राणीच्या मायला एडस कसा झाला ?
कोणामुळे झाला ?
म्हणुन तुम्हाला
फक्त **** ( कथा चांगली आहे पण सभ्रम दुर झाला नाही म्हनुन चार स्टार फक्त)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
मायला एड्स कसा झाला हे नाही समजलं तरी कथेत काही बिघडत नाहीये. कारण कथा एड्स भोवती गुंफलेली नसून राणी या व्यक्तिरेखेभोवती आहे.
तरीही सांगते.. शक्यता आहे की, आबामुळेच झाला.. कारण आबाचे चंदाशी संबंध होते. आणि मायला झाला पण आबाला नाही झाला का? याचं उत्तर मी दुसर्या भागाच्या प्रतिक्रिये मध्ये दिले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मायला एडस कसा झाला? कोणामुळे झाला ?>>
कोणामुळेच झाला असेल असही नाही ना! मायने कधी मधी injection घेतले असेल तर काळजी न घेतल्यामुळे, आधी वापरलेलीच सुई परत वापरल्यामुळे सुद्धा झालेला असू शकतो. किंवा अजूनही अशी अनेक कारणे असू शकतात.
आणि तसेही कथेमधे एड्स कसा झाला, कोणामुळे झाला हे मुद्दे महत्त्वाचे नसताना त्याचा एवढा उहापोह कशाला?
~साक्षी
शेवट अगदीच धक्कादायक असला तरी कथा आवडली.
मस्त जमली आहे ...
खासकरुन कौतुक करावेसे वाटते ते आटोपशीरपणाचे, कुठेही फाफटपसारा अथवा अनावश्यक पाल्हाळ असलेले दिसले नाही, कथेच्या शैलीला पुरक अशी ग्राम्य भाषाही सुरेख जमली आहे...
मस्तच ..
येऊदेत अजुन असेच ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
प्रतिकूल मत झाल्यामुळे खरंतर प्रतिसाद द्यायचा नव्हता पण "कथेच्या शैलीला पुरक अशी ग्राम्य भाषाही सुरेख जमली आहे..." हे वाचून द्यावासा वाटला.
माझ्यामते ग्राम्य भाषा अजिबात जमलेली नाही. शहरीभाषेचं सरळसरळ भाषांतर वाटतय. उदा. "तू काल मला तुझ्या आयुष्याबद्दल सांगून रिकामी झाली", "तुला मी सांगूच शकलो नसतो ही गोष्ट", इत्यादी.
प्रतिक्रिया