साला, त्रास झाला रे. काय मस्त खादाडी. पूर्वी इंदौरला खाल्लेली रबडी, कालाजामुन, मावाबाटी... इ.इ.इ. सगळं आठवलं. रबडीचा आणि कालाजामुनचा फोटो मस्तच.
बिपिन कार्यकर्ते
हल्ली कोणी खायचं नाव काढलं की ह्यांना भारी तरास होतो .. तरी सांगत होतो .. माझी बरोबरी करू नका !! नाय म्हणे "अभी तो मै जवाण हूं" .. घ्या हे धौतीयोग घ्या आता ..
तात्या .. लेख आवडला !! बर्याच दिवसांनी लिहीलंत ... :) ... असे चार शब्द लिहा राव ... मजा येते ..आम्ही पामर तर काय आजुन बाहेर कुढं फिरू शकलो नाय
-(*****) टारझन
** **** *** ***** ** !!
तात्यांचा त्रिवार निषेध!!!
का आम्हाला असं जळवताय?
एकदम मथुरेत रहायलाच जावं असं वाटायला लागलं.
पण कसं जाणार? उपाय एकच.... हे पदार्थ आपल्याला जमतील तसे घरी करणे.;)
रेवती
पाऊण एक किलो रबडी?
तेव्हा जोर होता अंगात! आता एवढी खाऊ शकेन असं वाटत नाही. कदाचित त्यानंतर रात्रभर रेघोट्या ओढत धावावं लागेल! :)
पण मला कालाजामुन आणि पेढे विशेष आवडत नाहीत.
इतर पेढे आवडत नसतील, परंतु मथुरा-पेढा खाल्ला आहे काय? तो एकवार खाऊन पाहा, नक्की आवडेल. अगदी खमंग असतो.. :)
खवा चांगला लालसर, खमंग होईस्तोवर परतून घेतात व पेढे बनवतात. त्यानंतर सर्व्ह करतांनादेखील ते पेढे छानसे साखरेत घोळवून देतात. अगदी मथुरेपर्यंत जायची आवश्यकता आहे असंही नाही. मुंबैला आलात कधी तरी खिलवीन. फोर्टमधल्या पी एम रोडवरील मथुराभवन या दुकानात. त्याचा मालक रामलाल हा खुद्द मथुरेचाच! माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. दोस्तच आहे म्हणा ना! कधी तिथे गेलो की प्रेमाने रबडी, आटीव दूध, मथुरा-पेढे वगैरे खाऊ घालतो! :)
अर्थात, खुद्द मथुरेत जाऊन खाण्याची मजाच वेगळी! :)
आपला,
मथुरादास तात्या! :)
मस्त लेख आहे , हे सगळं वाचल्यावर काहीतरी गोड खावंसं वाटलं, पण इकडे काय मिळणार यातलं, रबडी बनवायला घेतली तर ४-५ दिवस तरी लागतील दुध आटायला. :D
मला तर सुपर भुक लागलीये हा लेख वाचुन आणि माझं नाव टाकल्याबद्द्ल धन्यु. ;;) 8>
दिपाली :)
मथुरेतली जन्माष्टमी मात्र अनुभवायलाच हवी एकदा.
तात्या,
मुंबईला येताना हातात काही दिवस ठेवून यायला पाहिजे म्हणजे तुझ्या खास खास ठिकाणचए मिसळ, बिर्याणी, मासे, पेढे असे (आणि अजून बरेच) पदार्थ खाता येतील :)
लेख एकदम चविष्ट झालाय हे वे सां न ल :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
तात्या,मुंबईला येताना हातात काही दिवस ठेवून यायला पाहिजे म्हणजे तुझ्या खास खास ठिकाणचए मिसळ, बिर्याणी, मासे, पेढे असे (आणि अजून बरेच) पदार्थ खाता येतील
नक्की जाऊ. कधी येतोस बोल?! :)
तुला मुंबै दाखवतो. दुपारची, संध्याकाळची आणि म्हणशील तर अगदी मध्यरात्रीची सुद्धा! ;)
जाऊ एखाद्या कोठ्यावर! तिकडच्या गाणार्या बायका, बाजिंदे-साजिंदे, मावश्या, आपा, सगळी आपली लै इज्जत करतात बॉस! तिथे बसून तुला बाकायदा 'बाबूलमोरा', किंवा 'मोहे पनघट पे' ऐकवीन! नायतर अजमेरच्या ख्वाजा मोईउद्दीन चिस्ती करता गायला जाणारा पुरियाधनाश्री ऐकवेन!
कधी येतोस बोल?! :)
आपला,
(कोठेवाला गवई) तात्या.
>>जाऊ एखाद्या कोठ्यावर! तिकडच्या गाणार्या बायका, बाजिंदे-साजिंदे, मावश्या, आपा, सगळी आपली लै इज्जत करतात बॉस! तिथे बसून तुला बाकायदा 'बाबूलमोरा', किंवा 'मोहे पनघट पे' ऐकवीन! नायतर अजमेरच्या ख्वाजा मोईउद्दीन चिस्ती करता गायला जाणारा पुरियाधनाश्री ऐकवेन!<<
हे अजून चालतं? अस्सल गायकी मुंबईतल्या कोठ्यावर अजून ऐकायला मिळते? माझ्या केवळ ऐकीव माहीतीप्रमाणे ते सगळं इतिहासजमा झालं.
काश.. हे खरंच ऐकायची संधी घेणं मलाही शक्य असतं!!!
असो!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
लई भारी तात्या! मी यायला तयार आहे तुमच्याबरोबर! आपण एक खाद्य-यात्राच काढूया.. प्लॅन असा
१) दिवस पहिला: स्थळः मुंबई- माटुंग्याला मणीजमध्ये गरम्-गरम इडली, मग दुपारी 'राजधानीत भरपेट जेवण, संध्याकाळी फोर्टमधील मिठाई, कॅननची पावभाजी,खाऊगल्लीत टाईमपास रात्रौ: लिओपोल्ड्ची बिअर, बडेमियांकडे खिमा (मग जमल्यास एखादं गाणं..तात्या म्हणतील तिथं..)
२) दिवस दुसरा: नाश्त्याला ठाण्याची मामलेदार मिसळ, गाडी पुढे हाकून वाटेत लोणावळ्याला गोल्डनचा बटाटवडा आणि फज (पोटात जागा असेल तर मनशक्तीची मिसळही), एक राजमाचीवर चक्कर (खाल्लेलं पचवायला!) मग पुढे कार्ल्याला एकविरा देवीला दंडवत घालून पुण्यात आगमन!
तिथे खाद्य-भ्रमणमंडळाच्या सन्मानार्थ रात्रौ धमू-आयोजित जंगी कट्टा!
३) दिवस तिसरा: सकाळी पुण्यातील काटा-किर्र किंवा रामनाथची मिसळ, मिपाचे दैवत भीमण्णंच्या प्रकृतीची चौकशी, दुपारी डॉ. दाढे किंवा पेठकरकाकांकडे उकडीच्या मोदकाचे जेवण, त्यानंतर मस्त पांघरूण घेऊन, खोलीत अंधार करून, मस्त पंखा (किंवा एसी) लावून झोप!
संध्याकाळी एफ.सी रोडवर एक निरिक्षण फेरफटका, वाडेश्वरची इडली किंवा (किंवा आणि!) पेशवेपार्काजवळच्या 'कल्पना' मध्ये डोसा! रात्री कपिलाचे काठी-कबाब आणि ग्रेट पंजाबमध्ये पतियाळा चिकन ! (सोबत एखादा 'पतियाळा')
४) दिवस चौथा: कोल्हापूरकडे प्रस्थान! वाटेत वनपत्रेची भेळ तोंडात टाकत कर्हाडच्या 'संगम' मध्ये जेवण. कोल्हाप्रात पोचल्यावर विश्रांतीनंतर रंकाळ्यावर फेरफटका, रात्री पर्लमध्ये खास मेजवानी!
५) दिवस पाचवा: फडतरे मिसळीने सुरूवात करून पन्हाळ्यास प्रयाण! तिथे बाजीप्रभूंना मुजरा करून अंबा घाटातल्या पावनखिंड रिसॉर्टमध्ये मुक्काम. शिरगावकरसाहेब (रिसॉर्टचे मालक) रसिक असल्याने तबला-पेटी असतेच.. रात्री उशिरापर्यंत मैफल..
पुढे इतर रसिक खवैय्यांनी भर घालावी.. हे लिहितांना प्रचंड भूक लागल्याने खाद्य-भ्रमणमंडळाच्या सन्माननीय सदस्यांना घाईघाईने स्वैपांकघर गाठावे लागत आहे..
संपलो...!
दाढेसाहेब, आपण केवळ प्रतिसाद नाही लिहिलात, तर सुखासमाधानाची एक छोटेखानी व्याख्याच सांगितलीत!
सुख म्हणजे तरी अजून दुसरं काय असतं हो?! :)
जियो दाढेसाहेब, जियो..!
आपल्याला मानाचा मुजरा करतो..!
आपला,
तात्या.
दाढेसाहेबांना सलाम असेच म्हणतो ...
फारच अचाट आणि लै लै लै भारी आयडिया आहे खादाडीची, पाहु केव्हा आणि कशी जमतीये ती ....
मंडळी, जेव्हापण असा कट्टा होईल तेव्हा आमचे नाव जरुर घ्या, आम्ही नक्की हजर होऊ ;)
बाकी तात्या, लेख आणि महत्वाचे म्हणजे लेखातला "रबडीचा" फोटो फारच अप्रतिम हो ...
गाढवासारखी सकाळी इडली खाल्यावर आणि त्यावर पँट्रीतला बेचव चहा पिल्यावर असा फोटो पहाणे ह्याने किती वेदना होतात ते काय सांगावे ?
असो, चालु द्यात ...
उत्तम धागा आणि कल्पना असेच म्हणतो ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
गाढवासारखी सकाळी इडली खाल्यावर आणि त्यावर पँट्रीतला बेचव चहा पिल्यावर असा फोटो पहाणे ह्याने किती वेदना होतात ते काय सांगावे ?
अरे चलता है यार! गरमागरम इडलीचीही मजा वेगळी! तिची रबडी, वा कालाजामूनसोबत तुलना का करा?
मधुबालेसारख्या रबडीवर जसं प्रेम करावं तसंच ते नाजूक अमृता राव सारख्या नाजूक इडलीवरही करावं! :)
प्रेम कुणावरही करावं! :)
आपला,
तात्या शिरवाडकर! :)
आदरणीय तात्यासाहेब शिरवाडकर,
क्षमा करा प्लीज. हा धागा तसा मौजमजा-विरंगुळा सदरात मोडणारा आहे म्हणूनच केवळ आपले आडनांव उधार घेतले आहे! :)
खल्लास. या प्रतिक्रियेचा प्रिंटआऊट काढून ठेवीन म्हणतो, पुढच्या फेरीत नक्कीच कामी येईल :). बाकी खाद्य-सप्ताहच करू की. कोल्हापूर झालं की गगनबावड्याचा घाट उतरून पुढचा दिवस तळकोकणात/गोव्यात. :)
लई भारी तात्या! मी यायला तयार आहे तुमच्याबरोबर! आपण एक खाद्य-यात्राच काढूया..
अजून एक ठीकाण अॅड करा राव!
पुणे - सोलापुर रस्त्यावर भीगवण गावी ज्योती नामक हॉटेलात जगातली सगळ्यात फंडु मिसळ मिळती! तीही चापुयात!
मस्त तात्या. मला समर्थ - ग्रँट - बादशाही कोल्ड्रिंक अशा त्रिस्थळीची आठवण झाली :). यंदाच्या फेरीत राहून गेलं, आता पुढच्या वेळी मथुराभवन ऍड करायला हवं या यादीत.
मात्र या खेपेला दिल्लीच्या पराठेवाली गलीत जाऊन आलो. एकीकडे लाल किल्ला आणि दुसरीकडे चांदनी चौक अशा रस्त्याची - खरं तर बोळकांडीची - तारीफ किती करावी. पं. गयाप्रसाद शिवचरण अशा खानदानी नावाच्या दुकानात तब्ब्येतीत तीन-चार पराठे खाल्ल्यावर रबडी, जाड नळीची 'जलेबी' किंवा खुर्चन रिचवले की साधारण 'गॉड इज इन हिज हेवन, ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' सारखे वाटू लागते :). वानगीदाखल हे फोटू.
कामात मग्न पंडितजी -
बिनभानगडीचा सुटसुटीत मेनू :) -
अखंड पापड प्राठा -
यंदाच्या फेरीत राहून गेलं, आता पुढच्या वेळी मथुराभवन ऍड करायला हवं या यादीत.
नक्की जाऊ रे, मजा येईल! :)
पुढल्या वेळेला तुला आमच्या मेरवानकडे नेईन. सक्काळच्या सात-साडेसातच्या वेळात जरा लौकर भेटू आणि मेरवान इराण्याकडे पावमस्का, ब्रूममस्का, डब्बल आमलेट, मावानी केक आणि कडक मिठी चाय असा भरभक्कम नाष्टा करू! :)
पं. गयाप्रसाद शिवचरण अशा खानदानी नावाच्या दुकानात तब्ब्येतीत तीन-चार पराठे खाल्ल्यावर रबडी, जाड नळीची 'जलेबी' किंवा खुर्चन रिचवले की साधारण 'गॉड इज इन हिज हेवन, ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' सारखे वाटू लागते
दिल्लीची पराठा गल्ली! ओहोहो! आपने भी क्या याद दिलाई! अरे मीदेखील एकेकाळी तिथे मनपसंत खादाडी केली आहे! :)
तात्या.
१९८० साली मी महिनाभरासाठी दिल्लीला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा पराठेवाली गल्लीत पराठा खाल्ला होता तेव्हा केवळ १रुपयात एक पराठा मिळायचा. बाकी साजुक तुपातला पराठा आणि त्यावर रबडी...म्हणजे सुखाची परमावधी म्हटली पाहिजे.
आताचा किमान २५रुपये भाव वाचून अक्षशः हादरलो.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
काय सुंदर लेख आहे. गोड पदार्थ तसेही मला फारच आवडतात. मथूरेचे हे गोड पदार्थ वाचून आणी बघून तर आता फारच भूक लागली आहे.
बाकीचे पण छान माहीती देत आहेत. मी तर लिस्टच बनवतीए पुण्या मुंबईत कुठे काय खायचे त्याची.
आणि आज पहातो तर हा धागा सरसरत कुठच्याकुठे पोचला!
दाढे साहेबांनी खाद्यसंस्कृतीचं भरजरी वस्त्रच उलगडण्याचा घाट घतलाय. मस्त आयडिया. ज्यांना जमेल त्यांनी जरुर करा. आम्ही तिथे असलो तर नक्कीच यायचा प्रयत्न राहील.
माणसाच्या मनाचा प्रवास पोटातून असतो म्हणतात ते अजिबात खोटं नाही! :)
(पं.खाया प्रसाद)चतुरंग
मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात मी कृष्णाची जशी मूर्ती पाहिली तशी अन्यत्र कुठेच पाहिली नाही. अत्यंत आखीव-रेखीव देखणी अशी ती संगमरवरी मूर्ती आहे. कारागिराच्या कलेला मनमोकळी दाद द्यावी लागेल इतके अप्रतीम भाव त्या मूर्तीच्या चेहेर्यावर आहेत!
अगदी रे, फार सुंदर, सजीव वाटावी अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे,
मथुरेच्या आठवणी तुझ्या लेखाने ताज्या झाल्या.
स्वाती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी