>>ह्या कथा आपलं जीवन संपन्न करतात
१००% सहमत.
मला ही कथा खुप आवडतात व आवडत होत्या.. लहानपणी मी चांदोबाच्या कथा वाचून रंगून जात असे.. कधी कधी आई-बाबा गोष्टी सांगायचे ते आठवले... माझ्या बाबांनी मला फक्त एकदाच कथा सांगितली होती चल रे फुटाण्या.. आता ती गोष्ट पुर्ण आठवत नाही पण तो काळ देखील आता माझ्या आठवणीच्या खजानातील अनमोल रत्न आहे.. काही कथा जिवन बदलून टाकतात तर काही कथा निखळ मनोरंजन करतात... कथा हेच माझं विश्व होते लहानपणी... लहानपण जसं जसं हरवत गेलो तस तसे त्या कथा देखील मागे राहत गेल्या.. तुमच्या ह्या लेखामुळे.. मला परत एकदा कथा वाचाव्यात असे वाटू लागले आहे... चांदोबा मागवावा लागेल.. नाही तर सिहासंन बत्तीशी... :)
थोडेसं नवीन !
ह्या कथा आपलं जीवन संपन्न करतात.टीव्ही आणि चित्रफितीतून आधूनिक पद्धतिने ह्या कथा फैलावल्या जात आहेत.साध्या सरळ शब्दातून सांगितलेल्या ह्या कहाण्या मात्र आपल्याच अंतरात वास करतात. आपल्यावर दबाव आणून मेंदूतल्या कल्पकतेच्या साधनाला परिश्रम घ्यायला उत्तेजीत करतात.
१००० टक्के सहमत.
या आनंदाचा पुनःप्रत्यय घ्यायचा असेल तर आपणही अशा लहान पणी ऐकलेल्या कथा मिपावर द्यायला, एक नवा प्रवाह सुरू करायला काय हरकत आहे? :)
अश्या आपल्या ह्या कथा म्हणजे भूत आणि भविष्याला बांधलेली गांठ समजली पाहिजे.आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो.वर्षानुवर्ष समाजाने ह्या कथांच्याद्वारे आपली जीवन-शैली एका पिढीतून दुसर्या पिढीत व्यक्त करण्यासाठी वापरली आहे.
वा वा .. उत्तम !
खरे आहे आपले म्हणणे.
आपल्या लेखनामागे सुद्धा अशीच काही प्रेरणा असावी.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
समजा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर एक विमान कोसळले. त्यात ३७ हिंदू आणि ३ मुसलमान होते. काही प्रवासी मेले, आणि काही वाचले. तर वाचलेल्यांना पुरणार की जाळणार ? आणि पायलटचे काय करणार ?
- अरविंद उर्फ मिसळभोक्ता
प्रतिक्रिया