Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐसी रत्ने मेळवीन-

र
रामदास
Mon, 06/15/2009 - 08:38
💬 25 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6622 वाचन

💬 प्रतिसाद (25)
अ
अवलिया Mon, 06/15/2009 - 08:42 नवीन
वा! मस्त !! जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनिया चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा बोलो जाता बरळ करीसी ते नीट नेली लाज, धीट केलो देवा तुका म्हणे आता खेळतो कौतूके जाले तुझे सुख अंतर्बाही जय हो ! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/15/2009 - 09:33 नवीन
या मास्तराबद्दल काय बोलू? एकच शब्द लागू पडतो, म्याड. हो, म्याडच. सर्वसाधारण जगाच्या नियमांप्रमाणे मास्तर जे काही करतो तो म्याडपणाच असतो. म्हणून मास्तर म्याड. रामदासांच्या लेखातला शब्द न् शब्द खरा आहे. मास्तर आपल्याच मस्तीत जगतो. त्याची काही एक विचारपध्दती आहे आणि त्याला अनुसरून जगायची मस्ती आहे. 'सांगेन गोष्टी युक्तीच्या चार...' हाच याचा ध्यास. आणि एकदा का एखाद्याला आपले म्हणले की त्याच्यासाठी आख्खी दुनिया फाट्यावर मारून प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करून पूर्णपणे साथ देतो मास्तर. पण केलेल्या कामाच्या मानाने खूपच अप्रकाशित राहिलाय मास्तर. मास्तराचे सगळ्यात जास्त कौतुक हेच वाटते की, अशी म्याड माणसं सहसा आपल्याच संसाराची राखरांगोळी करतात आणि त्याला त्याग वगैरे उदात्त नाव देतात. पण मास्तराने आपल्या कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष न करता हे सगळे साध्य केले आहे हे ग्रेटच. मास्तर, असा म्याडच राहा. नाहीतर आमच्यासारख्या शहाण्यांना मदतीचा हात कोण देणार? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 06/15/2009 - 09:48 नवीन
सहमत. लेखन खूप भावणाऱ्या शैलीत आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विसोबा खेचर Mon, 06/15/2009 - 13:50 नवीन
पण केलेल्या कामाच्या मानाने खूपच अप्रकाशित राहिलाय मास्तर. हेच बोल्तो..! रामदासभौजी, सुंदर लेखन.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Mon, 06/15/2009 - 16:53 नवीन
मास्तर एक कमाल आहे १!! रामदासांचं ही झकास स्टाईल मधे लिहील्याबद्दल अभिणंदण !! - संत टारेश्वर आधी पोटोबा .. मग विठोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नितिन थत्ते Mon, 06/15/2009 - 11:55 नवीन
सरांना लाख प्रणाम. नुसतं काहीतरी केलं पाहिजे असं वाटणं आणि करणं यात खूप अंतर असतं. मास्तरांनी ते ओलांडलंय. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 06/15/2009 - 12:26 नवीन
:) सरांना लाख प्रणाम. नुसतं काहीतरी केलं पाहिजे असं वाटणं आणि करणं यात खूप अंतर असतं. मास्तरांनी ते ओलांडलंय. १००% सहमत. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गणा मास्तर Mon, 06/15/2009 - 15:31 नवीन
- गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
म
मुक्तसुनीत Mon, 06/15/2009 - 17:01 नवीन
लिखाण आवडले. "मास्तुरे" तर काय , सुपरडुपर हिट्ट ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/15/2009 - 12:35 नवीन
गुर्जी म्हणजे खरतर स्वतःच एक आग आहे. त्यांच्या सारखे तळमळीने आणी निस्वार्थीपणे कार्य करणारे लोक खरच फार कमी आहेत. कधीतरी कुठेतरी वाचले होते की जगात फार मोजकी माणसे उरलीयेत आता पुण्यवान, पण प्रलय रोकुन धरला गेलाय तो त्यांच्याच पुण्याईनी.... गुर्जी मला त्या पुण्यवानांपैकी एक वाटतात. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 06/15/2009 - 14:09 नवीन
त्यांच्या सारखे तळमळीने आणी निस्वार्थीपणे कार्य करणारे लोक खरच फार कमी आहेत. ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ध
धमाल मुलगा Mon, 06/15/2009 - 14:15 नवीन
आम्ही कर्मदरिद्री काय बोलणार गुर्जींच्या ह्या मोठेपणाविषयी? आनंद ह्याचाच वाटतो, की अशा माणसाची आणि आमची ओळख आहे :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
घ
घाटावरचे भट Mon, 06/15/2009 - 15:12 नवीन
अशा मोठ्ठ्या माणसाला मी आंतरजालाकरवी का होईना ओळखतो याचा मला खूप अभिमान आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्राजु Mon, 06/15/2009 - 21:20 नवीन
हे मास्तर आंतरजालातून ओळखिचे आहेत याचा खूप अभिमान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
र
रेवती Mon, 06/15/2009 - 14:01 नवीन
प्रभूसरांबद्दल असलेला आदर व्यक्त करायला रामदासांना शब्द सापडले हेच ग्रेट झाले. आपण दोघेही एकमेकांचे मित्र शोभता!:) रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/15/2009 - 15:41 नवीन
अशी स्थिती कधी येणार माझी हे माहीत नाही पण मास्तरांना भेटायला उतावीळ आहे! माणसाच्या रुपात देव येतो हे खरं आहे का? अशा शंका मास्तरांसारखी माणसं असताना येऊ शकत नाहीत. रामदास, तुम्ही त्यांचे श्रम शब्दात मांडण्याचं काम करु शकलात तुम्हालाही नमस्कार! मास्तरांच्याच भाषेत - एकच सूत्र - बेरीज करत रहा, वाटत रहा, मिळत जाईल! __/\__ (नतमस्तक)चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/15/2009 - 15:54 नवीन
मी देवाची प्रार्थना करत होतो. "मला ह्याचं सूत्र सांग रे बाबा.ह्या तुकारामाचं काय करू ? घरी गेल्यावर गाथा उघडली .डोळे मिटून गाथेचं मधलंच पान उघडलं.उत्तर माझ्यासमोर होतं. तोची ज्ञानी खरा तारी दुजीयासी वेळोवेळी त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल कुळे उध्दरील सर्वांची जो सुंदर !!! प्रभुमास्तरांसमोर आपणही नतमस्तक आहोत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 06/15/2009 - 16:24 नवीन
मास्तरांबद्दल जितकं अधिक समजतंय तितकीच उत्सुकता वाढतेय. लेखाबद्दल धन्यवाद रामदास. मास्तर, लहान तोंडी मोठा घास घेतोय पण -- keep up the good work !
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 06/15/2009 - 16:57 नवीन
ज्यांना भेटतात त्यांचे मोठे भाग्य. मास्तरांना सादर प्रणाम.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 06/15/2009 - 17:10 नवीन
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती! मिपापरिवारातल्या अशा एकेक रत्नांची आणि त्यांच्या कार्याची ओळख झाली, की धन्य जीव होतो. प्रभुसरांनी तर वसाच घेतलाय नि:स्वार्थ सेवेचा! त्यांचं कार्य लेखाद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं म्हणून रामदासकाकांना खास धन्यवाद! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 06/15/2009 - 17:36 नवीन
मास्तर, शुक्रवारी आपण भेटलो तेव्हाच सांगत होतात, रविवारी एक महत्वाचा निकाल आहे. अखेर तो आपल्याच बाजुने लागला. अभिनंदन - तुमचे आणि तुमच्या विद्यार्थ्याचे. रामदासशेठ, आपले मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
च
चतूराक्ष Mon, 06/15/2009 - 20:25 नवीन
प्रभू सर, आपल्या ह्या निस्वार्थी मदतीब्बदल मनःपूर्वक आभार! नमस्कार चतूराक्ष
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 06/15/2009 - 21:04 नवीन
(आणखी काही बोलून डोह डहुळत नाही) -पिडां
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द Tue, 06/16/2009 - 00:50 नवीन
__/\__ "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 06/16/2009 - 05:33 नवीन
ग्रेट! शब्द नाहीत..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा