राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजरने I.R.R साठी लोन पास करु नये ह्याचे आश्चर्य वाटले. मुळात रिपोर्ट इतक्या बार्काइइन वाचला. की त्याला अजून काही हवे होते?
ह्या लेखामुळे दोन गोष्टी समोर आल्या.
१. राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजरला I.R.R चे महत्व माहित असते.
२. प्रभू मास्तर फकत शीइटी वाल्यांनाच मार्गदर्शन करत नाहीत.
हा लेख तुमच्या CET/मार्क्सीस्ट विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आवडला. :)
उद्योजकाचे पाणी थोडे वेगळेच असते. Master of So & So पेक्षा Jack of all trades ला इथे यशस्वी होण्याची संधी जास्त असती, आणि सगळ्यात महत्वाचा धडपड्या स्वभाव...शिवाय व्यवहारज्ञान हे कुठल्या डीग्रीचा मक्ता नाही, कित्येक तथाकथित engineers इतके मठ्ठ प्रश्न विचारतांना पहिलत की त्यांच्या तथाकथित शिक्षणाची लाज वाटते.
- मनिष
(खुद के साथ बातां - मास्तर हे आपल्याच टाईपचे 'येडं' दिसतय, एकदा भेटलंच पाहिजे! :) मास्तर फोन व्यनी करणार का प्लीज?)
ह्या समस्येचे मुळ खालील प्रमाणॅ:
त्यांना व्यवहार ज्ञान हे पालकांनी द्यायचे असते.
तसेच हे ज्ञान कंपनीतल्या मेंटर्सनी सुद्धा द्यायचे असते.
समस्या ही आहे की, बर्याच नव्या इंजीनीयर्सना मेंटर नको असतो, ते स्वतःला स्वयंभू समजतात.
तसेच बहुसंख्य वरिष्ठांना मेंटर व्हायचे म्हणजे काय ते कळत नाही. असे वरिष्ठ, आपल्या हाताखालच्या इंजीनीयरचे मेंटर न होता, त्याला ऑफीस बॉय प्रमाणे राबवायचा प्रयत्न करतात.
शेवटी तो इंजीनीयर मठ्ठ रहातो.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
पण मुळात "How things work & and why they qwork the way they work?" ही उत्सुकता असली तर शिकता येते/शिकवता येते. तीच नसली तर मग सगळाच आनंद आहे.
एक उदाहरण देतो - एक मेक. इंजिनिअर आहे, सॉफ्ट्वेअर मधे काम करतो, तो आणि मी घर बघत असतांना हॉल आणी किचन च्या बाउंड्रीज सेम होत्या, आमच्या हातात रूम डायमेंशन्स वगैरे..हॉलची लांबी १८ फुट, हा विचरतो आहे मग किचनची किती आहे? ही स्लीप ऑफ टंग नाही, किंवा एखाद-दुसरी स्लीप ऑफ माईंड पण नाही. फर्निचर बनवतांना ह्याला असेच विचित्र प्रश्न विचारतांना पाहिले आहे.
दुसरा एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर अहे, त्याचा BSNL फोन बंद होता ४ दिवस, जोरात हिसका बसून खाली पडल्याने बंद झाला होता आणि ४ दिवस फोन आणि ब्रॉडबँड बंद असल्याने वैतागला होता (तक्रार करून BSNL वाले आले नव्हते , किंवा आले असले तरी हा ऑफिसमधे असल्याने भेटले नसतील) मी सहज घरी गेलो आणि सॉकेट उघडले तर वायर निघालेली, जोडल्यावर फोन सुरू!
माझ्याच एक वर्ष सिनियर बॅचच्या एका इलेक्ट्रॉनिक्स वाल्याला मास्टर्स करतांना सुद्धा 'रीले' माहित नव्हता (सगळि वर्षे फर्स्ट क्लास), माझ्या प्रोजे़क्टच्या एका भागात मी रिले आणि स्टेपर मोटर वापरली होती, ते बघून त्याला फारच नवल वाटले होते.
नॉलेज जर वापरलेच नाही तर काय? विज्ञान/तंत्रज्ञान शिकून वैज्ञानिक दॄष्टीकोन येतोच असे नाही. Apply केले नाही तर त्या शिक्षणाला काय अर्थ?
अवांतर वाचनाचा अभाव!
एक मेकॅनिकल इं. असून, नवख्या इले. / इलेक्ट्रीनीक इंजीनीयर्सना रिले व रिले सर्कीट्स मला नेहमी समजवावी लागतात.
आमच्या अभ्यासक्रमा मध्ये रीले सर्कीट्सना एवढे गौण का मानतात?
असो, विषयांतर करूनही एक प्रश्न विचारावास वाटतो, खालील पुस्तक ज्याने मला रिले लॉजीक शिकवले, ते अनेक वर्षे शोधत आहे (नव्या इंजीनीयर्सना देण्यासाठी): Electrical Motor Controls & Circuits - Stephan Garstang & J. Devid Fuchs (Pub. Taraporwala & Sons). मुळचे अमेरिकन पुस्तक, आता भारतात प्रकाशीत होत नाही.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
Electrical Motor Controls & Circuits - Stephan Garstang & J. Devid Fuchs (Pub. Taraporwala & Sons) हे आता मिळत नाही. :(
तसेच रेस्निक आणि हॉलिडेचे फिजिक्सही मिळत नाही आजकाल. मी खूप शोधले मधे पण मिळतच नाही! :(
अवांतर वाचनापेक्षाही मला वाटते हा प्रॉब्लेम आहे तो hands-on अॅप्रोच च्या अभावाचा, किती सर्किटस बनवून बघतात मुलं? साधे टायमर सर्कीट १०० रू. च्या आत १-२ तासात बनवून होते, पण करते कोण? पुस्तकी ज्ञानापेक्षा (आणि मार्कांपेक्षा) किती व्यवहारातले प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या ज्ञानाने किंवा कल्पकतेने सोडवू शकता ते महत्वाचे; असे मला वाटते.
मास्तर, दगडाचा देव होतो, पण मातीच्या ढेकळाचा नाही. तरीही घर बनवताना याच मातीची गरज असते. तेव्हा मातीचं ढेकूळ आणि दगड यांना आपापलं महत्त्व समजलं नसेल तर ते सांगणं हेच महत्त्वाचं काम असतं!
काय बोललीस अदिती! जियो!!
विप्रबाबा झिंदाबाद!!
समुपदेशन झिंदाबाद!!!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
अदितीचा प्रतिसाद पाहून 'असेच म्हणतो' हेच डोक्यात आलं.
लेख आवडला.
(स्वगत -- प्रोजेक्ट रिपोर्ट वाचायला कॉमर्स करावं लागत नाही हे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचं मानावं यश की अपयश? !!)
>>स्वगत -- प्रोजेक्ट रिपोर्ट वाचायला कॉमर्स करावं लागत नाही हे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचं मानावं यश की अपयश? !!
प्रोजेक्ट रिपोर्ट वाचायला कॉमर्स करावं लागलं नसेल तर ते वाचणार्या बरोबर रिपोर्ट तयार करणार्याचे यश..
कॉमर्स करूनही रिपोर्ट वाचता येत नसेल तर ते कॉमर्स करणार्याचे अपयश आणि त्याहून मोठे त्याला पदवी देणार्याचे अपयश..
ग्रेट!
कोण म्हणतं सर फक्त अभ्यासात हुष्षार असलेल्या मुलांनाच मार्गदर्शन करतात, दुनियेच्या शाळेतल्या हुषार मुलांनाही केलेली मदत आता त्यांच्या लेखामुळे समोर येतीये.
अदितीबाईंचा प्रतिसाद आवडला, त्या आम्हाला असं लिहिणं बोलणं शिकवायला तयार आहेत काय?
रेवती
मस्त अनुभव! सरांचे असे अनुभव वाचूनसुद्धा मला समृद्ध झाल्यासारखं वाटतंय! अजून येऊ द्या सर.
अदिती, तुझा प्रतिसाद लाखात एक! तू कमाल आहेस!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
सर, I.R.R. DSR काय आहे ते सांगा ना. लाँग फॉर्म दिला तरी चालेल.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
मास्तर, वाचून खूप आनंद वाटला रे.. :)
दहावी-बारावीच्या पास पोरांची फालतू कवतिकं न ऐकवता असेच काही अनुभव सांगत जावा. मला वाचायला आवडेल..
सुकड्यासोबत प्यायला बसू एकवार! मजा येईल... :)
आपला,
(रांडांचे विमे उतरवलेला) तात्या.
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी