Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अगं अगं बशी..! - १

प
प्राजु
Mon, 06/15/2009 - 20:34
💬 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4409 वाचन

💬 प्रतिसाद (23)
प
पिवळा डांबिस Mon, 06/15/2009 - 21:00 नवीन
लेख मस्त आहे... आम्हा मुंबयकरांची लोकलट्रेन ही जर माय तर बीएस्टीची बस ही मावशीच की!!!! ३११, ३१३ अगदी बालपणापासूनच्या मैत्रिणी... मुलंडहून पार बोरोलीला घेऊन जाणारी ३९६.... कॉलेजात असतांना प्रेयसीकडे नेणारी १३७.... आणखी, आणखी, अशा आणखी कितीतरी.... थॅन्क्स प्राजु, आठवणी जागवून दिल्याबद्दल.... नॉस्टाल्जिक, डांबिसकाका
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/15/2009 - 21:14 नवीन
आम्हा मुंबयकरांची लोकलट्रेन ही जर माय तर बीएस्टीची बस ही मावशीच की!!!! अगदी...! लोकलट्रेन आणि बेस्ट या आमच्या मुंबापुरीच्या रक्तवाहिन्याच आहेत. बेस्टने तर जे जाळं पसरलं आहे आणि तिची इतकी उत्तम सेवा आहे की तिला तोड नाही! लोकलट्रेनमध्ये सकाळी ८.३२, ८.५२ च्या कसारा डबलफास्ट, ९.१५, १०.४७ च्या ठाणा, संध्याकाळच्या ५.१०, ६.११ च्या अंबरनाथ, ५.२४ ची टिटवाळा या माझ्या विशेष लाडक्या ट्रेन्स् आणि ३९६, ३९८. ६५. ६६, १२६, १६९, १७१, १७२ या माझ्या लाडक्या बशी! :) लेख मस्त आहे... हेच बोल्तो! प्राजू, जियो..! आपला, (यातायाती मुंबैकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पर्नल नेने मराठे Tue, 06/16/2009 - 07:16 नवीन
तात्या ६५, ६६ माझ्या दारावरुन जाते :-? ठाकुद्वार, कधी उतरा गोर्या रामापाशी. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
निखिल देशपांडे Tue, 06/16/2009 - 14:58 नवीन
आम्हा मुंबयकरांची लोकलट्रेन ही जर माय तर बीएस्टीची बस ही मावशीच की!!!! रोज आम्ही ४९६,३०,३९९ ने जातोच त्या मुळे त्या विशेष आवडीच्या. बेस्ट ची निळ्या रंगाची ए सी बस तर फार छान आहे. Image removed. पण सगळ्यात डेंजरस प्रवास तो टी एम टी चा.... खुप घाबरतो मी टि एम टी मधे चढायला. ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
श
श्रावण मोडक Mon, 06/15/2009 - 21:13 नवीन
पुढे? केएमटीचे अजून अनुभव आहेत गाठीशी. केएमटी आणि ब्रेक डाऊन हा अगदी जवळचा संबंध. लिहा...
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 06/16/2009 - 05:28 नवीन
केएमटी आणि ब्रेक डाऊन हा अगदी जवळचा संबंध. एन एम एम टी ( नवी मुंबई ) बाबतही असेच म्हणतो. बाकी लेख मस्तच -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
च
चित्रा Mon, 06/15/2009 - 23:27 नवीन
करणारा विषय. छान आहे लेख. आता मागे वळून पाहताना खूप छान वाटते. आपण कसे बस चालू होता होता चढत होतो, आणि प्रचंड गर्दीतही आनंदात प्रवास करू शकत होतो असे सगळे आठवते. मुंबईला १, ३१४, ३१५, ८५, ६६, ९० अशा अनेक बशींमधून प्रवास करायला लागला आहे. त्यातही कमी गर्दीच्या वेळी ३१४ नंबरच्या बसमधून प्रवास बसून करायला मिळाला की छान रमतगमत यायला मिळायचे. http://bestundertaking.com/transport/index.htm हल्ली ३१४, आणि ९० लिमिटेड असतात का नाही? वरच्या दुव्यात दोन्ही मिळाल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/15/2009 - 23:56 नवीन
मस्त वर्णन! प्रत्येकाला आपापल्या बशींची आठवण नक्की होणार आणि सगळे आकडे प्रतिसादांमध्ये दिसणार. ह्या धाग्यावरचे प्रतिसाद शब्दांऐवजी आकड्यांत बोलतील.:) माझे बस नं. शाळेत असताना १५४, १५८, १८१, ४, ११६ कॉलेजात असतानाचे मात्र आठवत नाहीत.:( रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनिता Tue, 06/16/2009 - 02:25 नवीन
असेच... माझी बसः पुणे, (वनाज कॉर्नर ते नळ स्टॉप यातायात :) ) ८६ (शास्त्रीनगर ते डेक्कन. बस कायम जुनी असायची, पण आपुलकी वाटायची.) ८१ ( हि नटवी. नेहेमी नवे मॉडेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ध
धमाल मुलगा Tue, 06/16/2009 - 09:14 नवीन
>>८१ ( हि नटवी. नेहेमी नवे मॉडेल) :O काय सांगता? कोणत्या काळात? मला तरी सन २००१ ते २००३ ह्या काळात सहजानंद ते पुणे स्टे. बस क्र.८१ (८१च काय, च्यामारी, २८३ तरी कुठं धड होती?) ए-क-दा-ही धडपणे असलेली दिसली नाही हो! सुटण्यापुर्वी अर्धाअर्धा तास गाडी तशीच चालु ठेवायचे, का तर म्हणे बंद केली तर चालु होत नाही....त्यातल्या त्यात २८३ जऽऽऽरा बरी असायची.. पण ८१ नं मला इतक्यांदा दगा दिलाय की सांगता सोय नाही :( असो, प्राजुतै, बसपुराण लय भारी :) तुझा आणखी कशाकशाशी ३६चा आकडा आहे? बसचा एक झाला, मागे एकदा तू आणखी एक काहीतरी सांगितलेलंस, आता आठवेना :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता
अ
अवलिया Tue, 06/16/2009 - 02:58 नवीन
वा! मस्तच लेख !! आवडला :) अवांतर - तुम्हालाही क्रमशःची लागण झालीच तर ... :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 06/16/2009 - 05:14 नवीन
असेच बोल्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Tue, 06/16/2009 - 03:08 नवीन
बशीचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. आधी सायकल मग दुचाकी असल्याने बसमधे बसायची वेळ आलीच नव्हती. पण ज्या दिवशी बसलो त्या दिवशी आख्खे जग त्या बसमधे भरले गेले होते. त्या दिवशी आपली आई रोज संध्याकाळी अश्या गर्दीतुन येते व आल्याआल्या घरकामात बुडते ह्याचा बोध झाला. म्हणजे कळत होते पण वळले नव्हते त्या दिवसापासुन आईला जाणिवपुर्वक शक्य तेवढी मदत करणे, मुख्य बसस्टॉपपर्यंत सोडणे, आणणे असे काहीतरी करु शकलो.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 06/16/2009 - 04:35 नवीन
कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. महिन्याचा पास काढायचा, पण निम्मे दिवस ११ नं.ची दोन पायांची बस चालवायची! शाळेत मात्र बसचा संबंध आला नाही! छान लिहिलंस. अजून येऊ दे लवकर लवकर. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/16/2009 - 06:22 नवीन
झकास लेख. आमच्या लहानपणी बसचा संबंधच नाही आला. चार किमी चं अंतर मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करत पार करण्यात जी मजा होती ती बसच्या प्रवासात थोडीच असणार आहे. आणि त्यातुन वाचलेल्या पैशामध्ये कल्पनाला ब्रुसली, जॅकी चेन चे पिक्चर बघता यायचे, हा महत्वाचा फॅक्टर होता. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/16/2009 - 08:20 नवीन
प्राजु, लेख आवडला. प्रत्येकाला आपापल्या बशी आठवणार हे रेवतीचे म्हणणे अगदी पटलेच. माझी बस कुर्ला ते कलिना ३११ किवा ३१८.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/16/2009 - 08:39 नवीन
प्राजुतै लेख मस्तच ग. बशीचा आणी आमचा कधी संबंधच आला नाही. शाळा घरापासुन ५ मिनिटाच्या अंतरावर आणी क्लास २ मिनिटाच्या अंतरावर. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 06/16/2009 - 09:28 नवीन
बसकथा छान!! माझा कधीच बसशी संबंध नाही आला. तशी कंपनीची बस होती ने- आण करायला. पण ती रोज टायमात यायची. कधीच लेट नाही झाली.
  • Log in or register to post comments
प
प्रशु Tue, 06/16/2009 - 11:11 नवीन
मस्त लेख. सध्या मी दिल्लीत आहे आणी त्यामुळे मुम्बई लोकल खुप आठवतेय. रोजची सकाळी ६:४५ ची अंधेरी लोकल, त्यातले मित्र, मिळुन केलेली धमाल सगळ आठवुन दिल्या बद्द्ल धन्यवाद.................
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 06/16/2009 - 15:46 नवीन
वा! नोस्टॅल्जिआ मस्त भारी!! आवडला. पण क्लास झाल्यावर जवळच्याच मैत्रीणीकडे जाऊन सकाळच्या वेळेसाठी आईने दिलेली पोळी-भाजी खाल्ली.. मग शाळेत गेले. व्यवस्थित ८ तास बसून अभ्यास केला आणि संध्याकाळी रिक्षातून घरी आले. व्वा!!! काय थ्रील होतं! यातलं थ्रिल समजलं नाही बॉ. याऐवजी, "आईने दिलेली पोळी भाजी न खाता, कोपर्‍यावरच्या गाडीवर मिसळपाव, वडापाव खाल्ला.. मग शाळेत दोन चार मास्तरांची खेचली, ४ तास बंक केले आणी हुंदडत घरी आले." यातलं थ्रिल कसं वाटलं ? असो, असाही हा मुलींचा प्रांत नाही. :) इकडे पुण्यात पीएमपीएमएल बसचे हॉर्न सोडुन सर्व भाग वाजतात, बसमधे उभं रहायची जागा मिळाली तर, मुंबईच्या लोकलपेक्षा भयंकर अनुभव येतात. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Fri, 10/29/2010 - 17:33 नवीन
बर्याच दिवसानी पण छान लिखाण... मला तर पुण्यात कितीही लांबचं ठिकाण असेल तरी बसने गेल्याचं आठवत नाही... या बशींची वाट बघण्यापेक्षा मला टांगा(दैवी देणगी..) सोयिस्कर वाटत. अगदी अभिनव पासुन भांडारकर रोड...सिंबायोसिस..पर्यंत हा ठाण्यात मात्र १२ नं ची बस फिक्स आणि जागा मिळेल तेव्हाच जाणार..त्यासाठी २ बशीही फोडु (सोडु) शकतो..
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 10/29/2010 - 18:11 नवीन
लेख आवडला प्राजक्ता ! सकाळी ८.३१ ची ठाणा फास्ट लोकल पण विक्रोळी ला थांबणारी ... आणि माझ्या 'बशी' ... ३९९ - ४९६ - ए सी ४९६ - ८ नंबर शास्त्री नगर सगळ सगळ आठवलं :) या वेळच्या ठाणे भेटीत आमच्या छोट्याला एका नवीन बशीत बसवलं ... १०९ शिवाई नगर ... टी एम टी च्या या नवीन गाड्या खूपच चांगल्या आहेत. अगदी बसच्या आतमध्ये 'टी एम टी सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत करते' असा electronic display बघून सुखद धक्का बसला ... (रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बसणाऱ्या धक्क्यांमध्ये आणखी एकाची भर ! )
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/29/2010 - 19:59 नवीन
प्राजु, तुम्ही आणि बस समांतर आहात हे नशीब म्हणा! मी हैराण करणार्‍या गोंयकार बसेसनी गेली १० वर्षं प्रवास करतेय. आणि सहनशक्ती संपेल तेव्हा नोकरी सोडून देईन म्हणतेय. लेख मस्त झालाय हे वेगळे सांगायला नकोच!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा