Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुस्तक परिचय (तेलाविषयक)

स
सुचेल तसं यांनी
Wed, 07/01/2009 - 17:37  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
4896 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अ
अभिज्ञ Wed, 07/01/2009 - 17:53 नवीन
दुसरे पुस्तक सध्या वाचतो आहे. अतिशय सुरेख व ओघवती भाषा अन तसा नवीनच विषय असल्याने पुस्तक आवडत आहे हे सांगणे न लगे. आपले परिक्षण वाचून "हा तेल नावाचा इतिहास आहे" हे पुस्तक देखील एकदा वाचायला पाहिजे. असो. परिक्षण आवडले. अभिज्ञ -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/02/2009 - 02:42 नवीन
पुस्तक ओळख आवडली.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 07/02/2009 - 02:55 नवीन
एका तेलियाने हे पुस्तक फारच सुरेख आहे.. तीन पारायणे झाली. मीसुद्धा ह्या पुस्तकावर स्वतंत्र लेख लिहिणार होतो पण तुम्हांला आधी सुचलं ते बरं झालं. यामानी हा खरोखरंच अफलातून माणूस आहे, त्यांनी किसिंजर, निक्सन इ मंडळींची जी मारली त्याला तोड नाही. मी तर ह्या माणसाच्या इतक्या प्रेमात पडलोय की सध्या मी त्यांच्यासारखीच दाढीही ठेवली आहे :) फैझलचा खून वाचल्यावर खूप वाईट वाटते.. शैली अतिशय ओघवती आणि गुंगवून टाकणारी आहे..आवर्जून वाचावेच!
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sat, 11/07/2009 - 04:51 नवीन
भारी परिचय.
मी तर ह्या माणसाच्या इतक्या प्रेमात पडलोय की सध्या मी त्यांच्यासारखीच दाढीही ठेवली आहे Smile
हे लय भारी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
अ
अवलिया गुरुवार, 07/02/2009 - 03:10 नवीन
दोन्ही पुस्तकं वाचली आहेत. सुरेख आहेत. --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 07/02/2009 - 06:23 नवीन
खरोखर सुरेख परिचय.. अभिनंदन
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 07/02/2009 - 12:02 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 07/02/2009 - 13:56 नवीन
राजहंस प्रकाशन (दिलीप माजगावकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
च
चतुरंग Fri, 11/06/2009 - 19:38 नवीन
अतिशय ओघवत्या शैलीत आणि सोप्या भाषेत लिहिलेलं हे उत्तम माहितीपूर्ण पुस्तक आहे. विशेषतः तेलासारख्या अक्षरशः हरघडी वापरल्या जाणार्‍या इंधनाबाबत आपण इतके अनभिज्ञ असतो हे पहिल्यांदाच लक्षात आले! संपूर्ण जगाचा इतिहास आणि काही प्रमाणात भूगोल सुद्धा बदलून जाईल इतका उत्पात ह्या तेलानं घडवला आहे आणि पुढेही घडवू शकेल. भांडवलशाही जोपासताना मूल्यं म्हणून काही चीज असते ह्याचा सोयिस्कर विसर अमेरिकन आणि ब्रिटिश तेल कंपन्यांना कसा पडला? सर्व तेलधारक देश हे आपले जन्मजात मांडलिक आहेत असे समजून अमेरिकेने तेल उपसण्याबाबत, तेलाच्या दराबाबत सतत दंडुकेशाहीचं धोरण कसं ठेवलं? ह्याचा इत्थंभूत आढावा ह्या पुस्तकात घेतलाय. सौदी अरेबिया किंवा इतर तेलवाल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये अमेरिकेबाबत इतकी चीड का आहे ह्या प्रश्नाचं उत्तरं ह्या पुस्तकात मिळतं. सीआयए ह्या गुप्तचर संस्थेला हाताशी धरुन अमेरिकन सरकारनं जे काही घृणास्पद खेळ मध्यपूर्वेत खेळले, ओसामा, आयातोल्लाह खोमेनी, सद्दाम ह्यांना वेळप्रसंगी शस्त्रास्त्रे पुरवून रशियाविरुद्ध उभं केलं आणि तेलाच्या व्यवहारात ते आपल्यालाच डोईजड होताहेत म्हटल्यावर निर्दयपणे त्यांना बा़जूला सारायला मागेपुढे बघितलं नाही त्याचाही गोषवरा ह्यात आलेला आहे. किंग फैजल ह्या सौदीच्या अतिशय दिलदार, प्रगतीशील आणि अमेरिकन तेल कंपन्यांना सतत मदत करणार्‍या राजाची तो केवळ एका तेल व्यवहारात आपल्याला डोईजड होतोय असे लक्षात आल्यावर हत्या झाली. ह्यात सीआयएचा हात आहे असा संशय आहे. ते कधीच सिद्ध होऊ शकले नाही परंतु परिस्थितीजन्य गोष्टी कुठे निर्देश करतात ते सुजाण व्यक्ती समजू शकते! तेलटंचाईचे चटके सोसून, दोन महायुद्धे खेळून, विएतनाम, इराक, अफगाणिस्तान च्या लढाया लढून इतक्या वर्षांनंतरही अमेरिकन सरकारच्या इतर जगाला दुय्यम मानून विचार करण्याच्या पद्धतीत फारसा फरक पडलेला नाही हे आजही जाणवतं आणि आपण दिग्मूढ होतो. आमचं नाक कापलं गेलं तरी चालेल पण आम्ही अवलक्षण करणार हा दुराभिमान उद्या जगाला खाईत लोटेल की काय ह्या आशंकेनं पुस्तकाच्या शेवटी आपण ग्रस्त होतो, निदान मी तरी झालो. --------------------------------- अहमद झाकी यामानी ह्या अफलातून व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले आहे त्यामुळे जागोजागी यामानींची थोरवी लेखकाने गायली आहे. कधी क्वचित ती जरा जास्त होते की काय असे वाटून जाते परंतु तो काही फार मोठा दोष नव्हे. हा माणूस अफलातून आहे ह्यात संशय नाही. सगळ्या लोभी आणि व्यवहारशून्य अशा तेलसमृद्ध राष्ट्रांची मोट बांधून अमेरिकेच्या अंगभूत माजुरड्या दंडुकेशाहीला टक्कर द्यायची म्हणजे खायच्या गप्पा नाहीत. ओपेक्/ओआपेक संस्था स्थापण्यात ह्याचा पुढाकार होता. त्यामुळे आज अमेरिकेला व्यवस्थित फाट्यावर मारलेले आहे. नाहीतर हे तेलसाठे अमेरिकेने केव्हाच गिळंकृत करुन सर्व जगाला नाकदुर्‍या काढायला लावल्या असत्या ह्यात मला तरी शंका नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 11/07/2009 - 15:56 नवीन
या पुस्तकाबरोबरच कुबेरांचे नुकतेच आलेले " अधर्मयुध्द" हे पुस्तक हे मला सर्वात जास्त आवडले. आजपर्यंतचा दहशतवादाचा इतिहास अतिशय सुंदर रितीने कुबेरांनि शब्दबध्द केला आहे.संग्रहि असावे असे पुस्तक. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ट
टुकुल Sat, 11/07/2009 - 04:39 नवीन
सुंदर परिचय !! वाचुन बघतो.. रंगासेठ, तुम्ही पण भर टाकली आहे.. --टुकुल
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 11/07/2009 - 08:46 नवीन
पुस्तक परिचय फार आवडला. :) मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sat, 11/07/2009 - 09:39 नवीन
पहिलं पुस्तक वाचलं आहे.चांगली माहिती मिळाली .
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 11/07/2009 - 13:01 नवीन
सुरेख परिचय. चतुरंग यांचा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Sat, 11/07/2009 - 14:28 नवीन
पहिलं पुस्तक वाचलं आहे. तेव्हाच ते प्रचंड आवडलं होतं. कुबेरांची लिखाणाची शैली मस्त आहे. त्यामुळे अवघड विषयही ते छान सोपा करून सांगतात. वाचायलाही मजा येते. पहिल्या पुस्तकात काही शब् कसे रूजले याविषयी त्यांनी फार छान माहिती दिलीय. उदा. आसाममधले दिग्बोई हे आता तेलासाठी प्रसिद्ध असलेले गाव. तिथे तेल असल्याचे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी ते खोदून काढण्यासाठी मजूर लावले. त्यासाठी ते 'डिग बॉय' असे म्हणायचे. यातून म्हणे दिग्बोई हे नाव रूढ झाले. शेल कंपनीच्या बाबतीतही असेच काहीसे स्पष्टीकरण त्यात आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/07/2009 - 19:37 नवीन
चांगला धागा, आधी नजरेतून सुटला होता. सुचेल तसं, चतुरंग, भोचक आणि अभिज्ञ तुम्हा चौघांचे आभार. अदिती
  • Log in or register to post comments
ब
बकुळफुले गुरुवार, 11/12/2009 - 08:30 नवीन
ओपेक वर बृनेई च्या सुलतानाचा किती पगडा आहे? मी एका दिवाळी अंकात सौदी तले सगळे भूगर्भीय तेल काही टेक्नीक वापरून भारतात भूमीखालून आणले ..या कल्पनेवर एक लिखाण वाचले. तेल संपले तर सौदीचे काय होईल हा मोठाच प्रश्न आहे. कदाचित ते दुबई सारखे पर्यटन केंद्र बनवतील. अर्थात इस्लामी पर्यटन केंद्र.
  • Log in or register to post comments
ब
बेभान Wed, 03/17/2010 - 11:31 नवीन
"एका तेलियाने" चा इंग्रजी अनुवाद/ या विषयावरील इंग्रजी पुस्तक सुचवाल काय..? माझ्या एका अमेरिकन मित्राला हवी आहे. वाद घालत बसण्यापेक्षा त्याला हे पुस्तकच द्यावे म्हणतो. "अधर्मयुध्द" हे Peter Bergin यांचे Holy War INC. चा मराठी अनुवाद तर नाही ना?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/17/2010 - 11:59 नवीन
Oil 101 बद्दल ऐकून आहे. अजून पुस्तक हातात पडलं नसल्यामुळे नक्की माहित नाही. एका तेलियाने हा कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद नसावा. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेभान
स
संदीप चित्रे Wed, 03/17/2010 - 18:19 नवीन
'एका तेलियाने' वाचलंय. तुम्ही पुस्तकाचा परिचय खूप छान करून दिला आहे त्यामुळे इथे अजून काही लिहीत नाही. त्या पुस्तकावर मी एक लेख लिहीला होता तो मात्र अजून मिपावर आणायचा राहिलाय.. लवकरच टाकतो. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा