Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ढाई अक्षर प्रेम के

फ
फारएन्ड
Wed, 05/27/2009 - 03:15
💬 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9201 वाचन

💬 प्रतिसाद (22)
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/27/2009 - 05:56 नवीन
या सिनेमासाठी टंकायचे खूप कष्ट घेतलेत... पण छान लेख आहे.. मज्जा आली... विशेष्तः दिग्दर्शनाचे वर्णन बहारदार आहे... वादळ्,पिंजडा,आकाश वगैरे .. मस्तच... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
स
सुहास गुरुवार, 05/28/2009 - 03:18 नवीन
या सिनेमासाठी टंकायचे खूप कष्ट घेतलेत... त्यापेक्षा जास्त कष्ट सिनेमा पूर्ण बघताना घेतले असतील... नंतर या सिनेमाचे दुष्परिणाम विसरण्यासाठी त्यापेक्षा जास्त कष्ट पडले असतील, नाही? --सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
छ
छोटा डॉन Wed, 05/27/2009 - 06:04 नवीन
मजेशीर लेख आहे. बरीच निरीक्षणे अचुक आहेत, आवडली. अनेक ठिकाणी चपखल कमेंट्समुले हसु फुटले. येऊ द्या असेच अजुन, पुलेशु. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 05/27/2009 - 06:31 नवीन
'ढाई अक्षर प्रेम के' विषयी अतिशय अखोल (अचपळ म्हणजे खूप चपळ तसेच अखोल म्हणजे खूप खोल) अशा टीकेमुळे माझ्यासारख्या रसिकतेचा अभाव (इथे अभाव म्हनजे खूप भाव नई काई :P )असलेल्यांची पिक्चर न पहाताच भारी करमणूक झाली. म्हणून तुम्हाला प्रतिसादाची 'उ त्त म' ही साडेतीन अक्षरे बहाल करण्यात येत आहेत ;)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 05/27/2009 - 08:15 नवीन
च्यायला. एवढा छान आहे हा पिक्चर बघायला पाहिजे पुन्हा. मागच्यावेळी मुर्खासारखा झोपुनच गेलो मी. >:) सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री श्री केशवसुमारजी...)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/27/2009 - 08:15 नवीन
मालक आपल्या व्यासंगाला सलाम ___/\___ हा चित्रपट फुकटात सुद्धा पाहवला नाही हो. ऐश्वर्याच्या मागे गुंड लागलेले बघितल्या बरूब्बर ऐश्वर्या पळाली नसेल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही थेटर बाहेर धाव घेतली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 05/28/2009 - 04:25 नवीन
गाभ्रीचा पाऊस बद्दलचे उत्कृष्ट परीक्षण लिहिणारे तुम्हीच ना ? :-) मला तुमचा हा लेख आवडलाच. पण हा चित्रपट सुमारे सव्वा मिनिट पाहिल्यानंतर तुम्हाला बंद का करावासा वाटला नाही, हा माझ्यामते मिलियन डॉलर प्रश्न आहे. असले चित्रपट मी बघण्याचा विचारच आधी करत नाही. पहायला सुरवात केल्यानंतर सुमारे दिड मिनिटात हे किती सडलेले असेल याची कल्पना येते. मग ते बंद करावे किंवा त्यातून उठून जावे. खेळ खल्लास :-)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 05/28/2009 - 10:20 नवीन
फारेंड इज फेमस फॉर रायटींग रिव्ह्युज ऑन (चिरफाडींग) सच मुव्हीज! :)) हा तुझा लेख म्हणजे माझा बेस्ट स्ट्रेसबस्टर असतो! नेहेमी काढून वाचते मी! :) ओम जय जगदीशही येऊदे.. :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
क्रान्ति गुरुवार, 05/28/2009 - 04:34 नवीन
मस्तच परीक्षण! बरं झालं, इतका महान चित्रपट पहायचे कष्ट घेतले नाहीत! तसेही बडजात्या, चोप्रा इ. इ. कंपनी आजकाल जाम डोक्यात जाते! =)) ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर घसरगुंडी खेळू शकतील एवढ्या मोठ्या उंच टाचेच्या चपला घलून घरात का फिरते कळत नाही. ही टिप्पणी वाचून मी आणि माझी लेक अजूनही हसत सुटलोय! =)) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 05/28/2009 - 05:18 नवीन
काय मस्तं लिहिलं आहे... मजा आली वाचून! या चित्रपटाची कथा ऐश्वर्या रायच्या आईने लिहिली आहे म्हणे! -अनामिक
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 05/28/2009 - 09:51 नवीन
असंच कुणी "कभी अलविदा.." किंवा "नो स्मोकींग" वरती ही लिहा.. "कभी अलविदा.." एक मैत्रिणीच्या शाहरूख पंखेगिरीमुळे थेटरात जाऊन पाहिला..पहिल्या अर्ध्या तासातच काय रद्द्ड.. भिकार...आहे ते कळाले.. पण इलाज नव्हता.. शेवटच्या एका तासात सिनेमा संपला असं वाटलं.. उठलोही होतो(मोठठा नि:श्वास टकून).. पण तोवर पुन्हा पाटी आली.. "तीन साल बाद" नि तो छ्ळ पुन्हा लांबला.. :(( नो स्मोकींग मध्ये काय होते याचा थांगपता शेवट्पर्यंत नाही लागला... :T मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!! अवांतरः "९९" थोडा हटके आहे.. शेवट्पर्यंत कंटाळा नाही आला.. एकूण प्रकरण मूळ हिंदी वाटलं नाही.. पण कशाचा रिमेक आहे माहीत नाही..!!
  • Log in or register to post comments
न
निखिलचं शाईपेन Fri, 05/29/2009 - 05:35 नवीन
--पण त्यानंतर अर्ध्या सेकंदात ती त्याला म्हणते की "मला प्रॉमिस कर की पुन्हा कोणावर प्रेम बसले तर लगेच सांगशील". नशीब अभिषेक तिला म्हणत नाही की "आणि तू मला प्रॉमिस कर की पुन्हा लग्न करायच्या आधी तुझ्या सगळ्या 'फक्त-दोस्तां'कडे एकदा चेक करशील" --आता अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडणे शक्य नसल्याने ती थेट आत्महत्या करायला निघते, पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते. आरे धिंगाणा घातलायस अक्षरशः .... फारच छान.. -निखिल
  • Log in or register to post comments
क
केदार_जपान Mon, 07/06/2009 - 03:52 नवीन
पूर्वी मासिकात बघितलेल्या अमिताभच्या कौटुंबिक फोटोतील अभिषेक प्रमाणे दिसतो. >>>>> =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 03/01/2011 - 16:06 नवीन
हा हा हा हा !! झकास मालक !! अजुन येऊ द्या त
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 03/01/2011 - 17:01 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 05/12/2011 - 01:18 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 05/12/2011 - 02:12 नवीन
पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते.
मग खाली पडून जेथे पाण्यातून बाहेर निघतात तेथे धबधब्यात पडायच्या आधी वरती यांच्या राहिलेल्या बॅगासुद्धा आपोआप आलेल्या असतात!
अशा निरीक्षणांनी मजा आली...
तो सोनाली कडे परत येतो, पण ती त्याला सरप्राईज काय देते तर त्यांच्या आणखी एका मित्राशी तिचे लग्न झालेले असते!
हिंदी सिनेमे बहुतेक सेलफोन, फेसबुक, इंटरनेट, गूगल चॅट वगैरे गोष्टी नसल्यासारखे केले जातात हे एक वेळ समजू शकतो - त्या गोष्टींचा शोध नुकताच लागला आहे. पण सामान्य कुतुहल व कॉमन सेन्सचं काय? त्यांचा शोध बऱ्याच पूर्वी लागला होता असा माझा समज आहे...
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार गुरुवार, 05/12/2011 - 02:24 नवीन
हसुन हसुन पोट दुख्या. कुठे मिळेल कुठे हा अल्टिमेट मुव्ही ! टोरंट लावला पायजे.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/12/2011 - 06:25 नवीन
या आधी वाटलं न्हवत ढाई अक्षर प्रेम के वर एखादा लेख मी संपूर्ण वाचू शकेन ;) बाकी "Walk In the Clouds" हा मीड नाईंटींज ते अर्ली ट्वेन्टीथ च्या दशकातील सर्व यशराज फील्म्स चा बाप आहे. फरक इतकाच की त्यांचा टेक्सास मधील शेतकर्‍याचा तडका यांनी पंजाबी ढंगात बदलला .. बाकी सगळ तेच.... एकत्र कूटूम्ब ... फॅमीली वॅल्यूज.. वढीलधार्‍यांचे मान पान व त्यातून तरूण पीढीची/स्त्रीयांची होणारी घूसमट (?).... अमेरीकेबद्दल थोडीशी आढी.... मूलांवर संस्कार... टीपीकल .. डीडीएल्जे स्टाइल प्रेम ..... वगैरे वगैरे वगैरे........ पण आजही कीनू रीवज आणी त्या हीरॉइन ची केमीस्ट्री बघायला आवडते....
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/12/2011 - 19:10 नवीन
कहर आहे हे परिक्षणही! हे वाचायचं कसं काय राहिलं बुवा? सोनाली बेंद्रे असलेला पिक्चरचा थोडा भाग मी पाहिला होता. तेव्हा ते काही न झेपल्यामुळे बंद केल्याचंही आठवत आहे. तुम्ही वेळेत का नाही हो अशी मापं काढत, असल्या पिच्चरांची! करमणूकही होईल.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Mon, 12/13/2021 - 11:46 नवीन
ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर घसरगुंडी खेळू शकतील एवढ्या मोठ्या उंच टाचेच्या चपला घलून घरात का फिरते कळत नाही. खल्लास :=) बरं झालं हा पिक्चर बघितला नाही, मायला एवढा भंगार असेल वाटलं नव्हत.
  • Log in or register to post comments
आ
आंबट गोड Mon, 01/10/2022 - 07:08 नवीन
खूपच मस्त! :-) हसुन हसून पोट दुखायचे बाकी आहे. पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते. मग खाली पडून जेथे पाण्यातून बाहेर निघतात तेथे धबधब्यात पडायच्या आधी वरती यांच्या राहिलेल्या बॅगासुद्धा आपोआप आलेल्या असतात! अशा निरीक्षणांनी मजा आली... तो सोनाली कडे परत येतो, पण ती त्याला सरप्राईज काय देते तर त्यांच्या आणखी एका मित्राशी तिचे लग्न झालेले असते! >>>१ खूपच भारी. हल्ली असले सिनेमे नाही निघत का?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा