Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समलिंगी संबंध हा गुन्हा नाही: दिल्ली उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

म
मेघना भुस्कुटे
Fri, 07/03/2009 - 06:17
🗣 94 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
48726 वाचन

💬 प्रतिसाद (94)
स
सहज Fri, 07/03/2009 - 06:23 नवीन
निदान कायद्याच्या गैरवापराने जर का अन्याय होत असेल (जसे हे कलम लावून आत टाकतो नाहीतर लाच दे.) तर तो थांबावा. हा धागा फार भरकटू नये इतकी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/04/2009 - 09:02 नवीन
समलिंगी संबंध हा गुन्हा नाही: दिल्ली उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल जळ्ळं त्यात ऐतिहासिक काय, हे कळलं नाही. मुद्दा असा आहे की जर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला नसता तर समलिंगी संबंध घडले नसते का? हा निर्णय देण्याआधीही हा संबंध सुरू असणारच की! आज ज्या समलिंगी मंडळींमध्ये संबंध आहेत ते चार भिंताडा आड तसेच घडत राहणार आहेत. न्यायालयच्या निर्णयाशी त्याचे काय देणेघेणे? बरं दुसरा मुद्दा असा की जर न्यायालयाने आता 'गुन्हा नाही' असा निकाल दिला आहे तर हा निर्णय देण्याआधी हा गुन्हा समजला जात होता का?/असला पाहिजे. तर मग त्या मागची कारणं काय आणि ती कारण आता कशी काय इरेज झाली की जेणेकरून न्यायालयाच्या दृष्टीने आता हा गुन्हा ठरत नाही? आपला, (भिन्नलिंगी) तात्या. अवांतर : प्रतिसादांची बरीच गर्दी झाल्यामुळे मध्येच घुसखोरी करतो आहे! :) मेघनादेवींनी कृपया नवा धागा सुरू करावा ही विनंती..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
न
नितिन थत्ते Sat, 07/04/2009 - 09:52 नवीन
>>जळ्ळं त्यात ऐतिहासिक काय, हे कळलं नाही. तसं ऐतिहासिक काही नाही. वर्तमानपत्रातील शब्दच मेघनाताईंनी वापरले असावेत. >>मुद्दा असा आहे की जर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला नसता तर समलिंगी संबंध घडले नसते का? हा निर्णय देण्याआधीही हा संबंध सुरू असणारच की! आज ज्या समलिंगी मंडळींमध्ये संबंध आहेत ते चार भिंताडा आड तसेच घडत राहणार आहेत. न्यायालयच्या निर्णयाशी त्याचे काय देणेघेणे? तात्या, तुमचे म्हणणे त्या अर्थाने बरोबरच आहे. फक्त त्या कृतीतला शिक्षापात्रपणा आता निघून गेला आहे. म्हणजे अगोदर तुमचे आणि माझे असे संबंध असताना इतरांनी तक्रार केली असती आणि आपण दोघांनी तसे कबूल केले असते (किंवा आपली वैद्यकीय तपासणी होऊन तसे सिद्ध झाले असते) तर आपल्याला शिक्षा झाली असती. आता तसे सिद्ध झाले तरी शिक्षा होणार नाही. :) >>ती कारणं आता कशी काय इरेज झाली की जेणेकरून न्यायालयाने फक्त ते घटनेतील स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी हे 'शिक्षा करणे' विसंगत आहे एवढेच म्हटले आहे. न्यायालयाने हे आधी का म्हटले नाही याचे उत्तर आधी न्यायालयाकडे कोणी गेले नाही असे आहे. समाजाचे पॅराडाइम बदलत जातात. पूर्वी हुंडा घेणे योग्यच अशी समाजाची धारणा होती. हळूहळू हुंडा घेणे अयोग्य अशी धारणा होऊ लागली म्हणुन हुंडा घेणे शिक्षापात्र बनवले गेले. हुंड्याचा आजच्या वधुपित्याला जितका त्रास होतो तेवढाच पूर्वीच्या वधुपित्यालाही होत असे. फक्त आता समाजाचा दृष्टीकोण बदलला आहे. पूर्वी कुटुंबनियोजनाचा प्रचार करणे समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे र धो कर्व्यांना शिक्षा झाली. आता तशी होत नाही. तसा दृष्टीकोण बदलला म्हणुन कोणाला तरी न्यायालयात जाऊन दाद मागितली तर आपल्याबाजूने निकाल मिळण्याची आशा वाटली म्हणून हे आता झाले. नवा धागा काढू नये असे वाटते कारण अनेकदा पहिला धागा न वाचलेले सदस्य जुनीच (भरपूर चर्वण झालेली) बाजू पुन्हा मांडतात. आणि आधी चर्चा केलेल्यांना ~X( असे आणि :''( असे करण्याची वेळ येते नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sat, 07/04/2009 - 11:18 नवीन
म्हणजे अगोदर तुमचे आणि माझे असे संबंध असताना इतरांनी तक्रार केली असती
ऑ?? वरील वाक्यात 'समजा' हा शब्द मस्ट हवा होता..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 07/04/2009 - 13:24 नवीन
तुमचे म्हणणे बरोबर आहे. शब्द राहिला खरा. :D भावना पोचल्या ना? ;) नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/04/2009 - 13:36 नवीन
कोणाच्या ? तुमच्या का तात्यांच्या ?? º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 07/04/2009 - 14:12 नवीन
माझ्या (प्रतिसादातल्या). माझ्या तात्यांबद्दलच्या नव्हे. ;) नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नितिन थत्ते Fri, 07/03/2009 - 07:11 नवीन
सध्या चांगला निर्णय असेच म्हणेन. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/03/2009 - 15:33 नवीन
हेच म्हणते. सध्यातरी चांगला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुनील Fri, 07/03/2009 - 07:35 नवीन
देश खर्‍या अर्थाने २१ व्या शतकात गेला. दिल्ली उच्च न्यायालयाचे अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 07/03/2009 - 07:36 नवीन
अरे वा !! आपण पण एक लायनीच्या धाग्यांच्या शर्यतीत उतरलात का ? जो दुसर्‍यांना तरास न होई पर्यंत काहीही करतो त्याला कोणाचंच ऑब्जेक्शण नसाव !! असो .. ह्या निर्णयात "ऐतिहासिक" असं काय होतं कळेल का ताई ? कोणी होमो सेक्शुअल असो किंवा हेट्रोसेक्शुअल .. इव्हन सेल्फ सेक्शुअल का असेना .. तो त्याचा/तिचा पर्सनल मामला !! कायदा मधे यावाच का ? हा मला पडलेला प्रश्न आहे ! असो ...
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 07/03/2009 - 07:41 नवीन
कोणी होमो सेक्शुअल असो किंवा हेट्रोसेक्शुअल .. इव्हन सेल्फ सेक्शुअल का असेना .. तो त्याचा/तिचा पर्सनल मामला !! कायदा मधे यावाच का ? हा मला पडलेला प्रश्न आहे ! सहमत. पण कायदा मध्ये येत होता. तो अडसर आता दूर झालाय म्हणून हा निर्णय "ऐतिहासिक". Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/03/2009 - 07:52 नवीन
बरं झालं. लोकांना त्यांच्या इच्छे प्रमाणे संबंध ठेवायची परवानगी मिळाली. अवांतरः ह्या धाग्यावर कोर्टाच्या निकालासबंधी चर्चा करताना धागा संस्कॄती बॅशींग अथवा गे बॅशींग कडे वळू नये ही इच्छा.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Fri, 07/03/2009 - 08:08 नवीन
अत्यंत दुर्दैवी निर्णय. विकृतीला कायद्याचे पाठबळ मिळाले. संपूर्ण समाज उद्ध्वस्त होण्याइतपत दूरगामी परिणाम यामुळे होऊ शकतात. पुढील पिढ्यांचा विचार व्हायला हवा होता. दादांचा शेर आठवला. मला त्यांचे हसू आले, भविष्याच्या महाद्वारी कुणापाशी न येणार्‍या, पिढ्यांचा दाखला होता. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 07/03/2009 - 08:22 नवीन
आम्ही फक्त इतकेच म्हणु, "जो जे वांछिल तो ते लाहो....प्राणिजात!" अवांतरःआता घटकंचुकीचा खेळ आणि सामुदायीक प्रणयक्रिडा कायदेशीर होण्यासाठीदेखील याचिका दाखल होणे कदाचित शक्य होईल....शेवटी प्रश्न ज्याच्या इच्छेचा आणि मर्जीचा आहे.... मायबाप सरकार कदाचित अशी याचिकादेखील मंजूर करवून त्यावर १२.५% करमणूक कर लादेल. असो, जो जे वांछिल तो ते.... -ध मा ल जेटली. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 07/03/2009 - 08:27 नवीन
अहो .. असे कसे म्हणता ? अजुन परदेशात कुठे झाला तसा कायदा ... परदेशात झाला एकदा आणी तत्सम विचारवंताना खाद्य कमी पडले नट्यांना चित्रपटात काम मिळेनासे झाले की मिळुन करतील आंदोलने .. करो बापडे !! जमावबंदीसारखा जमावसंभोगाचाही कायदा होईल .. अहो व्यक्तीस्वातंत्र्या आहे मालक .. आहात कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सुनील Fri, 07/03/2009 - 08:25 नवीन
संपूर्ण समाज उद्ध्वस्त होण्याइतपत दूरगामी परिणाम यामुळे होऊ शकतात हे कसे? जर दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवू इच्छित असतील तर संपूर्ण समाज उद्ध्वस्त कसा काय होतो, ते कृपया समजावून सांगावे. उगाच काहीतरी मोघम विधाने नकोत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 07/03/2009 - 08:26 नवीन
विकृती म्हणावे की नाही हे माहित नाही. कायद्याचा उद्देश समाजरचना टिकून रहावी हा असतो. (समाज का टिकायला हवा? तर समाज असण्याने मानव या स्पेसीचे सर्व्हायवल आणि प्रोपेगेशन सुकर होते). त्यादृष्टीने समलैंगिकता प्रचंड वाढून लोकांमधील पुनरुत्पादनाची इच्छा कमी होते आहे आणि त्यामुळे मानवजातीचे भवितव्य धोक्यात आहे असे दिसले तर कायद्याने त्यात ढवळाढवळ करायची गरज पडू शकेल तोपर्यंत 'हार्मलेस अ‍ॅबरेशन' असे म्हणून दुर्लक्ष करायला हवे. काल खरडीतून एका सदस्याशी चर्चा केल्याप्रमाणे 'समलिंगी लग्न' हा प्रकार कायदेशीर करायचा म्हटला तर आणखी तिढे निर्माण होतील. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/03/2009 - 09:11 नवीन
... त्यादृष्टीने समलैंगिकता प्रचंड वाढून लोकांमधील पुनरुत्पादनाची इच्छा कमी होते आहे आणि त्यामुळे मानवजातीचे भवितव्य धोक्यात आहे असे दिसले तर कायद्याने त्यात ढवळाढवळ करायची गरज पडू शकेल...
तसं असेल तर काही पंथ किंवा समाजगट ब्रह्मचर्य आणि स्त्री-पुरुष संबंधानांच (धर्माचं(?) आवरण लावून) मनाई करतात. आणि हे काम गेले काही दशकं सुरू आहे. त्यांनाही कायद्याचा बडगा दाखवावा. लोकं परस्परसंमतीने आपापल्या बेडरूममधे काय करतात हा माझा प्रश्न नाही. खरंतर घटनेच्या या कलमामुळे अनेक (लग्न केलेल्या / न केलेल्या) भिन्नलिंगी जोडप्यांनाही, परस्परसंमती असूनही, काही विशिष्ट प्रकार केल्याबद्दल शिक्षा करता येऊ शकते. मुद्दा हा सुद्धा मांडता येऊ शकतो की कायद्याने लोकांच्या व्यक्तीगत आयुष्यात किती ढवळाढवळ करावी. किंवा एखादा कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करणं शक्य आहे का? जर कलम ३७७चे उल्लंघन अगदी "व्यवस्थित" किंवा "सुसंस्कृत" म्हणता येतील अशा लग्न झालेल्या जोडप्याच्या बेडरूममधेही होत असेल, तर हे कलम खरंच योग्य आहे का? ख्रिश्चन धर्मावर आधारीत बनवलेला हा कायदा, जिथून मुळात आपल्याकडे आला, त्या देशानेही तो मोडीत काढला आहे, तर आपण धर्मनिरपेक्ष असूनही का एवढे ख्रिश्चन (वा मुसलमान) बनत आहोत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 07/03/2009 - 09:22 नवीन
>>तसं असेल तर काही पंथ किंवा समाजगट ब्रह्मचर्य आणि स्त्री-पुरुष संबंधानांच (धर्माचं(?) आवरण लावून) मनाई करतात. आणि हे काम गेले काही दशकं सुरू आहे. त्यांनाही कायद्याचा बडगा दाखवावा. तुमचे म्हणणे बरोबरच आहे. पण जोपर्यंत ही अ‍ॅबरेशन किरकोळ प्रमाणात आहेत तोपर्यंत कायद्याला त्यात लक्ष घालायची गरज नाही. ह्या ब्रह्मचर्य छाप लोकांची (प्रचारकांची) संख्या बरीच असली तरी ९९ टक्क्याहून बहुधा जास्तच लोक त्या प्रचाराला फाट्यावर मारतायत तोपर्यंत दुर्लक्ष करायला हरकत नाही. तसेच 'सलै' लोकांची संख्या किरकोळच असल्याने सध्या तरी कायद्याने त्यात डोकावण्याची गरज नाही असे मला वाटते. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नीधप Fri, 07/03/2009 - 09:34 नवीन
समलिंगी संबंधांमुळे लोकसंख्या कमी होऊन देशासाठी काळजीचे प्रकरण होईल अशी शक्यता येत्या शंभर वर्षात तरी दिसत नाही. उलट लोकसंख्येच्या बेसुमार वाढीला थोडा आळा बसला तरी ते स्वागतार्ह राहील. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिरोटा Fri, 07/03/2009 - 08:37 नवीन
आता पर्यंत समलिंगी संबंध श्रीमंती चाळे समजले जात्.फॅशन्,बॉलिवूड,पेज ३ अश्या लोकांत ह्या मंडळींचा जास्त वावर असायचा.आता कायद्याचे पाठबळ मिळाल्याने निश्चितच ते सुखावले असणार्.मध्यमवर्गात अजुनही समलिंगी लोकांबद्दल घ्रुणा आहे तेव्हा 'आमच्या मुलासाठी आम्ही मुलांचीच स्थळ बघत आहोत' असे उघडपणे म्हणायला अजुन थोडा काळ जावा लागेल. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 07/03/2009 - 08:52 नवीन
आता पर्यंत समलिंगी संबंध श्रीमंती चाळे समजले जात्.फॅशन्,बॉलिवूड,पेज ३ अश्या लोकांत ह्या मंडळींचा जास्त वावर असायचा.
ही माहीती चुकीची आहे.. या लोकांचे संबंध चार्चौघात चर्चिले जातात म्हणून पसिद्धी मिळते इतकंच.. अगदी चहुकडे अश्या व्यक्ती पसरलेल्या आहेत त्याला रंग, धर्म, जात, आर्थिक स्तर कथाचीही बंधने नाहित नक्की निर्णयाचे स्वरूप समजले नसले तरी हा व्यक्तीगत पर्याय निवडायला मुभा दिल्याबद्द्ल कोर्टाचे अभिनंदन ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
य
योगी९०० Fri, 07/03/2009 - 09:04 नवीन
आता पर्यंत समलिंगी संबंध श्रीमंती चाळे समजले जात्.फॅशन्,बॉलिवूड,पेज ३ अश्या लोकांत ह्या मंडळींचा जास्त वावर असायचा. ही माहीती चुकीची आहे.. या लोकांचे संबंध चार्चौघात चर्चिले जातात म्हणून पसिद्धी मिळते इतकंच.. अगदी चहुकडे अश्या व्यक्ती पसरलेल्या आहेत त्याला रंग, धर्म, जात, आर्थिक स्तर कथाचीही बंधने नाहित ऋषिकेश तुमचे बरोबर..मी मला आलेले असे अनूभव येथे मांडले होते. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
नितिन थत्ते Fri, 07/03/2009 - 08:33 नवीन
>>त्यावर १२.५% करमणूक कर लादेल धागा हायजॅक झाला म्हणायचा. लांब रहावे हे बरे. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 07/03/2009 - 08:50 नवीन
आम्ही फक्त इतकेच म्हणु, "जो जे वांछिल तो ते लाहो....प्राणिजात!"
ह्याकडे दुर्लक्ष झालं का साहेब? :) बाकी, अवांतरात लिहिलेलं हे आमचं स्वत:चं वैयक्तिक मत आहे. आणि..... After all, we all agree to disagree on certain points... नाही का? :) असो, -(वैचारिक मतभेद असलेला खराट्यांचा मित्र) ध मा ल कुंचा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 07/03/2009 - 09:12 नवीन
निर्णयाचे स्वागत करतो. हा निर्णय नक्की काय आहे हे मी स्वत; वाचले नाहीये पण साधारणपणे वृत्तवाहिन्यांवर जे काही दिसले त्यावर अवलंबून आहे. मला वाटते की या निर्णायाने फक्त त्या कृत्यातला गुन्हा असणे हा भाग काढून टाकला आहे. कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन वगैरे दिलेले नाही. दोन सज्ञान व्यक्ती एकांतात पूर्णपणे स्वेच्छेने काय करतात हा तिसर्‍या व्यक्तीच्या चर्चेचा अथवा काळजीचा विषय होऊ शकत नाही. याला अपवाद फक्त जर का सुरक्षा यंत्रणांकडे काही सज्जड पुरावा असेल की अशा ठिकाणी काही देशविघातक किंवा संभाव्य गुन्हेगारीबद्दल काही कृत्य चालले आहे असे असेल तर. आणि लैंगिक अत्याचाराबद्दल अथवा सज्ञानतेबद्दल असलेले सर्व कायदे लागू आहेतच. उद्या जर का समलिंगी मंडळींनी त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करायला सुरूवात केली तर मात्र तो समाजाच्या विचाराचा विषय ठरेल, नव्हे ठरायलाच हवा. एकंदरीत या विषयावर आपल्याकडे माहिती आणि चर्चेपेक्षा, अतिअभिनिवेशपूर्ण असे मतप्रदर्शनच चालते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 07/03/2009 - 09:19 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने समलिंगी संबंध ठेवू इच्छिणार्‍या लोकांना नवे बळ मिळाले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यात अभिनंदन कुणाचे करायचे आहे? सर्वोच्च न्यायालयाचे की समलिंगी संबंध ठेवणा-यांचे ? सर्वोच्च न्यायालयाचे असेल तर हा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापेक्षा दिल्ली उच्च न्यायालयाचे अभिनंदन जास्त योग्य राहिल. समलिंगी संबंध ठेवणा-यांचे असेल तर त्यांना जगण्यात येणारा अडथळा दुर झाला असे मानुन त्यांचे अभिनंदन करता येईल. अर्थात, या निर्णयाला अनेक बाजुंनी विरोध होवु शकतो आणि शहाबानो प्रकरणाची पुनुरावृत्ती होवु शकते. विशेषतः ३७७ कलम हे व्हिक्टोरीया राणीच्या काळात (सन १८८३) लादले गेले होते. तेव्हा प्रचलित चर्चचा प्रभाव त्या कायद्यावर होता. आजही अल्पसंख्यांकांच्या धार्मिक भावना संतुष्ट करण्यासाठी सरकार नमते धोरण अवलंबण्याची शक्यता आहे. बाकी सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 07/03/2009 - 09:24 नवीन
चूक दाखवून दिल्याबद्दल आभार. दुरुस्ती केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मिसळभोक्ता Mon, 07/06/2009 - 19:31 नवीन
आजही अल्पसंख्यांकांच्या धार्मिक भावना संतुष्ट करण्यासाठी सरकार नमते धोरण अवलंबण्याची शक्यता आहे. हायज्याक !!!! पण सीरियसली: "नवाबी शौक" मधले नवाब हे अल्पसंख्यांक की बहुसंख्यांक ? -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अभिज्ञ Fri, 07/03/2009 - 09:37 नवीन
परस्पर संमतीच्या समलिंगी संबंधांना न्यायालयाने मान्यता दिलेली पाहून काहिसे आश्चर्य वाटले. काहि प्रश्न मला इथे पडले आहेत ते असे, १. जर परस्पर संमतीने "समलिंगी संबंध" जर कायद्याला मान्य असतील तर मग परस्पर संमतीने केलेले भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत काय?ह्याचाच अर्थ "भिन्नलिंगी संबंधांवर आधारित वेश्याव्यवसाय" हा कायद्याने मान्य केला आहे असे मानावयाचे का? २. समलिंगी संबंधांवर आधारीत उद्या कोणी व्यवसाय चालु केला तर त्याला हा कायदा रोखु शकतो का? ३. समलिंगी संबंध ठेवण्यावर,म्हणजेच एखाद्याने किती लोकांशी संबंध ठेवावे ह्याबाबत काहि बंधने आहेत का? ४. एकच व्यक्ती भिन्नलिंगी व समलिंगी संबंध ठेवू शकते का? उदा. एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि लग्न करू शकतो काय? व त्यातून निर्माण होणा-या समस्यांचे काय? अजून जसे आठवतील तसे देइन. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 07/03/2009 - 09:56 नवीन
अभिज्ञरावांशी सहमत. उत्तम मुद्दे मांडले आहेत. ह्यांचाही कोर्टाने विचार केलेला आहे की नाही ह्यावर मिडियाने/ संबंधीत पी.आर.ने भाष्य केलेले दिसत नाही. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
न
नीधप Fri, 07/03/2009 - 09:56 नवीन
तर मग परस्पर संमतीने केलेले भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत काय?<< अर्थातच आहेत. आपण सगळे कायद्याच्या चौकटीत, कायद्याच्या संमतीने केलेल्या लग्नांच्यातून जन्मलेले आहोत. कायदा भिन्नलिंगी लग्नांवर बंदी घालत नाही तेव्हा नक्कीच भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत परस्परसंमतीने केलेले. २. समलिंगी संबंधांवर आधारीत उद्या कोणी व्यवसाय चालु केला तर त्याला हा कायदा रोखु शकतो का?<< भिन्नलिंगी संबंधांवर आधारीत असलेल्या व्यवसायांना कायद्याने रोखलंय पण तरी ते आहेतच ना? तसेच हेही व्यवसाय अस्तित्वात आहेत. ३. समलिंगी संबंध ठेवण्यावर,म्हणजेच एखाद्याने किती लोकांशी संबंध ठेवावे ह्याबाबत काहि बंधने आहेत का?<< असं काही असतं का? एक पुरूष अनेक बायांशी वा एक बाई अनेक बाप्यांशी संबंध ठेवू शकते ना? त्याला परस्परसंमती असेल तर कायदा काही करू शकत नाही तर इथे कशाला बंधने असतील? ४. एकच व्यक्ती भिन्नलिंगी व समलिंगी संबंध ठेवू शकते का? उदा. एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि लग्न करू शकतो काय? व त्यातून निर्माण होणा-या समस्यांचे काय?<< एकापेक्षा जास्त लग्नांची परवानगी कायद्याने काही धर्मांना दिली आहे. संबंध वेगळा आणि लग्ने वेगळी. लग्नाबाहेर संबंध ठेवायला बहुतेक कायद्याने बंदी आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
छ
छोटा डॉन Fri, 07/03/2009 - 10:18 नवीन
>>परस्पर संमतीच्या समलिंगी संबंधांना न्यायालयाने मान्यता दिलेली पाहून काहिसे आश्चर्य वाटले. :) आम्हाला नाही वाटले, अर्थात हे वियक्तीक मत असल्याने ईट्स ओएक म्हणतो.
१. जर परस्पर संमतीने "समलिंगी संबंध" जर कायद्याला मान्य असतील तर मग परस्पर संमतीने केलेले भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत काय?
हो. कायद्याला मान्य आहेत असे वाटते. जर दोघेही जण सज्ञान असतील तर असे संबंध मान्य आहेत, इथे ते "लग्नाचे जोडपेच" असावे असा काही नियम नाही. अवांतर : इथे दोघेही सज्ञान असणे, स्त्री ही विवाहीत नसणे, शोषण अथवा जोरजबरदस्ती नसणे वगैरे बाबी महत्वाच्या ठरतात. समजा कुठल्या "क्ष" पुरुषाला "य" ही विवाहीत स्त्री काही सेंटिंग लाऊन पटली, त्यांनी संबंध ठेवले तर तो गुन्हा आहे. पहिल्यंदा इथे फक्त पुरुषाला शिक्षा व्हायची आता दोघेही समान दोषी आहेत असे कायदा म्हणतो ...
ह्याचाच अर्थ "भिन्नलिंगी संबंधांवर आधारित वेश्याव्यवसाय" हा कायद्याने मान्य केला आहे असे मानावयाचे का?
गल्लत होते आहे. वेश्याव्यवसाय आणि संबंधांची परवानगी ह्यात गल्लत होते आहे. ज्या ठिकाणी "पैसा, जोर-जबरदस्ती, लालसा,अपेक्षा, लालुच" आदी मार्गांनी समोरच्याचे "शोषण" होते अशा सर्वांना कायद्याची मान्यता नाही. माझ्यामते अजुन कायदा वेश्याव्यवसायाला "शोषणच" समजतो त्यामुळे ह्याला परवानगी नाही ... मुळात वरील विधानच मला पटले नाही, २ विधानांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही ...
२. समलिंगी संबंधांवर आधारीत उद्या कोणी व्यवसाय चालु केला तर त्याला हा कायदा रोखु शकतो का?
१०० %, कायदा तो रोखु शकतो. स्पष्टिकरण वर दिले आहे ...
३. समलिंगी संबंध ठेवण्यावर,म्हणजेच एखाद्याने किती लोकांशी संबंध ठेवावे ह्याबाबत काहि बंधने आहेत का?
भारतात आजकाल प्रत्येक गोष्टीलाच कायदा वगैरे करण्याची आवश्यकता अगर बंधन असण्याची आवश्यकता आहे काय ? हे परस्परांच्या समजुतदारपणावर अवलंबुन असते, उगाच आकाशपाताळ एक करण्याला काय अर्थ आहे ? असो, आपल्याला मी "नाही" असे उत्तर देतो ... >>४. एकच व्यक्ती भिन्नलिंगी व समलिंगी संबंध ठेवू शकते का? हो, ठेऊ शकते ... >>उदा. एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि लग्न करू शकतो काय? प्रॅक्टिकली शक्य आहे असे वाटते. अहो इथे लैंगिकदॄष्ट्या नामर्द असलेले लोक स्त्री शी लग्न करतात हे सत्य आहे ना ? >> त्यातून निर्माण होणा-या समस्यांचे काय? उत्तर पुन्हा तेच. समजुतदारपणा ...!!! आपण नक्की कुणाबरोबर सुखी आहोत हे ठरवावे व मगच लग्न करावे. समजा एखाद्या स्त्रीची फसवणुक झाली तर कायदा त्या स्त्री ला त्वरित "घटस्फोट" घेण्याचे स्वातंत्र्य देतो व त्या पुरुषाला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली शिक्षाही होऊ शकतो ... थोडक्यात समजुतदारपणा महत्वाचा नाही का ? अवांतर : मिपाकरांची आक्रस्ताळी, आकाशपाताळ एक करणारी मते वाचुन मज्जा वाटली ( असे माझे वैयक्तीक मत आहे ). "समलैंगिक संबंध" हे एवढे नविन आणि प्रथमच ऐकतो आहे असे असावेत हे पाहुन अंमळ गंमतही वाटली ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
न
नंदन Fri, 07/03/2009 - 10:04 नवीन
निश्चितच स्वागतार्ह निर्णय. अर्थात अजूनही सर्वोच्च न्यायायलयात यावर स्थगिती येणे किंवा निर्णय फिरवला जाणे शक्य आहे, पण निदान समानतेच्या दृष्टीने पडलेलं छोटं पाऊल म्हणून हे महत्त्वाचं आहेच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 07/03/2009 - 10:19 नवीन
तर मग परस्पर संमतीने केलेले भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत काय?<< अर्थातच आहेत. आपण सगळे कायद्याच्या चौकटीत, कायद्याच्या संमतीने केलेल्या लग्नांच्यातून जन्मलेले आहोत. कायदा भिन्नलिंगी लग्नांवर बंदी घालत नाही तेव्हा नक्कीच भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत परस्परसंमतीने केलेले. ह्याचा अर्थ वेश्याव्यवसाय हा कायद्याला मान्य आहे का? व त्यातून मिळणा-या उत्पन्नावर सरकारला कर मिळतो का? ह्यावर बरेच खोलात शिरता येइल. २. समलिंगी संबंधांवर आधारीत उद्या कोणी व्यवसाय चालु केला तर त्याला हा कायदा रोखु शकतो का?<< भिन्नलिंगी संबंधांवर आधारीत असलेल्या व्यवसायांना कायद्याने रोखलंय पण तरी ते आहेतच ना? तसेच हेही व्यवसाय अस्तित्वात आहेत. अस्तित्वात असणे वेगळे.आता तर इथे कायदाच असे संबंध मान्य करतोय.उद्या कोणीहि दुकान टाकेल कि "बाबारे तुम्हाला असे संबंध ठेवायचे आहे त तर इथे या.मी तयार आहे. दोघेहि संमत असलो कि झाले."हे चालु शकेल काय? इथेहि वेगळ्या प्रकारचा वेश्याव्यवसाय चालु होइलच ना? ३. समलिंगी संबंध ठेवण्यावर,म्हणजेच एखाद्याने किती लोकांशी संबंध ठेवावे ह्याबाबत काहि बंधने आहेत का?<< असं काही असतं का? एक पुरूष अनेक बायांशी वा एक बाई अनेक बाप्यांशी संबंध ठेवू शकते ना? त्याला परस्परसंमती असेल तर कायदा काही करू शकत नाही तर इथे कशाला बंधने असतील? मी ऑफिशिअली विचारतोय. एखादा गे मनुष्य ४ ते ५ जणांशी लग्न करू शकेल ना. हाय काय अन नाय काय. सगळेच संमत असतील तर मग काय? ४. एकच व्यक्ती भिन्नलिंगी व समलिंगी संबंध ठेवू शकते का? उदा. एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि लग्न करू शकतो काय? व त्यातून निर्माण होणा-या समस्यांचे काय?<< एकापेक्षा जास्त लग्नांची परवानगी कायद्याने काही धर्मांना दिली आहे. संबंध वेगळा आणि लग्ने वेगळी. लग्नाबाहेर संबंध ठेवायला बहुतेक कायद्याने बंदी आहे. "लग्नाबाहेर संबंध ठेवायला बहुतेक कायद्याने बंदी आहे." हाच तर लोच्या आहे ना. म्हणजे संबंध ठेवायचे असतील मग ते कसेहि असोत तर मग लग्न आलेच कि. मग असेल एखाद्याला आवड दोन्हि प्रकारे संबंध ठेवायची. त्याच्यावर अन्याय कशाला? अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 07/03/2009 - 10:54 नवीन
>>ह्याचा अर्थ वेश्याव्यवसाय हा कायद्याला मान्य आहे का? व त्यातून मिळणा-या उत्पन्नावर सरकारला कर मिळतो का?<< भिन्नलिंगी संबंध म्हणजे केवळ वेश्याव्यवसायच असं का समजताय तुम्ही? मी वरतीच उदाहरण दिलंय. भिन्नलिंगी संबंध हे कुठल्याही कायद्याने संमत लग्नामधे अपेक्षित असतातच तेव्हा भिन्नलिंगी संबंध ठेवण्यावर बंदी कशी असेल? काय लिहिलंय ते वाचून समजून घ्या ना आधी. वेश्याव्यवसाय कायद्याला मान्य नाहीये म्हणून भिन्नलिंगी संबंधांवर बंदी घालणं योग्य असेल का? मग सगळेच लग्नविषयक कायदे केरात टाकावे लागतील. मूल होणं हाही गुन्हा ठरेल. जो व्यवसाय कायद्याला मान्यच नाही त्यावर शासन कर कसा घेऊ शकेल? संबंधांना संमती आणि व्यवसायाला संमती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे कळतंय का तुम्हाला? >>अस्तित्वात असणे वेगळे.आता तर इथे कायदाच असे संबंध मान्य करतोय.उद्या कोणीहि दुकान टाकेल कि "बाबारे तुम्हाला असे संबंध ठेवायचे आहे त तर इथे या.मी तयार आहे. दोघेहि संमत असलो कि झाले."हे चालु शकेल काय? इथेहि वेगळ्या प्रकारचा वेश्याव्यवसाय चालु होइलच ना?<< परत तेच. भिन्नलिंगी संबंधांचं पण हेच होत नाही का? त्यात वेश्याव्यवसाय होतोच ना. तुम्ही म्हणता तशी कित्येक हाटेलं आहेत जिथे ये बाबा संबंध ठेव प्रकारच्या खोल्या मिळतात. पण म्हणून भिन्नलिंगी संबंध कायद्याने बंद करायचे का? कायद्याने संमत लग्नामधे ठेवलेला असतो तोही संबंधच असतो ती काही पूजा घातलेली नसते. >>मी ऑफिशिअली विचारतोय. एखादा गे मनुष्य ४ ते ५ जणांशी लग्न करू शकेल ना. हाय काय अन नाय काय. सगळेच संमत असतील तर मग काय?<< जर ही सूट हेटरोसेक्श्युअल्स ना आहे तर होमोसेक्श्युअल्स ना का नाही? "लग्नाबाहेर संबंध ठेवायला बहुतेक कायद्याने बंदी आहे." हाच तर लोच्या आहे ना. म्हणजे संबंध ठेवायचे असतील मग ते कसेहि असोत तर मग लग्न आलेच कि. मग असेल एखाद्याला आवड दोन्हि प्रकारे संबंध ठेवायची. त्याच्यावर अन्याय कशाला?<< काय लोचा आहे? संबंध ठेवा ना पण जर लग्नातल्या जोडीदाराने त्यावर आक्षेप घेतला तर कोर्ट केस होऊ शकते. आक्षेप घ्यायचा अधिकार केवळ जोडीदारालाच असतो हे लक्षात घ्या आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/03/2009 - 11:00 नवीन
एखादा गे मनुष्य ४ ते ५ जणांशी लग्न करू शकेल ना. हाय काय अन नाय काय. सगळेच संमत असतील तर मग काय?
एकावेळेला एक लग्न हा भिन्नलिंगी लोकांसाठी असणारा न्याय समलिंगी लोकांना लागू का होऊ नये? भिन्नलिंगी लोकांमधेही वेगवेगळ्या वेळेला पण तरीही अनेक लग्नं करणारे लोकं आहेतच ना? विधवा-विवाह हे त्याचं अतिशय पॉझिटीव्ह उदाहरण असावं. माझ्या मतानुसार, पूर्वी पोलिस समलिंगी संबंध ठेवणार्‍या लोकांना "फौजदारी" कलमं लावून अटक करू शकत होते. आता परस्परसंमती असल्यास पोलिस कुणालाही अडवू शकणार नाहीत. लग्न हा वेगळा मामला आहे. आत्तापर्यंत समलिंगी संबंध कार्पेटखाली सारण्यामुळे अशा जोडप्यांचा विचार करण्याची गरज नव्हती. पण जसंजसे कायदे, त्यांचे अर्थ आणि मुख्य म्हणजे समाज बदलत जाईल तेव्हा अशा जोडप्यांच्या लग्नांचा आणि त्यांच्या मिळकतीच्या संदर्भात कायदेही बनवावेच लागतील. अगदी अलिकडपर्यंत लिव्ह-इनला मान्यता न देणार्‍या युनायटेड किंगडमनेही "आता लिव्हवाली जोडपी, त्यांची मुलं आणि घटस्फोट यांचं प्रमाण लक्षणीय असल्यामुळे" लिव्ह-इन जोडप्यांसाठी कायदे बनवले. या गोष्टी बदलायला वेळ लागतात पण बदलतात. आज कायदा नाही, नियम नाही याचा अर्थ पुढे असणारच नाही असं नाही; त्यामुळे समलिंगी जोडप्यांमुळे प्रॉब्लेम्सच वाढणार असंही समजण्याची गरज नाही. काल कुठे न्यायसंस्थेने त्यांना पहिली मान्यता दिली आहे, अजूनही समाज या लोकांना आपल्यातले समजत नाही आहे. वेळ लागेल, पण सर्व बाजू लक्षात घेऊन समलिंगी जोडप्यांसाठीही कायदे अस्तित्त्वात येऊ शकतात. आणि समाजात अमान्य आहे किंवा कायद्याने गुन्हा आहे म्हणून समलिंगी जोडपी आत्तापर्यंत भारतात नव्हतीच का? नक्कीच होती आणि आहेत. त्यांचे व्यवहार (बहुतांशी) व्यवस्थित सुरू असणार. त्यामुळे या अशा जोडप्यांसाठी कायदे, नियम बनवता येणारच नाही असं नाही. प्रश्न आहे तो थोड्या कालावधीचाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
अ
अभिज्ञ Fri, 07/03/2009 - 11:25 नवीन
दोघेहि भिन्न पर्स्पेक्टिव्ह ने बोलत असल्याने चर्चा भरकटतेय. माझा मुद्दा हा एकच आहे. जेंव्हा कायदा हा "परस्पर संमतीने" हा शब्द वापरतो तेंव्हा त्याला अनेक अ‍ॅंगले ने पाहता येइल. पहिला मुद्दा आहे "भिन्नलिंगी संबंधांना कायद्याची संमती" ह्यात मी हा प्रकार विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलत आहे. नवीन कायद्याच्या धर्तीवर जर का एखादी व्यक्ती भिन्नलिंगी विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा होऊ शकणार नाहि.कारण ह्यात दोघांची परस्पर संमती गृहित धरलेली आहे व पहिल्या जोडिदाराच्या मताला ह्यात काहि किंमत नाहि कारण हि इतर दोघांचि परस्पर संमती आहे. नाहि का? आता वळुयात वेश्याव्यवसायाकडे. इथे तर खुल्लम खुल्ला परस्पर संमती असतेच कि. दोघेहि डिल करून हवे तसे संबंध ठेवू शकतात. तरीहि त्याच्यावर इतके दिवस कायद्याने बंदी आहेच ना? मग हा तर त्याच्या पुढचा प्रकार. तो कसा काय कायद्याला मान्य आहे? तुम्हि म्हणताय कि संबंधांना संमती व व्यवसायाला संमती ह्या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. मला वाटते ह्यातली सीमारेषा फारच धुसर आहे. ह्याचे व्यवसायात परिवर्तन कधी होईल हे सांगता येत नाहि. किंबहुना ह्या "समलिंगी" लोकांची एकंदर कमी असलेली संख्या पाहता ह्याचे व्यवसायीकरण होणार हे निश्चितच. भले ते पडद्याआडून का चालेना. ह्यावर सरकार/पोलिस/न्यायालये कसे काय नियंत्रण ठेवणार? समलिंगी संबंधात अपत्य होण्याचा धोका नसल्याने ह्या प्रकाराकडे अनेक लोक आकर्षित होणार नाहित कशावरून? बरेच बेकार ह्या प्रकाराला आपला उपजीविकेचा व्यवसाय बनवणार नाहीत कशावरून? असे अनेक प्रश्न निर्माण होतीलच. मग ह्या सर्वांचा विचार केला तर लग्न ह्या संस्थेला काय अर्थ राहिला? फक्त परस्पर संमती असली कि झाले. कोणीहि कुणाशिही संबंध ठेवा. लग्न नको अन घटस्फोट नको अन अपत्येहि नकोच. काहिच बंधन राहणार नाहीत. मग माणसात व कुत्र्यात फरक तो काय राहील? (वेळे अभावी थोडक्यात लिहायचा प्रयत्न केलाय.जमल्यास सविस्तर लिहेन.) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 07/03/2009 - 12:19 नवीन
ह्यात मी हा प्रकार विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलत आहे.<< हे आधीच सांगायला काय झालं होतं? >>नवीन कायद्याच्या धर्तीवर जर का एखादी व्यक्ती भिन्नलिंगी विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा होऊ शकणार नाहि.कारण ह्यात दोघांची परस्पर संमती गृहित धरलेली आहे व पहिल्या जोडिदाराच्या मताला ह्यात काहि किंमत नाहि कारण हि इतर दोघांचि परस्पर संमती आहे. नाहि का?<< नाही. परस्पर संमती असल्यास गुन्हा नाही असे म्हणताना दोघांपैकी एकाच्या कायदेशीर जोडीदाराने आक्षेप घेतला तर न्यायालयाला ते मानावेच लागेल कारण अ‍ॅडल्टरी हा आपल्याकडे गुन्हा मानलेला आहे. सब घोडे बारा टक्के या पद्धतीने ह्या नवीन तरतुदीकडे बघणं योग्य नव्हे. >>आता वळुयात वेश्याव्यवसायाकडे. इथे तर खुल्लम खुल्ला परस्पर संमती असतेच कि. दोघेहि डिल करून हवे तसे संबंध ठेवू शकतात.<< म्हणून तर कायद्याने बंदी असूनही हा व्यवसाय वाटापळवाटा काढून फोफावत राह्यलेला आहे. >>मग हा तर त्याच्या पुढचा प्रकार. तो कसा काय कायद्याला मान्य आहे?<< इथे लोचा आहे. समलिंगी संबंध ठेवणारी व्यक्ती आणि वेश्या यांची तुलना कशी काय करता येईल? समलिंगी संबंध ठेवणारी व्यक्ती ही तुमच्या आमच्यासारखीच नॉर्मल व्यक्ती असते. तुम्हाआम्हाला जेवढी लैंगिक संबंधांची जरूर, गरज आणि इच्छा असते तेवढीच त्याही व्यक्तीला असते. अशी अनेक जोडपी मला माहीती आहेत पुण्यामुंबईतली सुद्धा. अनेक जण चांगले मित्र आहेत माझे. अतिशय गुणी कलाकार, अतिशय हुशार प्राध्यापक असे अनेक लोक आहेत. ते त्यांच्या बेडरूममधे काय करतात हा त्यांचा मामला आहे. जोवर कुणावर जबरदस्ती, अन्याय केला जात नाहीये तोवर. दोन माणसांना एक आदिम गरज भागवण्यातून आनंद मिळालेला असतो इतकंच आहे. वेश्येची संमती ही मिळणार्‍या पैशांसाठी असते. तिला त्यातून यत्किंचितही आनंद मिळत नसतो. तिचं आणि तिच्या मुलांचं त्यावर पोट भरणार असतं बास. प्रत्येक वेश्येचे सगळ्यात मोठ्ठी महत्वाकांक्षा धंद्यातून बाहेर पडणे किंवा निदान मुलाला/मुलीला तरी यातून बाहेर काढणे याच्याशीच निगडीत असते. तेव्हा तिथे परस्परसंमती आलीच कुठे? >>ह्याचे व्यवसायात परिवर्तन कधी होईल हे सांगता येत नाहि. किंबहुना ह्या "समलिंगी" लोकांची एकंदर कमी असलेली संख्या पाहता ह्याचे व्यवसायीकरण होणार हे निश्चितच.<< शरीरसंबंधांचे भिन्न वा सम असो, पण त्यांचे व्यावसायिकरण गरीबी आणि ग्राहकाचे अस्तित्व यातून घडते. तसे काही प्रमाणात इथेही घडेल पण भिन्नलिंगी संबंध आणि भिन्नलिंगी वेश्याव्यवसाय यांचे जे प्रमाण आहे त्यापेक्षा फार काही वेगळे प्रमाण असणार नाही. असंही नाहीये सर्वच समलिंगी लोकांना पोटापाण्यासाठी 'धंदा' करण्याशिवाय पर्याय नाही. अनेक लोक आहेत जे आपापल्या क्षेत्रात फार वरच्या पातळीवर आहेत किंवा वरच्या पातळीवर नसले तरी त्यांचं व्यवसायक्षेत्र वेगळं आहे आणि ते त्यात कार्यरत आहेत. पोटापाण्यासाठी शरीरविक्रय किंवा विकतचे शरीरसुख ही गरज प्रत्येक समलिंगी व्यक्तीची नाही. जशी ती प्रत्येक भिन्नलिंगी व्यक्तीचीही नसते. बादवे, तुमच्याकडे समलिंगी लोकांची लोकसंख्या किती याचे आकडे आहेत का? >>समलिंगी संबंधात अपत्य होण्याचा धोका नसल्याने ह्या प्रकाराकडे अनेक लोक आकर्षित होणार नाहित कशावरून?<< अपत्य होण्याच्या धोका नाही म्हणून कितीजण मुळात भिन्नलिंगी प्रवृत्ती असतानाही समलिंगी संबंधांना पसंती देतील? तुम्हीच सांगा. शेवटी हा मुळातल्या इन्क्लिनेशनचा भाग आहे. >>बरेच बेकार ह्या प्रकाराला आपला उपजीविकेचा व्यवसाय बनवणार नाहीत कशावरून?<< असे अनेक भिन्नलिंगी बेकार युवक आणि युवती आत्ताही कार्यरत आहेतच की. वेश्याव्यवसायात बायकांची मोनोपॉलि नाहीये. पुरूष वेश्याही आहेत. आणि 'गे' वा 'लेस्बो' वेश्याही आहेत. तेव्हा या तरतुदीमुळे ते वाढतील यात काहीच अर्थ नाही. >>मग ह्या सर्वांचा विचार केला तर लग्न ह्या संस्थेला काय अर्थ राहिला?<< ही तरतूद अस्तित्वात नसतानाही ज्याला लग्न संस्थेला नाकारायचेय, फसवायचेय तो नाकारत/ फसवत होताच. आणि ज्यांना ते बायंडींग मानायचंय ते मानत होतेच. काहीजण लग्न न करताही ते बायंडींग मानत होते. या तरतुदीमुळे लग्न संस्थेला अर्थ रहाणार नाही असे वेगळे काहीच घडणार नाही. नाकारणारा नाकारेल, फसवणारा फसवेल, मानणारा मानेल. >>फक्त परस्पर संमती असली कि झाले. कोणीहि कुणाशिही संबंध ठेवा. लग्न नको अन घटस्फोट नको अन अपत्येहि नकोच. काहिच बंधन राहणार नाहीत. मग माणसात व कुत्र्यात फरक तो काय राहील?<< तुम्ही जे बोलताय ते सगळं भिन्नलिंगी संबंधांच्या बाबतीतही तसंच्या तसं म्हणता येईल. मग समलिंगी संबंधच वाईट काय म्हणून? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
न
नितिन थत्ते Fri, 07/03/2009 - 11:38 नवीन
सध्या भिन्नलिंगी संबंधांचे नियंत्रण वेगवेगळ्या कायद्यांनी केले जाते. हे कायदे बर्‍याच प्रमाणात समाजाच्या तत्कालीन विचारसरणीचे प्रतिबिंब असते. भिन्नलिंगी संबंधांचे नियंत्रण करण्यासाठी विवाहविषयक आणि वारसाविषयक कायदे असतात. त्या कायद्यांच्या रचनेतून समाजाला कोणते संबंध मान्य आहेत आणि नाहीत हे कळते. भिन्नलिंगी संबंधांबाबत असे कायदे आवश्यक असतात कारण त्या संबंधांतून संतती जन्माला येते आणि मालमत्ताविषयक त्रांगडी उद्भवतात. समलिंगी संबंधातून असे काही होणार नसल्याने कायद्याने ते रोखण्याची गरज नाही. तसेच ते संबंध लग्नाचे आहेत की बिनलग्नाच याबाबतही कायदा न्यूट्रल असायला हरकत नसावी. (अवांतरः हा विषय अचानक समोर आला आहे. त्यावर आधीचे चिंतन केलेले नाही. त्यामुळे बहुधा सगळ्यांचेच विचार या विषयावर विस्कळित असावेत. ठाम संस्कृतीरक्षक सोडले तर) नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 07/03/2009 - 12:04 नवीन
सर्वप्रथम : दृष्टिकोन की दृष्टिकोण? जे असेल ते समजून घ्यावे. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल काय आहे? उभय़संमत समलिंगी संबंध घटनाबाह्य किंवा कायदाबाह्य नाहीत. न्यायालयाने त्यासंबंधीच्या युक्तिवादाची मांडणी केली आहे. वृत्तसंस्थांतील निकालाच्या बातम्यांच्या अनुषंगाने ती येथे मांडतो - "घटनेच्या अनुच्छेद १४ नुसार सर्व जन कायद्यासमोर समान आहेत. घटनेच्या अनुच्छेद १५ नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारे जनांमध्ये भेदबाव करता येत नाही. घटनेच्या अनुच्छेद २१ नुसार जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे राज्यसंस्थेचे (स्टेट या अर्थी) कर्तव्य आहे... लैंगिक भेदभावाविरोधात संरक्षणाचा मूलभूत हक्क असल्याने सामान्य किंवा नैसर्गिक लैंगीक निवडी-आवडीच्या विरोधी मानल्या जाणाऱ्या वर्तनावरून भेदभाव होता कामा नये." भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ मध्ये परस्परमान्य समलिंगी संबंध गुन्हा ठरवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या उपरोक्त मांडणीचाच विस्तार केला तर भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द ठरवावेच लागते. निकाल आत्ताच आला आहे. निकाल एका विशिष्ट मुद्यापुरता मर्यादित आहे. समलिंगी संबंधांना कायद्याची मान्यता असावी की नको हा तो मुद्दा आहे. त्याचा फैसला असावी अशा अर्थाने दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आता या संबंधांचे नियमन कसे करावयाचे हा पुढचा तपशीलाचा मुद्दा आहे. इथे एक गोम आहे. ज्या समतेच्या तत्त्वाच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला तेच तत्त्व तर्कदृष्ट्या तेथेही लागूच होते. त्यामुळे समलिंगी संबंध, त्यांचे नियमन हे विषमलिंगी संबंध आणि त्यांचे नियमन यांना लागू असणाऱ्या व्यवस्थापनात्मक तत्त्वांनीच होईल. तसे करावयाचे नसल्यास न्यायालयाला समलिंगी संबंधांना मान्यता देण्यामागचे अधिष्ठान (जे समतेचे तत्त्व आहे) बदलावे लागेल. कायद्याच्या दृष्टीने दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल दिल्ली प्रदेशापुरता (जो प्रदेश दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायीक कक्षेत येतो त्यापुरताच) मर्यादित आहे. त्यामुळे मुंबईत किंवा दिल्लीव्यतिरिक्त इतरत्र असे संबंध असणाऱ्यांवर आत्ताही कारवाई होऊ शकते. संपूर्ण भारताला हा निकाल लागू व्हावयाचा असेल तर अर्थातच भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द व्हावे लागेल. त्यासाठी एकतर सर्वोच्च न्यायालय ते रद्द ठरवू शकेल किंवा केंद्र सरकार स्वतःहून कायदादुरूस्ती करू शकेल. समलिंगी विवाह - अर्थातच समतेचे तेच तत्त्व लावले तर एकच विवाह शक्य असेल. पण आता एक पंचाईत येतेय. विवाह किंवा लग्न हा पिढीविस्तारासाठीचाही करार (जुन्या काळच्या पत्रिका आठवा) असतो. येथे पिढीविस्तार हा सरळसरळ विषमलिंगी संबंधातून अपत्यप्राप्ती याच अर्थाने आजवर तरी आहे. विवाहसंबंधांवर कंत्राटविषयक कायद्यातील तरतुदींचाही प्रभाव अनेकदा पडतो. त्याशिवाय, परंपरा, रुढी यातून आलेल्या सामाजिक करारासारख्या काही संकल्पनाही तेथे लागू होतात. त्या साऱ्यांचा विचार नव्या संदर्भात करून मगच समलिंगी संबंधांचे व्यवस्थापन होऊ शकणार आहे. तोवर केवळ परस्पर संमती हाच मुद्दा प्रभावी राहील. त्यातून निर्माण होणारे वाद निस्तरताना इतर मुद्दे येतील आणि परिस्थिती स्वच्छ होत जाईल. अर्थात, तोवर समाजावर फार काही संकट वगैरे कोसळेल असे मानण्याचे कारण नाही. समलिंगी संबंधांना कायद्याची मान्यता मिळाल्याने समाजाच्या दृष्टिकोनात बदल होणार नाही. समाज त्यांच्याकडे किमान आणखी बराच काळ तरी थोड्या वेगळ्या नजरेनेच पहात राहणार. अशा मंडळींना समाजाच्या बंधनांच्या भीतीपोटीच हे संबंध चोरटे ठेवावे लागणार. येथे सर्वत्र परस्पर संमतीच्या संबंधांचा विचार केला आहे. जबरदस्तीच्या नाही. तसे झाले तर तेथे भारतीय दंड संहितेतील कलम ३७६ सक्षम आहेच. अर्थात, आता त्या कलमात बलात्काराच्या व्याख्येच्या अनुषंगाने समलिंगी संबंधांचाही उल्लेख करावा लागेल. समलिंगी संबंध आपल्याकडे यापूर्वी नव्हते वगैरेत काही अर्थ नाही. समाजशास्त्रीयदृष्ट्या त्याविषयीचे डॉक्यूमेंटेशन झालेले नसावे. पण असे संबंध ठेवणारी माणसे आहेत. अगदी उच्चभ्रू वर्गापासून ते तथाकथित निम्न स्तरावरही आहेत. पुण्या-मुंबईत आहेत आणि अगदी कागवाड, बोरकुंड अशा गावांमध्येही होती, असतील. गेल्या अडीच दशकांच्या समाजातील कळत्या वावरातून जे दिसले, पाहिले त्यावरून हे लिहितो आहे. त्याहीपेक्षा मोठा काहींकडे असेलच. त्यामुळे समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्याने इतका गहजब करण्याचे कारण नाही. समाजाची बांधणी इतकी लेचीपेची खचितच नसते. आणि ती बांधणी तयार होत जाते तीदेखील त्या-त्या समाजातील घटकांच्या वर्तनातूनच. समलिंगी संबंध ठेवणारे समाजाचे घटक नाहीत असे जोवर म्हणणार नसू तोवर समाजावर संकट मानण्याचे कारण राहात नाही. आणि त्यांना ज्या क्षणी समाजाचे घटक मानणार नाही, त्या क्षणी उद्भवणारे संकट मात्र भयावह असेल...
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Fri, 07/03/2009 - 12:16 नवीन
कायदा जे ठरवायचे ते ठरवो. पण एक गोष्ट नक्कीच की या प्रकाराचीही न्यायालयाला फोड करुन सांगावी लागेल. स्त्री -पुरुष संबंधातही काही संबंध कायद्याने अवैध ठरवले आहेत. उदा. मुलगा-आई, बाप्-मुलगी वगैरे. तर समलिंगी संबंधातही असे काही कायद्याने अवैध ठरवतील का ? उदा. भाऊ-भाऊ, बहीण्-बहीण, आई-मुलगी, बाप-मुलगा. तरी कायदेतज्ञांनी मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 07/03/2009 - 12:37 नवीन
वर अनेकदा चर्चेत ३७७ कलम आले आहे.. ते काय आहे हे फक्त संदर्भ म्हणून इथे देतो आहे . इशारा: पुढील नियमाच्या मसुद्यात सामान्यतः चारचौघात न बोलल्या जाणार्‍या शब्दांचा/क्रीयेचा वापर/वर्णन असु शकतो: ---------- कलम ३७७: अनैसर्गिक गुन्हा कोणत्याही व्यक्तीने जर इतर कोणत्याही पुरुष, स्त्री अथवा प्राण्याबरोबर अनैसर्गिक लैगिक संभोग केला तर सदर गुन्हेगारास गुन्हा सिद्ध झाल्यास (गुन्हाच्या पातळीनुसार) आजन्म कारावास, दहा वर्षांपर्यंत कैद किंवा दंड यापैकी एक शिक्षा व्हावी भाष्यः वरील गुन्हासाठी ३७७ कलमाअंतर्गत शिक्षा देण्याकरिता एखाद्या क्रियेस संभोग म्हणण्यासाठी केवळ योनीप्रवेशही (पेनिट्रेशन)पुरेसा आहे. ----------- या वरून असे कळते की ३७७मधे केवळ अनैसर्गिक क्रियेसाठी शिक्षा आहे. कशास अनैसर्गिक म्हणावे हे न्यायाधिशावर सोडले आहे. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Fri, 07/03/2009 - 12:39 नवीन
मोडक साहेबांची प्रतिक्रिया संयत, सुंदर आहे. पण सर्व प्रकारची जबरदस्ती ३७६ च्या कक्षेत बसणार नाही. आयपीसी ३७६ फक्त बलात्कारासाठीची शिक्षा स्पष्ट करते. बलात्काराची व्याख्या कलम ३७५ मधे आहे आणि त्या व्याख्येनुसार फक्त स्त्रीवर्च बलात्कार होऊ शकतो. ती व्याख्या अशी आहे:- 375. Rape. A man is said to commit "rape" who, except in the case hereinafter excepted, has sexual intercourse with a woman under circumstances falling under any of the six following descriptions: - First: - Against her will. Secondly: -without her consent. Thirdly: - With her consent, when her consent has been obtained by putting her or any person in whom she is interested in fear of death or of hurt. Fourthly: -With her consent, when the man knows that he is not her husband, and that her consent is given because she believes that he is another man to whom she is or believes herself to be lawfully married. Fifthly: - With her consent, when, at the time of giving such consent, by reason of unsoundness of mind or intoxication or the administration by him personally or through another of any stupefying or unwholesome substance, she is unable to understand the nature and consequences of that to which she gives consent. Sixthly: - With or without her consent, when she is under sixteen years of age. Explanation: - Penetration is sufficient to constitute the sexual intercourse necessary to the offence of rape. Exception: -Sexual intercourse by a man with his wife, the wife not being under fifteen years of age, is not rape]. मुळात हा विषय एवढा व्यापक आहे की दिल्ली हायकोर्टाचा निकाल संपुर्ण वाचल्याशिवाय या विषयावर निष्कर्श काढणे अवघड आहे. बातम्या वाचुन आणि पाहुन माझा समज असा झाला आहे की कलम ३७७ रद्द केलेले नाही तर स्वखुशीने समलिंगी संबंध ठेवणार्‍या लोकांना त्याच्या कक्षेतुन वगळले आहे. जर ते कलम पुर्णच वगळले असेल तर बरेच गंभीर विषय उपस्थित होतील. कुठेतरी वर समलिंगी विवाहाचा मुद्दाही चर्चेत आला. माझ्या मते या निकालाचा त्या मुद्याशी या क्षणी संबंध येवु नये कारण लग्न आणि त्याची वैधता आयपीसीच्या कक्षेत येत नाही. हा विषय फॅमिली लॉ च्या कक्षेत यावा आणि तेथे काहीही बदल झालेले नाहीत. आणखी एक विषय आला होता तो समलिंगी वेश्याव्यवसायाचा. तो विषयही आयपीसीच्या कक्षेपलीकडे, इम्मॉरल ट्रॅफिकिंग (प्रिव्हेंशन) अ‍ॅक्टखाली येतो. त्या कायद्यानुसार वेश्याव्यवसायाची व्याख्या अशी आहे:-२ (फ) "Prostitution" means the sexual exploitation or abuse of persons for commercial purposes, and the expression "prostitute" shall be construed accordingly. ----- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 07/03/2009 - 12:54 नवीन
पण सर्व प्रकारची जबरदस्ती ३७६ च्या कक्षेत बसणार नाही. सहमत. म्हणूनच मी म्हटलं होतं की, त्यातही समलिंगीच्या अनुषंगाने बदल करावे लागतील. कलम ३७७ रद्द केलेले नाही सहमत. माझे तेच म्हणणे आहे. ते कलम रद्द करावे लागेल स्वतंत्रपणे. त्या कलमातून स्वेच्छीक समलिंगीना वगळले हा अर्थ अगदी बरोबर आहे. लग्न आणि त्याची वैधता आयपीसीच्या कक्षेत येत नाही. हा विषय फॅमिली लॉ च्या कक्षेत यावा आणि तेथे काहीही बदल झालेले नाहीत. नेमके. त्या कायद्यापलीकडे तिथे सामाजिक रुढी-परंपरा, कंत्राट हेही मुद्दे येतात इतकेच माझे म्हणणे आहे. मी कुटुंब कायद्याचा उल्लेख केला नाही. तो गृहित धरला. एकूण +१!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Fri, 07/03/2009 - 13:04 नवीन
कलम ३७७ रद्द केलेले नाही. ते कलम रद्द करावे लागेल स्वतंत्रपणे.... जर दिल्ली हायकोर्टाने फक्त समलिंगीना कलम ३७७ मधुन वगळले असेल तर ते ठीक आहे. पण कलम ३७७ पुर्णपणे रद्द केले तर खूप गंभीर परिणाम होतील असे माझे व्यक्तीगत मत आहे. ____ Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Fri, 07/03/2009 - 13:20 नवीन
कलम रद्द झालेले नाही. ते स्वतंत्रपणे करावे लागेल. किंवा त्यातून परस्परसंमतीचे समलिंगी संबंध वगळल्याची सुधारणा करावी लागेल देशभरात ते मान्य होण्यासाठी. सध्याच्या घडीला दिल्लीपुरता तो विषय संपलेला आहे. तेथे परस्परसंमतीचे असे संबंध न्यायालयाच्या निकालानुसार मान्यताप्राप्त ठरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
स
सुनील Fri, 07/03/2009 - 12:55 नवीन
श्रावण मोडक यांचा अभ्यासू प्रतिसाद आणि पुनेरी यांचा ससंदर्भ प्रतिसाद आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 07/03/2009 - 13:24 नवीन
मोडक साहेब आणि पुणेरी, माहीतीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा