मराठी माणसाचा तारणहार कोण?
💬 प्रतिसाद
(6)
व
विकि
Sun, 05/31/2009 - 16:04
नवीन
तारणहार एकच भारताचा कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सिस्ट) . ज्याने मराठी माणसाच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रतिनिधीत्व केले .
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 05/31/2009 - 17:06
नवीन
मराठी माणसाचे मरण झाले. अहो सरकारात आपली लॉबीच नाही. जे आहेत ते सगळे मुगगीळे, तडजोड करणारे. तत्वांशी भांडणारे राहीलेच नाहीत. परत सांगतो, यांना सत्तेची उब पाहीजे फक्त. बाकी काही नको. सत्ता आपल्या नंतर घरात कोणाकडे तरी राहीली पाहिजे, बास.
राज ठाकरेंमुळे काहीतरी हातात आले आहे म्हणावे तर ते काय हे काळच ठरवेल. नाहीतर महाराष्ट्राची मुंबई होईल. (आता मुंबईचे काय झाले ते विचारू नका.)
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
- Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला
Sun, 05/31/2009 - 17:21
नवीन
माहीत नाय पन इन्टरनेटावर मराठी भाश्येच तारनहाय फकस्त आपल तात्याजी उरफ इसोबा खेचर. मिसलपावाच्या रुपान त्यानी मराठी भाश्येला नवी सजीवनी दिली =D>
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Mon, 06/01/2009 - 06:17
नवीन
मराठी माणूस म्हणजे केवळ शिवसेना/मनसे/भाकप का? राजकिय पक्षांशिवाय मराठी माणसाला अस्तिवच नाही का?लोकसंख्येने उत्तर प्रदेशच्या खालोखाल आणि क्षेत्रफळात देशात तिसर्या असणार्या राज्यातले लोक खरोखरच एवढे असहाय्य झाले आहेत का?
लोकसंख्येने जवळपास अर्ध्या असलेल्या शेजारच्याच कर्नाटकात इकडे 'कन्नड माणुस मागे/कन्नड माणसावर अन्याय' असली वाक्ये कधीच ऐकु येत नाहीत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 06/01/2009 - 06:25
नवीन
असली वाक्य सगळीकडे ऐकू येतात. 'पिंक चड्डी' इतकही जुनं नाही झालं अजुन.
पण तारणहार लागतोयच कशाला लोकांना कुणास ठावुक?
- Log in or register to post comments
प
प्रशु
Mon, 06/01/2009 - 07:41
नवीन
|| तुझ्या ऱक्षणा तुच रे सिद्ध होई.||
|| सदा संकटि देव धाऊन येई. ||
- Log in or register to post comments