments