वरळी - बांद्रे सेतू बद्दल उत्सूकता लागून राहिली आहे.
अर्थात बघुया आमच्या सारखे चार चाकी गाडी नसणारे कधी या सेतूवरुन मार्गक्रमण करतात ते.
(आमचा सारख्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने लवकरात लवकर या मार्गावरुन एक बस चालू करावी ही विनंती )
जालावरुन मिळवलेली या सेतूची काही चित्रे
--------------------------------------------------
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
चांगली माहिती.
अमोल केळकर यांनी दिलेले फोटोही छान.
५० ते ७५ टोल? तोही एकदा जायला?
आजकाल भाववाढीची सगळीच समिकरणं बदललेली आहेत.
वेळ वाचवायला पैसे मोजायला लागण्यालाच 'टाइम इज मनी' म्हणतात की काय? ;)
रेवती
हा मार्ग सर्वसामान्य बसेससाठी उपलब्ध नसेल. या मार्गासाठी एकेरी ५० रुपये तर दुहेरी ७५ रुपये टोल आकारण्यात येइल. महापालिका सर्वसामान्यांच्यासाठी या मार्गावर काही नाममात्र आकार आकारुन एक टप नसलेली डबल डेकर चालु करण्याच्या विचारात आहे, जेणेकरुन लोकांना या सेतुवरुन मुंबईचे तथाकथित सौंदर्य अवलोकीता येइल. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
१० वर्षात चीन ने ७ नवीन पुल बांधले. सामना ची बातमी बघा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
५० रु देणारया कार रोज १,२५,००० एवढ्या धावणार, रोज्चे कलेक्षन ६२,५०,००० रु. वार्षिक साधारण २२५ कोटी रु.
सेतूचा खर्च १७०० कोटी रु. दरवर्षी १०% ट्रॅफिक वाढ धरली तरी
७-८ वर्षात व्याजासकट पैसे वसूल होण्यास हरकत नाही.
हे गणित मांडले आहे ते एकवेळच्या टोलावर आधारित, दोनवेळचा ७५ रु टोल धरल्यास परतावा कालावधी अजून कमी होइल.
खाजगीकरणातून उभरले जाणारे प्रकल्प, त्यावरील टोल वसूली ह्यासाठी एक समिती स्थापन केली आहे असे वाचनात आले.
सेतूचा खर्च १७०० कोटी रु. दरवर्षी १०% ट्रॅफिक वाढ धरली तरी
७-८ वर्षात व्याजासकट पैसे वसूल होण्यास हरकत नाही.
आपल्याशी सहमत पण राज्य शासन ३० वर्षासाठी देणार हा सेतु टोल
वसुल करायला मग हिशोब केला तर ६७५० कोटी ३० वर्षात जनतेच्या खिशातुन ढापणार हे लोक :O :O :O :O :O :O
किति चोरी करणार आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
कोतवाल
तुम्ही १०% वाढ धरली नाहीत. ती धरली तर ३० वर्षात ३७,००० कोटी रु टोल वसूल होइल.
२००० साली पुणे- मुंबइ एक्स्प्रेस हायवे ची टोल वसूली सुरु झाली, दोन वर्षांनी जुन्या हायवेवर सुद्धा टोल आकारला जाउ लागला, तो आजतागायत.
ह्यात किती खर्च आणि किती टोल ह्याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध झालेली नाही.
<आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!>
एक तुलना--
पुण्याहून कोल्हापूरला जायचे तर १७५रु. टोल द्यावा लागतो कारसाठी. आणि पेट्रोलचा खर्च येतो ६००- ७०० रु.

अहो वाढ धरली काय आणी नाहि धरली काय
पण राजानेच राज्य चोरांना आदंण दिले त्याचे काय !!!
हे वाचा हे काय म्हणतात
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
कितीहि कौतुकास्पद गोष्ट असली तरी , ह्या पुलावरुन भुर्रकन जाणार्या गाड्या आणि अविकसीत भागात उन्हा तान्हात प्यायच्या पाण्यासाठी वणवण हींडणार्या बायाबापड्या हा विरोधाभास विसरता येईल का ?
रोज सव्वालाख गाड्या ही अतिशयोक्ती आहे.
अर्थात प्रकल्प फायदेशीर आहे असे भासवण्याच्या नादात अशा अतिशयोक्त्या नेहमीच केल्या जातात.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारा एकमेव माहीम कॉजवेचा रस्ता दिलासा मिळाल्याने काहीसा सुखावेल. दररोज जवळपास सव्वा लाख वाहनांची अहोरात्र ये-जा पाहणारा हा एकमेव रस्ता वांद्य्राच्या समुद्रावरून किनाऱ्यावर आदळणाऱ्या एखाद्या लाटेनं दिलेल्या सागरी सेतूच्या प्रगतीच्या बातम्यांनी दिवसागणिक सुखावत गेला असेल...
..... दररोज सव्वा ला़ख गाड्या ह्या पुलावरून नव्हे... माहीम कॉजवेवरून ये-जा करतात, असे सर्वेक्षण आहे. ह्या रस्त्यावरून गर्दीच्या वेळात आणि दिवसभरात होणारी वाहतूक पाहता, ही अतिशयोक्ती आहे असे म्हणणे खरे वाटत नाही.
प्रतिक्रिया