Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जॉनी मेरा नाम...

व
विनायक प्रभू
गुरुवार, 06/18/2009 - 17:36
💬 65 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14330 वाचन

💬 प्रतिसाद (65)
स
संदीप चित्रे गुरुवार, 06/18/2009 - 17:41 नवीन
धन्स मास्तर... का माहिती नाही पण फोटोखालची नावं वाचण्याआधीच जॉनी अचूक ओळखला :) >> १. २४ तासात मार्क विसरायचे. Gone, kaput,vamoss, history. नविन पिच, नविन इनिंग 2. गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही. हे तर खासच.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/18/2009 - 17:46 नवीन
के.टी कलेक्टर होणार नाही ओ कायतरी काय? गणितात KT घेतल्याशिवाय कोण इंजिनिअर झालाय काय? (बाळ खराट्या, तू पालथे धंदे करून दरवेळी केट्या घेऊन पास झालास म्हणजे सगळेच तसे नसतात. हे तर टॉपचे लोक आहेत.) (KT सम्राट) खराटा
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 05/20/2011 - 07:36 नवीन
बाळ खराट्या, तू पालथे धंदे करून दरवेळी केट्या घेऊन पास झालास म्हणजे सगळेच तसे नसतात. हे तर टॉपचे लोक आहेत. जे सलग चार वर्षात विंजिनेर होतात ते सगळे अत्यंत हुशार असतात. ( ड्रॉपर + केटी सम्राट + ढब्बू )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चतुरंग गुरुवार, 06/18/2009 - 17:46 नवीन
जॉनी मेरा नाम!! देवाची लेकरं आणि दयाळू वाटाड्या!! __/\__ (धन्य)चतुरंग
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 06/18/2009 - 17:54 नवीन
__/\__ - भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सहज गुरुवार, 06/18/2009 - 18:04 नवीन
__/\__ =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
म
मुक्तसुनीत गुरुवार, 06/18/2009 - 18:26 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
द
दशानन Fri, 06/19/2009 - 05:53 नवीन
दंडवत मास्तर ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ल
लिखाळ गुरुवार, 06/18/2009 - 17:56 नवीन
जोरात ! अभिनंदन :) -- लिखाळ. या मास्तरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 06/18/2009 - 18:07 नवीन
सर्व यशस्वी "कलाकारांचे" अभिनंदन! बरेचसे मुद्दे देखील पटले. मात्र, "प्रवेश प्रक्रिया पूर्ण होउन कॉलेज नीट सुरु व्हायला लागणार्‍या दिड महीन्यात कंप्युटर आणि मॅकॅनिकल ड्रॉइंग चा अभ्यास पूर्ण करायचा. कुठलाही क्लास न लावता ह्यातल्या 'पंडीताचे' फुकट मधे मार्गदर्शन." हा मुद्दा समजू शकला तरी पटत नाही. आपल्या शिक्षणपद्धतीतील ती मर्यादा आहे. तसेच शिकत असताना अभ्यासात/शास्त्रात उत्सुकता अर्थात "इन्क्विझिटीव्हनेस" ठेवीन, तसा प्रयत्न करेन असे पण म्हणावेसे वाटते. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे (विशेष करून) इंजिनियर होताना (पण इतरही पदव्यांमधे) भाषेचे महत्व कमी करणार नाही. भाषा (मराठी, इंग्रजी इतर जी कुठली योग्य असेल ती) शिकत राहीन आणि त्याचा संवाद माध्यम म्हणून जास्तीत जास्त वापर करण्यात तरबेज होईन. त्यासाठी भरपूर अवांतर वाचेन. म्हणजे भाषापण चांगली होईल, अनेकांशी संवाद साधता येईल आणि समुपदेशनाची गरज कमी भासेल ;) (शेवटचा भाग ह.घ्या. हे.वे.सां.न.ल.)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 06/18/2009 - 18:26 नवीन
आणखी एक शपथ म्हणजे जातीयता मानणार नाही.:) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 06/18/2009 - 18:47 नवीन
+१ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विनायक प्रभू गुरुवार, 06/18/2009 - 18:49 नवीन
मान्य. अ‍ॅडमिशन झाल्यावर सांगतो मात्र मर्यादा (लिमिट्स) ओलांडायची सवय आत्तापासुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
रेवती गुरुवार, 06/18/2009 - 18:24 नवीन
अहो काय हे सर! डोळ्यात पाणीच आलं आपले सल्ले वाचून! कसले ग्रेट आहात आपण! सगळे सल्ले सोन्यासारखे! एक (की अनेक?) जबाबदार नागरीक व जबाबदार वाटाड्या घडवण्याचे! ही मुले नशिबवान आहेत, आपल्यासारखा वाटाड्या मिळाला म्हणून! अजून एक, ते मुलींचे फोटूपण टाका की लवकर! रेवती
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर गुरुवार, 06/18/2009 - 18:17 नवीन
गुरू आणि शिष्य दोघांनाही! मुशाफिर.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 06/18/2009 - 18:20 नवीन
मस्तर ... उत्तम हो :) पण केटी शिवाय इंजिनियरींग ला मज्जा मज्जा नाही .. आणि एखादा सब्जेक्ट क्रिटीकल ला जाण्या(किंवा नेन्या) सारखं थ्रील नाही कुठं
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/18/2009 - 18:23 नवीन
अगदी मनापासून अभिनंदन!
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Fri, 06/19/2009 - 09:03 नवीन
अभिनंदन... तुमची टीम माझ्यासाठी एक आदर्श...आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठीही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
क्रान्ति गुरुवार, 06/18/2009 - 18:24 नवीन
धन्य ते गुरू आणि धन्य ते शिष्य! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि गुरुवार, 06/18/2009 - 18:48 नवीन
सर, तुमचे आणि तुमच्या शिष्योत्तमांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालिसाठि हार्दिक शुभेछ्छा!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 06/18/2009 - 18:59 नवीन
अभिनंदन!!! अगदी मनापासून. मास्तर तुम्हाला दंडवत!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ए
एक गुरुवार, 06/18/2009 - 19:10 नवीन
इंजिनियरींग साठी "प्रगती", २१ अपेक्षीत - रेडीमेड उत्तरं, प्रो. च्या रेडीमेड नोट्स वापरणार नाही. एकवेळ डीस्टीन्क्शन नाही मिळालं हरकत नाही पण रेफरन्स किंवा टेक्स्ट ला पर्याय नाही.. मॅथ्स ला केटी घ्यावीच लागते असा काही नियम नाही..अभ्यास-सराव स्वःताचा स्वःता केला तर ८ ही सेम्स मधे डीस्टींक्शन शक्य आहे.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 06/18/2009 - 19:15 नवीन
मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
च
चतुरंग गुरुवार, 06/18/2009 - 19:19 नवीन
तयार जेवण घेऊ नका. अपेक्षित्,प्रगती नो नो... मॅथ्सला केटी लागायचे कारण नाही! (M2 92/100)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
घ
घाटावरचे भट गुरुवार, 06/18/2009 - 23:44 नवीन
आणि स्वतःचा अभ्यास करून ४० ही शक्य आहे. ;) -भटोबा (यम २ - ४०/१००, फष्ट अ‍ॅटेम्ट) अवांतर - अनिल कुंबळे ब्याटिंग करताना ५० रन झाले की ब्याट वर करायच्या ऐवजी ४० रन झाले की ब्याट वर करायचा म्हणतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बबलु गुरुवार, 06/18/2009 - 19:54 नवीन
जॉनी मेरा नाम !! देवाची लेकरं आणि दयाळू वाटाड्या !! (स्वगतः आमच्या वेळी मास्तरांसारखा वाटाड्या का नाही भेटला राव?) ....बबलु
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/18/2009 - 20:07 नवीन
Gone, kaput,vamoss, history हे काय सुधरलं नाय. (अशिक्षित व मठ्ठ)खराटा
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 06/19/2009 - 05:34 नवीन
अ‍ॅडमिशन मिळाल्यावर मार्क 'पुराणातील वांगी' व्हावीत चे इंग्रजी भाषांतर. जरा जास्तच आक्रमक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ए
एकलव्य गुरुवार, 06/18/2009 - 21:57 नवीन
अभिनंदन! ६.दोन वर्ष नोकरी केल्याशिवाय एमबीए किंवा एमएस चा विचार सुद्धा करायचा नाही. हे तर मस्तच!!
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 06/19/2009 - 02:02 नवीन
गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.
ह.ह.पु.वा. (राहताहेत बिचारी ब्रम्हचारी जन्मभर) ;) यशस्वी विद्यार्थ्यांचे अन त्यांच्या मार्गदर्शकाचे हार्दीक अभिनंदन!! :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 06/19/2009 - 00:05 नवीन
गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.
ह.ह.पु.वा.
असेच म्हणतो. अहो सर - कोवळ्या वयात चक्रम प्रेमात पडू द्यात की पठ्ठ्यांना. त्या वयात पडणेही सोपे, धूळ झाडून उठणेही सोपे. सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/19/2009 - 01:38 नवीन
__/\__ :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 06/19/2009 - 02:50 नवीन
सर, तुमचे आणि तुमच्या गुणवंतांचे अभिनंदन. तुमच्या Ten Commandments खासच.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 05:48 नवीन
एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की. हम्म! अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेत प्रवेश म्हणजेच यश का?? उद्या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून तो मुलगा कुणी पेशालिस्ट डॉक्टर झाला तर तो पेशंटना लुटणार नाही, कट प्रॅक्टिसच्या रॅकेटमध्ये सापडणार नाही याची खात्री आहे का तुम्हाला? त्या दृष्टीने त्याच्यावर काय संस्कात केलेत?? जळ्ळं त्या सी ई टी परिक्षेत चार मार्क पडले तर फोटो डकवून कवतिकं कसली करताय?? एखाद्या परिक्षेत २०० पैकी १९०+ मार्क पडले तर त्यात त्या पोरांनी किंवा तुम्ही काय असे मोठे दिले लावलेत? लाईफच्या परिक्षेसंबंधी काय शिकवता पोरांना? की १९०+ मिळाले म्हणजे फोटू डकवून मिरवण्यातच सार्थक झाले?? जी मुलं नापास झाली, अयशस्वी ठरली त्यांच्याकरता काय केलेत?? ६.दोन वर्ष नोकरी केल्याशिवाय एमबीए किंवा एमएस चा विचार सुद्धा करायचा नाही. पुन्हा तेच! विंजिनियरींग, मेडीकल आणि एम बी ए..! त्यापेक्षा स्वत:चा काही धंदा करेन, स्वत:च स्वत:च्या पायावर उभा राहीन, असं का नाही काही शिकवत त्या पोरांना?? मास्तर, कुणावर संस्कार करणारच असाल, गायडन्स देणारच असाला तर पोरांना नुसते परिक्षार्थी बनवू नका! त्यात दूरगामी धोके आहेत! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/19/2009 - 06:01 नवीन
पोरं भविष्यात काय करतील कोणी पाहिलं तात्या, आणि लाइफचं भविष्य जगता-जगता येईल शिकता, हे वय शिकण्याचे आहे, दुनियादारीची ओळख होतच राहील की ! पण ज्यांच्याकडून अपेक्षाच नाही, असे पोरं घडवणे म्हणजे मोठ्ठ काम तेव्हा अशा माणसाचं कौतुक नक्कीच आहे ! स्वगत : तात्या, काहून मास्तरच्या मागे लागलाय कोणास ठाऊक ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 06:03 नवीन
स्वगत : तात्या, काहून मास्तरच्या मागे लागलाय कोणास ठाऊक ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भ
भाग्यश्री Fri, 06/19/2009 - 09:15 नवीन
का बळंच चिडताय हो तात्या? त्या मुलांचे एम जर इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचे असेल,प्रभू मास्तरांना त्यात मदत कराविशी वाटली, तर आपलं काय बिघडलं? संस्कार त्या मुलांचे आई बाप पाहतील! नाही का? (परवापासून जास्तच चिडताय बुवा... का शुद्धलेखन,ऑस्कर बरोबर इंजिनिअरिंग पण आलं आता?) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
N
Nile Fri, 06/19/2009 - 09:41 नवीन
जरा थंड घ्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
विनायक प्रभू Fri, 06/19/2009 - 05:56 नवीन
तेच. अहो तात्या, मी त्या मुलांना अगदी तुमच्या भाषेत काय काय सांगितले ते सर्व इथे कसे लिहु?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 05:57 नवीन
मास्तर, तुम्ही तुमची कवतिकं नेहमीच सांगत असता म्हणून आता मीही एक माझं कवतिक सांगतो.. आजपर्यंतच्या आयुष्यात तीन निराश मुलं भेटली. अगदी निराश. समोर काही नाही, फक्त अंधार! मी त्या पोरांना आयुर्विमा महामंडळाच्या दलाली बद्दलची सर्व माहिती सांगितली. सर्व खाचा खोचा समजावल्या. या धंद्यात किती कष्ट करावे लागतात आणि योजनाबद्ध कष्ट केले असता काय होऊ शकतं हे सांगितलं, समजावलं, त्यांना तयार केलं. मला सांगायला आनंद वाटतो की आज ते तिघेही जण अक्षरश: खोर्‍यानं पैसा कमावताहेत, स्वत:च्या पायावर उभे आहेत. या धंद्यात किती पैसा मिळू शकतो ते रामदासरावांना विचारा..! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 06/19/2009 - 06:06 नवीन
तात्या , तुमच्या तीन लोकांबद्दल , त्यांना तुम्ही केलेल्या मदतीबद्दल ऐकून आनंदच झाला ! मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 06:27 नवीन
तुमच्या तीन लोकांबद्दल , त्यांना तुम्ही केलेल्या मदतीबद्दल ऐकून आनंदच झाला ! मनःपूर्वक अभिनंदन. अरे आता बोलू नये, परंतु खरंच साफ अंधार होता रे त्यांच्या आयुष्यात! साला शिक्षणात गती नाही. घरची अत्यंत गरीबी, खायचे वांधे. अरे साधे ३५ मार्क मिळायची मारामार तिथे मास्तरच्या त्या सीईटीची आणि विंजिनियरींगची बातच सोड! आमचा बापू सोनावणेच बघ. साला काय केलं नाही आयुष्यात बापूने? वडापाव विकला, फटाके विकले, आंबे विकले, रिक्षा चालवली! पण आज बापू अगदी मजेत मस्तीत आपलं आयुष्य जगत आहे. साला शाळेतले मार्क फाट्यावर मारले बापूने! आमचा काल्या शिंदे. शाळेत जायचेच वांधे होते पण जेमतेम दहावी पर्यंत पोहोचला परंतु दहावी नापास झाला. समजावणारं, समुपदेशन करणारं, पाठीवरून मायेचा हात फिरवणारं कोण नव्हतं. बाप एक नंबरचा बेवडा. त्याला आणि आईला मारझोड करायचा. पण आज काल्या पेंटिंगची मोठमोठी कामं घेतो. अगदी भिंती खरवडण्यापासून काल्याने मेहनत घेतली. प्रसंगी उपाशी राहिला! पण स्वत:च्या पायावर उभा राहिला. ना काल्याने दहावीच्या/बारावीच्या/सीईटीच्या मार्कांचा बागुलबुवा मानला ना त्याला काही किंमत दिली. अरे बिचार्‍या आमच्या काल्याला सी ई टी म्हण्जे काय हे पण माहीत नाय रे! फाट्यावर मारलं सबकुछ आणि स्वकष्टाने स्वत:च्या पायावर उभा राहिला! आज काल्याकडे १० रंगारी पगारी नोकरीवर कामाला आहेत..! असो. तुमची आणि मास्तरांची दहावी-बारावीच्या मार्कांची आणि सी ई टीच्या यशाची (!) कवतिकं चालू द्यात! साला उथळपणा सगळा! जाऊ द्या! आपंण काय नाय बोलत.. नायतर पुन्हा माझ्यावर तेजोभंगाचा वगैरे आरोप व्हायचा! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/19/2009 - 06:12 नवीन
आपण निराश मुलासांठी घेतलेले कष्ट , परिश्रमही मास्तराच्याच दर्जाचं आहे ! आपलेही अभिनंदन ! अवांतर : आयुर्विमा महामंडळाच्या दलालीचा धंदा प्रामाणिक असतो का ? (माहिती हवी आहे) ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक प्रभू Fri, 06/19/2009 - 06:18 नवीन
वयोमानाप्रमाणे कार्यक्षेत्र मी कमी केले आहे. साधारण १४ वर्ष मी आणि बंधूनी मराठी माणसांना नोकरी आणि कामधंद्यात मदत हे मोफत अभियान चालवलेले होते. कामधंद्याकरता सरकारी सबसीडी कशी मिळवायची लाच न देता. साधारण २०० असावेत. आणि मी धंदा करु नका असे सांगतो अशा निर्णयापर्यंत कसे काय पोचलात तात्या. माझी ती बाजु मी इथे लिहीत नाही. पण रामदासाना माहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 06:40 नवीन
साधारण १४ वर्ष मी आणि बंधूनी मराठी माणसांना नोकरी आणि कामधंद्यात मदत हे मोफत अभियान चालवलेले होते. अहो मग त्या बद्दल लिवा ना! मला वचायला नक्कीच आवडेल. आपण तर साला ज्ळ्ळ्या त्या विंजिनियरींगच्या पोरांची आणि सी ई टी ची कवतिकं वाचून पार हैराण झालो! असो, बाकी मर्जी आपली. काय लिवायचं, काय नाय हा आपला अधिकार मी नाकारत नाय! काय चाहेल ते लिवा... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Fri, 06/19/2009 - 06:10 नवीन
मास्तर ! जरा एकदा इंडियातुन भारतात या हो !! अर्थात तुम्हाला सवड असेल तेव्हा या हो !! काही घाई नाही... अजुन चार वर्षानी आलात तरी आम्ही आहोत तितेच असु (जिवंत असलो तर) !! आम्ही काय भारतातली रिकामटेकडी पिचका-या मारणारी माणसे !! आम्हाला काही कळत नाही तुमचे काय चालले आहे ते.... :) चालु द्या तुमची कवतिके !!! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 06/19/2009 - 06:17 नवीन
=)) सही बोल्य्या नान्या तु ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ Fri, 06/19/2009 - 06:25 नवीन
पण मास्तरांचे हार्दिक अभिनंदन.खरोखर मास्तर तुमचे काम खुपच मोलाच व महत्वपुर्ण आहे. तुमच्या शिष्यांचे देखिल मनपुर्वक अभिनंदन. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 06/19/2009 - 06:38 नवीन
"आज माझ्यासाठी मास्तर आहेत ,मी उद्याच्या जॉनीसाठी मास्तर होईन"" खरय खरय.... हे फार महत्वाच.....
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 06/19/2009 - 07:37 नवीन
तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही असेच करत राहा इतकेच म्हणतो. आम्हाला तुमच्याबद्दल आदरच वाटतो. ज्याला जे आवडेल ते ते त्याने करावे ,मात्र ते निष्ठेने करावे हे महत्वाचे आणि प्रभूमास्तर ते करताहेत. तेव्हा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तात्याने जे आजवर केलेय,सद्या करतोय आणि भविष्यात करेल(हे सर्व चांगल्या कामाबाबतीतच बरं का!) तेही उत्तमच आहे. मात्र कृपा करून आपल्या कामाची एक-दुसर्‍याशी तुलना करू नका. ज्याला जे जमेल ते त्याने करावे,उगाच उंटाच्या बुडख्याचा मुका घेऊ नये....इति. रावसाहेब. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा