Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझा जलप्रवास!

च
चतुरंग यांनी
Fri, 06/26/2009 - 17:08  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
9518 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

ए
एक Fri, 06/26/2009 - 19:16 नवीन
"..गेले तीनचार उन्हाळे इथे अमेरिकेच्या अटलांटिक किनार्‍यावर पोहोण्याची संधी मी घेतली. पण इथलं पाणी मरणाचं थंडगार असतं! ऐन उन्हाळ्यातही बाहेरचे तपमान ३५ डिग्री सें. असतानाही पाणी जेमतेम १२-१३ डिग्री सें असते..." वेस्टकोस्टला पॅसिफिक ला पण हिच तर्‍हा आहे. भयानक गार पाणी. मला फक्त दोनदा थंडी जाणवते..पाण्यात पहिल्यांदा शिरल्यावर आणि बाहेर आल्यावर.. एकदा डोकं भिजलं की थंडी वगैरे काही वाजत नाही आणि बाहेर आल्यावर स्टारबक्स ;) फिर कायको टेन्शन! मज्जानू लाईफ! "समुद्रस्नान हे अतिशय उत्साहदायी असते हा माझा आजवरचा अनुभव आहे. शरीराचा आणि मनाचा सगळा शीण घालवून टाकण्याचे एक जबरदस्त सामर्थ्य त्यात असते." १००००% सहमत.. या विकेंड ला परत एक ट्रीप होणार.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/26/2009 - 19:46 नवीन
अप्रतिम लिहीलंत हो चतुरंग!! मी ८ वर्षाची असताना लक्षद्वीपला अरबी समुद्रात लाईफ जॅकेट घालून एका आजोबांनी मला ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक शिकवले.. ते माझं पहीलं पोहोणं! नंतर प्रत्येक सुट्टी इतकी सही गेली! पहीला व्यवस्थित डाईव्ह जमला तो दिवस अजुनही आठवतो मला! जबरी आनंद झालेला मला! :) अजुन बटरफ्लाय नाही जमत.. तुमचा तुम्ही कसा शिकलात?? :| अजुन नदीत आणि विहीरीमधे पोहायचा चान्स नाही मिळाला.. इथे पॅसिफीक बेकार आहे.. पण 'एक' यांचा उपाय ट्राय करून बघावा! :) मस्त लेख!! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 06/27/2009 - 05:55 नवीन
ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक,फ्री स्टाईल आवडतात. पण जानसे प्यारा फ्रॉग स्ट्रोक (स्टाइल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
पाषाणभेद Wed, 07/01/2009 - 09:47 नवीन
फ्रॉग स्ट्रोक म्हणजे कुठला स्ट्रोक? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
र
रामपुरी Fri, 06/26/2009 - 20:08 नवीन
पंचगंगेत पोहायला जायचे दिवस आठवले. पलिकडच्या काठाला जाउन लाल माती अंगाला लावून पडून रहायचे. मनसोक्त मृत्तिकास्नान आणि सुर्यस्नान झाले कि परत. तसंच वाडीची कृष्णा नदी. पावसाळ्यात कृष्णा नदीत पोहोणं म्हणजे आव्हानच असतं. केवढीतरी ओढ असते पाण्याला. छान आठवणी जाग्या केल्यात. मनापासून धन्यवाद. अवांतरः समुद्रापेक्षा नदीत पोहायलाच मजा येते. समुद्रात उगिच दंगाच जास्त करायचा. तरणतलावात तर अगदीच अडीनडीला, पाण्याची आठवण आली आणि नदी जवळपास नाही, म्हणूनच जायचं. :) परत एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 06/26/2009 - 20:27 नवीन
लेख मस्तंच आहे... एक खंत म्हणजे मला अजूनही पोहायला येत नाही... आणि या समरमधे शिकायचा प्रयत्न तरी करावा असं ठरवूनसुद्धा अजून पाण्यात उतरलो नाहीये! -अनामिक
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 06/26/2009 - 21:28 नवीन
मस्त लेख. पोहायला येत नाही ही माझीही खंत आहे. अगदी महाराष्ट्र मंडळात क्लास लाऊनही सुट्टे पोहता येत नाही. मुलगा जेव्हा पोहायला शिकला तेव्हा त्याचा चक्क हेवा वाटला होता.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 06/26/2009 - 23:34 नवीन
तुमचं आणि आमचं सगळं सेम कसं काय बुवा? नगर, सांगली ,वाडी,,मिरज, सगळंच! :) मि असाच ५-६ वर्षांचा असताना येतं येतं म्हणुन भीमेत उडी मारली अन थेट खाली! ३-४ आठवडे मला ते मी ओरडलेले बुडबुडे, मासे वगैरे दिसत होतं स्वप्नात! पण पोहोण्याचा मुहुर्त काही लागत नव्हता. नुकतंच स्वतः हुन शिकलो इथे. कालच ७०० मीटर पोहलो आता वाट लागलीये! :D मी स्वतःहुन कसा शिकलो ते इथे लिहलं आहे. कुणाला मदत झालीच तर अजुन काय हवं? चतुरंगांचा धागा हायजॅक केल्याबद्दल माफी मागतो. :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 06/26/2009 - 23:56 नवीन
आत्ता जरा गडबडीत आहे.. सविस्तर नंतर बोलतो / लिहितो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/27/2009 - 04:38 नवीन
जलयात्रा आवडली रे रंगा.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 06/27/2009 - 04:59 नवीन
छान! नाव वाचून वाटले होते की बहुदा लक्झरी क्रुझ किंवा (एडमिरल अब्रोमोव्हीच सारख्या )प्रायव्हेट यॉट्/याच(yacht) मधुन प्रवासवर्णन वगैरे असावे :-)
  • Log in or register to post comments
अ
अनिता Sat, 06/27/2009 - 04:59 नवीन
<छान! असेच.. अवा॑तरः (माझा जलप्रवास! ) धब्ब् SSS बूडू़क... स्स्स्स्स ...ग्लग्..ग्लग्..आऑ..बूडू़क बूडू़क..वाचवा.. न॑तर सगळ्या॑नी जाम झापले..
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 06/27/2009 - 05:10 नवीन
लेख खूप आवडला. लेख पोहोण्याबद्दल आहेच. पण पोहोणे , पाण्याशी केलेली दोस्ती , विविध ठिकाणचे अनुभव , आजूबाजूचे वातावरण , माणसे.... एखादा चित्रपट पहात होतो असे वाटले. तुमचा मागचा पतंगांवरचा लेख आणि हा पोहोण्यावरचा. दोन्ही अतिशय आवडले. हे लेख केवळ त्या त्या गोष्टींपुरते मर्यादित नाहीत. माझ्यालेखी ते अस्सल लिखाणापैकी आहेत. फारच सुरेख, चित्रदर्शी शैली, रसाळ वर्णन. फार फार जुन्या गोष्टींमधले रंगरूपगंधादि सेंद्रिय अनुभव एखाद्या लिखाणात क्वचितच इतके जिवंत झालेले दिसतात. भरभरून जगण्याचा अनुभव पुरेपूर लिखाणात आला. मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 06/27/2009 - 13:26 नवीन
चतुरंग यांचे लिखाण अतिशय अस्सल व गेले काही लेख बघता दर्जा दर लेखागणिक उंचावतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चित्रा Wed, 07/01/2009 - 15:19 नवीन
अगदी अचूक. लेख खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ट
टारझन Sat, 06/27/2009 - 05:27 नवीन
चतुरंग सर , ह्या विषयावर लिहील्याबद्दल व्यक्तिगत आभार !! लहाणपणी आम्ही ४-५ तास पोहत असू ... एक गेम असायचा .. विहिरीच्या एका कडेवरून ज्यावर राज्य आहे तो बाकिंना पकडायला येत असे ... बाकी सगळे दुसर्‍या टोकाला असंत .. खोल बुडी मारत पुण्हा विरूद्ध टोकाला पोचलो की आपण सुटलो .. ज्याला पकडला त्याच्यावर राज्य १!!! मी कधीच सापडलो नाही !! पण मी हैशेने राज्य घ्यायचो .. खोल बुडी मारण्यात आपण मास्टरी मिळवलेली :) (पेटा लाऊन पोहायला शिकलेला) टारझन
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 06/27/2009 - 06:33 नवीन
आपल्या या लेखाने , शाळेत असताना सांगलीला कृष्णेच्या पुराच्या पाण्यात आयर्वीन पुलावरुन ( माचीवरुन ) काका, चुलत भाऊ यांच्या बरोबर मारलेल्या उड्या आणि पोह्त गाठलेला विष्णू घाट हे सर्व आठवले. जुन्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 06/27/2009 - 06:54 नवीन
वाह! पाणी हे असं रसायन आहे जे कवटाळणार्‍याला आनंदाने भिजवून टाकते :) पोहणे ही माझ्यासाठी (झोपण्यानंतरची ;) ) सगळ्यात आनंदादायी गोष्ट! विहीरीपासून ते समुद्रापर्यंत वेगवेगळ्या जलतीर्थांमधे पोहण्याची मजा वेगवेगळी.. जलतरणावरचा असा आतून आलेला लेख खूप आवडला.. (ओलाचिंब)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sat, 06/27/2009 - 07:05 नवीन
तुमचा जलप्रवास वाचला आणी मिरजेमध्ये घालवलेल्या ३ -४ आनंदी वर्षांची आठवण झाली. माझे आजोळ ब्राम्हणपूरीमध्येच आहे. खाडीलकर गल्लीच्या जवळ... सांगली मिरज आणी वाडी छान आठ्वणी जाग्या झाल्या ... धन्यवाद... विद्याधर
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 06/27/2009 - 07:05 नवीन
अप्रतिम लेख.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 06/27/2009 - 09:29 नवीन
रंगा, मस्तच लिहिलंय रे. तू अगदी बोटाला धरून त्या काळात / भागात फिरवून आणतोस. आपण वाचतोय असं वाटतंच नाही. तुझ्या बरोबर फिरतोय असं वाटतं. क्लास... फ्रिक्वेंसी वाढवा जरा जमल्यास. मी कधी नदीत पोहलो नाहीये अजून. पण तलावात आणि विहिरीत मात्र बर्‍यापैकी पोहलो आहे. पुण्याला महाराष्ट्रीय मंडळाच्या विहिरीत पोहायला शिकलो होतो. पहिल्या दिवशी त्या सरांनी पाठीला लाकडी ठोकळा वगैरे बांधला. तसंच २-३ दिवस पाण्यात बागडू दिलं. आणि मग एक दिवस म्हणे की चला आता विहिरीत. ठोकळा नको, मी हात धरतो म्हणाले. काठावर माझ्या बाजूला उभे राहिले. हात वगैरे धरला (माझी चूक झाली की मी त्यांचा हात नाही धरला, त्यांनी माझा हात धरला) आणि म्हणाले मार उडी. मी कसली उडी मारतोय? खाली काळेशार पाणी. तेवढ्यात त्यांनी दिले मला ढकलून आणि माझ्या मागोमाग स्वतः उडी मारली. पाणी खूप खोल होते. किती खाली गेलो होतो कुणास ठाऊक पण भयानक घाबरलो होतो हे नक्की. पण नंतर आले पोहायला. आठवण जागवलीस रे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 06/27/2009 - 10:09 नवीन
लेख मस्त आहे, सुरेख रंगला आहे. चौथीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेतल्या शिक्षकांनी कांदिवलीच्या सरदार पटेल तरणतलावात घेतलेलं शिबिर, खाल्लेल्या गटांगळ्या आणि धीर एकवटून पंधरा फुटांवरून मारलेल्या उडीनंतर झालेला आनंद ह्या सगळ्या आठवणी पुन्हा जागवल्या लेखाने.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/27/2009 - 11:27 नवीन
एकदम खळखळीत लेखन. पाण्याच्या आठवणींत मस्त डुबकी मारुन आणल्याबद्दल धन्यवाद हो रंगाशेठ. º°¨¨°º© जलपरा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/27/2009 - 12:24 नवीन
हीच प्रतिक्रिया "मास्तर"च्या एखाद्या लेखाला देऊन पाहिली .. आणि हा परा कसल्या पाण्यात डुंबत असेल ह्याचा विचार करून अंमळ हसू आलं - ( जलजिरा ) टारमासा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सुनील Sat, 06/27/2009 - 13:18 नवीन
व्वा झक्कास लेख, चतुरंगराव! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sat, 06/27/2009 - 13:21 नवीन
रंगाशेठ , मस्त आठवणी जागवल्यात. मी १२ वीच्या सुट्टीत पवनानदीमध्ये पोहायला शिकलो. माझा जिगरी दोस्त शिकवायचा. मित्राकडे जातो म्हणुन सांगायचो. घरी कोणाला काय पत्ता नसायचा. ऑइलचे रिकामे डबे लावुन पोहायला शिकलो. महिन्याभरानंतर घरी सांगीतले तर सगळे आवाक. मग काय वडीलपण पोहायला सोबत येउ लागले. पण जलतरण तलावात नदीसारखी मजा येत नाही. इथे जपानला आल्यावर एक गोष्ट पाहिली. शनिवार , रविवारी चिल्ली पिल्ली पोर आणि त्यांचे आई बाप पोहायला गर्दी करतात. फक्त पपा, ममा आणि इतर दोन चार शब्द बोलणारी चिमुरडी पोर पोहताना पाहुन त्यांचा हेवा वाटला. गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/27/2009 - 13:41 नवीन
अतिशय सुरेख लेख. खूपच आवडला!
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 06/27/2009 - 14:38 नवीन
बाकि आम्ही पोहण्यापुढे २-४ गटंगळ्यामारल्यावर हात टेकले.. दोन्हि पोरांना मात्र शिकवलय..
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 06/27/2009 - 14:59 नवीन
अगदी सहज, समोर बसून मनमोकळ्या गप्पा सुरू आहेत, असा भास होतोय लेख वाचून! मस्त शैली! अवांतर :- आमचं फक्त नळाच्या आणि टाकीच्या पाण्याशी सख्य! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 06/27/2009 - 15:06 नवीन
आमच्या अंगणातल्या मोठ्ठ्या विहिरीत मोडककाका सगळ्यांना पोहोणे शिकवत असत, त्यावेळी आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये एकही जण असा नव्हता की त्याला/तिला पोहोता येत नसे. उन्हाळ्याच्या सुटीत रोज आणि कधी लहर आलीच तर एखाद्या रविवारी सकाळी सगळे जण पोहायला उतरायचे.. आता ना मोडककाका, ना ती बिल्डिंग, ना ती विहिर राहिली.. फक्त आठवणी उरल्यात.. स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sat, 06/27/2009 - 15:23 नवीन
माझ्याही लहानपणच्या आठवणी जीवंत झाल्या. आम्ही सर्व भावंडेसुद्धा विहिरीतच पोहायला शिकलो. फक्त त्यावेळी कोणी एक नाना नव्हते. एकत्र कुटुंबात घरातच मुलांची रांग असायची. कॉलेजमध्ये शिकणारी मोठी भावंडे सुटीला घरी आली की सगळ्या लहान भावंडांना घेऊन गावाजवळच्या एकाद्या मळ्यातल्या विहिरीवर घेऊन जात असत. तिथे अनेक उत्साही नाना भेटत आणि नवशिक्या पोरांना हातपाय मारायला शिकवत. पोहून आल्यानंतर पोटात भुकेचा नुसता डोंब उसळायचा आणि क्षुधाशांतीची लय्यत तयारी घरी केलेली असायची. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 06/27/2009 - 15:59 नवीन
सुंदर लेख! अह्हाहा.. पोहणे ही माझी आवडती गोष्ट आहे. आम्ही सकाळी ६ च्या बॅचला पोहायला जात असू.. झोप सोडून उठण्याचा, तलावापर्यंत जायचा खूप कंटाळा यायचा.. पण एकदा पाण्यात उतरलं की बाहेरच पडू नये असं वाटायचं .. झाडावर चढणे, पोहोणे आणि सायकल चालवता येणे हे रोटी, कपडा, मकान प्रमाणेच जीवनावश्यक गरजात मोडते असे माझे मत आहे! अगदी पटलं :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 06/27/2009 - 19:00 नवीन
वा .. एकदम झकास लेख :) मला स.प.च्या तलावामध्ये बुडण्याचा एक लाहनसा अनुभव आहे ;) त्याची आठवण झाली . -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sat, 06/27/2009 - 19:35 नवीन
फर्मानपट्टा ते अटलांटा जलप्रवास सुळसुळीत झाला आहे. मजा आली वाचतांना. डालडा व तत्सम डब्यांना जस्ताचे डाग देऊन पोहायचे डबे करुन आम्ही आणायचो ते आठवले. पाण्यावर पुर्णपणे आडवे हल्चाल न करता तरंगता आले की खूप मजा येते.
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 06/28/2009 - 04:52 नवीन
चतुरंगजी, तुमचा जलप्रवास आवडला. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 06/28/2009 - 07:50 नवीन
पाण्याच्या आठवणी आवडल्या! पोहायला आणि सायकल चालवायला लहानपणीच शिकणं सोपं जातं, प्रत्येक मुलाला आलंच पाहिजे
  • Log in or register to post comments
उ
उपास Tue, 06/30/2009 - 20:01 नवीन
चतुरंग, मस्त झालाय लेख आणि अगदी समयोचित! मी गिरगावात मफतलाल मध्ये शिकलो पोहायला इतक्या लहानपणी की कधी ते आठवत देखील नाही. कधीही हुक्की आली की बाजूला गिरगाव चौपाटीत समुद्रात झोकून द्यायचो, विशेषतः फुटबॉल खेळून चिखलात बरबटलो की... रम्य दिवस आठवले! एकदा ६वी /७ वीत असताना सातार्‍याला माऊली ग्रामी गेलो होतो उत्सवाला तेव्हा कृष्णेत गेलो डुंबायला, वळीव सुरु झाला होता नुकताच आणि नदीच्या पाण्याचा सराव नाही. मरता मरता वाचलो :-) किनार्‍यावरच्या मोठ्या पोरांनी उड्या मारल्या मी मिळतोय का बघायला आणि कपडे धुणार्‍या बायकांची आरडाओरड सुरु "मुलगा चाल्ला पाण्यातून.." पण मी काटकुळ्या हातांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आलो.. अजून आठवलं की धडकी भरते.. :-) तेव्हापासून कानाला खडा अनोळखी ठिकाणी पाण्याशी मस्ती नाही तुमचा लेख पुनश्च आवडला, जुन्या आठवणी जाग्या करुन गेला.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 06/30/2009 - 23:04 नवीन
धमालच! चतुरंगराव, तुमचे पोहण्याचे विलक्षण अनुभव वाचून आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले! मला रत्नागिरीत असताना कधी पोहायला आलं नाही. एकतर आजूबाजूची पोरं दुपारी दोन ला नदीत उड्या टाकायला जायची. नि आमच्या घरातून दुपारी एक ते ४ बाहेर न पडण्याची कडक शिस्त. पुण्यात आल्यावर चारच वर्षांपूर्वी पोहायला शिकलो. पण गेल्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला, तर काही झेपत नाहीसं दिसतंय. मुळात ते आंघोळ बिंघोळ करून स्विमिंग ट्यांकात उतरायचाच वैताग येतो! असो. गेल्या वर्षी मुलीला शिकवण्याचाही व्यर्थ प्रयत्न केला. त्याविषयी इथे लिहिलं होतं.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Wed, 07/01/2009 - 16:05 नवीन
सुरेख झाला आहे लेख, चतुरंग. पोहणार्‍या माणसांनी वर्णिलेला हा असा आनंद पाहिला, की माझ्या भेदरटपणाला वैतागलेल्या आई-बाबांची तोंडं आठवतात! गावाला गेल्यावर मला पोहायला शिकवायचं म्हणून बाबा विहिरीत उतरले. न राहवून मग मामा आणि आईही उतरले. आमचं ध्यान मात्र रडत रडत काठावरून गंमत बघतंय! तसंच सायकलीचंही. आई किंवा बाबा मागे धरायला असत तोवरच माझी सायकल बरी चाले. त्यांनी हात सोडल्याचं कळलं रे कळलं की गच्छंती. शिवाय मला रस्ता पार मोकळा असावा लागे ते वेगळंच. दूSSSSSSरवर कुठेतरी एखादी रिक्षा किंवा मोटार दिसली, की तत्काळ सायकल रस्त्याच्या कडेला घेऊन मी निवांतपणे गाडीला अच्छा करत असे आणि गाडी गेली की मग सायकल हातातच घेऊन ढकलत रमतगमत पुढे चालू लागत असे. लांबवर बसलेले आई-बाबा पार वैतागायचे! एकेकाचं नशीब असतं. :( आमच्या सायकलच्या नशिबात (आणि बहुतेक विहिरीच्याही!) मी नव्हते!
  • Log in or register to post comments
P
Pain Tue, 08/17/2010 - 06:17 नवीन
लेख फार आवडला. ह्यापुढे तो काहीच नाही. मी माझ्या पालकांमुळे लहानपणीच शिकलो. दर उन्हाळ्याचा सुट्टीत आणि कधी इतर वेळीसुद्धा मित्रमैत्रिणींबरोबर पोहायला जायचो. मला इथल्या लोकांप्रमाणे पाण्याची नव्हे तर आधी घ्यायला लागणार्‍या टायफॉईडच्या इंजेक्शनची भीती वाटायची. कारण एकदा ते घेतले की २-३ दिवस पाय अजिबात हलवता यायचा नाही, भयंकर दुखायचा. त्यानंतर मी बर्‍याचदा गणपतीपुळ्याच्या, हरिहरेश्वरच्या समुद्रातही पोहलो. गणपतीपुळ्याच्या समुद्रात का आणि कसे पोहलात ? तिथे अनेक मृत्यू होतात आणि पोहू नये अशी सरकारची सूचना आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 08/17/2010 - 08:01 नवीन
छान लिहीलंय! नगरचा जलतरण तलाव, केडगावची विहीर, हिंगण्यातला कालवा आणि बर्‍याच ठिकाणच्या समुद्रात झालेलं पोहणं आठवलं. सध्या फक्त जलतरण तलावातच पोहणं होतंय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा