Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रेल्वे पोलीसांची स्वागतार्ह मोहीम

व
विकास
गुरुवार, 06/25/2009 - 03:21
🗣 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3471 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
सुनील गुरुवार, 06/25/2009 - 03:42 नवीन
मोठ्या रकमेच्या दंडापेक्षा अल्पकाळाकरीता तुरुंगवास, ही शिक्षा अधिक परिणामकारक ठरावी!!! मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांवरदेखिल अशाच प्रकारच्या शिक्षेचा बडगा उचलला गेला होता, हे आठवले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/25/2009 - 03:48 नवीन
चांगले आहे. >मोठ्या रकमेच्या दंडापेक्षा अल्पकाळाकरीता तुरुंगवास दोन्ही आधीक चांगले नाही का? मोठ्या रकमेचा दंड + अल्पकाळाकरीता तुरुंगवास
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/25/2009 - 04:38 नवीन
एखादी गोष्ट करावी लागू नये अशी व्यवस्था केल्यानंतरही ती गोष्ट केली जात असेल तर शिक्षा करणे समर्थनीय. परंतु ती न करता शिक्षा करणे असमर्थनीय. ठाणे स्थानकावर ६ प्लॅटफॉर्म होते तेव्हाही पुलांवर प्रचंद गर्दी होत असे. गेल्या काही वर्षांत १० प्लॅटफॉर्म झाले, वाशी नेरूळ कडे जाणार्‍या गाड्या सुरू झाल्या. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ठाण्याला नव्याने थांबे देण्यात आले. को़कणात जाणार्‍या गाड्या सुरू झाल्या पण पुलांची संख्या जेवढी १९८० मध्ये होती तेवढीच आहे. तेव्हा पुलांवर आणि त्याही पेक्षा पुलांवरून प्लॅटफॉर्मवर उतरणार्‍या जिन्यांवर जी मरणप्राय स्थिती असते ती 'अनुभवली' तर या दंड करण्याचे समर्थन केले जाऊ शकणार नाही. तसेही ठाण्याला प्लॅटफॉर्मच्या टोकाकडून रूळ ओलांडण्याची शक्यता दूरपर्यंत फेन्सिंग घालून बंद केलेली आहे. पुलावरूनच मरत मरत जाण्यावाचून पर्याय नाही. (पूर्वी एकदा गाडीच्या दरवाजात उभे राहून प्रवास केल्याबद्दलही दंड करण्याची घटना घडली होती. सुदैवाने ती पुढे घडली नाही). खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 06/25/2009 - 05:37 नवीन
सहमत. हा वरवरचा उपाय आहे मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
महेश हतोळकर गुरुवार, 06/25/2009 - 05:42 नवीन
आई जेवू घालीना, बाप भीक मागु देईना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुनील गुरुवार, 06/25/2009 - 06:13 नवीन
हा ही मुद्दा विचार करण्यासारखा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/25/2009 - 05:52 नवीन
या विषयातील आणखी वाईट भाग म्हणजे असे खटले ज्या न्यायालयांत चालतात तेथे आरोपीने गुन्हा मान्य केला नाही आणि तोंड उघडले तर दंडाची रक्कम वाढते असे म्हणतात. (वरील माहिती ऐकीव आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही) म्हणजे खरेतर आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी न देताच शिक्षा ठोठावली जाते. (कसाबला मात्र वकील मिळाला नाही तर किती भयंकर अन्याय होईल याची चर्चा होते). खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 06/25/2009 - 06:12 नवीन
या विषयातील आणखी वाईट भाग म्हणजे असे खटले ज्या न्यायालयांत चालतात तेथे आरोपीने गुन्हा मान्य केला नाही आणि तोंड उघडले तर दंडाची रक्कम वाढते असे म्हणतात. (वरील माहिती ऐकीव आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही) खरे आहे. त्याला "अडाणी कोर्ट" असे म्हणतात. मुलुंडला असे एक कोर्ट होते (अद्याप आहे?). मी स्वतः अनुभवले आहे (प्रेक्षक म्हणून - उगाच गैरसमज नको!). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिरोटा गुरुवार, 06/25/2009 - 06:48 नवीन
पण पुलांची संख्या जेवढी १९८० मध्ये होती तेवढीच आहे
आणखी जादा पूल बांधण्यासाठी तिकडे जागा आहे का? महानगर पालिकेच्या/राज्य्/केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकसंख्या काही ठराविक परिसरात बेफाम वाढते.ठाणे शहराचेही तेच झाले असावे.रेल्वेकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करणे योग्य नाही असे मला वाटते. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/25/2009 - 08:10 नवीन
वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा कोण करतंय. फक्त त्यामुळे लोक रूळ ओलांडत असतील तर दंड करू नये एवढेच म्हणणे. (मी रोज गाडीने प्रवास करत नाही पण ठाण्याला स्टेशनात शिरल्या पासून प्लॅटफॉर्मवर पोचायला जितका वेळ लागतो तितक्या वेळात तीन गाड्या येऊन निघून जातात. यावर असेही म्हणता येईल की मग लोकांनी तीन गाड्यांएवढा वेळ आधी निघावे. ) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/25/2009 - 08:40 नवीन
खराटाशेट, यावर माझा उपाय म्हणजे ठाण्याला पूर्वेच्या बाजूला जायचं. अर्थात तिकीट काढायला कमी वेळ लागतो असं नाही, पण गर्दी थोडी कमी असते. सॅटीस, भरमसाठ लोकसंख्या वाढ, शिवाय ट्रेन्स, प्लॅटफॉर्म यांच्याही वाढीमुळे ठाणे स्टेशन आणि आजूबाजूचा भाग, रोजच्यारोज कुंभमेळ्यासारखा दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/25/2009 - 08:56 नवीन
मी पुलावर चढू लागल्यापासून पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरेपर्यंतचा (किंवा उलट) वेळ म्हणतोय. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पिवळा डांबिस गुरुवार, 06/25/2009 - 23:48 नवीन
रेल्वे पोलिसांनी हे असले उद्योग करण्यापेक्षा माणसांनी तुडुंब भरलेले फलाट आणि पूल जलद ड्रेन कसे होतील, फलाट/ पुलावर जागा अडवून बसलेले विक्रेते/ भिकारी तिथून नाहिसे कसे होतील, 'मदत' या पाटीखाली एकतरी पोलिस कायम कसा उपस्थित असेल, याची चिंता करणं जास्त जरूरीचं आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुहास गुरुवार, 06/25/2009 - 21:22 नवीन
एक गोष्ट ऐकून आनंद वाटला की या निमित्ताने का होईना, रेल्वे पोलिस फलाटावर जास्त वेळ असतील जेणेकरून लोकांना त्यांची मदतच होईल.. ;) बाकी खराटा साहेबांशी सहमत. अवांतरः पश्चिम रेल्वे वर फिरताना एक गोष्ट लक्षात येते की येथे कुठेही अपंगांसाठी/वयस्कर लोकांसाठी ramp ची सोय नाहीय.. ईथल्या फलाटांची ऊंची फूटबोर्डाच्या ऊंचीपेक्षा इतकी कमी आहे की एखादा ३०-३५ वयाचा माणूस चूकून गाडीतून पडला की गाडीखाली जातोच.. असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे काय करतेय? --- सुहास
  • Log in or register to post comments
क
कुंदन Fri, 06/26/2009 - 04:29 नवीन
रेल्वे पोलिसांचा असाही एक पराक्रम..... http://www.mumbaimirror.com/article/2/200906262009062602043783781508705/Robbers-stab-constable-minutes-after-he-handed-them-over-to-RPF.html
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा