किस्सा रोचक आहे.
"चिंकी" आणि तद्भव शब्द हे इतर अनेक शब्दांसारखे विशिष्ट वंशातील लोकांना उद्देशून आणि त्या वंशाचा अपमान करणारे आहेत असा रूढ समज आहे. संदर्भासाठी हा दुवा पहावा. असे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. हे शब्द वापरणे अशिष्टसंमत आहे. किंबहुना , कुठल्याही घटनेचे वर्णन करताना त्यातील व्यक्तींच्या वर्ण/जाती/वंशाचा उल्लेख अनावश्यक ठरतो.
(संपादक - अपमानास्पद शब्द काढून टाकून संपादन केले आहे.)
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे...पण बर्याचदा हे शब्द वापरण्यामागे अपमान/वंशभेद या भावना नसतात/नसाव्यात असं वाटतं. तरीही असले उल्लेख टाळावे या तुमच्या मताशी सहमत!
बाकी किस्सा भारीच आहे...मी तर म्हणेन असले शेजारी असतील तर रात्री दोन तीनदा घरातनंच गाडी लॉक/अनलॉक करावी! सौजन्याची ऐशी तैशी!!!
पॉलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली आपण अतिरेकी हळवे, संवेदनाशील वगैरे झालो आहोत. चिंकी हा शब्द अपमानकारकच वाटला पाहिजे असे नाही. तशात मिसळपाव वाचणारे किती चिनी भाई आहेत? अगदी कुणाला तोंडावर कुठलेसे शेलके विशेषण म्हणणे वेगळे आणि असे लिहिणे वेगळे.
थोडक्यात चिंकी वगैरे म्हटले की बरीच स्वभाववैशिष्ट्ये पटकन लक्षात येतात. उगाच जडजंबाल पण पॉलिटिकली करेक्ट कशाला लिहायचे?
भारतीयही गुल्टी, बिहारी व घाटी म्हणतातच. त्यात त्या गटाचा निव्वळ अपमान करायचा असतो असे समजणे चुकीचे आहे.
=)) =)) एकदम चोक्कस ... मस्त रे भटा .. जुणा शब्द आहे हा .. आम्ही चायनिज च्या हातगाडीवर कामं करणार्या णेपाळी-मणिपुरी पोरांना असंच म्हणायचो ..
प्राजु ताई .. लेख आवडला आहे .. क्लास ...अजुन येउन देत गं
(नजरकैद) टा.रू.सावरकर
मुसुरावांशी सहमत.
अवांतरः 'म्हारड्या' या शब्दातून प्रचंडी रडी माणसे आठवतात. आम्ही आमच्या एका भयंकर रड्या मित्राला 'महारड्या' म्हणायचो. पण आमच्या शाळेतल्या बाईना आम्ही त्याला 'म्हारड्या' म्हणतो असे वाटायचे. :)
म्हणून एकदा बाईनी चांगलेच झाडले होते मला.
(पॉलिटीकली करेक्ट)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
कदाचित पंधरावीस वर्षांपूर्वी तितकासा जाणवलाही नसता.
आज परिस्थिती फार बदलली आहे. 'चिंकी' हा शब्द चिन्यांसाठी वापरतात हे मला माहीत होते, मी ही वापरायचो पण तो इथे अवमानकारक शब्दात मोडतो हे मला अमेरिकेत असून ठाऊक नव्हते. हा माहिती असण्याचा प्रश्न आहे. चुकीची सवय पडू नये आणि कुठे भलत्याच ठिकाणी हा शब्द बोलला जाऊ नये ह्या हेतून ही दुरुस्ती मला अतिरेक वाटत नाही. (तसे खाजगी संभाषणातून आपण सर्वच जण बरेच शब्द वापरत असू, म्हणून सगळेच सर्रास लिहायचे म्हटले तर आफत ओढवेल!)
चतुरंग
आपल्या कारमागे हायवेवरती अचानक मोठ्याने हॉर्न वाजवला, म्हणून कोणातरी आडदांड विक्षिप्त अमेरिकनाकडून ह्या माणसाचा अपमान झाला असावा! त्या अपमानाने आणि भीतीने ह्याच्या मनात घर केल्याने येईल जाईल त्याला गाडीचा हॉर्न वाजवू नको अशी सूचना देत असेल हा! :? :W
(खुद के साथ बातां : रंग्या, ह्याला 'हॉर्नी ली' असे म्हणायला काय हरकत आहे? B) )
चतुरंग
कधी कधी असे विचित्र स्वभावाचे लोक भेटतात व आपल्याला नसता त्रास होतो. पण असाकसा तो पॅटिओपर्यंत आला. त्याला सांग असं करू नकोस. सरळ बझ् करून ये! सध्या घरात तुझ्याबरोबर कुणी ना कुणी आहे म्हणून ठीके पण नंतर फारसं सुरक्षित नाहीये ते!
(आता प्राजु मलाच भित्रीभागुबाई म्हणणार!) :)
रेवती
अनुभवकथन आवडले. लगेच सुधारणा केली ते तर अजुन जास्त आवडले. हेच तर सौजन्य!
पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की लेखिका कवयित्री म्हणून प्रसिद्ध असली तरी गद्यलेखन तितकेच अतिशय प्रभावी.
हो संदीप, नक्कीच आला असता.
पहिली गोष्ट, फोर्ड्ची गाडी लॉक होताना हाँक करते हे कोणत्याही अमेरिकन माणसाला माहिती आहे. त्यामुळे त्याने त्यावर आक्षेप घेतला नसता. याने कसा घेतला देव जाणे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं!
मस्त! :)
फारच मजेशीर सौजन्य आहे बॉ, मस्तपैकी हसु आले.
मात्र प्राजुताई, माझ्या मते माणुस चक्क "येडा ( हो येडाच, आयला सायकिक हा काय शब्द आहे ? सायंटिस्ट सारखा उच्चभ्रु वाटतो लेकाचा )" आहे असे दिसते आहे. जास्त त्याला भाव व किंमत न दिल्यास उत्तम ...
भारतात कसे, असे काही झाले की मस्तपैकी "२ तडाखे" देता येतात आरामात, तिकडे आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे येतो ना ...
काळजी घ्या ...!!!
बाकी किस्सा मस्त आणि खाऊ तर त्याहुन मस्त ;)
लेख आवडला ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
अवांतर :- त्या ली ला 'आणी हो' चे २/३ लेख भाषांतर करुन वाचायला दे ;) बघ काही फरक पडतोय का.
काय जोक मारून र्हायला बे ... ? "आणि हो" चे उच्च मराठीत लिहीलेले लेख
"सुलभ मराठीत" भाषांतर करायलाच ज्ञानेश्वरांना परतावं लागेल .. आणि तु "ली" च्या भाषेत भाषांतर करायला लावतो ? तुला काही हाड ?
=)) =))
हा हा हा!
मस्त किस्सा! मजा आली
बाकी एखाद्याला चिंकी, काळा वगैरे सहजतेने आलेले लेखनात चुकीचे आहेत असे वाटत नाहि. असे शब्द लिहिण्याने कोणी वर्णद्वेषी आणि न लिहिण्याने कोणी वर्णद्वेष न बाळगणारा होतात असे मला वाटत नाहि.. बोलताना/लिहिताना काय भाव आहेत हे महत्त्वाचे.. उगाच अॅफ्रो-अमेरिकन्स म्हणायचं आणि वागणूक वर्णभेदाचीच ठेवायची यापेक्षा तो काळा आहे तरीही तो आपल्यासारखा माणूस आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं असं वाटतं (काळा हे केवळ उदाहरण)
माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात
मी असं ऐकलं आहे की त्यांना एकमेकांनी ब्लॅक/निग्रो म्हंटलेले चालतं, पण दुस-या वर्णाच्या कोणीही म्हंटलेले खपत नाही - ब-याचदा त्यावरुन वादळही उठतात/उठवली जात असावी.
प्राजु - लेख आवडला, पण वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे तुही त्याला ठणकावुन सांग की मुख्य दारातुनच त्याने यावे, नाहीतर यासाठी तूच त्याची कंप्लेंट करु शकते :)
मजेशीर किस्सा!!
बाकी चिन्यांना जसे आपल्याला "चिंकी" म्हणतात ते ठाऊक आहे तसेच काळ्यांनाही आपल्याला भारतीय लोक "कल्लू" म्हणतात हे ठाऊक आहे. तेव्हा असे शब्द अनवधानानेदेखिल वापरात येऊ नये याची काळजी घ्यावी.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हा हा..
मजेदारच अनुभव आहे हा अगदी!
तो माणूसही भन्नाटच दिसतोय.
एव्हाना त्याने तुला काहीतरी 'प्युअरली व्हेजीटेरीयन' खाऊ आणून दिलाच असेल ना? मग त्याबद्दलही काही लिही ना..
--शाल्मली.
म्हणजे सध्या प्राजुताईचा एकदम चिनी पोपट झालाय म्हणा की!!!!:)
यालाच "चिनी मकाव"म्हणतात वाटतं!!!!:)
आता मी तर ठरवलंय की जेंव्हा प्राजुला भेटायला जाणार तेंव्हा तिच्या घरासमोर गाडी उभी करून पहिल्यांदा दोन्-चार वेळा कर्कश्य हॉर्न वाजवणार!!!
बघूया तर खरी गंमत!!!
बाय द वे, प्राजुताई, ते तुला भेट मिळालेलं चिनी नॉनव्हेज जरा इकडे यूपीएस कर ना!!!!
:)
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
तो विक्षिप्त अजून तरी आला नाहीये. आणि काही वेजी खाऊही आणून नाही दिला. ..
पण आता मात्र तो आला की, मी त्याला सांगणार आहे की, बाबा.. मला असा त्रास देऊ नको नाहीतर मी ९११ ला फोन करेन.
डांबिसकाका, तुम्ही याच इकडे आणि खरंच हाँक करा त्याच्या घरासमोर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजु, किस्सा आवडला.
आमच्या मिडवेष्टात कोणी हाँकच करत नाही. गाडीचा हाँक येणे म्हणजे गाडी लॉक केली आहे असा सर्वसाधारण समज आहे. आम्ही बिनधास्त दोनदा बटण दाबतो.
कोणाची बिशाद नाही काही बोलण्याची कारण कोणी नसतेच अर्ध्या मैलाच्या अंतरात. ;)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी