कलादालन

कोकण दौरा

Primary tabs

कोकण दौरा मी आणि माझे काही मित्र कोकणात दौर्‍यावर गेलो होतो. त्या वेळी मी माझ्या कॅमेर्‍यातून टिपलेला कोकणाची काही छायाचित्रे मी इथे टाकत आहे... आपणही त्याचा आनंद घ्याल.... त्यावर प्रतिक्रिया दिल्यात तरी आनंद.... Image removed.Image removed." alt="" /> मार्लेश्वर मंदिर Image removed.Image removed." alt="" /> केशवसुत यांचे जन्मस्थान, मालगुंड Image removed.Image removed." alt="" /> राजापूरची गंगा Image removed.Image removed." alt="" /> कुणकेश्वर मंदिर Image removed.Image removed." alt="" /> कुणकेश्वर किनारा Image removed.Image removed." alt="" /> वेतोबा मंदिर, आरवली Image removed.Image removed." alt="" /> तेरेखोल किनारा
अमोल केळकर

फोटो मस्तच
कुणकेश्वर परिसरातील फोटो आहेत का ?

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सूर्य

सगळे फोटो मस्त आहेत. कोणत्या भागाचे आहेत ?

- शशांक

कपिल काळे

गोमुखातून पाणी पडतेय तो फोटो राजापूरच्या गंगेचा असावा.

मदनबाण

सर्वच फोटो छान आहेत...पण शेवटचा जास्त आवडला. :)
गोमुखातून पाणी पडतेय तो फोटो राजापूरच्या गंगेचा आहे का ?
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

अनंत छंदी

ख्यातनाम दिवंगत साहित्यिक जयवंत दळवी यांचे गाव सिंधुदुर्गातले वेंगुर्ले तालुक्यातील आरवली. त्या गावाचे हे फोटो आहेत. काही फोटोतून दिसणार्‍या श्री वेतोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारावरून हा कयास बांधला आहे. दळवींचे वडील या देवस्थानचे मानकरी होते. श्री वेतोबाचा उल्लेख दळवींच्या लेखनात काही ठिकाणी दिसून येतो.

तर्री

तर्री
जयवन्त दळ्वी यान्च्या धर्मानन्द आणि सारे प्रवसी घडीचे ह्या कादम्बरी मधे ह्या परिसराचे वर्नन फार प्रत्ययकारी .

त्या पूर्वी भाऊसाहेब खान्डेकराचे वास्तव्या आरवली / शिरोड्या मधे होते.

ह्या छायाचीत्रान्मुळे ह्या थोर लेखकन्च्या सहित्य क्रुतिच्या स्म्रुती जाग्या झाल्या.

अनंत छंदी

बिपिनराव
त्याला डबके नाही हो म्हणत; डोह, कोंड म्हणतात नदीच्या, समुद्राच्या पात्रात निर्माण झालेला आणि पाण्याने भरलेला खोल खड्डा म्हणजे कोंड. हा खास कोकणातला शब्द आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवरील चिं.त्र्य. खानोलकरांच्या कोंडुरा या कादंबरीमधून याची अधिक माहिती मिळेल.

चित्रा

सगळ्यात शेवटचा फोटो पाहून तेरेखोलच्या समोरील किनार्‍याची आठवण झाली.
सुंदर फोटो.

क्रान्ति

सगळे फोटो मस्त आहेत.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

क्रान्ति

सगळे फोटो मस्त आहेत.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

नानबा

बर्‍याच जणांनी फोटोंबद्दल अंदाज केले आहेत.... त्यांना सर्व फोटोंची माहिती देत आहे.... क्रमानुसार देत आहे...
१) मार्लेश्वर
२)केशवसुतांचे जन्मस्थळ, मालगुंड
३)राजापूरची गंगा
४)कुणकेश्वर मन्दिर
५)कुणकेश्वर किनारा
६)वेतोबा मंदिर, आरवली (प्रथमेश लघाटेचं गाव)
७)तेरेखोलचा किनारा

अनंत छंदी

प्रथमेश लघाटेचे गाव आरवली हे जरी खरे असले तरी ते सिंधुदुर्गातील आरवली नव्हे. प्रथमेशचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर अगोदर लागणारे आरवली आहे. आपण छायाचित्र दिले आहे ते जयवंत दळवींच्या मूळ गावाचे. सिंधुदुर्गातील आरवलीचे आहे.

शाहरुख

फोटो मधे दिसले नाही म्हणुन,

पुढच्या वेळी जाल तेंव्हा राजापूरमधले धुतपापेश्वराचे आणि राजापूर पासुन अंदाजे २५-३० किमी अंतरावरील आडिवरे येथील महाकालीचे मंदिर नक्की बघा.

धुतपापेश्वराचे देऊळ ७००-८०० वर्षे पुरातन आहे आणि तेथे झक्कास धबधबा आहे.
आय जस्ट लव्हड् दॅट टेंपल :-)