व्हीलनचे नाव "देशमुख " आहे. आणि तो रानरेड्यासारखा जाडजूड आहे. हे पटत नाही
आम्हाला माहीत असलेला देशमुख एकदम सूपर लाइट वेट आहे. त्याशिवाय तो काही व्हीलन नाहिय्ये.
वेताळराव, धन्स....
अनुला आरशात कोण दिसलं याला काहीतरी पार्श्वभूमी हवी म्हणुन पहिले संक्षिप्त कथानक. वाचकांना थोडेसे गोंधळात पाडण्यासाठी फक्त त्याचा वापर केला आहे. नक्की भुत कुठले याचा संभ्रम उडावा म्हणुन आणि शेवटपर्यंत रहस्य कायम राहावे म्हणुन हा खटाटोप. ;-)
होशिंगकर फॅमिली जिवंतच आहे. फक्त अनुला त्यांचे अस्तित्व जाणवते. कारण अनु किंवा अभि ही देखील भुते नाहीतच. जीवन आणि मृत्युच्या सीमारेषेवर अडकलेले दोन अशरीरी आत्मे किंवा फारतर त्यांची अपुर्ण राहीलेली इच्छाशरीरे म्हणु हवे तर.
पण आता मनापासुन वाटतेय की होशिंगकर कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा. पुढेमागे त्यांची कथा देखील येइलच. तोपर्यंत वाट बघा. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
होशिंगकर फॅमिली जिवंतच आहे. फक्त अनुला त्यांचे अस्तित्व जाणवते. कारण अनु किंवा अभि ही देखील भुते नाहीतच. जीवन आणि मृत्युच्या सीमारेषेवर अडकलेले दोन अशरीरी आत्मे किंवा फारतर त्यांची अपुर्ण राहीलेली इच्छाशरीरे म्हणु हवे तर.
हे काही समजले नाही.त्याना मृत कसे काय म्हणु शकत नाही? त्या पोलिसाला तर गाडीत दोन मृतदेह आढळतात. ते कोणाचे असतात?होंशिगकर कुटुंबियाचे प्रतिबिंब अनुला आरश्यात दिसते. म्हणजे ते अगोदर ते नाहीसे झाले आहेत ना? का अनुच्या भुताला त्याचे मानवी अस्तित्व तिथे जाणवते?जरा स्पष्टिकरण दिले तर उत्तम होईल.
वेताळ
पोलिस म्हणतात ऑन द स्पॉट खलास झाले आहेत म्हणजे दोघही ठार झाले आहेत.नंतरचे त्यांचे संवाद म्हणजे त्यांचे आत्मे बोलत आहेत्.बरोबर?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
सत्यासत्य देवच जाणे. पण हिंदु मायथॉलॉजीनुसार मृत्युनंतर लगेच आत्मा मुक्त होत नाही किंवा त्याचे पिशाच्चातही रुपांतर होत नाही. (milky way theory) काही काळ ते इच्छाशरीरांच्या रुपाने जीवनमृत्युच्या सीमारेषेवर घुटमळत राहते आणि आपल्या अतृप्त इच्छा पुर्ण करुन घेण्याचा प्रयत्न करते. त्यात त्याला यश आले तर मुक्ती मिळते अन्यथा पिशाच्चात रुपांतर होते.
इथे पोलीसांना प्रेते सापडतात ती दुसर्या दिवशी. त्यापुर्वीच म्हणजे आदल्या रात्री त्या दोघांनी आपली अतृप्त इच्छा पुर्ण करुन घेतलेली आहे. लक्षात घ्या...मृत्यु तर झालाच आहे...पण इच्छाशरीरांच्या माध्यमातुन ते अजुनही आहेत. इच्छा पुर्ण झाली आणि त्यांना मुक्ती मिळाली की त्यांच्या देहातली धुगधुगी पुर्णपणे संपते. जी तेव्हाच संपली असेल जेव्हा ती दोघे ही विरघळून जातात. चुभुदेघे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
मृत्यु नंतरचे जीवन
ह्या नावाचे मराठीत कोणाचे तरी पुस्तक वाचलेचे मला स्मरते.त्यात ह्या गोष्टीचा बराच उहापोह केला आहे. परंतु माणुस मरण पावल्या नंतर त्याचा आत्मा ३ दिवस पृथ्वीतलावर राहतो असा समज आहे २४ तास नव्हे.परत त्याच्या शरिरात धुगधुगी असताना इच्छापुर्ती त्याचे आत्मे करुन घेतात, त्याचा अर्थ अजुन ते जिवंत आहेत हाच होतो. आत्मा बाहेर पडला की त्याचे शरीर मॄत होते .मग शरीर गरम असताना आत्मे बंगल्यात कसे? काहीच कळेना.
वेताळ
काय पटली नाय बुवा कथा...
एक तर क्रमश: नाही तिथेच आपला इंटरेश्ट गेला... दुसरे म्हणजे माणसांपेक्षा भुतं जास्त आहेत कथेत...
(नेहमीप्रमाणेच सुमार वाचनाची आवड असलेला आणि मिपावर आलेल्या क्रमश:च्या लोंढ्यात हात धूऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा)विंजिनेर
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
मला तर आवडली कथा...जेव्हा विशालरावांनी सांगितले की होशिंगकर फॅमिली जिवंत आहे. मला आधी वाटले की त्यांची पण भुतेच वावरत आहेत त्या घरात. स्पष्टीकरणानंतर कथा एकदम छान / वेगळी वाटली.
छान आहे.
फक्त एक उल्लेख खटकला...
चारीबाजुला घनदाट जंगल. कायम वाहणारा बेफाम वारा घनदाट जंगलात बेफाम वारा वाहणार नाही. कायम तर मुळीच नाही.
बाकी उत्तम. पु. ले. शु.
थोडीशी निकोल कीड्मन च्या 'द अदर्स' ह्या चित्रपटा सारखी वाट्ली कथा.
दोन कुटुंब एकाच घरात...पण दोघांनाही नीटसं कळत नाहीये आपल्या व्यतिरीक्त अजुन कोणाचा वावर आहे घरामध्ये.
निदान एकदा तरी मोठ्या पडद्या वर बघावा असा सिनेमा.
आणि क्रमश: पण नाही. वा वा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
आणि क्रमश: पण नाही. वा वा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
मजा आली वाचताना...
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
कल्पना रोचक आहे... मात्र कथा सांगताना पात्रांची लांबण लाऊन कथा खूप कन्फ्युझिंग होत गेल्याने शेवटी दिलेला धक्का हा संभ्रमित वाटतो.
आधीची कथा सलग असती तर शेवटाचा पंच अगदी मर्मावर बसला असता.. कारण कल्पना एकदम वेगळीच आणि मस्त आहे
(प्रियालीताईच्या भयकथेच्या प्रतिक्षेत)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
छान कथा आवडली. तुमचा प्रतिसाद वाचे पर्यंत सरच भूते आहेत असे वाटले होते. आता वनक्षेत्रपालाची सुद्धा कथा लिहा. वाट पाहतो :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
प्रतिक्रिया