हाहाहा !!@!
काय मास्तर .. रोज सकाळी एक ऑम्लेट (पक्षी : लेख ) टाकताय नाष्ट्याला (पक्षी : वाचायला )
मजा आली !!! होप क्वालिटी ठेवाल लेखाची !!
कारण बोर व्हायला लागलं की आम्ही आहोतच हो :)
(मास्तरचा अजुन एक विद्यार्थी) टारझन
काय मास्तर .. रोज सकाळी एक ऑम्लेट (पक्षी : लेख ) टाकताय नाष्ट्याला (पक्षी : वाचायला )
चांगल आहे मास्तर.... सकाळी आल्यावर तुमचा लेख वाचायला आवडते...
बाकी बर्ड फ्लु सरकारी भुमिके बद्दल लिहाच.
==निखिल
रंजक आहे. अर्थात काही निर्णय पथ्यावर न पडणे, काही मोठे धोके /रिस्क स्वीकारणे याचा (पक्षी : स्व:ता सुकड्या यांच्या निर्णयाचा)देखील मोठा हात आहे. लवकरात लवकर सुकड्या यांचा प्रवास पुन्हा राजा बनण्याकडे होवो ही सदिच्छा!
>>बर्ड फ्लू बद्दलच्या गैरसमजाला सरकार आळा न घालु शकल्याने हजारो मराठी शेतकरी भिकारी झाले.
म्हणजे नक्की काय झाले? परदेशात सर्रास कत्तली केल्या जातात. शेतकर्याला भरपाई मिळते (अर्थात भरपाईबद्दल कधीच कोणी खुश नसते) मराठी शेतकरी भिकारी झाले म्हणजे नक्की काय झाले?
बाकी काटकोन, पत्र काय क्रिप्टीक म्हणे?
इमोशनल इंटेंसिटी की मोशनल इंटेंसिटी ?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
उत्तम.
हेच आणि असेच अपेक्षित.
अपेक्षेवर विरजण न पडावे.
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
आजही कंट्रोल्ड फार्मिंगवर मी केलेला रिसर्च कुणीही फारसा पुढे नेलेला नाही
अरेरे!
सुमारे २५ लाख बुडवुन हा एक्स्पोर्ट युनीट चा मालक कंपनी बंद करुन चालता झाला. आज राजकारणात आहे.
अर्रे वा! सर, आजकाल राजकारण हाच एक धंदा तेजीत असताना ते एक्सपोर्ट युनिट कोण चालवत बसणार. दहा वर्षं आधी भेटायचा योग असता तर आमचंही युनिट बंद पडलं नसतं.
बर्ड फ्लू बद्दलच्या गैरसमजाला सरकार आळा न घालु शकल्याने हजारो मराठी शेतकरी भिकारी झाले.
ह्याचं कारण काय? सरकारनं पुरेशी माहीती पुरवली नव्हती? मराठी लोक धंदा करू शकत नसल्याबद्दल जी ओरड चालते ती निष्कारण आहे काय? का त्यांना माहिती मिळू न देण्यातच काही फायदा आहे, अर्थात राजकारण्यांचा? जर आपल्याच पायाशी इतकं जळत असताना बाकीच्या देशांमधे काय चालतं यावरून दुसर्यांना नावं ठेवण्यापेक्षा आधी स्वत:कडं डोळे उघडे ठेवून न बघण्याची वृत्ती या सगळ्याला काही अंशी तरी कारणीभूत आहे काय?
सुमारे दहा लाखाच्या पुरस्कारापासुन मी वंचीत झालो. फक्त एकच उन्हाळा हवा होता मला माझा रिसर्च पुर्ण करायला.
हे वाक्य वाचून भयंकर वाईट वाटलय. आधी केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत हे माहितीये पण त्यावेळेस यातना देऊन जातात अश्या गोष्टी. तुम्हाला त्याचं दु:ख नाही म्हणता........तुम्ही ग्रेट आहात.
रेवती
आजही कंट्रोल्ड फार्मिंगवर मी केलेला रिसर्च कुणीही फारसा पुढे नेलेला नाही.
संशोधनाची अशी परवड बघून मन उद्विग्न होतं ~X( (अब्दुल कलाम ह्यांच्या 'अग्निपंख' मधे त्यांच्या रॉकेटच्या पहिल्या संशोधनाचे मॉडेल असेच लालफितीत धूळ खात टाकल्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्याची आठवण झाली :S )
सुकड्याला २५ लाखाच्या कर्जातून बाहेर काढण्याची तुमची करामत थक्क करणारी आहे. मनाचा कणखरपणा आणि कठिण अवस्थेतही वाट काढण्याचं संतुलन वाखाणण्याजोगं. अशा किती बेरजा करुन ठेवल्या आहेत मास्तर? चोपडीत आता टोटल मांडायला सुद्धा जागा नसेल!!
(+)चतुरंग
मास्तर, तुमच्या या काटकोनी लेखातलं काय *टसुद्धा कळलं नाही....
तुम्ही कायतरी क्रिप्टीक पत्र लिहून कुणा एकाला बरबाद होण्यापासून वाचवलंत इतकंच समजल!!!!
आणि आमच्यासाठी तेव्हढंसुद्धा पुरेसं आहे!!
अभिनंदन!!!!!
मास्तर, तुमच्या या काटकोनी लेखातलं काय *टसुद्धा कळलं नाही....
तुम्ही कायतरी क्रिप्टीक पत्र लिहून कुणा एकाला बरबाद होण्यापासून वाचवलंत इतकंच समजल!!!!
हेच म्हणतो.
अभिनंदन मास्तरांचे आणी सुकड्याचे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
शेती हा तसाही एक विचित्र उद्योग आहे.
उत्तम उत्पन्न काढायचे आणि उत्पन्न चांगले झाले म्हणून भाव पडणारा एकमेव उद्योग
केलेली मेहनत आणि गुंतवणूक जर औद्योगीक दराने मोजली तर उसवाला शेतकरी हाही तोट्यातच असतो.
बर्डफ्लु मुळे जेंव्हा कोंबड्यांची पिले रोडरोलरखाली चिरडून मारावी लागली तेंव्हा ते दु:ख पैशात मोजणे शक्य नव्हते.
संपूर्ण गावातील पोल्ट्र्या एकाएकी दूषीत होतात आणि अचानक सगळ्या भागातल्या मेलेल्या कोंबड्या जाळून पोल्ट्र्या सहासहा महिने बन्द पडीक ठेवाव्या लागतात तो हिशेब कोणीच गृहीत नाही
अंडी नेणारा आणि खाद्य देणारा एजन्ट जो हिशेब करतो तो सरळ समजणारा जागतीक बॅन्केचा अध्यक्षच होउ शकतो
प्रतिक्रिया