पाककृती

खेकडा भजी

Primary tabs

कांद्याच्या भज्यांचा मुखपृष्ठावरील फोटो पाहिला. एक धागाही त्या निमित्ताने सुरू झाला आहे. मध्यंतरी एका विषयात कांद्याच्या भज्यांचा उल्लेख केल्यावर संदीप चित्रेनं (आणि परीकथेत(च) रमलेल्या राजकुमाराने) त्याची रेसिपी टाकायला सांगितली होती. आज हा समसमासंयोग जुळून आल्यानं रेसिपी देत आहे. यात काही विशेष असेल, असं अजिबात वाटत नाही. तरीही, काही खवैयांसाठी कदाचित मार्गदर्शक ठरू शकेल! साहित्य ः सुमारे सहा ते सात कांदे, लाल तिखट, बेसनपीठ, मीठ, तेल, किंचित सोडा. अतिरिक्त साहित्य ः कढई, गॅस आणि पाऊस! कृती ः कांदे उभे बारीक कापून घ्यावेत. (कापताना शक्‍यतोबोट कापून घ्यावे. भज्यांना चांगली चव येते!) त्यात गरजेनुसार तिखट आणि अंदाजे मीठ मिसळावे. हे मिश्रण चांगले कालवून अर्धा तास तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या तासाने कांद्याला पाणी सुटते. त्यातच बेसनपीठ मिसळून घ्यावे. काटेरी भजी करायची असतील, तर पिठाचे प्रमाण कांद्याच्या सुमारे वीस टक्के असावे. कापलेला कांदा व पीठ एकत्र होईल, पण एकूण मिश्रणावर कांद्याचे वर्चस्व राहील, असे पाहावे. म्हणजे कांद्याच्या दोन पाती जुळविण्यापुरता पिठाचा वापर करावा. (पुण्यातल्या बहुसंख्या हॉटेलांत कांद्याची भजी म्हणून पिठाचे गोळे भरवतात, तसे अजिबात करू नये!) तेल खरपूस तापवून त्यात हळुहळू भजी सोडावीत. मस्त खमंग तळून खाणाऱ्याला ("गीळ मेल्या' म्हणत) वाढावीत. कांद्याची ही भजी दह्यात लाल तिखट कालवून त्यासोबत खाण्यास छान लागतात. त्यापेक्षाही, ताटात काढल्यानंतर, किंबहुना झाऱ्यातच तेल पाघळायला ठेवलेली असताना त्यातून काढून तोंड पोळत पोळत खाल्ली, तर त्यांची खुमारी आणखी वाढते!
टारझन

मेलो ... वारलो ... निवर्तलो ... चचलो .. खपलो ... पंचमहाभुतांत विलीन झालो ..

अनामिक

+१
पण खरी गोष्टं माहीत करून घ्यायची असेल तर मनस्वीला विचारायला पाहिजे! :)

-अनामिक

रेवती

भज्यांइतकी पाकृही खमंग आणि चवदार!

रेवती

विसोबा खेचर

आम्ही विनाफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही..

क्षमस्व,

तात्या.

टारझन

हे प्रतिसाद देउन सांगा =))

आपला अभिजित

पाकृंचा फोटो तुम्हीच मुखप्रुष्ठावर चढवलाय, तात्या!
त्यावरूनच तर मला पाक्रु प्रसवली!!

शाल्मली

चवदार पाकृ.
यशस्वी पदार्थाबद्दल अभिनंदन !

कांद्याची ही भजी दह्यात लाल तिखट कालवून त्यासोबत खाण्यास छान लागतात.

तसंच चिंच-गुळाची दाण्याचं कूट घालून केलेली चटणी असेल तर अहाहा..! ती या भज्यांबरोबर अप्रतिम लागते. त्यानंतर वाफाळता आलं घालून केलेला चहा!!!
पावसाचं आणि कांदा भज्यांचं अतूट नातं असल्याने मध्यंतरी इथे जोरदार पाऊस पडला होता त्यादिवशी ही भजी खायची इच्छा झाली नाही तरच नवल! म्हणून लग्गेच करुन खाल्ली होती.

--शाल्मली.

फोटोशिवाय पाकृ टाकल्याचा निषेध !
उत्तम पाकृ टाकून भजी न दिल्याबद्दल निषेध निषेध !
कधीकाळी सांगितलेले आवर्जून लक्षात ठेवून पाकृ टाकल्याबद्दल धन्स धन्स धन्स :)

क्रान्ति

फोटो काढायला भजी शिल्लक तर रहायला हवी ना? ;)
बाकी पाकृ एक्दम भारी!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

सुनील

अतिरिक्त साहित्य ः कढई, गॅस आणि पाऊस!

उत्तम!!!

छान पाकृ.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जागु

छान पाकृ. मी पण अशिच करते. आजीबात पाणी न घालता आणि मंद गॅसवर म्हणजे चांगली कुरकुरीत होते.

अतिरिक्त साहित्य ः कढई, गॅस आणि पाऊस!
हे फारच आवडलं..
स्वाती

पक्या

भज्यांप्रमाणेच खुसखुशीत लेखन.
अतिरिक्त साहित्यः पाऊस - क्या बात है !

सूहास (verified= न पडताळणी केलेला)

<< (पुण्यातल्या बहुसंख्या हॉटेलांत कांद्याची भजी म्हणून पिठाचे गोळे भरवतात, तसे अजिबात करू नये!)>>>
तरी ही खाल्लीत(सेन्स ऑफ ईमर्जन्सी..)

सुहास

(कापताना शक्‍यतोबोट कापून घ्यावे. भज्यांना चांगली चव येते!)

वावा ! बातमी ला कसा घामाचा वास आला पाहिजे. तसा भज्याला रक्ताचा. बल्लवाचार्य कृत पाकबल्लवी ग्रंथात कर्क भज्यम असा उल्लेख कुठेतरी आढळतो.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.