Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुंतवणूक करावी कुठे ?

र
रामदास
Sun, 06/28/2009 - 13:34
🗣 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6840 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
सुनील Sun, 06/28/2009 - 14:02 नवीन
जाणकारांनी लवकर प्रकाश टाकावा. वाट पाहात आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 06/28/2009 - 14:05 नवीन
ह्म्म मस्त धागा ... चुचु
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sun, 06/28/2009 - 14:51 नवीन
रामदास आणि इतर जाणकारांनी अधिकाधिक माहिती द्यावी... क्लिंटन -- कुठे आहेस रे? --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 06/29/2009 - 05:50 नवीन
यवढा चांगला धागा खाली जाऊ नये म्हणून हा परतिसाद.
  • Log in or register to post comments
अ
अनंता Mon, 06/29/2009 - 06:17 नवीन
मंदी अजून आपला प्रभाव टिकवून आहेच. सबब गुंतवणूकदारांनी बाजाराच्या आहारी पुर्णत: जावू नये. पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर बाजाराचा रोख स्पष्ट होईलच. शिवाय आपली शेतीप्रधान अर्थव्यवस्था मॉन्सूनच्या लहरीवर अवलंबून असल्याने पाऊस कसा पडतोय यावर बहुतांश शेअरबाजाराची वाटचाल ठरावी. अल्पकालीन नफा काढून घ्यावा. त्यातही गुंतवणूक करायचीच झाली तर दीर्घकालीन करावी. नव्या आय.पी.ओ.च्या फंदात न पडणे उत्तम. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/29/2009 - 06:46 नवीन
>सामान्य गुंतवणूकदारानी काय करावे? म्हणजे फक्त शेयरबाजारात असलेल्या किंवा शेयरबाजाराकडे बघत असलेल्या लोकांबद्दल म्हणत आहात का? त्यांनी आपापल्या अभ्यास व जबाबदारीवर त्यांना योग्य वाटते तेथे गुंतवणूक करावी. पण जर जनरल/सर्वसाधारण सर्व खर्च वळगता शिल्लक राहीलेले पैसे भविष्यासाठी कुठे गुंतवावे असे म्हणत असाल तर १) प्रत्येकाने आपापले रिस्क प्रोफाइल पहावे २) साधारण किती रक्कम कुठल्या कारणासाठी लागणार आहे (जसे उच्चशिक्षण, लग्न, घर इ इ ) ते ठरवावे ३) गुंतवणुकीचा कालावधी शक्यतो मोठा ठेवावा जसे १० ते २० वर्षे ४) पीपीएफ, पोस्टऑफीस इ नेहमीच्या सरकारी बचत योजनांचा लाभ जरुर घ्यावा ५) तुम्ही नुकतीच नोकरीस सुरवात केली असेल (तरुण वय - गुंतवणुक कालावधी १०-२० वर्षे ) तर शेयरबाजारात जरुन सहभागी व्हा. एसआयपी (SIP) मार्गाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक मार्ग आहे. ६) एक टर्म इन्शुर्न्स पॉलीसी काढावी की अकाली जाण्याने/अपघातग्रस्त होण्याने आपल्यावर अवलंबुन असलेल्यांच्या किमान ५ वर्षेच्या खर्चाची /गृहकर्ज घेतले असल्यास ते कर्ज फिटेल अशी सोय व्हावी ७) मेडीकल इन्शुरन्स असावा. टर्म व मेडीकल इन्शुरन्स शक्यतो नोकरीला लागताच काढावे हप्ता कमी व कव्हर जास्त असते. ८) घर घेताना हप्ता शक्यतो पगाराच्या २५% असावा जेणे करुन नोकरी गेल्यास, दुसरी नोकरी मिळे पर्यंत बिकट परिस्थीती होउ नये. ९) शक्यतो ८ महीन्याचा खर्च निघेल इतके पैसे फिक्स डिपॉझीट मधे असु द्यावे. १०) आवक - जावक शक्यतो पॉझीटीव्ह रक्कम असावी किमान २५% ११) लग्न शक्यतो साधेपणाने, जास्त खर्च न करता केले तर नव्या घराच्या डाउन पेमेंटची सोय होते :-) १२) थोडासा पैसा शक्यतो जोडधंदा किंवा स्वताची स्कील्स अपग्रेड करायला वापरला तर ती देखील एक उत्तम गुंतवणूक ठरेल. अजुन काही आठवल्यास लिहीन. इतर लोकांनी अजुन यादीत भर टाकावी. बाकी जास्त चिंता करु नये. ज्यांचे लग्न अजुन झाले नाही त्यांनी वधु/वर बघताना ह्या आर्थीक व्यवस्थापन या विषयावर जरुर बोलावे आपल्या भावी जोडीदाराशी. तसेच लग्नानंतर दोघांनी मिळून आर्थीक नियोजन करावे. रामदाससरांनी उपस्थीत केलेले प्रश्न त्यांनीच उत्तर द्यावे. वांशीकवाद उसळी मारेल न मारेल, अमेरिका पैसे कुठून तरी उभे करेलच. भारत सरकार पैसे कसे उभे करेल व खर्च करेल हे मात्र माहीत नाही पण बुडीत खात्यातील कंपन्या नफ्यात आणता येत नसतील तर अंग काढून घेणे उत्तम. थोडा थोडा पैसा १० ते २० वर्ष कालावधीसाठी शेयरबाजारात टाकायला हरकत नसावी अर्थात हे माझे मत.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 06/29/2009 - 07:02 नवीन
४) पीपीएफ, पोस्टऑफीस इ नेहमीच्या सरकारी बचत योजनांचा लाभ जरुर घ्यावा मी पण घेते :D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/01/2009 - 06:44 नवीन
प्रतिसाद उपयोगाचा आहे, धन्यू...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ग
गणा मास्तर Mon, 06/29/2009 - 08:51 नवीन
रामदासशेठ उत्तम धागा. १. सहजरावांच्या सल्ल्यांशी सहमत. २. पीपीएफ चा व्याजदर चांगला आहे. ८%चक्रव्याढ व्याज. पण बर्‍याच जणांना याची काहीच माहिती नसते. कुठलीही जोखिम नसणार्‍या योजनांमध्ये सर्वोत्तम परतावा देणारी दीर्घकालीन योजना आहे. ३. शेअर मार्कॅटात गुंतवणुक करणार असाल तर कोणाच्याही टीप्सवर अवलंबुन राहु नका. स्वत:च अभ्यास करा. ४.फालतु खर्च टाळणे ही पण चांगली गुंतवणुक आहे. वर्षाला ३ वेळा मोबाईल बदलू नका. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 06/29/2009 - 09:36 नवीन
शेअरमार्केटमधल्या घडामोडींचे विश्लेषण करणारे काही ब्लॉग्ज. १.http://stock-mkts.blogspot.com/ २.http://stock-mkts.blogspot.com/ ३.http://ajayshahblog.blogspot.com/ ४.http://www.stockanalysisonline.com/ शेअरमार्कॅट्मधील गुंतवणुक मोठी जोखमीची आणि स्वतः काळजीपूर्वक विचार करुन करायची गुंतवणुक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/29/2009 - 17:37 नवीन
रेलिगेअरमध्ये काम करणार्‍या एका मित्रानं बोलता बोलता सांगितलं की जे काही हातात साठून आहे ते सध्या काढून टाक. जुलैमध्ये करेक्शन येणार. त्यावेळी परत स्टॉक कव्हर करुन घे. ह्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे, बजेट जुलैमध्ये येणार म्हणुन अशी बातमी आहे की पावसामुळे की ही फक्त अफवा? अवांतरः सहजराव, उत्तम सल्ला. अतिशय आवडले मुद्दे. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 07/01/2009 - 05:47 नवीन
>>> रेलिगेअरमध्ये काम करणार्‍या एका मित्रानं बोलता बोलता सांगितलं की जे काही हातात साठून आहे ते सध्या काढून टाक. जुलैमध्ये करेक्शन येणार. त्यावेळी परत स्टॉक कव्हर करुन घे. :) बरोबर... =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
पर्नल नेने मराठे Tue, 06/30/2009 - 07:00 नवीन
सोन्यात गुन्त्वणुक केली तर कित्पत फायदेशिर :-? चुचु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/30/2009 - 10:50 नवीन
ए नान्या, लेका तुझं मत मांड ना! तात्या.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/24/2009 - 12:08 नवीन
युनिट लिन्क प्लॅन घ्यावा... एखाद दुसरा.. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा