Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

अ
अजय भागवत यांनी
Sat, 06/20/2009 - 12:26  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
4305 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Sat, 06/20/2009 - 18:47 नवीन
नमस्कार, लेख वाचला. थोडाफार समजला. नक्की लेख कुणाला उद्देशून आहे आणि प्रश्नांची उत्तरे कुणी देणे आपेक्षित आहे ते मला उमजले नाही. लेख शिक्षकांसाठी लिहिला आहे आणि इतरांनी फक्त वाचायचा आहे की त्यातील काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ते मला समजले नाही. तरी...
क ) तुमच्या पाठ्यपुस्तकांची ( शाळा , महाविद्यालयातील ) तुम्हाला आठवण येत असल्यास त्यात ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या तुम्हाला दिसल्या का ? उदाहरणे देऊ शकाल ?
हा प्रश्न विचारात टाकणारा आहे. विचार करुन उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. ज्ञानकक्षा रुंदावणे, माहिती-ज्ञान स्विकारण्यासाठी माणसाला प्रवृत्त करणे आणि सक्षम करणे वगैरे हेतू प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाचे असतात. पण जन्माला आलो आहोत त्यामुळे यापुढे नक्की काय करावे, जीवनाचा उद्देश काय असावा, त्यासाठी नक्की काय करावे या बाबत कोणतेच मार्गदर्शन अथवा विचार उद्युक्त करणारे शिक्षण मला मिळाले नाही असे मला वाटते आहे. ते मिळण्याची फार गरज आहे/होती. (चर्चेला उगीच तात्विक वळण लावणारे किंवा विषयांतर करणारे हे मत नाही. प्रामाणिक मत आहे आणि शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍यांकडून याबाबत काही विचार ऐकण्याची उत्सुकता आहे.) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sat, 06/20/2009 - 19:18 नवीन
नक्की लेख कुणाला उद्देशून आहे आणि प्रश्नांची उत्तरे कुणी देणे आपेक्षित आहे ते मला उमजले नाही. लेख शिक्षकांसाठी लिहिला आहे आणि इतरांनी फक्त वाचायचा आहे की त्यातील काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ते मला समजले नाही. तरी... लेख सर्वांना उद्देशून आहे. ह्यातील अनेक गोष्टी आपण स्वतः शालेतर जीवनात वापरु शकतो. उदा. कंपनीत काम करत असाल आणि तुमच्यावर इतरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असेल तर. आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
मिहिर Sat, 06/20/2009 - 19:06 नवीन
चांगला लेख. मात्र पुढील वाक्य पटले नाही. जर एखादे उद्दीष्ट्य " आठवणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते " वापर " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे . असे का बरे असावे? असे असू शकत नाही का की मी एखाद्या गोष्टीबद्दल अधिक शिकलो तर अपेक्षित ते मला लवकर येईल. मला तर माझ्या शालेय जीवनात असे शिक्षक आवडले जे मुलांनी शिकणे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक शिकवण्याचा प्रयत्न करायचे. मी शाळेत आणि अजुनही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी पटकन नाही समजल्या तरी पुन्हा वाचल्यावर समजतात. एकदा डोक्यात बसल्यावर काही प्रॉब्लेम नाही. काही गोष्टी आपोपाप माझ्या लक्षात राहतात. उदा. सनावळ्या.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sat, 06/20/2009 - 19:10 नवीन
तुम्ही ती त्रुटी बरोबर पकडली आहे. ते विधान आणखी थोडे विस्तारावे असे मी लिहून घेतले आहे. असे लिहिण्यात हेतू इतकाच आहे की, अनावश्यक गोष्टीवरचा भर कमी करुन वेळेची योग्य आखणी करण्यासाठी योग्य ते वर्गात केले जावे. आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
व
विकास Sat, 06/20/2009 - 20:54 नवीन
लेखाची कल्पना आवडली. कदाचीत अशाप्रकारचा लेख एकापेक्षा अधिक भागात विभागून क्रमशः लिहीला असता (लेखमालेसारखा) तर त्यावर अधिक "फोकस" चर्चा होऊ शकेल असे वाटते. आपण ज्ञानाची जी व्याख्या करत आहात ती "ज्ञान" या शब्दाच्या आणि त्याच्या वापरासंदर्भात पटली नाही. इंग्रजीतील नॉलेज हा ज्ञानाच्या जवळ जाणारा शब्द आहे तर इन्फॉर्मेशन हा माहीतीच्या जवळ जाणारा शब्द आहे. तसेच सेन्सेस ला जवळ जाणारा नक्की शब्द माहीत नाही पण विविध (पंचे)इंद्रियांनी होणारी जाणिव असा काहीसा त्याचा अर्थ आहे. आपण दिलेली उदाहरणे ही माझ्यालेखी माहीतीत मोडतात. त्या माहीतीचा योग्य वेळेस योग्य वापर करण्याची (थोड्याफार प्रमाणात "इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग" करून) क्षमता आणि साधना असणे म्हणजे "ज्ञान" असे वाटते. उ.दा.: शेअरबाजारातील उदाहरण घेऊया. जर गेल्या वर्षाच्या आणि क्वार्टरच्या माहीतीवर आधारीत एखाद्या कंपनीचे भांडवल माहीत आहे, वार्षिक उलाढाल माहीत आहे, प्राईस टू अर्निंग माहीत आहे, प्रति शेअरची किंमत माहीत आहे, इत्यादी इत्यादी, पण त्याच संबंध सध्याच्या जागतिक घडामोडींशी, बाजारात बदलत असलेल्या मागणीशी त्याचा संबंध लावता आला नाही (उ.दा. जनरल मोटर्सला हायब्रिड गाड्या करायची अक्कल आलीच नाही , पण ती मोठी कंपनी आहे...), तर त्या माहीतीचा काय उपयोग? थोडक्यात "व्यावहारीक ज्ञान" हे संदर्भातील माहीती आणि स्थलकालानुरूप वापरणे याला म्हणावे लागते. नाहीतर ती नुसती पुस्तकी विद्या ठरू शकेल. अजून सुचल्यास पुढे परत लिहीन. पु.ले.शु. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sun, 06/21/2009 - 05:54 नवीन
लेखाची कल्पना आवडली. कदाचीत अशाप्रकारचा लेख एकापेक्षा अधिक भागात विभागून क्रमशः लिहीला असता (लेखमालेसारखा) तर त्यावर अधिक "फोकस" चर्चा होऊ शकेल असे वाटते. आपण ज्ञानाची जी व्याख्या करत आहात ती "ज्ञान" या शब्दाच्या आणि त्याच्या वापरासंदर्भात पटली नाही. आपल्या सुचनेनुसार, एक नवा धागा तयार केला आहे: व त्यात ह्या लेखातील व्याख्या माझा प्रतिसाद म्हणुन दिली आहे. ज्ञान म्हणजे काय ह्याबाबतीत मतभेद असणे स्वाभाविक आहे. ते मतभेद होऊन माझ्या लेखातील मुळ आशयाला धक्का लागू नये म्हणूनच मी माझ्या लेखापुरती ज्ञानाची व्याख्या केली. ती त्या लेखात वापरुन त्यातील संदेश पोहोचविण्याचे काम त्या व्याख्येने केले की तिचे काम संपते. असे अनेक टेक्निकल पेपर मध्ये केले जाते हे आपणास माहिती आहेच. तसे पाहता ज्ञान ह्या विषयावरच एक पुस्तक विद्यार्थ्यांना असायला हवे- कदाचित माध्यमिक शाळेतील. इंग्रजीतील नॉलेज हा ज्ञानाच्या जवळ जाणारा शब्द आहे तर इन्फॉर्मेशन हा माहीतीच्या जवळ जाणारा शब्द आहे. तसेच सेन्सेस ला जवळ जाणारा नक्की शब्द माहीत नाही पण विविध (पंचे)इंद्रियांनी होणारी जाणिव असा काहीसा त्याचा अर्थ आहे. त्यास ज्ञानेंद्रिये असे म्हणता येईल. ज्ञानेंद्रियांनी आपण विदा (डेटा) गोळा करतो. त्यावर क्रिया करतो (इंन्फॉर्मेशन), वगैरे. "know" ledge ह्या शब्दाची व्युत्पती फ़ार रंजक आहे. Information ह्या ही शब्दाची व्याख्या पाहिली की, ती डेटा पासुन विस्डम पर्यंत काहीही केलेली आहे. knowledge ह्या शब्दाचे समानर्थी शब्द शोधल्यास आणखी गोंधळ वाढतो. आपण दिलेली उदाहरणे ही माझ्यालेखी माहीतीत मोडतात. त्या माहीतीचा योग्य वेळेस योग्य वापर करण्याची (थोड्याफार प्रमाणात "इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग" करून) क्षमता आणि साधना असणे म्हणजे "ज्ञान" असे वाटते. वर आणि खाली दिलेले संदर्भ व प्रतिसाद पहावेत. ज्ञानपातळ्या हायरार्कीकल आहेत जसजशी आपण (डेटा) माहितीचा वापर, करत राहतो तसतशी आपल्यात सफाई, येत राहते हे आपण पाहतोच, त्यातून नवनिर्मिती करतो, मग हळूच आपण त्याला IP म्हणायला लागतो. उ.दा.: शेअरबाजारातील उदाहरण घेऊया....... वरील उदाहरण ज्ञानपातळीच्या "चिकित्सा-नवनिर्माण" चे आहे. ज्ञानाच्या व्याख्या अनेक आहेत, मला आंतर्जालावरुन ज्या देत्या आल्या त्या खालील प्रमाणे- [ ह्या लेखावरील चर्चा भरकटू नये अशी नम्र विनंती.] Sanskrit http://en.wiktionary.org/wiki/ज्ञान#Sanskrit Noun ज्ञान (jñāna) n: knowing, becoming acquainted with, knowledge, (esp.) the higher knowledge (derived from meditation on the one Universal Spirit) "knowledge about anything cognizance" (cf. ज्ञानतस् (jñānatas) and अज्ञान (ajñāna)) jñānād a-jñānād vā — knowingly or ignorantly conscience = ज्ञानेन्द्रिय (jñāne*ndriya) engaging in (+ genitive, e.g. सर्पिषस् (sarpiṣas), "in sacrifice with clarified butter") name of a shakti http://dictionary.reference.com/browse/knowledge: 1. acquaintance with facts, truths, or principles, as from study or investigation; general erudition: knowledge of many things. 2. familiarity or conversance, as with a particular subject or branch of learning: A knowledge of accounting was necessary for the job. 3. acquaintance or familiarity gained by sight, experience, or report: a knowledge of human nature. 4. the fact or state of knowing; the perception of fact or truth; clear and certain mental apprehension. 5. awareness, as of a fact or circumstance: He had knowledge of her good fortune. 6. something that is or may be known; information: He sought knowledge of her activities. 7. the body of truths or facts accumulated in the course of time. 8. the sum of what is known: Knowledge of the true situation is limited. http://en.wikipedia.org/wiki/Knowledge: Knowledge is defined by the Oxford English Dictionary as (i) expertise, and skills acquired by a person through experience or education; the theoretical or practical understanding of a subject, (ii) what is known in a particular field or in total; facts and information or (iii) awareness or familiarity gained by experience of a fact or situation. Philosophical debates in general start with Plato's formulation of knowledge as "justified true belief". There is however no single agreed definition of knowledge presently, nor any prospect of one, and there remain numerous competing theories. Synonyms: information, lore, wisdom, erudition, instruction, learning, scholarship, science, data, fact, intelligence, ability
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अजय भागवत Mon, 06/22/2009 - 05:27 नवीन
वरील संरचनेची अभिसंरचना खालील प्रकारे: १. माहिती चिकित्सा: वरील फ़्रेमवर्क वाचून, ज्याला वरील तक्त्यांचा वापर करायचा आहे, त्याने, ज्या माहितीची "चाचणी" करायची आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते- जे आपण नेहमीच करतो. ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: तुमच्या कडे धड्यातील असा सारांश आहे की तो विद्यार्थासाठी महत्वाचा आहे. ह्यास आपण ज्ञानांश म्हणू या. २. ज्ञान संपादन पातळी ठरवणे: त्यातील काय (तथ्ये, व्याख्या, संरचना, ई) चाचणायचं आहे हे ठरल्यानंतर, ते ज्ञानाच्या कोणत्या पातळीला चाचणावं लागणार आहे ह्याचा निर्णय घायचा. उदा. वरील लेखातील ज्ञानाची व्याख्या नुसती "आठवणे" पातळीपेक्षा "समजणे" पातळीवर चाचणे कमीत-कमी ध्येय (पहिल्या टप्प्याचे) असणे आवश्यक आहे. ते ज्ञान किती उंचीवर न्यायचे आहे हे त्या विषयाचा सर्व-साधारण आशय व विद्यार्थी ही माहिती का शिकत आहे हे पाहून ठरवावे. ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: ज्ञानांश कोणत्या पातळीला संपादला पाहिजे हे निश्चीत असणे. ३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर ठरवणे: ज्ञानांशाची चाचणी ज्यापातळीला चाचणायची आहे त्याचा कठीणस्तर ठरवणे. (म्हणजेच ऍबस्ट्रॅक्टनेस ठरवणे) उदा. वरील लेखातील "ज्ञानाची व्याख्या" हा ज्ञानांश त्यातील प्रत्येक घटकाला शिक्षण उद्दीष्ट मानुन चाचणला हवाय की, ज्ञानाची व्याख्या हीच शिक्षण उद्दीष्ट मानायची आहे?- हे समजल्यास प्रश्न बनवणे सोपे जाते. ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी (मराठी- कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स) एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वरील ३ पायऱ्या ह्यातील सर्वात महत्वाचा व वेळखाऊ भाग आहे. पण वरील भाग जर पारदर्शक असेल तरच पलिकडचे प्रश्न लख्ख दिसतील. तसेच, वरील भाग कितीही पारदर्शक असला तरी, प्रश्नविकास हे एक कौशल्य आहे व ज्ञानसंपादनाचा सगळा डोलारा ह्या पायावर उभा राहतो. ४. ज्ञानपातळीचा प्रश्नतक्ता: वरील लेखात दाखवल्याप्रमाणे, एकदा तुम्ही ज्ञान संपादन पातळी ठरवली की, योग्य तो तक्ता निवडणे शक्य होईल. व प्रश्न लिहिण्यास सुरुवात करता येईल. प्रश्न विकास करतांना आपल्या मनात दोन गोष्टी घोळत राहिल्या हव्यात- शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी वरच्या ज्ञानपातळीचा तक्ता निवडल्यास त्या खालील ज्ञानपातळीचासुद्धा वापरणे आवश्यक असते. म्हणजेच "समजणे" साठी "आठवणे" तक्ता हवाच. आता एक उदाहरण घेऊन आपण ही पायरी पुर्ण झाल्याची खूण प्रत्यक्षात पाहू. मी वरील लेखाचेच उदाहरण घेऊन त्यातील ज्ञानांश घेतला आहे. त्याला काही अंदाज लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे- १. ज्ञानांश: ज्ञानाची व्याख्या २. ज्ञान संपादन पातळी: समजणे ३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर: माध्यमिक (तुम्ही हा कठीणस्तरतक्ता तुमच्या गरजेनुसार/अनुभवानुसार बनवा). ह्यानुसार मी ज्ञानाची व्याख्याच शिक्षण उद्दीष्ट मानतोय. खालील स्तरावर मी व्याख्येतील प्रत्येक घटक एक वेगळे शिक्षण उद्दीष्ट मानले असते. ४. तक्ता: ज्ञान संपादन पातळी: आठवणे ज्ञानपातळी: माहिती आठवता येणे कोणते प्रश्न असावेत? कोणी, काय, कधी, कुठे, कसे, सांगा (उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा) प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत? क्रियापदे: सांग, यादी बनव, समजाव, नातं सांग, शोध, लिही, नाव दे (काय म्हणतात ते सांग), व्याख्या सांग उद्दीष्ट्य क्र. 01: ज्ञानाची व्याख्या प्रश्न: १. ज्ञानाची व्याख्या सांगा २. ज्ञानाचे स्वरुप किती घटकांनी ओळखता येते? ते घटक कोणते ह्याची यादी बनवा? ३. ज्ञानाची प्रचलित व्याख्या कोणी लिहिली? ४. पुढील वाक्य पूर्ण करा: "चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने .. ५. एखाद्या माहितीचे फायदे/तोटे, चांगल्या/वाईट बाजू सांगता येणे ह्या ज्ञानस्वरुपाला काय म्हणतात? ६. "जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो", ह्यातील आधीच्या ज्ञानस्वरुपाच्या पायऱ्या कोणत्या? ७. "एखादी गोष्ट समजली की, ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते", खरे की खोटे? ८. आठवणे आणि समजणे ह्यातील फरक सांगा ९. नवनिर्माण म्हणजे काय? वरील प्रत्येक प्रश्नाचे उद्दीष्ट ज्ञानाची व्याख्या आठवणे ह्या पातळीवर तपासली जाते. एव्हढ्या स्कॅफोल्डींगने पुढील प्रश्नतक्ता कसा तयार करता येईल हे समजेल. एकदाका वरील ज्ञानपातळीचे प्रश्न विचारुन झाले की, समजणे ज्ञानपातळीचे प्रश्न विकास करता येतील. त्याचे एकच उदाहरण देऊन मी हा प्रतिसाद संपवतो. १. ज्ञानाच्या आणखी कोणत्या व्याख्या प्रचलित आहेत?- त्यांची उदाहरणे देऊन थोडक्यात लिहा. २. ज्ञानाची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा. ३. ""शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत" ह्या परिच्छेदातील ज्ञानस्वरुपाच्या पातळ्या ओळखून दाखवा. जाताजाता, वरील पद्ध्तीने प्रश्न तयार करणे हे सांगणे हा ह्या लेखाचा एकमेव हेतू नसुन मी शेवटी लिहिल्यानुसार, "पाठ्यपुस्तके, ३ टप्पे आणि शिक्षक" हा संपुर्ण भागही तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येकालाच कल्पकतेने किंवा अननुभवी असण्यामुळे, प्रशिक्षीत नसल्यामुळे प्रश्नविकास करता येईलच असे नाही. ते एक कौशल्य आहे. ह्या लेखाचा वरील सर्व बाबींवर प्रकाश टाकणे हा हेतू होता. शिक्षणक्षेत्रातील अनेक व्यक्तिंना ही पद्धत आधीच माहिती असेल व ते असे कामही करत असतील अशी माझी खात्री आहे कारण मी हे मुलभूत किंवा नवे संशोधन आहे असे मानत नाही. अनेक ज्ञात गोष्टींपासुन एक पद्धत सुचविण्याचा फक्त हेतू आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा