आता वय झालं. डोळे, कान काही नीट साथ देत नाहीत. पण तिकडे संपलेली कॅसेट माझ्या मनात सुरूच राहते. मी पन्नासेक वर्षांपूर्वी असा होतो, हे माझं मलाच खरं वाटत नाही. एखाद्या तिर्हाईतावर हसावं तसं माझे किस्से आठवून मला हसू येत राहतं. बोळा कधीच निघालेला असतो, पाणी अखंड खळखळत वाहत राहतं. "
सु रे ख...!
अन्य शब्द नाहीत...
नंदनसायबा, जियो..!
आपला,
(गजा खोत प्रेमी) तात्या.
हे घ्या - http://marathisahitya.blogspot.com/
ज्यांनी वाचलं नव्हतं, त्यांना सहीच आहे हे.
पण मला मारे वाटलं, इतक्या नवसासायासानं, इतक्या महिन्यांनी वगैरे लिहिलंय, तर कायतरी सॉल्लिड असणार.
कसलं काय - म्हणून आवर्जून निराशा नोंदवली.
लिहिलं आहे चांगलंच, पण मेघनाशी सहमत. हे लिहिलं होतंस तेव्हाच मी म्हटलं होतं आता एकेक कॅरेक्टर घेऊन करा सुरवात. कसलं काय?
हा नंदन खूप आळशी आहे असं दिसतंय मंडळी :)
>>रांगत रांगत पुन्हा सुरूवात करतो आहे
हे म्हणून कोणाला तक्रार करु द्यायला वाव ठेवलेला नाहीस, त्याचा निषेध! :)
आणि कारण दिले आहेस तरीही - नवीन काही न लिहिल्याचाही निषेध!
अवांतरः हे लिहिलेले उत्तमच आहे! परत वाचायलाही खूप मजा आली. :) जरा नियमित लिही रे माणसा!
नंदन मालकांचा हा लेख आम्ही बर्याच आधी वाचला होता, तेव्हा फार आवडला होता.
आता अजुन पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला ...
एक विनंती, असेच बाकीच्या व्यक्तीरेखांवर लिहावे.
मस्त जमतो आहे हा प्लॉट तुम्हाला, आम्ही वाट पहात आहोत ...
------
डॉन्या बर्वे.
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
अरे हे काय! परत तेच? पुन्हा वाचायला आवडलं.. पण.....!!!
असो.
रांगु नकोस रे फार काळ.. पळ पाहु पटापट..
(पळपुटा)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
वरिल लेखातील गटणे आम्हाला ही भयंकर आवडला .. पुर्व इतिहास माहित नसल्याने .. आमचे मेंदूत पुलंच्या गटण्याची प्रतिकृती "ओव्हर राईट" झाली होती .. पण आता वेगळाच गटणे असल्याने सुखावलो .. णंदण भौ .. लिवा की राव आजून .. इथे "उरलेल्या पाकाचं काय करावं ? " आणि "फाटलेल्या चड्ड्यांचं काय करावं ? " असले लेख उचकून लै बोर झालंय राव ...
@ मनिष : कसा आहेस रे दोस्ता , बरेच दिवस झाले तुझी खरड नाही , काळजी वाटली.
- तुकाराम मटणे
लेख आवडला. लोकांच्या मनात घट्ट प्रतिमा असलेल्या व्यक्तिचित्राबाबत लिहिणे अवघड असते. चांगले जमले आहे.
(आम्हाला आधी कौलाराम परत आले असे वाटले होते)
खराटा
(रंग माझा वेगळा)
लेख ह्या आधी वाचला होता तेव्हाही आवडलेला आणि आताही तितकाच आवडला.
काही काही गोष्टी करण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असतो. त्यातील एक म्हणजे हा लेख.
नंदन असाच लिहीता राहा!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
मीही पहिल्यांदाच वाचला.. मस्तच आहे..खूप आवडला लेख. पुलंना एका प्रकारे आदरांजलीच आहे!
थोडीशी मुकुंद टांकसाळ्यांच्या बटाटा अपार्टमेंट्समध्ये पुलं' ची आठवण झाली.. अर्थातच तुम्हां-आम्हां सर्व पुलंप्रेमींच्या भावना अश्याच आहेत.
मी एकवेळ माझे नाव, आयडेंटिटी विसरू शकेन्..पण पुलंच्या व्यक्तिरेखा नाही विसरू शकणार
मी पहिल्यांदाच वाचला लेख. फारच छान लिहलं आहेस.
(जरा नियमित येऊ दे असं म्हणायचं होतं पण त्याआधी माझीच अर्धी राहिलेली कामं पूर्ण करायला हवीत हे लक्षात आल्यानं तसं म्हणत नाहीये! ;) )
चतुरंग
मी पहिल्यांदाच वाचले हे. अर्थातच आवडले. "त्याचे पुढे काय झाले ?" अशा प्रकारची क्लोजर्स आपल्याला हवी असतात. "व्यक्ती आणि वल्ली" च्या संदर्भात विशेषच. हा अशा क्लोजरचा एक प्रयत्न वाटला.
काही जाणवलेले विशेष :
लहानपणीचा भोळसट वाटणारा सख्या स्वत:ला (आणि जगाला )समजून घेण्याच्या बाबतीत मचुअर , अनाग्रही वाटतो. एकेकाळी ज्याच्या वागण्याबोलण्यातून व्यंगात्म बाबी डोकावायच्या , त्याच्या विचारसरणीचे वर्णन "विवेकी" असे करता येईल. थोडक्यात "तो" सख्या पुलंचा , आणि आताचे श्री. गटणे नंदनचे आहेत. हे एकूण तर्काला धरूनच झाले. दुसर्या कुणाचे गटणे स्वतःला समजून घेण्याऐवजी काहीसे तिरसट म्हणा किंवा काहीसे आत्मप्रौढी मिरविणारे बनले असते. तसे इथे होत नाही. एकूण जगाशी नाळ त्याने जोडून घेतलीसे दिसते. तो एक टिप्पिकल "गीक" राहिला नाही.
बाय द वे , काळाचा हिशेब करता, गटणेचे कान डोळे काम न करणे तर्कसुसंगत वाटत नाही. (का माझा हिशेब चुकतोय ??)
हा वेगळा पैलू खूप आवडला. बाकीच्या वल्ली पण वाट पहात असतील नाण्याची दुसरी बाजू घेऊन प्रकाशात यायची! त्यांनाही येऊ द्या लवकर!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
नंदन, गटणेचं आत्मकथन आवडलं. तू तुझी लेखणी का रे म्यान करून ठेवतोस?
या लेखामुळे अशाच प्रकारातला आणखी एक लेख आठवला.
(फाफॉ वापरणार्यांना कॅरॅक्टर एन्कोडींग वेस्टर्न करावं लागेल.)
छान लिहिलेत. खूप आवडले. :)
बाय द वे, मी शब्दबंधच्या चौथ्या सत्रात होतो, त्यामुळे तुमचे लेखन ऐकता आले नाही. असो. पुन्हा कधीतरी.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी