Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही अनुभव..पावसाळलेले!

आ
आपला अभिजित यांनी
Fri, 06/19/2009 - 20:21  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
9935 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

प
पक्या Fri, 06/19/2009 - 23:18 नवीन
मस्त. पावसाळी आठवणी आवडल्या. अशीच गारांच्या पावसाची मजा ही काही औरच. दोन्ही फोटू ही सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सुहास Sat, 06/20/2009 - 00:02 नवीन
फोटो मस्तच... पहिला तर १ नंबर.. माझ्या आठवणीतला पाऊस २६ जुलै २००५ चा, मुंबैतला... नशीब माझी नाईट शिफ्ट होती त्या दिवशी त्यामुळे घरी बसून पाहता आला.. बाकीच्यांचे हाल ऐकूनच आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटदा मुंबै सोडावी वाटली.. जर माझ्याकडे करवत असती आणि पाऊस साठवायची सोय असती, तर त्या पावसाचा एक तुकडा कापून साठवून ठेवला असता, इतका तो दाट आणि जोरदार होता.. भजी, cigarette, चहा ची तल्लफ येत होती पण आम्ही रहात होतो त्या हिंदमाता area त पाणी तुंबल्यामुळे आम्हां रूममेट्स ना खाली जाऊन ती चैन करणे परवडत नव्हते...फक्त "maggi" असल्याने आम्ही रूममेट्स ऊपाशी नव्हतो.. दुसर्‍या दिवशी फक्त दादर टी टी लाच २-३ हजारभर लोक (जास्तच असतील) बघितले.. अडकून पड्लेले... अगदि ठाण्याला जायला कोणत्याही वाहनाला प्रत्येकी हजारभर रूपये द्यायची तयारी होती त्यांची.. पण शीव (sion) च्या पुढे कुणी जातच नव्हते... फोनचे नेटवर्क बंद होते.. flyover बंद पडलेल्या गाड्यांनी सजले होते.. चिंताग्रस्त आणि भुकेले लोक सगळीकडे... या पावसानंतर "गारवा" ची cassette फेकून दिली आणि वर्षभर तरी पावसाची गाणी ऐकणे बंद केले.. आणि मे २००६ ला मुंबै सोडली...! --सुहास
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 06/20/2009 - 05:53 नवीन
पहिला फोटू अप्रतिम! अनुभव आवडले. माझे आणि पावसाचे फारसे सख्य नाही. सुहास यांनी लिहिल्याप्रमाणे मुंबईच्या पावसाच्या २००६ च्या बातम्या वाचून सुन्न झाले होते. माझा भाउ पाण्यात बरेच तास अडकून पडला होता. नंतर कसाबसा चालत तो दुसर्‍या भावाकडे गेला आणि आमच्या जीवात जीव आला. रेवती
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 06/20/2009 - 05:58 नवीन
कुठे काढलाय हा फोटो? फोटो पाहूनच आधी मन प्रसन्न झालं. त्यानंतर तुझा लेख वाचून अजून आठवणी जाग्या झाल्या. आम्हाला असा एकदा पाऊस कडकडून भेटला होता लोहगडावर. कॉलेजच्या सहलीसाठी गेलो होतो आणि वर पोचता पोचताच धुमधार पावसाने गाठलं. खाली उतरताना तर चक्क एक लांबच लांब साखळी करून उतरावं लागलं होतं.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 06/20/2009 - 06:04 नवीन
मस्त आठवणी पहिला फोटो , रत्नागिरी- चिपळुण रोडवरचा (सावर्डे जवळचा) आहे का? -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
र
रत्नागिरीकर Sat, 06/20/2009 - 13:36 नवीन
मला वाटतं, हा फोटो कशेडी घाटातला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
ट
टारझन Sat, 06/20/2009 - 06:34 नवीन
वा !! पहिला फोटू क्लासंच .. अशा रोड्स वरून तुफान स्पीडने बाईक चालवायला काय मजा येते !! वळणांवर लॅप मारताना तर अँड्रेनॅलिन तर एकदम पिक ला पोचतं .. थोडक्यात लेखापेक्षा फोटू आवडला :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 06/20/2009 - 08:45 नवीन
फोटो मस्तच. पहिल्याने तर गारवा आणला डोळ्यांना.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 06/20/2009 - 09:18 नवीन
वा! फोटो पाहुन ऑगस्ट महिन्यातल्या लोणावळ्याची आठवण झाली!! भुशी डॅम, झेनिथ धबधबा, हिरवळ, आणी पाउस.. डोळ्यांची पारणे फिटावीत असं अप्रतिम निसर्गसौंदर्य.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 06/20/2009 - 13:05 नवीन
पहिला फोटू कसला क्लास आहे रे. काळजात हललं बघ. (कुठे काढलाय?) पावसाळी सहली टपटपल्या मनातून. अगदी घट्ट मनात बसलेली म्हणजे शिवथरघळची. (मुसळधार)चतुरंग
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/20/2009 - 13:16 नवीन
वा वा वा ! अभिजितदा फंडु लेखन आणी फंडु फोटु रे. दिल पावसाळी पावसाळी हो गया. अवांतर :- खेकडा भजीची पा़कृ फोटुसकट कधी देणार ?? º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sat, 06/20/2009 - 13:28 नवीन
सगळेच रस्ते पावसाळ्यात असे धुमशान दिसतात! पण हा फोटो बहुधा खंडाळा घाटातला आहे. तुमच्या प्रशंसेच्या ओझ्याखाली मी नुसता दबूनच नव्हे, तर गाडला गेलोय, पण तरी सांगितल्याशिवाय राहवत नाही, की हा फोटो ढापलेला आहे. ऑफिस लायब्ररीत सर्च दिल्यावर घावला! मग ढापला नि हाणला इथे! असो. खालचा फोटो ताम्हिणीतला आहे. यंदाच्या पावसाळ्यात (नव्या `अल्टो`तून) बरीच भटकंती करायची आहे. तेव्हा पावसाचे फोटू काढून तुम्हाला जळवेनच.! असो. बाकी, पावसाळलेल्या लेखावरच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. टार्‍या, बाइक जपून चालव हो! आम्हाला अजून बरेच काही वाचायचेय तुझ्याकडून! चतुरंगराव, शिवथरघळीचा ट्रेक पावसाळ्यात धम्मालच होतो. विशेषत: घाटाच्या पुढे उतरून शेतातल्या रस्त्यातून जायचं! पण सालं त्या मुख्य धबधब्यात उतरता येत नाही! कसला ध्रोंकार करत वाहतो तो! पावसाळ्यात कोकण रेल्वेची सफर एकदा तरी करावीच!! असो. सगळ्यांना सहलींसाठी पावसाळलेल्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sat, 06/20/2009 - 13:33 नवीन
अजून पावसाचा पत्ता नाहीये!
आला ना पाउस, मस्त वाटतयं ........!! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sat, 06/20/2009 - 14:01 नवीन
अत्ता जरासा पिरपिरतोय बाहेर! हा पुण्याचा पाऊस मला आवडत नाही खरं तर! पाऊस म्हणजे कसा हवा, मुसळधार!! दोन-दोन दिवस सूर्याचं दर्शन न घडवणारा! दोन फुटावरचंही दिसू न देणारा!! कपडे सुकायची वाट पाहायला लावणारा आणि आंघोळ न करताच घरात बसून राहण्याची संधी देणारा!!!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 06/20/2009 - 14:46 नवीन
लेख आणि फोटो दोन्ही खास! :) तुम्ही पाऊसवाले लोक नशीबवान! आम्ही अजूनही काहिलीतच आहोत उन्हाच्या. तपमान "वाढता वाढता वाढे"या एकाच मंत्राचा जप करतंय! नुसते ढग येतात, आणि धग वाढवून निघून जातात. पाऊस कधी यायचा देव जाणे! :S क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 06/20/2009 - 15:13 नवीन
आणी वर्णनहि तितकेच सुरेख.. किती आठवणी जागवल्या.. मला पावसात भिजायला ज्याम आवडत. अगदि अजुनहि पहिल्या पावसात मी न चुकता भिजते. काल इथे रात्रभर पावसाने धुमाकुळ घातलाय. विजा आणी गडगडासकट.. आज सकाळ अशी छान पावसाळी उगवली आहे.. सगळीकडे हिरवगार.. डोळ्यांना सुखावणार.. मुलं ऊठायच्याआधी सकाळी सकाळी ६ वाजता मस्तपैकी १ तास बाहेर भटकून आले. आज संध्याकाळी चहाबरोबर कांदाभजी नक्कि..
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 06/20/2009 - 15:56 नवीन
पहिला फोटो क्लासच! लेख वाचून पावसात भिजल्यासारखे वाटले.:) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/20/2009 - 16:18 नवीन
अभिजित, मस्त फोटो आणि मस्त वर्णन. पावसात भिजायला मजा येतेच ! आमच्याकडेही पावसाचा अजून पत्ता नाही. पण पाऊस आल्यावर आपूनबी लै भिजणार ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 06/20/2009 - 16:45 नवीन
लेख आणी फोटो दोन्ही आवडले...:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 06/20/2009 - 18:26 नवीन
वा ... फोटो आणि आठवणी एकदम मस्त :) पावसाच्या खूप आठवणी जाग्या झाल्या. सिंहगडावर अनेक वेळा पावसाळी रात्री केलेली भटकंती आठवली. मान्सूनच्या जोरकस पावसाची खुमारी टेंपरेट हवामानाच्या प्रदेशातल्या बारमाही पावसाला नाही ! -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 06/21/2009 - 06:45 नवीन
पण अजुन पावसाचा साला पत्ताच नाही इकडे कोल्हापुरला.बघु कधी येतो ते.अभिजीत साहेब नवीन गाडी घेतली म्हणायची. अभिनंदन ,गाडी घेताना कोणती घ्यावी ह्यावर कौल काढला होता. आता घेतल्यावर पार्टी कुठे द्यायची ह्यावर एकादा कौल काढा. ह्या पावसाळ्यात होवुन जावुदे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
आ
आदम Sun, 06/21/2009 - 09:30 नवीन
1st pic is of kashedi ghat on mumbai-goa highway.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/22/2009 - 07:20 नवीन
अभिजितराव, पहिलं चित्र तर अल्टीच! :) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा