एकदा तुम्हाला भेटायलाच पाहिजे किती करता तुम्ही लोकांसाठी
निस्वार्थी मनाने अखेर तात्याना समुपदेशनाची केस पाठवलिच
तुमच्या कडे !!! :) ;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
मास्तर, विंजिनियरिंगला प्रवेश आणि समुपदेशन या मुद्द्यांवर इथे जरी आम्ही तुम्हाला कितीही नडलो तरी कुठची केस कुणाकडे पाठवायची ह्याचं मात्र आम्हाला बरंच नालिज आहे..! :)
अहो ती माऊली प्रथम माझ्याकडे सल्ला मागायला आली होती.. पण तुम्हाला माहित्ये मास्तर, आपण पडलो एक नंबरचा भिकारचोट माणूस..आपल्याला शिक्षण लायनीतलं काय समजतंय? काय घंटा सल्ला देणार होतो मी त्या माऊलीला??
मग मला प्रभू मास्तर नावाच्या एका एंजलची आठवण झाली! म्हटलं मास्तरच यांना काय तो मार्ग दाखवतील. असा विचार करून तुमचा फोन फिरवला!
तात्या.
वा !! तात्या आणि मास्तर ... छाण .. कौतुक वाटतं !! तात्यांचे विषेश आभार, कारण इतर वेळी मास्तरच्या समुपदेशनाला जालावर शिव्या जरी घालत असले तरी प्रत्यक्षात अगदी चांगलं काम केलंय :)
बाकी मास्तर ने नेहमी प्रमाणेच रिकाम्या जागा ठेऊन डोक्याला खाज आणलीये .. कोणते दोन मार्ग सुचवले ते इथं लिहिलं असतं तर बर्याच जणांना न भेटता आपला मेसेज पोचला असता .. असो
(तात्यामास्तरचा फॅण) टारझन
नडायच्या वेळेस फुल्टू नडणार हयगय नाही पण एकदाका गोष्ट पटली की मग मागे पुढे नाही! हाच दिलदारपणा!!
फार कमी लोकांकडे असतो. असाच कायम ठेव!!
आणि प्रभू सर तुम्हाला काय सांगू? भेटल्यावर तुमचे आणि तुमच्या मनातले ओळखून न सांगता पाकीट देणार्या माऊलीचे, पाय धरायचेत एवढंच सांगतो!!
(भाग्यवान)चतुरंग
मास्तर , तुमच्या बोलण्यातूनच तुमचे वेडेपण निदर्शनास येते. तुम्ही सतत कोणाला तरी आयुष्यात उभं करत असता. अशी वेडी माणसं फार कमी असतात, आम्ही स्वार्थी माणसं 'मी आणि माझं कुटूंब' यात रमलेलो, आम्ही इतकेच म्हणू शकतो...मास्तर, लगे रहो.
बाय द वे, तात्याच्या प्रकरणाचा योग्य निपटारा झालाय, तेव्हा तात्या खूश आहे, मास्तर त्या दहावीत पहिल्या आलेल्या मुलीबद्दल लेखन येऊ दे !
-दिलीप बिरुटे
उत्तम केलेत.
भारत तुम्हाला काही कमी पडु देणार नाही... !
बाकी भारताचा जो इंडीया झाला आहे.. त्याबद्दल पर्तिसाद देण्यास नकार.
४४ चा करार बासनात गेला की बघा काय होते ते ! म्हणुनच रामदासांच्या धाग्यावर काहीही बोललो नाही. बोललो असतो तर खरोखरच जिवंतपणी जाळले असते तुम्ही ! असो.
--अवलिया
ई. बी. सी. नावाची एक सवलत काही वर्षे पुर्वीपर्यन्त दिली जात असे. सध्या हि सवलत जर ईन्जीनीअरीन्ग अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहे का?
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
ई. बी. सी. (म्हणजे इकॉनॉमीकली बॅकवर्ड क्लास) ही सवलत अजूनही अस्तित्वात असायला हरकत नसावी (२००० पर्यंततरी होती अस्तित्वात). परंतू ही सवलत गोवर्नमेंट शाळा कॉलेजातच दिल्या जाते. आणि त्यासाठी कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न एका विशिष्ठ आकड्या खाली असायला लागते.
-अनामिक
असे बरेच ट्रस्ट आहेत जे दहावीत चांगले गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना आर्थीक मदत करतात.
उदा : महालक्ष्मी मंदीराचा ट्रस्ट आणि सिद्धीविनायकाचा ट्रस्ट.
अशा सगळ्या संस्थांची यादी किंवा जे आपल्याला ज्ञात आहेत अशांची माहीती मिपाकर देऊ शकतील का?
धन्य आहात सर.
अवांतर: "बेसीन वरचे ओडोमॉस, आफ्टर शेव क्रीम"
बेसीन वर आफ्टर शेव क्रीम समजू शकतो, पण ओडोमॉस तेथे का?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी