Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्रपट ओळख - लेटर्स फ्रॉम इवो जिमा

ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/29/2009 - 01:50
💬 25 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9501 वाचन

💬 प्रतिसाद (25)
स
सूर्य Fri, 05/29/2009 - 02:14 नवीन
वा! चांगल्या चित्रपटाची माहीती दिलीत बिपीनराव. आजोबांनी डिरेक्ट केलेला म्हणजे उत्तम असणारच. तुम्ही जसे लिहिले आहे त्यावरुन उत्सुकता वाढली आहे. बाकी 'आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.' याच्याशी अगदी सहमत. - सूर्य.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/29/2009 - 03:53 नवीन
वा! चांगल्या चित्रपटाची माहीती दिलीत बिपीनराव. हेच बोल्तो..! बिपिनभौजी, जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य
व
विकास Fri, 05/29/2009 - 02:22 नवीन
चित्रपट परीचय आवडला. नवीन माहीती कळली... क्लिंट इस्टवूड म्हणले की केवळ डर्टी हॅरीच डोळ्यासमोर येतो.. या चित्रपटाच्या निमित्ताने जरा काही वेगळे पहायला मिळेल असे वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 05/29/2009 - 03:04 नवीन
बिपिनशेट ! सुंदर ओळख !! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 05/29/2009 - 04:00 नवीन
एक जखमी अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती लागतो. त्याच्या जवळ त्याच्या आईने लिहिलेले पत्र असते. त्या पत्राचे जाहिर वाचन तिथला इंग्लिश बोलणारा अधिकारी जपानी मधून करतो तेव्हा साइगोचा एक साथी त्याला म्हणतो, "माझ्या आईने पण मला अगदी हेच सांगितले आहे". अमेझिंग!!! आता चित्रपट पहावाच लागेल. :) नाविन्यपुर्ण आस्वाद! आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/29/2009 - 04:23 नवीन
एका चांगल्या चित्रपटाची ओळख करून दिलीस बिपिनदा..! नक्कीच बघेन हा चित्रपट. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/29/2009 - 04:29 नवीन
हा चित्रपट यादीत टाकून ठेवला आहे. बिपिनदा उत्तम परिक्षणाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/29/2009 - 08:26 नवीन
हा चित्रपट यादीत टाकून ठेवला आहे. मी ही.. बिपिन, परीक्षण आवडले हेवेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
द
दिपक Fri, 05/29/2009 - 06:33 नवीन
वाह बिपीनदा माझ्या आवडत्या चित्रपटाबद्दल खुप छान लिहिले आहे. हा चित्रपट दोन महिन्यांपुर्वी पाहिला होता. त्याबद्दल इथे दोन ओळी लिहिल्या होत्या. तादामीची कुरुबायेशी(केन वॉटनेबी) अभिनयाला तोड नाही. अप्रतिम चित्रपट. अक्षरशः एकदाही जागचे न उठता बघितला हा चित्रपट. खरयं! Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/29/2009 - 06:34 नवीन
मस्त परीक्षण.. पाहिला पाहिजे चित्रपट... ____________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 05/29/2009 - 09:07 नवीन
>>(आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.) ही लेख वाचून सहज म्हणून विचार करताना वाटलं की भारतात चांगले युद्धपट कधीच का बनले नाहीत? (केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे, तिथे पैसा हा एक घटक असू शकतो, तर आशयाच्या दृष्टीनेसुद्धा.) बॉर्डर, एलओसी वगैरे दत्ताप्रभृती मंडळींचे सिनेमे तर युद्धपट म्हणून अत्यंत उथळ आहेत. याची कारणे कोणती असावीत? मला वाटली ती अशी - १) युद्धपटातही प्रेमकथा, गाणी वगैरे घुसवण्याच्या नादात पटकथेची वाट लागते. २) युद्धाचं त्रयस्थ चित्रण न दाखवता भावनेच्या आहारी जाणे. दत्तांचे चित्रपट तर अतिशय जिंगोईस्टिक वाटतात. ३) एक देश म्हणून युद्धाच्या बाबतीत कमी पडणारा आपला अनुभव (फक्त चार, ४८चं धरून ५, त्यातही एक हरलो त्यामुळे त्याच्यावर चित्रपट फारसे नाहीत. शिवाय युद्धांची स्केलही लहान.) ४) तांत्रिक सफाईचा अभाव (हे आजकाल जरा कमी झालंय. लक्ष्य सिनेमातली लढाईची दृष्यं बरी होती). ५) पहिल्या आणि जास्तकरून दुसर्‍या महायुद्धात युरोपात आणि अमेरिकेत एकूणातच खूप जास्त लोकांना युद्धाला तोंड द्यावं लागणं (युद्धामुळे नुकसान होणं, जवळच्या व्यक्ती युद्धात असणं वगैरे). मला वाटतं आपल्या भारतीय जनतेला युद्धाची प्रत्यक्ष झळ फारशी कधी बसलेली नाही. म्हणूनही युद्ध आणि जिंगोइझम यांचं असं समीकरण भारतीयांच्या मनात असावं. अजून कोणती कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं?
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 05/29/2009 - 09:27 नवीन
सहमत! भटाशी . परिक्षण मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
च
चतुरंग Sat, 05/30/2009 - 00:45 नवीन
अजून एक गोष्ट अशी वाटते की युद्धपट म्हणजे थेट आणि फक्त युद्धच दाखवायला हवे अशी समजूत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर मानवी संबंधांचे इतर धागेदोरे, माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती, देशांचे एकमेकांशी वैर असले तरी सर्वसामान्य माणसाला खरेतर युद्ध नको असण्याची मानसिकता अशा काही गाभ्याला हात घालणार्‍या विषयांवर विचार केलेले चित्रपट नसतात त्यामुले उथळ आणि बटबटीतपणा येण्याची शक्यता वाढते. ('लक्ष्य' त्यामानाने मला बराच संयत वाटला होता. विशेषतः उत्तरार्ध.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/29/2009 - 23:33 नवीन
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मी जेव्हा 'बॉर्डर'चा उल्लेख केला तेव्हा 'त्यांचं चांगलं म्हणून आपलं वाईट' असा काही उद्देश नव्हता आणि नाही. मला हेच म्हणायचे होते की आपल्याकडे निखळ थरारक युध्दपट नाहीच आहेत. कोणताही युध्दपट घ्या. त्यात बरीच दुसरी कथानकं असतात. युध्दाचे चित्रण पण नकली वाटते. (पण बॉर्डर मधे युध्दाचे चित्रण मात्र चांगले केले होते हे कबूल करावे लागेल.) चित्रणाच्या बाबतीत मला आजपर्यंत लक्ष्य मधले चित्रण सगळ्यात जास्त आवडले. विशेषतः कडा चढायचा प्रसंग. पण लक्ष्य हा निखळ युध्दपट नाही. शिवाय लाऊड अभिनय, एकदम दणकून संवाद वगैरे जीव खातात. आपण अजून एक नेहमी करतो... आपल्या युध्दपटांमधे शत्रू (म्हणजे पाकिस्तानी) अगदी फालतू, सुमार बुद्धीचे वगैरे असतात. भटाने मुद्दे छानच मांडले आहेत. मला अजून असे वाटते की पाश्चात्य लोक कोणतीही गोष्ट करताना पूर्ण संशोधन करून, बारकावे वगैरे सकट तयारी करतात. आणि चित्रण करताना पूर्ण आर्थिक ताकद वापरली जाते. क्वालिटीत तडजोड नसते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 05/29/2009 - 23:45 नवीन
लेख आवडलाच. चित्रपट यादीत टाकतो आहे. भट यांची प्रतिक्रिया (नेहमीप्रमाणेच) सांगोपांग विचार करणारी , प्रसंगी वर्मावर बोट ठेवणारी झाली आहे. भारतीय चित्रपटांच्या संदर्भात मात्र , हरलेल्या युद्धावर बनलेला एक चित्रपटच , सर्व युद्धपटांचा आदर्श आहे (हकीकत) हा मुद्दा त्यांनी नजरेआड केलेला दिसतो :-) एक कळीचा मुद्दा : एका अमेरिकनाने जपानी बाजूचे चित्रण करताना विश्वासार्हता, निष्पक्षपातीपणा , विषयाला न्याय देणे या मूल्यांचे जतन कितपत झाले आहे ?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/29/2009 - 23:55 नवीन
एका अमेरिकनाने जपानी बाजूचे चित्रण करताना विश्वासार्हता, निष्पक्षपातीपणा , विषयाला न्याय देणे या मूल्यांचे जतन कितपत झाले आहे ? जरी हा सिनेमा जपानी सैन्याच्या दृष्टीकोनातून बघतो असे म्हणले असले तरी, ते तितकेसे बरोबर नाहीये. जपानी सैन्याच्या बाजून असे म्हणले तर खरे तर असे पाहिजे की चित्रपट जपानची बाजू मांडतो, युध्दाचे काही समर्थन देतो वगैरे असायला पाहिजे. पण तसे नाहीये. त्या लढाईत, जपानी सैन्याच्या भागात काय आणि कशा घडामोडी झाल्या त्याचे चित्रण आणि त्याच्या आधाराने काही गोष्टी मांडतो. कुरिबायाशी (जो सर्वोच्च नेता आहे) आणि साइगो (जो एक साधा शिपाई आहे) या दोन्ही मुख्य व्यक्तिरेखा युध्दाच्या व्यर्थतेवर बोट ठेवणारी भाष्य करतात. तरी सुध्दा, जपानी सैन्याचे / सैनिकांचे मानवी रूप समोर मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे असेच म्हणावे लागेल. कुठेही जिंगोइस्टिक अथवा प्रचारकी थाट जाणवत नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
N
Nile Fri, 05/29/2009 - 23:55 नवीन
मि पाहीला आहे सिनेमा, फार आवडला नाही. :)
एक कळीचा मुद्दा : एका अमेरिकनाने जपानी बाजूचे चित्रण करताना विश्वासार्हता, निष्पक्षपातीपणा , विषयाला न्याय देणे या मूल्यांचे जतन कितपत झाले आहे ?
या बाबतीत शंका नको, सहसा हे लोक असं करत नाहीत(कारणं वेगळी:)) The Last Samurai पहा, सुंदर बनवला आहे. यामध्ये जो जपानी जनरल(नट) झाला आहे तोच त्यात लास्ट समुराय आहे. :) बाकी पाश्चात्य लोक फक्त "सुंदरच" सिनेमे बनवतात याबाबतीत मि असहमत आहे. त्यांचे आपण "सुंदर" सिनेमेच बघतो असे असु शकेल. (अर्थात मी फक्त सुंदरच नाही बघीतले म्हणुन हे विधान ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/29/2009 - 23:59 नवीन
बाकी पाश्चात्य लोक फक्त "सुंदरच" सिनेमे बनवतात... मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. मी फक्त युध्दपटांच्या बाबतीत हे लिहिलं होतं. :) लास्ट सामुराई हा मला आवडलेला अजून एक चित्रपट... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Sat, 05/30/2009 - 00:00 नवीन
तुम्हाला नाही हो तसं म्हट्ल. एकंदरी असा सुर दिसला लोकांचा म्हणुन. :) पण आपल्यापेक्षा पाश्च्यात्य लोकांकडे अनेक प्रकारचे प्रेक्षक टारगेट करणारे सिनेमे (जास्त संख्येने) निघतात हे मात्र अगदी खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
आ
आनंदयात्री Sat, 05/30/2009 - 06:23 नवीन
>>पण आपल्यापेक्षा पाश्च्यात्य लोकांकडे अनेक प्रकारचे प्रेक्षक टारगेट करणारे सिनेमे (जास्त संख्येने) निघतात हे मात्र अगदी खरं. क्या बात है !! आवडुन गेला तुमचा आउट ऑफ द बॉक्स व्यु :) बाकी बिपिनदा बरे केलेस लिहलेस ते .. पुढल्यावेळेस भेट्शील तेव्हा नक्की दे तो चित्रपट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
च
चंबा मुतनाळ Fri, 05/29/2009 - 23:46 नवीन
मला त्यामानाने, मनोज बाजपेयीचा अभिनय असणारा भारतीय युद्धकैद्यांवर काढलेला १९७१ हा चित्रपट आवडला होता. काहिही फाफट पसारा नसलेला आणी विषयाला धरून काढला होता. - चंबा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/30/2009 - 00:38 नवीन
हा मध्यंतरी टाळला सिनेमा, बघू की नको अशी द्विधा अवस्था होती. पण आता उत्सुकता निर्माण झाली आहे बघायची. चतुरंग
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 05/30/2009 - 04:48 नवीन
चांगला चित्रपट परिचय बिपिनराव, पाहिला पाहिजे! सध्या तंत्रज्ञान सुधारले असले तरी तात्विक, वैचारिक आणि प्रेम-कहाणी नसलेले चित्रपट भारतात दुर्मिळ आहेत. 'लाईफ इज ब्यूटिफूल', 'लास्ट सामुराई' किंवा 'ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय' सारखे चित्रपट आपल्या डेव्हिड धवन किंवा बडजात्यांनी हिंदीत बनविले आहेत हे स्वप्नरंजनही वृथा आहे. 'वेन्स्डे' सारखे अपवादही आहेत्, पण अपवाद उदाहरण होऊ शकत नाहीत. ऍव्हरेज भारतीय प्रेक्षकांचा एकंदरीत आय्-क्यूसुद्धा कारणीभूत आहेच. मागे एकदा माझी ह्याच विषयावरून हेमंत देवधरांशी (राजा शिवछत्रपतीचे दिग्दर्शक) चर्चा झाल्याची आठवली. ते पूर्वी जब्बार पटेलांबरोबर काम करीत असत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे वैचारिक किंवा 'वेगळे' चित्रपट मराठीत वा एकंदरीत भारतात फारसे चालत नाहीत त्यामुळे फायनान्सरही पैसे घालायला कचरतात; शेवटी सगळे गणित येऊन पोहोचते पैश्यांवरच!
  • Log in or register to post comments
श
शरदिनी Sat, 05/30/2009 - 05:45 नवीन
बॉर्डरमध्येही युद्धाच्या व्यर्थतेचे काही संवाद आहेत असे वातते... नक्की आठवत नही, पण पत्र येते त्यावेळी तो शत्रूबद्दल असे काही बोलतो असे वाटते... ... युद्ध हे भारी असे त्यांना म्हणायचे आहे " हे तुमचे मत असावे असे वाटले..
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 11/10/2016 - 09:38 नवीन
छान ओळख . "द गुड द बॅड अ‍ॅन्ड द अग्ली" वाल्या क्लिंट इस्टवुडचे "द मिलिअन डॉलर बेबी " , "लेटर्स फ्रॉम इवो जिमा" व इतरही चित्रपट खुप आवडले . "फ्युरी" , " शिंडलर्स लिस्ट" हे असेच लक्षात राहिलेले चित्रपट .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा