Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 05/28/2009 - 09:22
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4151 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अमोल केळकर गुरुवार, 05/28/2009 - 09:34 नवीन
'सावरकरांचे विचार नेहमीच प्रेरणा देणारे ठरतील.' ---------------------------------------------------------------- अवांतरः मिपाच्या संचालकांना विसर पडला असेल असे वाटत नाही. तांत्रीक कामांमुळे मुखपृष्ठावर उल्लेख राहिला असण्याची शक्यता जास्त आहे. लवकरच स्वा. सावरकरांचा फोटो आणि विचार दिसतील असे वाटते. -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 05/28/2009 - 10:16 नवीन
तसेच असावे. कारण माझ्या माहितीप्रमाणे तात्या कट्टर सावरकरभक्त आहेत. सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
क
कपिल काळे गुरुवार, 05/28/2009 - 10:15 नवीन
सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन!! आज सकाळीच विचार मनात आला होता की, मिपा मुखपृष्ठावर त्यांचे छायावित्र पहायला मिळेल का, परंतु देखभालीसाठी मिपाची डोळेमिचकावणी सुरु असल्याने ते शक्या झालेले दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 05/28/2009 - 10:24 नवीन
आम्हीही (मी व आहो) सावरकर भक्त आहोत. आमचेही विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/28/2009 - 21:10 नवीन
मीही सावरकर भक्त आहे.. माझेही अभिवादन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 05/28/2009 - 23:57 नवीन
सर्वप्रथम स्वा. सावरकरांना विनम्र आदरांजली. मी पण सावरकरांना मानणारा आहे हे माझ्या इतर अनेक साद-प्रतिसादातून (येथील आणि उपक्रमावरून) समजेल. हे सांगण्याचा उद्देश खालील उर्वरीत प्रतिसाद :-) : कृपया हे कोणी व्यक्तिगत घेऊ नये. तसा मनापासून उद्देश नाही. हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस वारंवार येतो म्हणून जे वाटले ते लिहीत आहे इतकेच. मिपावर प्रत्येक वेळेस प्रत्येक थोर नेत्याचे, विभुतीचे छायाचित्र हे त्यांच्या (म्हणजे त्या थोर नेत्याच्या) जयंती अथवा पुण्यतिथीस असलेच पाहीजे अथवा तसे नसले तर त्याचा संबंध मग मिपाकरांचे विचार, जात, धर्म, (उद्या एकाही थोर बाईचे चित्र लावले नाही म्हणून) लिंग आदींशी लावायचे काही कारण नाही असे वाटते. वास्तवीक मिपावर नुसते चित्र लावले का ते विचारण्याऐवजी, आपल्याला आवडणार्‍या अशा थोर व्यक्तिबद्दल आपल्याला माहीत असलेल्या घटनांवर, विचारांवर इत्यादी, आधारीत येथे लेख आणि चर्चा टाकावी आणि त्या व्यक्तीचे विचार वाचकांपुढे आणावेत असे वाटते - मग ती व्यक्ती सावरकर असोत अथवा आंबेडकर अथवा अजून कोणी :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/29/2009 - 03:45 नवीन
विकासभौजींशी सहमत आहे.. तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त मिपावर फोटू टाकला गेला नाही याचा अर्थ मिपा मालकांना त्यांच्याबद्दल आदर नाही असा कुणी करून घेऊ नये. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही. शिवाय गेल्या ३-४ दिवसांपासून मिपाचे कामही सुरू आहे त्यामुळे मिपा बराच वेळ बंद होते.. आपला, (सावरकरभक्त) तात्या. बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती.. आपला, (प्रांजळ) तात्या.
  • Log in or register to post comments
स
समिधा Fri, 05/29/2009 - 04:40 नवीन
माझ्या सर्व कुटुंबाला सावरकरांबद्द्ल खुप आदर आहे. माझेही अभिवादन! समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 05/29/2009 - 10:40 नवीन
सावरकरांना अभिवादन ! विकासरावांशी सहमत आहे. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ सावकरांच्या १२६व्या जयंती निमित्त सवलतीच्या दरात उपलब्ध केला आहे. काल लोकसत्तेत बातमी वाचली तीचा दुवा देतो. इच्छुकांना लाभ घेता येईल. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 05/29/2009 - 13:49 नवीन
शतशः अभिवादन काही व्यक्तींबद्दल बोलता येत नसते,शब्द तोकडे पडतात असेच सावरकर त्यामुळे पुन्हा एकदा अभिवादन (कालच धागा काढायला आलेलो होतो मात्र मिपा बंद दिसले ,पण विशालजीनी ते काम केल्याबद्दल त्यांचे आभार) स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ध
धमाल मुलगा Fri, 05/29/2009 - 14:17 नवीन
त्या क्रांतीसुर्य, दुरदृष्टी असलेल्या प्रचंड पांडित्यवान अश्या देवतुल्य व्यक्तिमत्त्वाला आमचाही साष्टांग प्रणिपात! लोकसत्तेतली ती बातमी वाचली, परंतु एक प्रश्न पडला की हे पुस्तक ह्या वर्षी सवलीतीच्या दरात देणार आहेत असं म्हणताहेत, पण मी तर गेल्यावर्षीच ग्राहक पेठेतून घेतलं. अर्थात तेव्हाही फारच नगण्य किंमत होती त्याची. साक्षात तात्यारावांनी स्वतः लिहिलेल्या हस्तलिखीताला पुस्तकरुपानं प्रकाशीत केलेल्या ह्या पुस्तकासाठी सवलत नसती तरीही नक्कीच लोकांच्या त्यावर उड्या पडल्या असत्या. :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नितिन थत्ते Fri, 05/29/2009 - 14:41 नवीन
सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील आणि हिंदू धर्मीयांना रूढींच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी केलेले समाजसुधारणात्मक कार्य अतिशय स्पृहणीय. मनःपूर्वक अभिवादन. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा