Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साखरेचे खाणार त्याला..!

च
चतुरंग यांनी
Mon, 06/01/2009 - 15:31  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
24857 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/01/2009 - 17:26 नवीन
हं ... रंगाशेट, आज तुम्हाला जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद आणि आत्ता यातलं काही खायला मिळणार नाही म्हणून थोडा खुन्नस! मस्त लिहिलं आहेत. मला एकदम आजोबा घरी बनवायचे त्या पेढ्यांची आठवण झाली. विनायकी चतुर्थीला ठाण्याला यायचे ते स्वतः गायींचं दूध काढण्यापासून, खवा बनवेपर्यंत सगळं काम स्वतःच करायचे. मी मोजून दहा पेढे त्यांच्या डब्यात प्रसादासाठी ठेवायचे आणि बाकीचे अर्थात आमच्या 'सिक्रेट' जागी! एक-दीड दिवसात पेढे गायब! साखर न घाललेले ते पेढे इतके अप्रतिम लागायचे ... गावच्या जंगलात चरलेल्या गायींच्या दूधाची चव का चुलीवर आटवलेलं दूध का आजोबांचं प्रेम हे मात्र न उलगडलेलं कोडं आहे!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/02/2009 - 12:23 नवीन
व्वा.....वाडीच्या बासुन्दीच्या आठवणीने बरे काही जागे केलेत रंगाशेठ. तिथे मिळणारी कवठाची बर्फीसुद्धा एकदम बेष्ट असते केशरी रंगाची आंबट गोड भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मस्त कलंदर Tue, 06/02/2009 - 19:55 नवीन
लेख वाचता वाचताच खूप काही गोड खाण्याची इच्छा झालिये... बाकी.. वाडी.. औदुंबर म्हटलं की कवठाच्या बर्फीची हटकून आठवण येते... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
क्रान्ति Mon, 06/01/2009 - 17:34 नवीन
नुसत्या गोड पदार्थांच्या आठवणीनं सुद्धा सण साजरा करतोय, असं वाटलं. खूप मस्त जमलीय बासुन्दी! <:P :) <:P क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 06/01/2009 - 17:38 नवीन
चतुरंग.. बरोबर लंच टायमाला गोडाची आठवण करून दिलीत त्याबद्दल निषेध! मीसुद्धा तुमच्या सारखाच गोडघाश्या! गोड अतिप्रिय!! तुमचा लेख भरपूर आवडला... तुमच्या तोंडात लग्गेच साखर पडो! -अनामिक
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 06/01/2009 - 17:40 नवीन
नगरला जात असे तेव्हा महेंद्र पेढावाल्याकडचे पेढे नेहमीच घेत असे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
स्वामि Mon, 06/01/2009 - 17:50 नवीन
बम्बइवाल्याकडचा बटाट्याचाचिवडा सांगायला विसरलात की!तो गोड नसतो म्हणुन सांगीतला नसेल. :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 06/01/2009 - 18:05 नवीन
काय लिहिले आहे. मी देखील "खाईन तर तुपाशी" संप्रदायातला आहे. त्यामुळे डाएट, सॅकरीन वगैरे काही प्रकार नाही. स्वास्थ्यासाठी म्हणून घरात साधारण गोड पदार्थच नसतात, अन असले तर तुपा-सारखेचे. तुमच्या नगर सारखा माझ्या गोव्यातील खेडेगावातला कुठला हलवाई नाही :-( वाचून खूप मजा वाटली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/01/2009 - 18:20 नवीन
खूप खूप गोड झालाय लेख! नगर बद्दल माहिती नाही, पण नरसोबाच्या वाडीचे पेढे, बासुंदी... म्हणजे ब्रह्मानंदी टाळी. तसं श्रीखंड आम्रखंड हे प्रकार इतके नाही आवडले कधी.. पण मोतीचूराचे लाडू, कलाकंद.. सूतरफेणी, सोनपापडी हे मात्र खूप आवडतात. जिलेबी विशेष नाही.. मात्र.... रसमलाई खूपच आवडते. लेखाने जुन्या आठवणी जागवल्या हे नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मिंटी Tue, 06/02/2009 - 07:43 नवीन
प्राजु ताईशी सहमत. फारच गोड झालाय लेख. नगरबद्दल मलाही फारशी माहिती नाही... पण नरसोबाच्या वाडीची बासुंदी, पेढे मस्तच.... तुमच्या लेखामुळे मला आमच्या पंढरपुरच्या देशपांड्यांच्या पेढ्याची आणि मी गेल्यावर आवर्जुन माझ्यासाठी आज्जी घेते त्या बासुंदीची आठवण झाली..... जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
N
Nile Mon, 06/01/2009 - 18:50 नवीन
वा! तुमच्या बरोबर मीही नगरला जाउन आलो. द्वारकादास ची लस्सी राहीली का आवडत नाही? मँगो आईसक्रीम घालुन तर हेवन! :) मैसुरपाक पदार्थ दक्षिणेत उत्तम मिळतो. चैनईला एक मिठाईवाला आहे (चैन्नई स्वीट्स) त्यांच्या वर्धापनदीनी मैसुरपाक हा निम्म्या किमतीत मिळतो (त्यांच्या संस्थापकाने मैसुरपाक शोधला असं ते म्हणतात). तो अजीबात आपल्या जाळीदार कोरड्या मैसुरपाकासारखा नसतो. मस्त तुपाळ आणि लई भारी लागतो. :) अवांतरः तुम्ही म्हणता त्या झालानीचा मुलगा माझ्या बरोबर (बहुदा त्याच) शाळेत होता. त्यात आम्ही नविपेठेत. कधीही लहर आली कि चाल्ले, मिठाई, वडे, वगैरे खायला. मला नगरच्या बटाटावड्यांइतके इतर कुठलेच आवडले नाहीत. सगळ्यात जास्त काय मुकत असेन तर संक्रांत, पतंग उड्वुन आता ७ वर्षं झाली. :( :( @स्वामी: मला वाटत आशिर्वाद जास्त प्रसिद्ध आहेत चिवड्यासाठी.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/01/2009 - 18:53 नवीन
अरे तुम्ही दोघांनी काय जोडीने येऊन मारायचे ठरवले आहे का? एक फोटो टाकते, दुसरा वर्णनं लिहितो. काय चाललाय काय, आँ? जीव जाईल ना एखाद दिवशी फटकन्. अरे भिया (भय्या नाही, भियाच) एकदा आमच्या इंदौरला (इंदूर नाही, इंदौरच) या. सराफ्यात नेतो तुम्हाला. अगदी तिथली आठवण करून दिलीस रे रंगा. तिथे म्हणजे रबडी जर का हाताने खाल्ली तर नंतर साबणाने धुवूनही हाताचा ओशटपणा पूर्ण जात नाही. सातार्‍याला गेलं की कंदी पेढा ठरलेलाच. मामाच्या लग्नात असाच घरी आचारी बोलवून पाडलेली बुंदी आणि आजीची / आईची नजर चुकवून त्या ताज्या बुंदीचे भरलेले बकाणेच्या बकाणे आठवले. मला मुगाचा शिरा अजिबात आवडत नाही. माझ्या लग्नात नेमकं पंचपक्वान्नात हेच शिरासाहेब हजर. आणि सासूबाईंनी आग्रह करूकरू चांगला दोनदा वाढला होता बचकन् पानात. तेही आठवलं. आजही गुरूवारी बरेच वेळा तो पिवळाधम्मक पेढा नजरेसमोर येतो आपसूक. गुढीपाडव्याची वाट बघायचो दोन कारणांसाठी, श्रीखंड / जिलबी तर असायचंच पण मान असायचा गाठीचा. ती गाठ्यांची माळ आदल्यादिवशी घरी आणली की जाम खुणावयाची. संकष्टीला / अंगारकीला आजी २१ मोदक तळायची. मोदक आवडायचे म्हणून मग मला बाप्पा पण आवडायचा लहानपणी. मोदक खाणारा बाप्पा भन्नाटच वाटायचा, एकदम एखाद्या दोस्तासारखा. खरंच खूप मस्त आठवणी जाग्या झाल्या. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 06/01/2009 - 19:54 नवीन
काय चाललाय काय, आँ? जीव जाईल ना एखाद दिवशी फटकन्.
ए कोण आहे रे तिकडं ? पकडा पकडा त्याला ... साला.... "तथास्तु" म्हणून पळतोय आं ... =)) रंगाकाका .. लै भारी राव .. स्मायलीज पेरलेला शिरालेख आवडला :) || ॐ टाराय नम: ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शाल्मली Mon, 06/01/2009 - 19:03 नवीन
वा वा! एकदम गोड झाला आहे लेख! भारतीय पदार्थांची खरी चव बाहेर आल्यानंतरच कळते खरंच.. लेख वाचून पुण्यातील काका हलवाईंकडची रसमलाई आणि चितळ्यांकडचे आम्रखंड याची आठवण झाली. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/01/2009 - 19:12 नवीन
मस्त लेख हो रंगाशेट! मागल्याच आठवड्यात महेंद्रचे पेढे खाल्ले हो... ढुम ढुम ढुमाक :) कदाचित पुढल्या आठवड्यात परत जाणे झाले तर तुमच्या वाटेचे पण खाईन :) आणि मुद्दाम तुम्हाला कळवेन ;) ढिंग चाक ढिचांग ढिंग चाक ढिचांग <:P --अवलिया
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 06/01/2009 - 19:29 नवीन
लेखही मस्त गोड झालाय... मलाही गोड खूप आवडतं.. .. कोणताही गोड पदार्थ आवडत नाही असं नाही.. काही फार फार आवडतात तर काही थोडे कमी आवडतात... अवांतर : लहानपणी बरेचसे सण त्याबरोबर केल्या जाणार्‍या गोडधोड पदार्थांसाठी मनात जोडले गेलेले असत... त्यासाठी त्या सणांची उत्सुकतेने वाट पाहिली जायची ..... आता वाटेल तेव्हा वाटेल ते उपलब्धही असतं आणि विकत आणून लगेचच्या लगेच खाता येतं त्यामुळे खाण्याच्या गोडधोड पदार्थांची तितकी उत्सुकता संपली आहे... सालं हे चांगलं झालं की वाईट हेही अजून कळत नाहीये... :( _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/01/2009 - 19:37 नवीन
आता वाटेल तेव्हा वाटेल ते उपलब्धही असतं आणि विकत आणून लगेचच्या लगेच खाता येतं त्यामुळे खाण्याच्या गोडधोड पदार्थांची तितकी उत्सुकता संपली आहे... मला असं वाटतं हे वाईट झालं. का? सणावारी तर श्रिखंड, बासुंदी, पुरणपोळी इ. पदार्थ मिळतातच पण इतरवेळी हापूसच्या फोडींचा साखरांबा, गुळांबा, स्ट्रॉबेरीचा मुरांबा, कैरीच्या किसाचा साखरांबा हे आणि असे अनेक प्रकार कमी कालावधीत संपवावे लागतात. ;) मग वजन वाढतं. त्यानंतर आपण म्हणतो," काय हे? गोडानं वजन वाढलं.";) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
संजय अभ्यंकर Mon, 06/01/2009 - 19:46 नवीन
हा लेख उशीरा टाकल्या बद्दल! आता नगरला गेलो की, मैं हूं और वोह महेंद्र है! परंतु, अलीकडे नगरला गेलो असतान रोज सकाळी ५-५.३०ला बस स्टँड वर चहा प्यायला जात असे, तेथे हे खवेवाले काही दिसले नाहीत! अबे बिका सराफेकी रबडी अकेलेही निगलकर हमें जलाते हो| और छप्पन दुकान भूल गये क्या? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 06/01/2009 - 19:54 नवीन
याला म्हणतात जातीवंत खवैय्याने लिहिलेहा "खादी" वरील लेख! खुप आवडला मी हलवायाच्या दुकानात घोंगावणार्‍या माश्यांच्या वरचढ तिथे घोंगावत असतो. त्यामुळे तुमचा हा लेख लै लै आवडला :) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Mon, 06/01/2009 - 19:58 नवीन
हा लेख आणी त्याच्यावरच्या प्रतिकिया वाचुन तोंडाला गोड गोड चव आली...
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/01/2009 - 20:07 नवीन
प्राजुताईच्या प्रतिसादाशी सहमत ... उत्तम झाला आहे लेख, अगदी रक्तातील आणि डोळ्यातील शुगर वाढण्याइतका ... बासुंदीवरुन आठवले, आमच्या गावकडेही रंगाशेठ वर्णन करतात तसेच गवळीआप्पा बासुंदी वाढायला यायचे, वर्षानुवर्षे एकाच माणसाकडुन बासुंदी घेत असल्याने त्यालाही आवड्-निवड पक्की कळलेली. एखाद्या दिवशी तो स्वतःच हाक न मारता दारात येऊन "मावशी, आज भट्टी मस्त जमली आहे, घ्या एक लिटरभर बासुंदी" असे सांगुन हक्काचे माप वाढुन जायचा. ती खरेदी चालु असताना शँपल म्हणुन दिलेल्या वाटीभर फुकटच्या बासुंदीची चव अजुन जिभेवर जाणवते. गाव सुटले तशी बासुंदीही सुटली, आज कमीत कमी ६-७ वर्षे झाली असतील मनोसोक्त बासुंदी खाऊन ... आमचे गाव देवस्थानाचे, प्रसादाच्या गोड पदार्थांची मुबलक रेलचेल. मग साधे पेढे, फिक्के पेढे, कंदी पेढे, सारखफुटाणे, माव्याची बर्फी, बत्ताशे किती खाल्ले ह्याला मोजमाप नाही. अगदी सहज गावातुन फिरायला निघाले तरी एखाद्या ओळखीच्या दुकानात जाऊन हाताने उचलुन एखादा पेढा तोंडात टाकायला कुनाच्या परवानगीची गरज नसायची. गेले ते दिवस ... बाके दिवाळीच्या वेळेसच्या नैवेद्यच्या बेसनलाडु आणि अनारश्यांचे तर काय वर्णन करायचे ? अप्रतिमच ... तसेच प्रेम "जिलेबी"बद्दल .... लग्नावळीत आणि देवाच्या कार्यात किती जिलब्यांचे आकडे खाल्ले ह्याला मोजमाप नाही, मोहनदासाचा किंबा बुंदीचा मोतीचुराचा लाडु हा एक असाच जेवळावळीतला फेमस आणि सर्वोत्तम प्रकार, वाढण्याची पद्धत म्हणजे हाताने नव्हे तर परातीत भरुन अक्षरशः परात ताटात रिकामी करायची. "नाही" म्हणण्याची सोय नाही कारण शेजारी बसलेले हात धरुन ठेवायचे व "वता वता, त्याचे काय ऐकता, आयला ५ लाडु जड आहेत होय ? " अशा आरोळ्या .... मग हे लाडु सरले नाहीत तर पंगतीत "लाडवांची फेकाफेक" ह्या डोळ्यांनी पाहिली आहे ... मात्र कधी "श्रीखंड्/आम्रखंडाची" आसक्ती वाटली नाही, आवडीने मागुन घ्यावे अशी कधीच इच्छा झाली नाही. कॉलेजच्या दिवशातल्या मेसमधल्या पाणी सुटलेल्या आंबट श्रीखंडाने आणि रव्याच्या अथव्या साबुदाण्याच्या खीरीने त्यांच्या आयुष्यातील इंटरेस्ट संपवला. आजसुद्धा समोर श्रीखंड आले की नकोसे वाटते ... तोच प्रकार "म्हैसुरपाकाबद्दल", अतिगोड असणारा व हाताला तसेच तोंडाला चिकटणारा म्हैसुरपाक खावा असे मुळीच वाटले नाही. घर सुटले तसे रसमलाई, रसगुल्ला, गुजराथी मिठाया, बर्फ्या ह्यांचे प्रमाण जास्त वाढले. पदार्थ जरी उत्तम असले तरी घरची "पुरणपोळी" अजुन ह्यांच्यासमोर वरचढ ठरते असे मनाला राहुन राहुन वाटते. वर्षातुन मुश्किलीने १ वेळा पुरणपोळीचा योग असल्याने उपलब्ध पर्याय "गोड मानुन" घ्यावे लागतात ... लिहील तेवढे कमीच , की-बोर्डला मुंग्या लागतील पण यादी संपायची नाही. तरीही "गोड पेये" ह्यात आलीच नाहीत , त्यांचीही भली थोरली यादी आहेच की. छे, फारच नॉस्टलेजिक केले बॉ रंगाशेठनी. चालु द्यात ... ------ ( आठवणीतला ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
अ
अनाडि Mon, 06/01/2009 - 20:18 नवीन
आरे किती मोठा प्रतिसाद देत बसताय,दिवसाला ५ -५ पाने भरुन खरडवह्या भरवताय , तेवढा वेळ कंपनीत कामाला दिला असता तर कशाला कंपनी दिवाळखोरीत जाईल? :) रंगाशेठ, लै ग्वाड झालाय लेख.पण अशाने लोकांना मधुमेह व्हायचा. अनाडि अब्दुल नारायण डिसुझा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
श्रीमंत दामोदर पंत Tue, 06/02/2009 - 13:19 नवीन
+१ डान्याशी सहमत....... माझं सासर आहे डॉन्याच्याच गावचं..... साखरपुडा झाल्यावर बायकोच्या आज्जीला भेटायला गेलो होतो त्यावेळी तिथली बासुंदी चाखली होती..... सुंदरच चव.... वर बर्‍याच जणांनी उल्लेख करुन वाडीच्या बासुंदीची आणि कवठबर्फीची आठवण करुन दिलीये..... आता लौकरच जायला हवं या ठिकाणी..... :) रंगाशेठ सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
भ
भाग्यश्री Mon, 06/01/2009 - 20:07 नवीन
वाह मस्त गोड झालाय लेख! मीही गोडखाऊ.. नगरची बरीच खादाडीची ठिकाणं कळली, आता सासरी गेल्यावर कुठे जायचे ते कळले! :) नवरा आणि सासरची मंडळी तिखट खाऊ त्यामुळे मलाच सगळं मिळेल! :) बाकी पहीलं वाक्य जबरी!! सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे माझा जीव की प्राण आहे! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 06/01/2009 - 20:40 नवीन
सुरेख लेख, रंगराव. शिरा, पेढे, मोदक, बासुंदी, गुलाबजाम... नुसती यादी वाचूनच तोंडाला पाणी सुटलं. (फक्त पुरणपोळी कशी राहिली?) लहानपणी खाल्लेल्या गोड पदार्थांची गोडीच निराळी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 06/02/2009 - 00:59 नवीन
असेच म्हणते. पण मस्त लेख. गोडखाऊ नसूनही लेख आवडला. लहानपणी माझ्या चुलतबहिणीच्या आजीकडे जेवायला बोलावले की मला आवडते म्हणून ती हमखास पुरणपोळ्या करायची. तिच्यासारख्या मऊसूत पुरणपोळ्या नंतर कधीच खाल्ल्या नाहीत. रव्याचे लाडू संपले वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
य
यशोधरा Mon, 06/01/2009 - 20:46 नवीन
मस्त गोड लेख! :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 06/01/2009 - 21:40 नवीन
यस यस... लेख मस्तच. :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 06/01/2009 - 22:55 नवीन
आयला, नुसतं वर्णन वाचूनच डायबेटिस झाल्यासारखं वाटतंय. ब्लड शुगर चेक केली पाह्यजे!!! (इथे अंगावर शहारे आल्याची स्मायली!) आता संध्याकाळी जळजळीत मिसळ खाल्लीच पाहिजे!!! :) सॉरी रंगा, आम्हाला गोड आवडत नाही ना त्यामुळे अशी विसंगत प्रतिक्रिया द्यावी लागली!! पण लेख छान आहे, आवडला!!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 06/01/2009 - 23:45 नवीन
ज्याला 'स्वीट टूथ' म्हणतात तसा मला खरंतर नाहीये पण पेढा आणि मोदक म्हणजे जीव की प्राण रे !! का लेखा नाही नाही त्या आठवणी ताज्या करवतो ? न्यू जर्सीला ये लवकर आता एकदा... आपण 'सुखाडिया'च्या दुकानातून ताजी जिलेबी घेऊ, 'डिंपल'मधे भेळ - पुरी आणि वडा-पाव खाऊ, जस्सी लस्सी मधून ताजा उसचा रस पिऊ आणि मग मस्तपैकी मसाला पान खात घरी येऊन गप्पांची मैफल जमवू :)
  • Log in or register to post comments
च
चित्रादेव Tue, 06/02/2009 - 00:11 नवीन
वरती लिहिलेले सर्व पदार्थ आवडतात. पूरणपोळीचा उल्लेख नसल्याने 'अगोड' लेख आहे थोडास, खरे तर निषेधच. :) सत्यनारायणाचा केळ घालून प्रसाद म्हणजे जीव की प्राण. त्या १००० तुळशी वहाणे कधी संपून भटजी सांगतो की नेवैद्य आणा ह्याची मी वाट पहायची. आईने नैवेद्य दाखवला की जवळजवळ वाडगा भरून रूम मध्ये खात रहायची. दुसर्‍या दिवशी हाच प्रसाद आणखी मस्त लागतो. कसे तरी तोंड धूवून ब्रेकफास्ट म्हणजे पुन्हा वाडगाभर प्रसाद. (ह्या साठी आईला नेहमी लोकांना घरी पुन्हा प्रसाद भरून देवू नकोस असे सांगायचे.) :) असेच कंदी पेढे सुद्धा आवडत मावशीने गावाहून पाठवलेले. वरील पदार्थांबरोबर पुरण पोळी हा एक आवडीचा प्रकार. होळीचा नेवैद्य झाला की ४ पूपो शुद्ध तूपात माखून आणि ग्लासभर दूध पिवून आदल्या संध्याकाळपसून रंग उडवायचे. दुसर्‍या दिवशी रंग पंचमीला पुन्हा सकाळी ४ पूपो ,ग्लासभर दूध खावून ९-२ वाजेपर्यन्त रंग उडवणे मग घरी येवून तिखट मटण नाहीतर चिकन रस्सा. मग झोप चार तास. संध्याकाळी पुन्हा तेच ४ पोळ्या आणि दूध मग खेळायला. एवढे खावून अंगाला मास चिकटलेले. :) उकडीचे मोदक एकावेळी पाच खल्ल्याशिवाय उठणे नाहीच. तसे येता जाता दिवसभरात गणपतीच्या पुढ्यातले नैवेद्यातले उचलत रहायचो माव्याचे मोदक सुद्धा. आई पुन्हा डिश भरून ठेवी. आता फक्त कॅलरीजच दिसतात..... ते कॉउच बसून चार पूपो खावून गेले ते दिवस म्हणण्याची हिम्मत नाही का ते चार तास खेळण्याचे दिवस नाही उरलेत. जेमतेम एक पोळी तीही भित भित खाते आताशी. :(
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 06/02/2009 - 03:20 नवीन
लेख हॉ
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/02/2009 - 03:29 नवीन
लेख व प्रतिक्रिया अतिशय गोड. मिपावरील सर्वात जास्त कॅलरीयुक्त लेख असावा. सत्यनारायणासाठी केलेला शीरा, पेढे, आम्रखंड, श्रीखंड, पुरणपोळी इ इ सगळेच आवडते असले तरी सध्या रसमलाई हा माझा सर्वात आवडता पदार्थ आहे. तसेच नुसती मिठाई म्हणून पेढे घरी आणून खाल्लेत/खातो :-) खाण्यासाठी जन्म आपुला :-)
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Tue, 06/02/2009 - 05:16 नवीन
मलापण गोड खायला आवडत नाही विशेष. पण तरी काय झालं! खाण्यावरचं खवय्याचं प्रेम कळायला का गोड आवडावं लागतं?! मस्तच झाला आहे लेख. बासुंदी, शिरा, जिलब्या, श्रीखंड हे तर दिवाणखान्यातले मानकरी. पण मला थोडे मागल्या दारचे पदार्थ आवडतात. कोकणात करिंदे म्हणून एक कंद मिळतो. तो किसून तुपावर भाजून त्याची खीर करतात. किंचित केशरी रंगाची ही खीर मला खूप आवडते. झालंच तर नारळाच्या पाण्यात अळीव भिजवून त्याचे बाळंतिणीसाठी लाडू करतात, तेही फार मृदू - तोंडात हलकेच विरघळणारे लागतात. त्यातली गोडी साखरेची नव्हे, गुळाची. शिवाय खरवस? तुम्ही खरवस कसा विसरलात? साखर घातलेला खरवस पिचपिचीत लागतो. गूळ घालून शिजवलेला चांगला खमंग लागतो. असो... यादी अनंत आहे!
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 06/02/2009 - 08:03 नवीन
मलापण गोड खायला आवडत नाही विशेष. पण तरी काय झालं! खाण्यावरचं खवय्याचं प्रेम कळायला का गोड आवडावं लागतं?! मस्तच झाला आहे लेख.
हेच म्हणतो....अफाट झाला आहे लेख! :) मला बंगाली मिठाई म्हणजे जीव की प्राण, त्यामानाने श्रीखंड, पुरणपोळी नाही आवडत एवढी....पन उकडीचे मोडक......यम, यम! लिटरभर लाळ सुटली तोंडाला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
व
विसोबा खेचर Tue, 06/02/2009 - 06:46 नवीन
'साखरेचे खाणार त्याला देव देणार' ह्या म्हणीवर माझा असलेला विश्वास मला माझी गोडयात्रा चालू ठेवण्यास हात(तोंड)भार लावतो आहे हे नक्की! जियो...! :) रंगा, खा रे बिनधास्त.. काय होत नाय..! :) लेखही गोड झाला आहे! :) तात्या
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 06/02/2009 - 07:50 नवीन
खुपच छान आणि गोग्गोड लेख लिहला आहे. नरसोबावाडीचे पेढे व कवटाची बर्फी एकदम झक्कास असते राव. उद्या जाणार आहे वाडी ला.बाकी आमचे वारणा श्रीखंड अजुनही मिळते बाजारात. तेही वेगवेगळ्या फ्लेव्हर मध्ये. या कधी तर वारणानगर ला .बाके लेख वाचुन तोंड एकदम गोड झाले बर का. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 06/02/2009 - 07:56 नवीन
लेख प्रचंड आवडला. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/02/2009 - 08:08 नवीन
एकदम गोग्गोड लेख हो रंगा सेठ. बासुंदीचे नाव काढलेत आणी हरिपुरला खाल्लेल्या बासुंदीची आठवण झाली. त्यासारखी बासुंदी पुन्हा म्हणुन कधी खायला मिळाली नाही. अजुन एक आवडता पदार्थ म्हणजे खरवस, आ हा हा क्या बात है. आजोळी सांगलीला बर्‍याचदा दुपारच्या काही बायका चिक विकायाल यायच्या, मग आजीच्या मागे लागुन लागुन तो चिक विकत घेउन खरवस करायला लावायचा आणी पोटभर हाणायचा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/02/2009 - 08:36 नवीन
लेख एकदम 'गोड' झाला आहे, मला अतिगोड आवडत नसले तरी हा लेख खूप आवडला. पुपो चा उल्लेख आणि केक सारखे विदेशी गोड पदार्थ राहिले ना.. स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अनंता Tue, 06/02/2009 - 08:36 नवीन
संध्याकाळी उतारा म्हणून झणझणीत कोल्हापूरी मिसळ चापावी लागणार :) प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 06/02/2009 - 11:13 नवीन
बेळगावचा कुंदा, गोकाकचा कर्दंट, कुरुंदवाडची कवठाची बर्फी, धारवाड-हुबळीचे मांडे, धारवाडी पेढे, खान्देशातला कलाकंद (साध्या दुकानांतून मिळणारा, तिथंच मिळणारं ते लंब्या-चौड्या कढईत उकळत असणारं दूध, वर चमच्यातून टाकलेली साय). सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 06/03/2009 - 05:18 नवीन
हेच म्हणतो. लेख आवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मैत्र Tue, 06/02/2009 - 11:46 नवीन
नगरच्या आठवणी जाग्या केल्यात... मस्तच लिहिलं आहे... आणि एक एक नेमक्या जागा... चितळे रोडच्या कोपर्‍यावर तो एक भय्या जिलबी तळत असतो. आणि त्याच्याच बाजूला ते खवे वाले आहेत बरेच. असे मोठ्या मोठ्या कसल्या तरी झाडाच्या पानात गुंडाळलेले मोठे मोठे ताज्या खव्याचे गोळे (नक्की कसली पानं असतात ती ? फ्लॉवरच्या पानासारखी दिसतात :)) लहानपणी जवळ जवळ प्रत्येक वेळी आजोळहून येताना किंवा कोणी भेटायला आलं घरी तर खवा यायचा. तसे गुलाबजाम आजवर परत कुठेच खाल्ले नाहीत... या भय्याची ही जिलबी पण थोडी वेगळी.. थोडी बारीक, जराशी कडक आणि गरमागरम. एकदम चितळ्यांची केशरी आणि मऊ जिलबी नाही... तेली खुंटावरचं बन्सीमहाराजचं दुकान, बम्बईवाला तर बेस्टच. त्याचे नमकीन पदार्थ मस्त असतात पण आता या पक्वान्नांच्या यादीत जरा तोंडीलावणं म्हणून चाललं असतं... नगरमधून एकदम रस्ता चुकून कुरुंदवाडच्या घट्ट एकसारख्या घनतेच्या अप्रतिम बासुंदीची आठवण करायला गेलात :) ... एकदा जायलाच हवं परत त्या बासुंदी साठी. बुंदी - नगरला पद्धतच आहे का बुंदी घरी पाडण्याची?... पुण्यात असले काही लाड नाहीत त्यामुळे लग्ना कार्यात तो सोहळा बघणे ही एक भारीच मजा असते तिथे. गरम गरम नुकतेच वळलेले लाडू इतके मस्त दिसतात :) माणिक चौकाजवळ आजोळ होतं त्यामुळे महेंद्र, बम्बईवाला आणि द्वारकासिंग लस्सीवाला हे सगळं एकदम शेजारी.. हो दत्ताच्या देवळाजवळ सोपानाचा वडासुद्धा :) आता आजोळ एकत्र राहिलं नाही आणि वाडाही नाही. चौदाच्या डझनाने आख्खी पाटी आंबे आणणारे आजोबा नाहीत आणि बादल्या (हो!) भरून केलेला रस नाही... काही महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा रात्री कापड बाजारात गरम दूध आणि दिवसभरात द्वारकासिंगच्या फेर्‍या मात्र चुकवल्या नाहीत. कोजागिरीला सुट्टी नसल्याने आजोळी कधी गेलो नाही त्यामुळे 'चांदोबाची साखरेची टोपी' काही खायला मिळाली नाही... गोड लेखाबद्दल खूप धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/02/2009 - 13:05 नवीन
माझ्या गोड आठवणीत सगळे इतके रमून गेलात ह्यामुळे खरंच खूप बरं वाटलं! भारतीय पदार्थात मिठायांनी आपल्या मनाचा एक कोपरा अगदी घट्ट धरुन ठेवलेला असतो त्याला स्पर्श करण्याचा एक प्रयत्न अनायासेच घडला. ३_१४ अदिती - घरच्या खव्याचे पेढे क्लासच लागत असणार. तसही खवा उत्तम असेल तर साखर न घालता नुसताच मस्त लागतो! :) आजोबांचं प्रेम आठवलं हे किती छान! धन्याशेठ - तुझ्या खेडेगावाला हलवाई नाही ह्याचं वाईट वाटलं. हलवाई हवाच त्याशिवाय मजा नाही! अधून मधून हा लेख वाचत जा तेवढाच आधार! ;) प्राजू - हो कलाकंद, सुतरफेणी, सोनपापडी हे मलाही आवडतात. मस्तच आठवण करुन दिलीस! स्वामी, Nile - चिवड्यांना ह्या पंगतीत स्थान नव्हते. त्यांची आपण कधीतरी वेगळी स्वतंत्र पंगत बसवूयात! :) बिपिनभिया - अरे ती इंदौरची रबडी खायची आहे रे, अगदी बोटं बुडवून चाखायची आहे, आजवर नुसतंच ऐकत आलोय पण कधी योग आहे माहीत नाही! लवकरच येईल असे मला वाटते आहे ;) टार्‍या - 'शिरालेख'! मस्तच शब्द. लेका तुझ्या डोक्यात काय स्वतंत्र शब्दकोष बसवून घेतला आहेस का? तू गुलाबजाम प्रेमी आहेस हे माहीत आहेच कधी भेटलो की फक्त गुलाबजाम पार्टी करुयात! पातेल्याच्या हिशोबातच बोलायचं! :D शाल्मलीताई - चितळ्यांचं आम्रखंडही छान असतं हे बरोबर. अवलिया - तुम्ही नगरला जाता हे माहीत नव्हतं. छान म्हणजे आमचा महेंद्र तुम्हालाही पेढे खिलवतो हे ऐकून मस्त वाटलं. भडकमकर मास्तुरे - आता सततच्या उपलब्धतेमुळे गोडाची उत्सुकता कमी झाली आहे हे एकप्रकारे वाईट झाले आहे. पण तुम्ही सरसकट कुठूनही मिठाई आणून न खाता गिनेचुने हलवाई गाठून त्यांची पेश्शल मिठाई खायचा प्रघात ठेवलात तर असे वाटणार नाही! :) संजय अभ्यंकर - अरेच्या, आपणही नगरला जाता तर. माझ्या गावाचा फेरफटका करणारे बरेच लोक आहेत की इथं! हे मला मिठाईइतकंच गोग्गोड वाटलं! :) ऋषीकेश - तुझं घोंघावणं असंच सुरु राहूदे! ;) डॉन्या - अरे केवढा दिलसे प्रतिसाद दिला आहेस? खर्‍या खादाडीला साजेसा आहे एकदम. मान गये! :) भाग्यश्री - अरे वा नगर तुझं सासर तर! मग काय मज्जाच. पाहिजे तितका ढीग लावायला सांगायचं नवर्‍याला मिठायांचा किंवा सगळी दुकानं इतकी जवळ आहेत की रोज चालतही जाऊ शकतेस आणि त्यांना कुणाला आवडत नाही म्हणज तूच येताजाता चापू शकतेस! ;) नंदन, चित्राताई, - पुरण्पोळीसारखा तालेवार पदार्थ विसरलो नाही पण किती लिहू, लोक मला हावरट म्हणतील की काय अशी शंका आल्याने मिठाईचे दुकान बेतानेच सजवले! =P~ पण गरमगरम दुधाबरोबर तुपात भिजलेली पुपो ह्म्म्म्म्म्...अंमळ त्रास झाला! ~X( पिडा - सॉरी. तुमचे मानकरी वेगळ्या पंगतीत आहेत! :H संदीप - तुझं 'सुखडायी' आमंत्रण लवकरच स्वीकारावं लागेल असं दिसतं आहे! वा वा पान खात गप्पांचा फड किती वर्ष झाली असतील! :? चित्रादेव - पुपो बद्दल वर लिहिलंच आहे. शिरा, मोदक आवडणार्‍या तुम्ही आहात हे ऐकूनही मस्त वाटले. :) प्रभू - तुम्हाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नाहीच मी! सहज - कुठल्याही परीक्षेशिवाय पेढे मिठाईसारखे आणून तुम्ही खाता हे ऐकून मस्त वाटलं! :) मेघना - अळिवाचे लाडू मलाही आवडतात. त्यांना एक शांत अशी चव असते अलगद जातात तोंडात अगदी! खरवस!! कसली आठवण दिलीस? छ्या. अस्वस्थपणा आला आणि हो गुळातलाच हवा तो. (ह्या भाभेमध्ये योग येईल का? :W ) मनीष - उकडीचे मोदक वाला तूही आहेस छान! :) तात्या - ठाण्याला येईन तेव्हा तुम्ही तुमच्या खास ठेवणीतल्या हलवायांकडे घेऊन जायचंय हे ठरलं! :) वेताळ्बुवा - कवठाच्या बर्फीच्या आठवणीने पाझरलो! माझी मावशी ही बर्फी मस्त करते. वाडीपेक्षा छान. त्यांच्या बर्फीत अतीसाखर असते. अभिज्ञ - धन्यवाद! :) स्वातीताई - हो केक राहिलाच पण ह्या सगळ्या धोतरवाल्या पदार्थात तो सुटाबुटातला जरा बाजूला पडला! ;) श्रावणदा - कर्दंट - अरे खल्लास! मांडे - अहो मनातच खात होतो आता खरेच खावे लागणार. मागे नगरला गेलेलो तेव्हा कोणीतरी बेळगावला जाऊन आणले होते दोन दिवस फक्त मांडे+दूध असाच मिताहार घेऊन राहिलेलो! ;) धारवाडि पेढ्यांबद्दल ऐकून आहे पण अजून योग यायचाय! :( मैत्र - तुम्हीही नगरकर आहात हे छानच! अहो माणिकचौक म्हणजे आमच्या घरापासून चालत पाच मिनिटे! व्यनि करा सविस्तर बोलू! :) ज्या कुणा खवय्यांचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल त्यांनी नाराज होऊ नये! हा लेख गोड मानून घेतल्याबद्दल पुनश्च आभार! : चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Tue, 06/02/2009 - 16:21 नवीन
व्वा ! मिपावरचा फार सुंदर लेख आहे हा. आपल्याला फार आवडला बोआ.
  • Log in or register to post comments
क
कळस Tue, 06/02/2009 - 17:42 नवीन
वा चतुरंग .. जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद !! आम्ही चितळे रोडला राहायचो.. रामप्रसाद चिवडा आणी रुचीराची (नेता सुभास चौक ) गरमागरम जिलेबि कस काय विसरला रे भो ? कळस
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 06/03/2009 - 13:20 नवीन
काय फक्कड जमलाय लेख. आता गोड आणी फक्कड शब्द एकत्र आल्याने फक्कीच्या लाडवांची आठवण येणे सहाजिक !! उत्तम उत्तम लेख .. यापुढे औरंगाबादला जातांनी गाडी जरा नगर मधे रेंगाळेलच !!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 06/03/2009 - 13:35 नवीन
ही गोड जवळीक आवडली. तशे आमी बी गोडघाशे. जायफळ घातलेले श्रीखंड खाल्ले कि काय जडत्व येत मस्त. मी शि-यात दुध घालुन खातो. तिखट खायला आवडत नाही. एखादे वेळी खाल्ल तर दुस-या दिवशी दाह होतो. गोड खाणे आणी गोड बोलणे याचा एकमेकाशी काही संबंध नाही पण गोड बोलणार्‍या माणसांपेक्षा गोड खाणारी माणसे आवडतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 06/03/2009 - 17:37 नवीन
वा ! फारच मस्त लेख आणि मस्त प्रतिसाद :) एकदम मजा आली. मला सुद्धा गोड खूप आवडते. लहानपणी माझी आई रोज एका लहान रुमालात चक्का टांगायची आणि सकाळी श्रीखंड करुन डब्यात द्यायची :) त्याची आठवण झाली. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा