टारु खरं सांगू तुझ्याकडून अशा लेखाची मुळीच अपेक्षा नव्हती! मला वाटलं पुन्हा धुतलंस कोणत्यातरी एक ओळिच्या धाग्याला!! माहीत आहे तू काय म्हणशील, कानफाट्या नाव पडले म्हणून कोणी खरं मानत नाहीत तुझ्या भावनांना. पण असं नाहीये, खरंच सांगतो. तुझा लेख एक नंबर झालाय, एकदम मनापासून, अगदी प्रामाणिक! हॅट्स ऑफ!!
(खुद के साथ बातां : रंग्या, टारुने असे प्रेमळ लिखाण करणे म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ खेळणार्या रॉकने एकदम भिकारसावकार खेळावे तसे झाले! ;)
(सावकार)चतुरंग
माझा पोपट झाला की रे! काहीतरी हास्यकल्लोळ करणारं वाचायला मिळेल या अपेक्षेन आले आणि पहाते तर काय.. चक्क टारूभाय आपली प्रेम कथा तेही "वो प्यार.. प्यार ही क्या जिसमें दर्द ना हो, एहसास ना हो , इंतजार ना हो.." च्या ष्टाईल मध्ये लिहिते झालेले आहेत.
वाह! देव आपणांस अशीच सद्बुद्धी देवो. लवकर गोड बातमी दे रे लग्नाची. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छान पैकी टोकाची वात सोलुन हळुच उदबत्तीने फटाका पेटवावा....
जरा दुर जावुन "धऽऽडाऽऽऽऽऽम ....." असा आवाज येईल या अपेक्षेने कानावर हात गच्च दाबुन घ्यावे....
आणि प्रतिक्षा करावी ......
सर सर... वात जळत असते...
आत्ता.... मग.... आत्ता.... मग ...
आणि....
कुठलाही आवाज न करता तो फटाका हळुच आकाशात जावा...
आणि नयनमनोहर रंगांची उधळण त्यातुनत व्हावी...
ती बघतांना कानावरचे हात काढुन घ्यायचे भान राहु नये ...
की विस्फारलेले तोंड बंद करायचे विसरुन जावे...
बास ! असेच काहीसे झाले रे तुझा हा लेख वाचतांना ....
जियो !!!!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
टारु मस्त लिहिलास लेख. अगदी मनातलं आणि मनापासून आलंय! खूप आवडला. :)
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
मस्त....
मांडलेल्या विचांराना दृष्यजोड देण्याची कल्पना एकदम भारी!!
लेख एकदम रोमँटीक आणी तो पण टारझण शैलीत. काँबिनेशन आवडले.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
टार्या ....
फारच सही आणि अनपेक्षित...
हाडं बीडं, बोळे क्लब, ब्वना या रांगेत अगदीच चुकार आहे लेख.. पण एकदम मनापासून आलेला वाटतोय. फोटो झकास आहेत.. (शेवटचा सगळ्यात बेष्ट)...
येऊदे अजून ... वरिजिनल फोटोसह...
टार्या, काय हे? तुझा एकदम टाराजे झाला? एकदम राज्याच्या प्रांतात घुसखोरी? आणि 'त्या' गाण्याचं काय झालं? असो.
छान लिहिलंयस. फॉर अ चेंज वर्जिनल लेख टाकलास, आता नेहमीच असं लिहित जा. हा लेख अगदी मनाच्या कुपितून म्हणजे अगदी मनापासून आलाय हे अगदी जाणवते.
आता कामकी बातें:
०१. कोणताही महत्वाचा उद्योग करताना काही प्रीकॉशन्स घेणं आवश्यक असतं. महत्वाच्या प्रसंगी फोन बंद / सायलेंट ठेवणे हे काय सांगायला पाहिजे? दोष दुसर्यांच्या माथी मारू नकोस. पुढच्या वेळी लक्षात ठेव. आणि तरी फोन आला तर घेऊच नकोस. आणि घेतलास तरी, 'ए थांब ना...' असं अचानक ओरडू नकोस. ;)
०२. ती जेन एकदा भेटूच दे मला. त्यानंतर तू दु:खी होणारेस.
०३. तुझ्या ब्रह्मांडाच्या ट्रिपमधे एकदा व्यत्यय आला तर त्यानिमित्ताने तुला एवढा छान लेख सुचला. असा व्यत्यय नेहमीच आणावा म्हणतो. काय? શું ટારુભાઇ, બ્રહ્માંડની ટ્રિપમાં ડિસ્ટર્બન્સ ચાલસે કે તમે?
બિપિનભાઇ કાર્યકર્તા
लेखकाचे नाव बाजूला ठेवून वाचला. मग लेखकाचे नाव डोक्यात आणले. त्याची काही छायाचित्रे मनासमोर आणली. कशाचीच टोटल लागेनाशी झाली. शेवटी हेही आपले स्टिरिओटाईपच एकेक. मग पुन्हा लेखकाचे नाव बाजूला सारले. लेख पुन्हा डोक्यात घुसला. छान. असेच लिहित रहा.
मस्त रे.
छान लिहिले आहेस.
और भी ऐसाही आने दो.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
टार्या,
तुझ्याकडून अश्या लेखाची वगैरे अजिब्बात अपेक्षा नव्हती हो..
मस्त लिहिला आहेस.
चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे सुरुवातीला वाटलं की कुठल्यातरी लेखाचं नक्कीच 'विडंबण' पाडलयंस की काय!!
जाहीरात : अपकमींग शेंशेशनल लेख .... "माझे प्रेमाचे ३ पोपट " लवकरच कमींग सुन
हे खास टारु टच लै भारी! लवकर कमूदे :)
अवांतर :- 'वैणी' कशा आहेत?
--शाल्मली.
:) ;;) टार्या तु फारच एमोतिओनल आहेस रे!!
मलाही हे माहित नहव्ता.....
खरोखर अप्रतिम आहे तुझी स्वप्ना.....आणि त्यातली तुझी स्वप्नासुंदरी....
फारच खर्या भावना आहेत तुझ्या ह्या.......
मी तुझी फॅन झाली आहे......
तुझ्या पुढ्च्या लेखाची वाट पाहते आहे,.....
(तुझी पंखी) जेन ;) :)
=D> =D> =D>
टार्या,
तू ठीक आहेस ना?
आम्हा सर्व मिपाकरांना तुझी काळजी वाटते.
इतका कसा बदललास?
जेनकृपेमुळे की काय?
लेख छान लिहिलायस. आता नेहमीसारखे ते 'पोपट 'झाल्याचे लेख येऊ देत.
रेवती
अनपेक्षित पण छान लेख..!!!!
मला गीतकार लोकांचं नि कवींचं (चांगल्या) नेहेमी आश्चर्य वाटतं. आपल्या स्वतःच्या भावनाच कधी कधी आपल्याला जमू नये इतक्या नेमक्या शब्दांत ते मांडतात... कसं काय जमतं त्यांना कुणास ठाऊक..!!!
आज मला हा लेख वाचताना अगदी तस्संच वाटलं!!!! :)
लगे रहो टारूभाई!!!! =D>
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
सर्व प्रतिसाद देणार्यांचं मन:पुर्वक आभार प्रदर्शन !!
ह्या असल्या भावणिक कोलन मधे आमच्यासारख्या कुख्यात आय.डी. नं हात घातल्याने आपणास धक्का बसणे सहाजिक आहे :)
तरी पण संभाळून घेतल्याबद्दल आणंद आहे :)
राज ठाकरे च्या टोण मधे :- ध्यानात ठेवा .. हिणकस लेख बंद करणार नाहीत .. मिसळपाव नवनिर्माण सेना एक लाईनीच्या बिहारी आणि पुचकट कौलाच्या युपीवाल्या धाग्यांना फाट्यावर मारल्या शिवाय रहाणार नाही .. हे हे हे मी तुमच्या टाळ्या(सॉरी) प्रतिसाद मिळवण्यासाठी नाही बोलत .. मला त्याचं काही नाही !!
पण म्हणतात ना काळ सोकावतो .. (असो पुढचं भाषण आपलं पाठ असावं )
- टारझन
काय रे टार्या,
डांबिसकाका काय म्हणताहेत? ;)
अवांतरः लेख एकदम जंक्षान लिव्हलायस की रे चोच्या. हाबिणंदण :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
लोक्स, हे सगळे फोटोझ टा-याचे (आणि टारीचे) आहेत. हे एफ वाय आय.
छान लिहिलेस रे, आता लोकांना सरप्राईज देतोस आहे वेगळं लिहून तर, एक दोन स्केचेस हि टाक तू केलेली.
-निखिल.
सूहास (verified= न पडताळणी केलेला)Tue, 06/16/2009 - 13:19नवीन
<<त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं .. "सहजिवनात आली ही स्वप्नसुंदरी">>>
बहुधा " मु॑बईचा फौजदार" मधल हे गाण आहे...तु ही सध्या मु॑बईला आहेस्...गाण्याचा असर की मु॑बईचा ???
सुहास
टारझन हे फार छान लिहितात. (मागे त्यांनी पूर्व आफ्रिकेतील प्रवासवर्णन लिहिले होते, तेही अव्वल होते.)
असेच वैविध्यपूर्ण उत्कृष्ट लेखन करत राहावे - त्यांनी जाहिरात केलेल्या लेखाची वाट बघत आहे.
भांचोद, कसला जबरा लिव्हला आहेस लेख एकदम ...
अगदी हटके आहे पण तुझ्या शैलीतलाच आहे, आवडला एकदम ...
बाकी मोडकसाहेबांशी सहमत, लेखातील कंटेन्ट आणि लेखकाची मनातली प्रतिमा अजिबात मेळ खात नाहीत, कदाचित हेच ह्या लेखाचे यश ...
असेच अजुन येऊदेत टारबा ...
बाकी ते एका ओळीच्या धाग्याला ठोकणे चालुद्यात, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. वेळ आली तर आमचे कार्यकर्ते ( बिका नव्हे ) रस्त्यावर उतरतील तुमच्यासाठी ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी