सरोदवादनाला आणि जुगलबंदीला ज्यांनी जगात पोहोचवले असा उस्ताद लोपला, आणखी एक दिग्गज काळाआड गेला.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांनी वाजवलेला राग मारवा इथे ऐकता येईल.
ईसकाळ मधील बातमी येथे पहा.
(खिन्न)चतुरंग
एका महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली !
उस्ताद अली अकबर यांच्या कॅलिफोर्नियातल्या संस्थेसमोरचा बोर्ड :
उस्ताद अली अकबर माझ्या एका अतिशय साध्या तबलजी मित्राला आशीर्वाद देताना. त्यांच्या संस्थेमधे संगीताबद्दल आस्था असणार्या कुणालाही मुक्त प्रवेश होता. खान बाबा कुणालाही मनमोकळे भेटायचे. चौकशी करायचे. संगीताची उपासना आणि जोपासना शेवट्पर्यंत चालू होती. हा फोटो एक महिन्यापूर्वीचा.
विख्यात सरोद वादक उस्ताद अलि अकबर खाँ ह्यांचे मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने सॅन फ्रॅन्सिको येथे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
या महान कलाकाराला माझीही श्रद्धांजली.
हा महान कलाकार अत्यंत आजारी असतानाही शिष्यांना राग दुर्गा शिकवत होता. त्यांची महती वर्णावी तितकी कमीच आहे.
- भटोबा
प्रतिक्रिया