Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जॉनी मेरा नाम...

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 06/18/2009 - 17:36  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
14330 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 07:49 नवीन
तात्याने जे आजवर केलेय,सद्या करतोय आणि भविष्यात करेल देवबाप्पा, मी आजवर अगदी अभिमानाने सांगावं असं काहीच केलं नाही. आता विषय निघालाच होता म्हणून फक्त मी त्या तीन पोरांबद्दल लिहिलं. एरवी मी अमूक केलं, तमूक केलं असं वारंवार सांगणार्‍यातला मी नाही. या दुनियेत कुठेच काही न बोलता खूप काही काम करणारी माणसं मी पाहिली आहेत! त्यांचं मोठेपण पाहिलं की मी स्वत:बद्दल काय लिहावं असा मला प्रश्न पडतो.. मात्र कृपा करून आपल्या कामाची एक-दुसर्‍याशी तुलना करू नका. तुलनेचा प्रश्नच येत नाही. मास्तर मला वयाने वडील आहेत, अनुभवाने, ज्ञानाने वडील आहेत. परंतु सी ई टी ची परिक्षा आणि त्यातलं यश, इंजिनियरींग-मेडीकलला प्रवेश इत्यादी गोष्टींना ते अवास्तव महत्व देत आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे.. असो, त्यांना पटतंय तेच ते करत आहेत..त्या बाबत मी अधिक आग्रह धरू शकत नाही. मला तो अधिकार नाही... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/19/2009 - 08:50 नवीन
पास होण्याची मारामार असलेल्या मुलाला धंदा करायला सांगणं हे ठीक आहे. पण ज्याच्यात हुशारी आहे, क्षमता आहे अशांना शिकवलं तर तेच जास्त योग्य होईल. आज तुमच्या एका मित्राला भिंती घासण्यापासून सुरुवात करावी लागली, तेच जर तो मित्र सिवील इंजीनियर झाला असता तर भविष्य अजून उज्वल व्हायचे चान्स अधीक वाढले नसते का? बुद्धी आणि शिक्षणाची आवड असताना न शिकणं हा बुद्धीदात्यावर अन्याय आहे. होउ दे ना इंजीनियर, काढेल स्वत:चं वर्कशॉप. आणि मेकॅनीक म्हणून सुरुवात केलेल्या माणसापेक्षा ते अधीक प्रोफेशनली चालवून जास्त नफा मिळवेल. रंगारी रू. ३०० रोजावर काम करतो, इंटीरियर डेकोरेटर हजारात फी लावतो. कारण त्याच्या कडे रंगार्‍यापेक्षा जास्त ज्ञान आणि व्यवसायीकता असते. हा फरक शिक्षणानेच येतो. डॉक्टर / इंजीनियर ह्या पदव्या म्हणजे सर्वस्व नाही पण हे अभ्यासक्रम माणसाच्या अंगभूत गुणांना झळाळी देण्यासाठी माणसानेच तयार केलेत. त्यामुळे शक्य असेल आणि बौध्धीक कुवत असेल तर शिक्षण घेणे योग्यच आहे. स्वाभिमानाच्या व स्वातंत्र्याच्या (कुणाची गुलामी नको) कल्पनांपायी स्वत: ची बुद्धी वाया घालवणे हा प्रकार बुद्धीपलिकडचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 09:17 नवीन
स्वाभिमानाच्या व स्वातंत्र्याच्या (कुणाची गुलामी नको) कल्पनांपायी स्वत: ची बुद्धी वाया घालवणे हा प्रकार बुद्धीपलिकडचा आहे. हम्म! बरेच प्रकार बुद्धीपलिकडले असतात! आपला, (निर्बुद्ध!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/19/2009 - 09:50 नवीन
तात्या अख्ख्या प्रतिसादातलं एकच वाक्य घेउन त्यावर नका बोलू हो. हे नुस्तंच वाक्य काही आगा पिछा नसलेलं वाटतं. ह्या वाक्या आधी लिहिलेल्या गोष्टीही महत्वाच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 09:58 नवीन
ह्या वाक्या आधी लिहिलेल्या गोष्टीही महत्वाच्या आहेत. तुझ्या मते असतील! मी तुझ्या मताचा आदर करतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
न
नितिन थत्ते Fri, 06/19/2009 - 09:35 नवीन
अ‍ॅडीशी १०० % सहमत. (अ‍ॅ आता नीट टंकता येतंय). शिक्षण घेण्याची पात्रता असेल तर शिक्षण घेण्याचाच प्रयत्न करावा. शिक्षणाने नुसतीच नोकरी मिळते असे नाही तर नेटवर्कही जमवायला सोपे पडते. धंदा करायचा तर नेटवर्क हवे. शिक्षण घेतले (म्हणजे कॉलेजात गेले) की हे नेटवर्क उभे करणे सोपे जाते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 09:58 नवीन
शिक्षणाने नुसतीच नोकरी मिळते असे नाही तर नेटवर्कही जमवायला सोपे पडते. शिक्षण घेतले (म्हणजे कॉलेजात गेले) की हे नेटवर्क उभे करणे सोपे जाते. ??? वरील वाक्ये अंमळ हास्यास्पद वाटतात! असो, प्रत्येकाची मतं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्रशु Fri, 06/19/2009 - 11:17 नवीन
मास्तर तुम्हाला साष्टांग दंडवत...................
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 05/20/2011 - 06:34 नवीन
तेंव्हा नेमकी शक्कल कशी लढवणार हे माहीत नव्हते. फक्त इच्छा होती. देवाच्या दयेने रस्ता मिळाला. जॉनी ला जवळ जवळ ३ वर्षाची कॉलेज आणि पुस्तकांची फी स्कॉलरशीप म्हणुन देउ शकलो. जॉनीच्या पहील्या ४ सेमिस्टर चे मार्क ९.३/१० कॉलेज विजेटीआय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
र
रेवती Fri, 05/20/2011 - 06:44 नवीन
४ सेमिस्टर चे मार्क ९.३/१० अगदी छान! तुमचे आणि तुमच्या शिष्यांचे अभिनंदन! मुलीही कमी नाही म्हणताय तर त्याबद्दलही लिहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ग
गोगोल Fri, 05/20/2011 - 10:21 नवीन
मदत हवी असल्यास अवश्य कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 05/20/2011 - 21:02 नवीन
आर्थिक मदत काहीही नको. पण जॉनीसारखा कोणीही नजरेत आला तर जरुर कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ह
हवालदार Fri, 06/19/2009 - 15:03 नवीन
प्रकटाआ
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 05/20/2011 - 08:28 नवीन
अभिनंदन!!! अगदी मनापासून. मास्तर तुम्हाला दंडवत!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 05/20/2011 - 08:31 नवीन
मास्तर, सलाम!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा