Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दी अनटोल्ड, अनसीन ऑफ मुंबई टेरर ऍटॅक...

क
कळस
Sat, 07/04/2009 - 17:45
🗣 62 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11937 वाचन

💬 प्रतिसाद (62)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 07/05/2009 - 16:37 नवीन
सकाळी हे व्हीडीओज पाहिले आणि तेव्हा आलेली खिन्नता आणि असहाय्यपणाची जाणीव अजूनही त्रास देत आहे. अजून किती दिवस ती छळत राहिल माहित नाही.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 07/05/2009 - 19:20 नवीन
असल्या हल्ल्यावर उत्तर म्हणजे आपले गुप्तहेरखात्याने आपले कौशल्य पणाला लावून पाकिस्तानातील ह्या कृत्याचे कर्ते करविते शोधून काढणे आणि त्यांना वेचून ठेचून मारणे. पण आपल्या षंढ राज्यकर्त्यांकडून असे होईल असे वाटत नाही. मागे २००० साली विमान अपहरण, अतिरेकी मुक्ती वगैरे नाचक्की झाल्यावर त्यावेळच्या "पोलादी" "कणखर" "राष्ट्रभक्त" सरकारने काही केल्याचे ऐकिवात नाही तर हे "निधर्मी" सरकार काही करेल असे मला वाटत नाही. पुढच्या हल्ल्याची वाट बघणे एवढेच आपल्या हाती! आणि हो, कसाबला फाशी देणे हा भाजपसमर्थक विरुद्ध "पुरोगामी" ह्यातल्या संघर्षाचा तद्दन राजकीय मुद्दा कधी बनतो हे ही बघू या.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 07/06/2009 - 05:23 नवीन
काय आहे ह्या दुव्या मधे, इथे ते दिसत नाही, कृपया कोणि सांगेल का?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 07/06/2009 - 14:16 नवीन
असल्या हल्ल्यावर उत्तर म्हणजे आपले गुप्तहेरखात्याने आपले कौशल्य पणाला लावून पाकिस्तानातील ह्या कृत्याचे कर्ते करविते शोधून काढणे आणि त्यांना वेचून ठेचून मारणे.
२६/११ खालील कारणांमुळे घडले आहे: १)गुप्तचर संघटनांकडे असलेली अपुरी माहिती. २)गुप्तचर संघटना आणि पोलिस ह्यांमधले मतभेद. ३)नविन तंत्रज्ञानाचा अभाव. ४)पोलिस आणि गुप्तचर संघटनांमध्ये असलेला भ्रष्टाचार ह्यात 'षंढ' राजकारणी लोकांचा तेवढा संबंध नाही. ऐकीव माहितीनुसार ईंटिलिजन्स ब्युरो,रॉ ह्या भारताच्या गुप्तहेर संघटना आहेत. ईंटिलिजन्स ब्युरो भारताचे अंतर्गत संरक्षण तर रॉ भारताबाहेरील ईंटिलिजन्स गोळा करते. ह्या दोन्ही संघटनांमध्ये आणि स्थानिक पोलिसांमध्य हेवेदावे/मतभेद असतात. एका संघटनेने मिळवलेली माहिती दुसर्‍या संघटनेला मुद्दामून न देणे असे प्रकार व्यक्तिगत फायद्यासाठी घडतात्.रॉ संघटनेमध्ये तर मोठ्या प्रमाणावर वशिलेबाजी चालते.(काही महिन्यांपुर्वीच एका स्त्री अधिकार्‍याने होणार्‍या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.) शिवाय ईंटिलिजन्स ब्युरो मध्ये होणारे पोस्टिंग म्हणजे बर्‍याचवेळा शिक्षा समजली जाते कारण तिकडे 'खायला' खूप कमी वाव असतो. तेव्हा केवळ 'षंढ' राजकारणी लोकाना दोष देण्यात अर्थ नाही. ते काय ,येतात आणि जातात.ठराविक धर्माच्या लोकाना खूष करण्यासाठी देशाच्या सुरक्षेकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करतील हे पटत नाही. २६/११ नंतर ह्या संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची घोषणा झाली होती.त्याचे काय झाले माहित नाही. क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 07/06/2009 - 17:57 नवीन
कुठलाही धोरणात्मक बदल मग तो युद्ध करायचा असो, छुपे युद्ध सुरु करायचा असो वा कुठले न्यायप्रविष्ट प्रकरण लवकर निकालात काढण्याचा असो. सत्ताधारी नेतेच हा निर्णय घेऊ शकतात. सरकारी संस्था कितीही ताकदवान असली तरी असला मूलगामी निर्णय ती परस्पर घेऊ शकतच नाही. रॉची स्थिती दयनीय असली तर ते ओळखून आणि आजची गरज ओळखून सत्ताधारी पक्षाने पावले उचलली पाहिजेत. पण त्यातून फार मते मिळत नसल्यामुळे कुणी ते करू इच्छित नाही हे उघड आहे. उलट ह्या नेत्यांच्या मनात एक छुपी भीती आहे की पाकविरुद्ध काही कारवाई केली तर मी मुस्लिम व्होटबॅंक तर गमावणार नाही ना? आपले मत की राजकीय नेते अगदी निष्पाप आणि ही विविध सरकारी खाती तीच काय ती कलंकित हे अत्यंत भाबडेपणाचे वाटते. नको तिथे पदोपदी राजकीय हस्तक्षेप करून बदल्या, बढत्यांचे खेळ करणारे सत्ताधारी इथे तो खेळ करून हवे ते इप्सित मनात आणले तर साध्य करु शकतील पण त्यांचे षंढत्व आड येते. षंढत्व अशासाठी की मामुली स्वार्थाकरता देशाच्या हिताकडे काणाडोळा करायला ह्यांना काही लाज वाटत नाही. मात्र यंव करू आणि त्यंव करु अशा बाता मारायला ते कमी करत नाहीत. आणि ह्या बाबतीत भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष तेवढेच आघाडीवर आहेत जेवढे कॉंग्रेस. अशाने जागरुक मतदारांत निरुत्साह पसरला नाही तरच नवल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
स
संताजी धनाजी Mon, 07/06/2009 - 12:28 नवीन
एकही व्हीडिओ दिसत नाही आहे. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 07/06/2009 - 13:38 नवीन
ह्या चित्रफिती पाहून व नंतर इथल्या काही "सभासदांच्या" बाष्कळ चर्चा वाचून अजूनच उबग आलाय. मेणबत्तीवाले काय, अफगाणिस्तान काय, इराक काय,इस्त्राईल काय कारगिल युध्द काय,संघ परिवार काय.. अग्गागा काही विचारू नका. एकानेही ह्या चित्रफितीबद्दल व ह्या भीषण प्रकाराबद्द्ल न बोलता फुक्या प्रतिसादांची मंडई इथे जी मांडली आहे त्याबद्दल तीव्र उद्वेग वाटतो. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 07/06/2009 - 16:09 नवीन
>>एकानेही ह्या चित्रफितीबद्दल व ह्या भीषण प्रकाराबद्द्ल न बोलता फुक्या प्रतिसादांची मंडई इथे जी मांडली आहे त्याबद्दल तीव्र उद्वेग वाटतो.<< आपले सविस्तर विचार समजून घेयला नक्कीच आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ह
हुप्प्या Mon, 07/06/2009 - 18:03 नवीन
चर्चा समजावून न घेता निव्वळ एक मताची पिंक टाकणे मग ती कुणाच्या अंगावर पडते का काय त्याची पर्वा न करणे ह्यातून आपण काय सिद्ध करत आहात? ज्याला आपण "विचारांची मंडई" म्हणता त्याला उहापोह, चर्चा, वाद असे आम्ही म्हणतो. त्यातून अनेक गोष्टी कळतात. नवे विचार कळतात. आपले विचार दुसर्‍याला पटवता येतात. अन्य देशांचा उल्लेख व्हायचे साधे सोपे कारण हे की असे हल्ले अन्य देशांवर झाले तेव्हा त्यांनी काय केले आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का? अर्थात हे सगळे समजायची कुवत नसेल वा त्यात काही स्वारस्य नसेल तर अशी एक निव्व्ळ पिंक टाकण्यात काय अर्थ आहे? तुम्ही आपले आवडीचे विषय निवडा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
अ
अभिज्ञ Tue, 07/07/2009 - 07:43 नवीन
चर्चा समजावून न घेता निव्वळ एक मताची पिंक टाकणे मग ती कुणाच्या अंगावर पडते का काय त्याची पर्वा न करणे ह्यातून आपण काय सिद्ध करत आहात? हि चर्चा अतिशय दिशाहिन आहे असे माझे स्प्ष्ट मत आहे. ज्याला आपण "विचारांची मंडई" म्हणता त्याला उहापोह, चर्चा, वाद असे आम्ही म्हणतो. त्यातून अनेक गोष्टी कळतात. नवे विचार कळतात. आपले विचार दुसर्‍याला पटवता येतात. वा. क्या बात है. लगे रहो. अन्य देशांचा उल्लेख व्हायचे साधे सोपे कारण हे की असे हल्ले अन्य देशांवर झाले तेव्हा त्यांनी काय केले आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का? सगळ्यात विनोदी वाक्य. इतर देश जेंव्हा अशा प्रसंगाला सामोरे जातात तेंव्हा ते त्यांच्या कुवतीनुसार यथायोग्य कणखर निर्णय घेतात. त्यांना नाही हो असले प्रश्न पडत? की भारताने अशा परिस्थितीत काय केले होते, किंवा भारत काय करत होता ?. थेट कृती करून ते मोकळे होतात.परिणामांची फिकीर दहशत निर्माण करणा-यांना पडते. हे असले प्रश्न फक्त आपल्याला पडतात. आपल्या देशाकरीता ,आपल्या देशाच्या व समाजाच्या सुरक्षेकरीता जे जे योग्य आहे व आवश्यक आहे ते ते सर्व ती राष्ट्रे कुठल्याही आंतर्राष्ट्रीय दबावाला बळी न पडता करतात. अशावेळी तिथला समाजही एकसंघ रित्या त्या सरकारच्या पाठीमागे उभे राहतो. इथल्या प्रतिक्रिया वाचून आपण अजूनही "कणाहीन व राष्ट्राभिमान नसलेल्या " समाजात वावरत आहोत ह्याचेच प्रत्यंतर येतेय. "कारगिल काय,कंदहार काय, भारतात दरवर्षी घडणारे बाँबस्फोट काय अन अलीकडचा हा मुंबई अतिरेकी हला काय ?" आपल्याला अशाने काय फरक पडतोय? तेवढ्यापुरता निषेध नोंदवायचा झाले. मग थोड्याच दिवसात ते सर्व विसरून जायचे. मग पुन्हा आपल्याला जाग येणार ती पुढच्या घटनेला. नाही का? लोकशाही असूनही इथली जनता आपले इप्सित सरकारच्या माध्यमातून साकार करू शकत नाही, आपल्या सुरक्षेबाबत सरकारवर कुठलाही दबाव टाकु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारवाईची वेळ असताना "काही लोकांना" मग मोदी आठवतात,ऋतंभरा आठवतात,बाबरी आठवते पण स्फोटात मृत्युमुखी पडलेले लोक आठवत नाहीत, अनेकांचे उध्वस्त झालेले संसार आठवत नाहीत, अपंग झालेले आयुष्यातून उठलेले कारण का तर आपण एका "सेक्युलर" देशाचे नागरीक आहोत. मोदी नसते,बाबरि पडली नसती तर हे अतिरेकी हल्ले झाले नसते हा सर्वात मोठा गैरसमज समाजात पसरवायचे काम पध्दतशीर पणे चालु आहे. तेंव्हा असल्या बाष्कळ व निरुपयोगी चर्चा तावातावाने करून फार काही हशील होईल असे मला तरि वाटत नाही. त्याकरीताच ही मताची पिंक. तुमचे चालु द्यात. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
आ
आशिष सुर्वे Tue, 07/07/2009 - 08:52 नवीन
नमस्कार मित्रानो, सध्या ह्या चित्रफीती मुख्य संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत.. पण अधूनमधून मी २६/११ च्या इतर चित्रफीती पहात असतो. मन अस्वस्थ होते. मला अजून ती काळरात्र आठवते.. रात्रीचे १०.३० वाजले होते आणि मी नुकताच जेवून निवान्त पुस्तक चाळत पहुडलो होतो. आई तेवढयात स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि मला दूरदर्शन वर बातम्याची वाहिनी सुरु करण्यास सान्गून परत अद्रुश्य झाली. मी तटस्थपणे बातम्या सुरु करून परत माझ्या पुस्तकात घुसलो. कानावर शब्द पडू लागले... 'सी. एस. टी. ' स्थानकाबाहेर गोळीबार.. हातातले पुस्तक केव्हा गळून पडले, कळालेच नाही.. मग ए़कांमागून एक बातमी येत गेली.. कामा इस्पितळ.. ताज.. मी फक्त ऐकत होतो.. रात्र वाढत होती आणि नेहमीप्रमाणे डोळ्यावर येणारी झोप आज मात्र नाहिशी झाली होती. दूरदर्शन सन्चावर 'ए. टी. स.' चे प्रमुख 'हेंमन्त करकरे' दिसत होते. शरीरावर चिलखत, उजव्या हातात बन्दूक, निर्भिड चेहरा.. एकन्दर एक प्रातिनिधीक पोलिस अधिकारी.. एवढयात भ्रमणध्वनीवर एक दोनदा बोलून झाले.. काय बोललो ते आठवत नाही.. पण मी सुखरुप आहे, माझे निकटवर्तीय सुखरुप आहेत हे कळल्यावर टाकलेला एक 'मध्यमवर्गीय निश्वास' आठवला. तेवढयात ती बातमी आली.. 'ए. टी. स.' प्रमुख 'हेंमन्त करकरे' गोळीबारात जखमी. मनात चलबिचल झाली. डोळे सताड उघडे होते. मधून मधून 'ताज' च्या बातम्या येत होत्या. मी त्या पहात होतो, वाचत होतो, ऐकत होतो.. वाचता वाचता अचानक एकामागून एक बातम्या धडकू लागल्या.. 'ए. टी. स.' प्रमुख 'हेंमन्त करकरे' शहीद.. वरिश्ट पोलिस अधिकारी 'विजय साळ्सकर' शहीद.. वरिश्ट पोलिस अधिकारी 'अशोक कामते' शहीद.. मन सुन्न झाले.. आजूबाजूला काय चालू आहे ते कळेनासे झाले.. दूरदर्शन सन्च धूसर दिसू लागला.. पुढचे २-३ दिवस असेच गेले.. त्यानन्तर काही दिवस बर्‍याच चर्चा झडल्या.. मोर्चे निघाले.. मेणबत्या लावण्याचे प्रकार झाले.. पुरावे देऊन झाले.. कडक समजही दिली.. पण निश्पन्न काय झाले? काही नाही.. २६/११ वर चर्चा होतेय हे योग्यच आहे.. ह्या जखमा भरता कामा नये.. कारण आपण अजूनही 'इशारे'च देत आहोत.. आणि मेणबत्या पेटवत आहोत.. मला मात्र अजूनही माझ्या 'मध्यमवर्गीय निश्वासा'ची लाज वाटते आहे.. लाज वाटते आहे.. 'शहिदाना माझे दन्डवत्'
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 07/07/2009 - 09:13 नवीन
त्यान्च्या भावना मेल्या असतील.. माझ्या अजुनही जिवन्त आहेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा