डान्राव, अतिशय सुंदर लेख, कथन, वर्णन आणि माफक चिंतनही! खरंच आवडला दुसरा भाग. त्यासाठी केलेली २४ (+२४) तासांची प्रतीक्षाही सुफळ संपूर्ण.
सांगीतलं नाही तर कणेकरांच्या नावावर हा लेख सहज खपुन जाईल!
डान्रावांचा फारच कमी वेळेला एवढा अपमान झाला असेल. त्याचा साफ निषेध.
राहत फतेह अली खानांचं हे गाणं, "मै जहां रहूं..." मलाही आवडतं. ही घ्या त्याची यू ट्यूब लिंक.
चेहर्यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे.
धन्य .....कै च्या कै रे डोन्या.
बाकी सचिन शी सहमत
सहमत हा शब्द "हस मत" असाही होउ शकतो.
मानल बुवा डानराव तुम्हाला तुमच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावीशी वाटते बसल्या जागेवर सर्वांचे मस्त निरीक्षण केलेत =D>
*************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
>>अवांतर -पहिल्यांदा डान्रावांची 'नजर' चांगली असल्याचे सर्टिफिकेट कुणी दिल्याचे पाहिले.
नेहमीप्रमाणेच वैयक्तिक चिखलफेक करणारी प्रतिक्रिया. मिपावर आलेल्या "चान्स पे डान्स्"च्या लोंढ्यात हात धूऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न.
=))
असो, अवलियासाहेबांशी सहमत आहे ... :)
अवांतर :
खरं तर हा भाग-२ अत्यंत गडबडीत व म्हणावी तशी बैठक न जमवता लिहला आहे, काल दिलेल्या २४ तासांच्या डेडलाईनचे पालन काही वैयक्तीक अडचणींमुळे करणे जमले नव्हते, त्याचीच मनाला टोचणी लागुन राहिली होती ...
अर्थातच हा भाग माझ्या मनासारखा उतरला नाही, आत्ता पुन्हा वाचुन पाहिल्यावर तसे कंफर्म झाले ...
तुर्तास जरा गडबडीतच आहे, थोडा वेळ मिळाला की अजुन थोड्या सुधारणा करेन अशी ग्वाही देतो. कंटेन्ट आणि शैली अजुन थोडी चाळायची गरज आहे असे राहुन राहुन वाटते आहे.
असो, वेळ मिळाल्यावर नक्कीच करेन ...
तोवर हा आमचा लंगडा लेख आवडुन घेतलेल्या सर्व मायबाप मिपाकरांचे आभार, तुमच्या कौतुकामुळेच लिहण्याचे प्रोत्साहन मिळले हे नमुद करतो.
अजुन थोडी सुधारणा करुन अजुन तुमच्या अपेक्षा पुर्ण करणारा लेख देईल असे आश्वासन देतो ( डेडलाईनचे आता नाव नका कढु, आधीच पुरता बदनाम आहे ;) )
आभारी आहे ..!!!
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
>>उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे
हम्म. सामन्याचा प्रभाव दिसतो आहे.. :) जसा जसा लेख वाचत जाईन पुढे तसा तसा प्रतिक्रिया देईन.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
कंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही.
गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्या, गाफील असणार्या किंवा कमालीचा सावध असणार्या, लहान मुलाची निरागसता घेऊन वारणार्या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मताल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...
जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे
" कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है,
पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...."
बासच ...!!!!
मस्त लेख! मलाही असेच निरीक्षण करायची आवड आहे, आणि राहत फतेह अली खानचे ते गाणे म्हणजे तर..........अशक्य आहे! :)
डॉन्या, वरचेवर/रेग्युलर लिहीत जा रे जरा!
श्रीमान डानचंद्ररावजीसाहेब,
अतिशय आवडलेलं आहे लिखाण. मजा आली वाचताना. काही विशिष्ट कथासूत्र नसताना देखिल ओघवती भाषा, अचाट निरिक्षणशक्ती, ती लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती आणि गंमतिदारपणे मांडण्याची हातोटी यामुळे वाचताना मजा आली. यातली बरीचशी निरिक्षणे आमच्या स्वत:च्या निरिक्षणांशी तंतोतंत जुळतात हे पाहून "ग्रेट मेन थिंक अलाइक" या वचनाची सत्यता पटली. (काही लोक कुत्सितपणे हसतील या वाक्यावर, पण एकदा ग्रेट मेन्सनी अलाइक थिंक केलं तर मग बाकीच्यांची तमा कशाला बाळगा? हो की नाही? असो. आम्ही पण तुमच्यासारखेच विषयांतरं करायला लागलो.) तर मुद्दा असा की लेखन आवडलेलं आहे. जास्तीत जास्त लिखाण करत जा.
बिपिन कार्यकर्ते
तुम्ही डॉन आहात!!!!
गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्या, गाफील असणार्या किंवा कमालीचा सावध असणार्या, लहान मुलाची निरागसता घेऊन वारणार्या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मताल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...
एकदम आवडले बॉस.
वा! दुसर्या भागाची वाट पाहतच होतो..
लेखनशैली आणि निरिक्षणशक्ती दोन्हीला मनापासून दाद! :)
मस्त उतरला आहे लेख.. आता पुढला लेख येऊ दे.. क्रमशः अर्थातच चालेल
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
डान्रावांचा फारच कमी वेळेला एवढा अपमान झाला असेल. त्याचा साफ निषेध.
हे मात्र फारच झालं! कणेकर हे अत्यंत छान लिहितात. डान्याच्या लिखाणावर त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो आहे. हवे तर विक्षिप्त ताई, तुम्ही या साठी मिपावर मतदान घेउ शकता!!
हे तुमचं मत असेल, माझं नाही! आणि नाही जुळली आपली मतं तर एवढं काय त्याचं?
पण उगाच काही झालं की उठल्याबसल्या मिपाकर जनतेकडे कौल मागायची पद्धत रूढ होऊ पहात आहे, झाली आहे त्याचाही निषेध! उगाच काहीही काय लोकांना विचारत सुटायचं? कधीतरी स्वतःचा स्वतः विचार करून स्वतःची स्वतः मतं बनवायला काहीही प्रत्यवाय नसावा.
ज्या लोकांना मी धड ओळखतही नाही त्या लोकांना "तुमचं डॉन्याच्या लिखाणाबद्दल काय मत आहे?" हा प्रश्न मी का विचारू?
आयला, ए अरे ओय, काय चाल्लंय रे? गपा की जरा.
ज्याला जे आवडतं त्यानं ते वाचावं, पहावं, करावं, खावं, प्यावं....वाट्टेल ते!
का आपापली मतं एकदुसर्याशी पडताळायला जाताय?
अवांतरः कणेकर हे डानरावांचे आवडते लेखक! कणेकरांनी लिहिलेलं जवळपास सगळं साहित्य डानराव बाळगुन आहेत असं आम्ही जाणतो :) अगदी, त्यांच्या लेखनातले अर्धविराम, स्वल्पविरामदेखील डानरावांना पाठ आहेत म्हणलं तरी चालेल ;)
अतिअवांतरः डान्या भैताडा, भारी निरिक्षण चाल्लंय हो! आता एखाद्यावेळी एनिग्मामधलंही निरिक्षण येऊ दे ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
:)
तुझ्या गोट्यान्च(डोळे) निरिक्षण लै झक्कास वट्ल बग........ B)
आनि त्यात्ल्या त्यात ते ............
लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की ............ =)) पुढची तयारि जोर्दार चललि आहे वाट्त... :))
सहि मामु तुच आहेस ;)
बाकि लेख आगदि तुफान झालाय बग........:)
तुझ्या गोट्यान्च (डोळे)विशेश कौतुक.......... ;) =D>
दोन्ही भाग सलग वाचले....
हुच्च लिहीलयेस.......;-)
असेच लिहीत रहा बंगलोरी बाबा :-D
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
हा लेख जास्त आवडला. त्यातल्या त्यात आजीपाजोबा आणि मंडळी!
त्यांना घेऊन येणार्या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही.
खूपच खास वर्णन सुखी कुटुंबाचं!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
मस्त जमलाय लेख.. तुझ्याबरोबर एक पिझ्झा हटची सैर करून आलो :)
>> आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते
च्यायला .. पिझ्झा खायची ही कुठली 'ऑथेंटिक' पध्दत रूढ झालीय तिथे? पिझ्झा स्लाइस हाताने खाल्याशिवाय मजा नाही येत राव :)
तुझं निरीक्षण चांगलं आहे. लिपस्टिक वगैरे सत्राशे साठ भानगडी सांभाळणं बायकांना कसं जमतं ते त्यांचं त्यांनाच माहिती !
आजोबांपासून ते नातवापर्यंत कुटुंब एकत्र पिझ्झा हटमधे पाहून नो वंडर मस्त वाटलं असेल.
(आता अनायसे धागा वर आला आहेच तर ) प्रतिसाद देणार्या, न देणार्या, कौतुक करणार्या व आपलेपणाने ४ दुरुस्त्या सुचवणार्या सर्व वाचकांचे आभार मानतो ...!!!
धन्यवाद मित्रांनो ...!!!
------
(आनंदी) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
पिझ्झा मस्त झालाय.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
आजकाल बर्याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.
डानरावांचं अजूनही बिनसलेलंच दिसतंय.. बर्याच दिवसांत त्यांचे दमदार लेख पहायला मिळाले नाहीत.
अर्थात त्यांना विचारलं तर ते मी सध्या वाचनमात्र आहेत असे सांगून बोळवण करतात.
ठीक आहे.
वाट पाहू.
मिटलेच डोळे तर डान्राव आणि कावळा पाहून घेतील काय करायचं ते... आपल्याला काय !
प्रतिक्रिया