Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा

स
सुधीर काळे यांनी
Tue, 06/23/2009 - 18:00  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
4174 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

आ
आकाशस्थ Tue, 06/23/2009 - 21:23 नवीन
आपल्या लेखातून अल् जझीरा चॅनेलवर प्रसारित झालेलं वृत्तं समजलं. परंतु, (असेही अल्-कायदाचे अफगाणिस्तानमधील नेते अबुल-याझीद यांनी रविवारी सांगितले. अफगानिस्तानला येण्यापूर्वी अबुल-याझीद अल्-कायदाचे मुख्य आर्थिक अधिकारी होते आणि त्यांनी ९/११ च्या हल्ल्यासाठीही पैसा पुरवला होता. १९८०च्या सुरुवातीला ते अल्-जवाहिरीबरोबर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादत यांच्या हत्येमध्ये हात असल्याच्या आरोपावरून तुरुंगात होते) लेख वाचताना एक गोष्टं खूप खटकली. अनावधानाने असेन कदाचित, पण "अल् कायदा" या कुपप्रसिद्ध संघटनेच्या या लेखात उल्लेखित "म्होरक्या"विषयी तुम्हाला नितांत आदर आहे असा वाचकांचा ग्रह होऊ शकतो... बाकी लेख उत्तमच.....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/24/2009 - 03:49 नवीन
"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा उत्तम होईल! अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा दुश्मन आहे. अण्वस्त्रांमुळे तो देश नामशेष झाला तर फारच छान होईल. फक्त नामशेष होण्याआधी आमचे सर्व भारतीय बांधव सुखरूप भारतात परतले पाहिजेत..! :) आपला, (अमेरिकाद्वेष्टा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 06/24/2009 - 04:18 नवीन
"आकाशस्थ" नांव घेतले असले तरी आपले पाय जमीनीवर आहेत याचा आनंद झाला व सूक्ष्म निरीक्षणशक्तीचे कौतुकही वाटले. तुम्ही म्हणालात तसे नाहीं. पहिल्या 'ड्राफ्ट' मध्ये मी याझीदचा उल्लेख "अरे-जारे"तच केला होत. पण नंतर हा 'ड्राफ्ट' वाचताना माझ्या असे लक्षात आले कीं मी ग्रिफिन यांचा उल्लेख, अनवधानाने कां होई ना पण, "अहो-जाहो"त केला होता. एकाला गोरा म्हणून अहो-जाहो करायचे व दुसर्‍याला तो अरब आहे म्हणून अरे-जारे करायचे ही वागणूक माझी मलाच वर्णद्वेषी अशी वाटून खटकली म्हणून मी संबोधन बदलले. याझीदी धर्मवेडा आहे व नजीकच्या भविष्यकाळात तो आपल्या देशाला धोका होऊ शकतो म्हणून हा मनुष्य आपल्याला (मलाही) आवडत नाहीं. पण त्यांच्या संघटनेने आज बलाढ्य पकिस्तानी फौज व सुपरपॉवर अमेरिका व तिचे शस्त्रबळ व मनुष्यबळ यांच्या नाकातले पाणी पळविले आहे. म्हणून आपण या व्यक्तीला अरे-जारे केल्याने त्याच्या संघटनेचा कस कमी होत नाहीं. उलट उद्या आपली गाठ याच संघटनेबरोबर आहे व आपलेही दोन हात या संघटनेशी होणार आहेत असा दूरदर्शी विचार करून आपण शत्रूला नीट समजून घेतले पाहिजे. त्याला शिव्या दिल्याने ना आपली ताकत वाढते ना त्या संघटनेची कमी होते. येत्या पाच-ते दहा वर्षांत हिदुस्तानाला या संघटनेला चेचून काढायचे आहे हे लक्षात ठेवणे हेच फक्त महत्वाचे! सुधीर काळे (अनुवादाक)
  • Log in or register to post comments
आ
आकाशस्थ गुरुवार, 06/25/2009 - 03:41 नवीन
माझ्या "घेतलेल्या नावाचं" मार्मिक पण उपरोधिक विश्लेषण आणि यानंतरच्या प्रतिसादा मधील "साहेब" हे विशेषनाम अफलातून आहे. धन्यवाद. " एकाला गोरा म्हणून अहो-जाहो करायचे व दुसर्‍याला तो अरब आहे म्हणून अरे-जारे करायचे ही वागणूक माझी मलाच वर्णद्वेषी अशी वाटून खटकली म्हणून मी संबोधन बदलले." हा आपला युक्तिवाद सुद्धा अफलातून आहे !! आपण आपला "पहिला ड्राफ्ट" येथे प्रकाशित केला असता तर सुक्ष्मातिसूक्ष्म निरिक्षणांतूनही हा "वर्णभेद" कदाचित उलगडला नसता! अखंड मानवजातीला काळिमा फासणारी कृत्ये करणारी ही संघटना आणि त्यांचे म्होरके आदरार्थी संबोधनास निश्चितच पात्र नाहीत. त्यांना एकेरी संबोधल्याने त्यांच्या ताकदीला कमी लेखलं जातं असंही नाही. परंतु, कुकर्म करणारी व्यक्ति वा संघटना कितीही सामर्थ्यवान असली तरीही ती समाज व मानवजातीच्या आदरास यत्किंचीतही पात्र नसते, असा एक मार्मिक इशारा यातून दिला जातो. किंबहुना लेखनातील हा एक संकेतच आहे. कुठलेही "दर्जेदार" मराठी वृत्तपत्रं आपण चाळलंत तर बहुतांश मोठ मोठे पत्रकार आणि संरक्षण सल्लागार हा संकेत पाळताना दिसतात. आपल्या लेखात तो दिसला नाही ही आपल्या लेखनातील एक "तांत्रिक कमी" मी दाखवून दिली. आपला अनुवादात्मक लेख माहितीपूर्ण होता असाच माझा अंतिम निष्कर्ष होता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Wed, 06/24/2009 - 04:35 नवीन
तात्यासाहेब व कर्कसाहेब, (खरं तर या न्यायाने आकाशस्थ यांना पण आकाशस्थसाहेब म्हणायला हवे होते, क्षमस्व) २०१४ पर्यंत भारतीय फौजा तालीबानच्या फौजांबरोबर भिडणार यात मला तरी शंका वाटत नाहीं. तेंव्हा शत्रूचा शत्रू तो आपला (तात्पुरता कां होई ना) मित्र हे लक्षात ठेवलेले बरे. येत्या पाच-दहा वर्षांत सध्याच्या मुस्लिम जगात खूप उलथा-पालथ होणार आहे. त्यावर लिहिलेला माझा लेख उपलब्ध आहे पण लिप्यंतरातील अडचणी पहाता मी तो इथे देऊ शकत नाहीं. वैयक्तिक ई-मेल पत्त्यांवर पाठवू शकतो. येत्या कांहीं वर्षांत पाकिस्तान हा देश कराची व रावळपिंडी यांना जोडणारी गाझासारखी पट्टी रहाणार आहे, बलिचिस्तान व कुर्डिस्तान स्वतंत्र देश होणार आहेत, अफगाणिस्तान दक्षिणेला व इराण पूर्वेला सरकणार आहे, सौदी अरेबिया असणार नाहींय्, त्या ऐवजी मक्का-मदीना ही शहरे "पवित्र नगरी-होली लॅंड्स्" म्हणुन असतील असे खूप होरे आहेत. पाकिस्तान ही एक गाझासदृष पट्टी राहिली तर तालीबानी आपल्या नको तितके जवळ येणार आहेत व काश्मीरसारखी खुसपटे काढून आपल्याला त्रास देणार आहेत. अशा वेळी अमेरिका व इतर पाश्चात्य राष्ट्रेच फक्त (त्यांच्या स्वत:च्या फायद्यासाठी का होई ना) आपल्या बाजूने उभी राहातील. तरी इकडे दुरदर्शीपणाने पहाणे अवश्य आहे. सुधीर काळे (अनुवादाक)
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 06/24/2009 - 04:36 नवीन
तात्यासाहेब, हा तालीबानवरचा अनुवादात्मक लेखही मिपावरच फक्त प्रसिद्ध झाला आहे, इतरत्र नाही! सुधीर काळे
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे गुरुवार, 06/25/2009 - 04:33 नवीन
पाकिस्तानला अण्वस्त्रे पुरविण्याचे "पाप" रेगन, बुश-१ व बुश-२ या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत घडले अशी माहिती नुकतीच वाचण्यात आली. आधीची जी कल्पना होती कीं हे पाप चीनने केले ते खरे नाहीं असे दिसते. यावर माझे संशोधन सुरू आहे. पाहू हे संशोधन मला कुठे घेऊन जाते ते! त्या दृष्टीने तालीबानने ही अस्त्रे उद्या जर अमेरिकेवरच उलट डागली तर एका तर्‍हेने "चांगली अद्दल घडली" किंवा "poetic justice" असे म्हणता येईल!
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 06/25/2009 - 13:56 नवीन
तालिबान्यांच्या हाती अण्वस्त्रे पडली तर सर्वात मोठा धोका भारताला आहे. सॉफ्ट अ‍ॅन्ड टेक्टिकली/लॉजिस्टिकली सोपे टारगेट म्हणून पहिला हल्ला भारतावर होण्याचीच शक्यता अधिक.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/25/2009 - 14:14 नवीन
<< मुलाखत कांहीं CNN सारख्या उतरती कळा लागलेल्या >> सत्य आहे. <<<अबुल-याझीद यांच्या भाष्यावर बोलताना अल् कायदाबद्दलचे विशेषज्ञ मायकेल ग्रिफिन अल् जझीराला म्हणाले कीं त्यांची (याझीद यांची) विधाने म्हणजे वल्गना व उग्र प्रतिकार यांचे "गमतीदार मिश्रण" आहे पण ती विधाने अल् कायदाच्या कांहीं त्रुटींवरही प्रकाश पाडतात.>>> मायकेल ग्रिफिन ह्या॑च्याशी सहमत... अमेरिकेनेच तालिबान सारखा भस्मासुर बनविला आता पाकिस्तानला पोसताहेत....अमेरिकेची जगाची "पोलीसी" केल्याने त्या॑च्याच अ॑गलट आली आहे..येत्या पाच्-दहा वर्षात भारताला ह्या॑च्या(अमेरिका+पाकिस्तान्+तालिबान+अल-कायदा आणी बा॑गलादेश पासुन तर धोका आहेच) लढा द्यावा लागेल....ईथे दोन फाश्या अजुन "पेन्डी॑ग" आहेत्..तो गोळ्या घालणारा फिदी-फिदी हसतो काय...मृत माणसे बघून रडतो काय्..असो..विषया॑तर नको.... सुहास
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा